महिषासुरमर्दिनी, मल्लिकार्जुन मंदिर

विवेक मराठी    26-Sep-2022
Total Views | 111
 @स्वप्ना कुलकर्णी
 

devi 
सातव्या शतकात पट्टदक्कल येथे राजे विक्रमादित्य द्वितीय यांच्या राणीने त्रैलोक्यमहादेवीने या देवळाचे बांधकाम करून घेतले आहे. सँडस्टोनमध्ये घडवलेले मंदिर द्रविड शैलीतील आहे. भिंतीवर उत्तम कलाकुसर आहे. मुख्य म्हणजे देऊळ सुस्थितीत आहे. खिडक्यांना जाळ्या असून वेलबुट्ट्या आणि भौमितिक आकृती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवरील कोनाड्यात देव-देवता कोरले आहेत.
 
 
 
येथील देवी महिषासुरमर्दिनी याच रूपात असून अत्यंत देखणी आणि कमनीय आहे. अंगावर दागिने आहेत, मुख्यत्वे हातात पाटल्या, गोठ, बांगड्या आहेत, सर्पाकृती बाजूबंद आहेत. कानात कुंडले आहेत. केस शीर्षभागी गुंफले आहेत. गळ्यात हार आहे. पाठीवर बाणांचा भाता आहे. अष्टहस्त असून हातांत त्रिशूल, तलवार, भाला ही शस्त्रे आहेत. बाकीचे हात चक्र-गदेने सुशोभित आहेत. एका हातात घंटा, तर दुसर्‍या हातातील शंख तिच्या आगमनाची ग्वाही देत आहेत. एक हात पाठीवरील भात्यातील बाण काढत आहे. तलवार महिषासुराच्या छातीत व त्रिशूल मानेत खुपसला आहे आणि देवीचा एक पाय महिषासुराच्या डोक्यावर आहे. ती महिषासुराचा अंत करत आहे.
 
 
लेख