ज्या देशाच्या इतिहासात रणांगणावरील पराक्रमापासून ते शास्त्रार्थातील विद्वत्तेपर्यंत स्त्रियांनी नेहमीच नेतृत्वाची धुरा सांभाळली, त्याच देशाच्या धोरणकर्त्या सभागृहात मात्र आजही त्यांचा सहभाग जेमतेमच आहे. 1996 पासून संसदेच्या उंबरठ्यावर रेंगाळलेले महिला आरक्षणाचे स्वप्न 2023 मध्ये कायद्याच्या रूपात साकार झाले खरे; पण अंमलबजावणीच्या वाटेवर आजही ‘डिलिमिटेशन’चे अडथळे उभे केले जात आहेत. उत्तर विरुद्ध दक्षिण असा कृत्रिम वाद निर्माण करून किंवा तांत्रिक पेच उभे करून महिलांच्या हक्कांची अडवणूक नेमकी कोणासाठी केली जात
कॉर्पोरेट क्षेत्रात काही ठिकाणी नियोजित पद्धतीने धर्मांतरण घडवून आणले जात असल्याच्या चर्चा पुढे येत आहेत. नाशिकमधील आय.टी. कंपनीत उघडकीस आलेले प्रकरण हे याचाच भाग असून ते हिमनगाचे टोक असल्याचे सूचित करते; त्यामुळे या मुद्द्याकडे केवळ वैयक्तिक किंवा मर्यादित दृष्टीने न पाहता व्यापक पातळीवर विचार करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत कर्मचार्यांनी जागरूक राहून परस्परांना आधार देत सावधपणे वागणे हीच आजची खरी गरज बनली आहे.
ऊर्जा ही आजच्या काळात अन्न-वस्त्र-निवार्याइतकीच महत्त्वाची गरज बनली आहे. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे गॅसचे पर्याय बदलत असून त्यामागं तांत्रिक आणि आर्थिक कारणं आहेत. एलपीजी आणि पीएनजी हे दोन्ही गॅस वेगवेगळ्या स्त्रोतांवर आधारित असल्यानं त्यांच्या उपलब्धतेत फरक दिसतो. जागतिक घडामोडींचा परिणाम एलपीजीसारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या इंधनांवर अधिक होतो. पीएनजी गॅस हा नैसर्गिक वायूवर आधारित असल्यामुळे तो तुलनेनं सुरक्षित आणि सातत्यानं उपलब्ध राहू शकतो. देशांतर्गत साठे आणि पायाभूत सुविधा यामुळे पीएनजीकडे झुकाव वा
यश मिळविण्याच्या बाबतीतील गुणसंपदा अमेरिकेने संपादन केली, यश पचविण्यात अमेरिका अयशस्वी झाली. वेगवेगळ्या अध्यक्षांच्या रूपाने या घमेंडखोर अमेरिकेचा चेहरा जगासमोर यायला लागला. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका या युद्धात वीस दिवसांची शस्रसंधी झालेली आहे. या शस्त्रसंधीने डोनाल्ड ट्रम्प यांचे नाक कापले गेले आहे, हे मात्र स्पष्ट झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धातील जागतिक खलनायक झालेले आहेत.
नेतृत्व आव्हाने दूरदृष्टी या त्रिसूत्रीवर आधारित, श्रीगुरुजींची बौद्धिके, भाषणे, पत्रसंवाद आणि जीवनप्रवासावर आधारित हा विशेषांक साकारला जाणार आहे.
‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ अशी सध्याची स्थिती आहे. ...आणि अनेक युद्धे ही प्रत्यक्ष युद्धभूमीवर नाही, तर मनोभूमीवरही लढली जातात याचे भान ठेवले; तरच या ’बहुरूपी जिहादशी’ दोन हात करणे शक्य आहे.
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध आणि त्याचे जगावर होणारे परिणाम याने जगभरातली माध्यमे ओसंडून वाहत आहेत. दरम्यान आपल्याकडे पंतप्रधान कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या वारंवार बैठका घेत होते. अजित डोवाल सुरक्षेबद्दल हाय लेवल मीटिंग घेत होते, आपले लष्करप्रमुख पुरीला जाऊन जगन्नाथाला सैनिकांच्या आरक्षणासाठी प्रार्थना करत होते...आणि याच दरम्यान तमिळनाडूच्या किनारपट्टीवर ऊर्जेच्या क्षेत्रातले ब्रह्मास्त्र तयार होत होते. भविष्याच्या कपाळावर भारताचे नाव ठळकपणे कोरले जात होते..
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असलेले, अद्वैतवादाचे प्रणेते, मूर्तिपूजेचे पुरस्कर्ते, पंचायतन पूजेचे प्रर्वतक आणि संन्यास धर्माचे महत्त्व वाढणारे आद्य शंकराचार्य यांची आज जयंती. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी अलौकीक कार्य केले आहे. या भारतमातेच्या सुपुत्राला अभिवादन करणारा लेख..
अलिबागस्थित श्रीक्षेत्र कनकेश्वराच्या शिखरावर जून 1876 साली श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मीभूत श्री लंबोदरानंद स्वामीजींनी श्री रामसिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली. आध्यात्मिक साधनेसोबत समाजसेवेचे व्रत त्यांनी गणेशभक्तांना दिले. यंदाचे वर्ष हे श्री रामसिद्धिविनायक मंदिराचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
बीड बायपास येथील हेडगेवार रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात श्रीराम नवमीच्या दिवशी विधिवत शिलान्यास कार्यक्रम संपन्न झाला. संभाजीनगर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या वैद्यकीय शिक्षण संकुलामध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाने वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि फिजियोथेरेपी कॉलेज सुरू झाले आहे.
मी आस्तिक आहे. देऊळ, चर्च, मशिद काही दिसलं की हात आपसून जोडले जातात. पण एक चांगली शक्ती म्हणजे परमेश्वर किंवा निर्गुण निराकार सत्याचे रूप म्हणजे परमेश्वर हे माझ्या छोट्या मेंदूला पुरत नाही, म्हणून भगवंतांची साजिरी गोजिरी रूपं आणि त्यांच्या सन्मार्गाने आयुष्य घालवण्याच्या कथा मला भुरळ घालतात. या सगळ्या वाटचालीत राम अगदी लहानपणापासून सतत भेटत राहिला आणि कणाकणाने मनात उतरत राहिला.
चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा! नव्या संवत्सराचे स्वागत. अशा साठ संवत्सराचे चक्र सांगितले गेले आहे. दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवे संवत्सर सुरू होते. यावर्षी विश्वावसु नावाचे संवत्सर संपून सुरू होते आहे पराभव नावाचे नूतन संवत्सर!
स्त्रियांच्या बाबतीत पौगंडावस्था, रजोनिवृत्ती आणि गर्भधारणा हे त्यांच्या आयुष्याचे तीन महत्त्वाचे कालखंड असतात. या तिन्ही काळात निरनिराळ्या कारणांनी त्यांचे वजन वाढत जाते. मात्र त्याकाळात जाणीवपूर्वक लक्ष न ठेवल्यास जरुरीपेक्षा जास्तच वजनवाढ होणे अटळ ठरते आणि ते आरोग्याला बाधक ठरून असंख्य विकारांना निमंत्रण ठरते.
आपले वजन कमी करताना, सर्वांगीण आरोग्याला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने ते कमी व्हायला पाहिजे, नुसत्या कॅलरीज मोजून नव्हे. आपण खाणार आहोत त्या अन्नघटकाचे ‘पोषणमूल्य’ सर्वात महत्त्वाचे असते. नुसत्या कॅलरीज कमी घेण्याऐवजी कमी कॅलरीजचा, पण सर्व अन्नघटकांनी समृद्ध असा आहार घ्यावा, त्यामुळे आरोग्य दीर्घकाळ सुस्थितीत राहते.
आश्लेषा नक्षत्राचे दैवत सर्प असल्यामुळे हे नक्षत्र ‘गूढता’, ‘तीक्ष्ण बुद्धिमत्ता’ आणि ‘संरक्षण’ यांचे प्रतीक मानले जाते. नाग जसा आपली जुनी कात टाकून नवीन रूप धारण करतो, तसाच नागकेशराचा वृक्ष शरीरातील जुने आजार आणि विषारी घटक बाहेर काढून शरीराला नवीन ऊर्जा देतो. हा वृक्ष आरोग्याचे आणि नैसर्गिक सौंदर्याचे एक अक्षय्य वरदान देईल.
आपल्याला दैनंदिन जीवनात लागणार्या कॅलरीजचा विचार करून जर आपला आहार आखला तर वाढलेले वजन नक्कीच आटोक्यात येते. वजन कमी करताना सातत्य आणि दीर्घदृष्टी ठेवावी. कारण आपण आहारयोजना नियमितपणे पाळत राहिलो तरच वजन हळूहळू कमी होत जाते आणि त्यानंतर कमी झालेले वजन काटेकोरपणे पाळून ताब्यात ठेवता येते. या संदर्भातील एक आदर्श आहारयोजना देत आहोत.
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहे. पारंपरिक शेतीपासून तंत्रज्ञानाधारित, मूल्यवर्धित आणि बाजाराभिमुख शेतीकडे होत असलेली वाटचाल शेतकर्यांच्या आत्मनिर्भरतेला नवी दिशा देत आहे. उत्पन्नवाढ, जलव्यवस्थापन, पीक विविधता आणि प्रक्रिया उद्योग यांच्या जोरावर शेती आता नफ्याचा व्यवसाय बनत आहे. या बदलातूनच राज्याच्या एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला बळ मिळणार आहे.
भारतासारख्या विशाल देशात गोआधारित वैदिक शेती शाश्वत पर्याय म्हणून उदयास येत असताना, सातार्यातील युवा शेतकरी सचिन ताम्हाणे यांनी या संकल्पनेला वास्तवात उतरवले आहे. गोपालन, मूल्यवर्धित उत्पादने, नैसर्गिक शेती आणि पारंपरिक उद्योग यांचा संगम साधत त्यांनी समृद्धीचे प्रभावी मॉडेल उभे केले आहे. निसर्ग, शुद्धता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर घडलेली ही प्रेरणादायी यशोगाथा अनेकांसाठी दिशादर्शक ठरते.
विदर्भाच्या मातीत रुजलेला आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळवून घेतलेला गौळाऊ गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार आहे. काटक बांधा, उष्णतेला तोंड देण्याची क्षमता आणि औषधी गुणांनी समृद्ध अ-2 दूध ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. मात्र बदलत्या परिस्थितीत लुप्ततेच्या उंबरठ्यावर आलेल्या या वारशाचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक समुदाय पुढे सरसावला आहे.
बांबू उद्योगाच्या यशामागे भक्कम पुरवठा साखळी हीच खरी किल्ली ठरते. शेतकरी, उद्योजक, तंत्रज्ञ आणि शासन यांच्या समन्वयातून कच्चा माल, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांची अचूक सांगड घातली तर उद्योगाला गती मिळते. चीनने याच सूत्राचा अवलंब करत बांबू क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली, यातून शाश्वत विकास आणि ग्रामीण समृद्धीचा आदर्श उभा राहिला.
खेळ सुरळीत, न्याय्य आणि विश्वासार्ह राहण्यासाठी मैदानावर दिसणार्या खेळाडूंइतकाच महत्त्वाचा एक अदृश्य आधार म्हणजे अंपायर आणि रेफरी. त्यांच्या निर्णयक्षमतेवर संपूर्ण खेळाची दिशा, गती आणि अंतिम निकाल अवलंबून असतो. अंपायर आणि रेफरी ही भूमिका आज पूरक न राहता, स्वतंत्र ओळख आणि वाढत्या संधींसह एक सन्माननीय करिअर म्हणून उभी राहत आहे.
क्रीडा पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, तर एक जबाबदारी आहे. खेळातील सत्य, भावना आणि प्रेरणा जगासमोर मांडण्याचे काम या क्षेत्रात केले जाते. जर तुम्हाला खेळाची आवड, लेखनाची ताकद आणि सत्य शोधण्याची जिद्द असेल, तर क्रीडा पत्रकारिता तुमच्यासाठी एक उत्तम, रोमांचक आणि प्रभावी करिअर ठरू शकते.
क्रीडा समालोचक हा आवाज आणि ज्ञान यांचा सुंदर संगम आहे. जर योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण सराव, खेळावरील प्रेम, शब्दांवर पकड आणि लोकांना गुंतवून ठेवण्याची कला असेल तर क्रीडा समालोचन हे तुमच्यासाठी रोमांचक आणि सन्मानाचे करिअर ठरू शकते आणि या क्षेत्रात नावलौकिक मिळू शकते.
आताच्या भारतीय संघाने हे विजेतेपद आपल्याकडे राखताना नवीनच आदर्श घालून दिला आहे. या संघाकडे विजयाचं सातत्य आहे, न डगमगणारं धैर्य आहे, समोरच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवण्याची मर्दुमकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकालाभिमुख खेळण्याची कणखर मानसिकता आहे. युवा खेळाडूंचा हा संघ खर्या अर्थाने निडर आहे. पराभवाने ते विचलित होत नाही. त्यांना आस आहे मोठ्या कामगिरीची. भारतीय संघाने मिळवलेलं यश पाहिलं तर, वैयक्तिक मापदंडांनी नाही तर सांघिक कामगिरीने या संघाने हे यश खेचून आणलं आहे. हे यश मिरवताना जे वर्चस्व राखलं आहे
संगीताच्या विशाल नभांगणात आशाताईंनी निर्माण केलेलं स्वतःचं स्थान म्हणजे त्यांनी अपार कष्टाने मिळवलेला स्वतःचा चंद्र आहे. चिमूटभर चांदण्यात समाधान मानणारी अल्पसंतुष्टता नाकारत जिद्दीने मिळवलेला पूर्णचंद्र! आशाताईंनी स्वरांचा असा आनंदलोक आपल्यासाठी निर्माण केला आहे की, जिथला चंद्र कधीच मावळत नाही!
1977 आणि 1980 मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला. लोकसभेत त्यांची भाषणे नेहमी अभ्यासपूर्ण, संयत आणि प्रभावी असत. विरोधकांनाही ऐकून घेण्याची तयारी, तथ्यांवर आधारित युक्तिवाद आणि संसदीय परंपरांचा आदर यामुळे ते सर्वपक्षीय मान्यता मिळवणारे नेते ठरले. जनतेच्या दैनंदिन अडचणी-रोजगार, पाणीपुरवठा, नागरी सुविधा यांसोबतच देशहिताचे व्यापक मुद्दे त्यांनी मांडले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर लोकसेवेसाठी असते, हा संदेश त्यांच्या कार्यात
‘वन्दे मातरम्’ विषयाचे पूर्ण वर्षभर कार्यक्रम करून हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोहोचवून स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहाणारे ’वन्दे मातरम्’ जागराचे प्रणेते मोहनराव अळवणी. पुण्याच्या संघसमर्पित व्यक्तींच्या नामावळीतील मोहनराव अळवणी यांचे 8 फेब्रुवारी 2026रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले.
जीवनाचा मूलार्थ सांगून कर्म-उपासना बळकट करण्याचा संदेश प.पू. सद्गुरुदास महाराज यांनी प्रत्यक्ष आचरणातून साधकांना दिला. आज जरी ते देहाने आपल्यात नसले, तरी त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यातील ‘शककर्ते शिवराय’ हा एक युगप्रवर्तक ग्रंथ ठरला आहे. त्यांनी स्थापन केलेली उपासना केंद्रे आणि त्यांनी दिलेले विचार हे येणार्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. ‘धर्मभास्कर’ ही विद्वत जनांनी दिलेली पदवी, त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवली. महाराष्ट्राच्या मातीतील हा ‘सांस्कृतिक दीप’ सदैव तेवत राहील यात शंका नाही. या ध्येयन
विवेक पुस्तक प्रकाशनतर्फे 13 एप्रिल 2026ला म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. पुस्तकातील एक प्रकरण विवेकच्या वाचकांसाठी...
गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता...
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये