कीड नियंत्रणासाठी पितांबरी अ‍ॅग्रिकेअरची नवी उत्पादने!

विवेक मराठी    21-Sep-2024   
Total Views |
pitambari
शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी पितांबरी अ‍ॅग्रिकेअर विभाग सतत प्रयत्नशील आहे. पितांबरी अ‍ॅग्रिकेअर डिव्हिजनने ’गोमय’ या सेंद्रिय खताच्या निर्मितीपासून कृषी निविष्ठा क्षेत्रात आपले पाय रोवले. याचबरोबर पितांबरीने द्रवरूप खते व बायोस्टिम्युलंट्स आणली असून यातून शेतकर्‍यांना प्रचंड फायदा होत आहे.
 
 
पितांबरी अ‍ॅग्रिकेअरने एकात्मिक खत व्यवस्थापनेबरोबरच ’एकात्मिक कीड व्यवस्थापनावर’ लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत पीक लागवडीपासून कीड नियंत्रण व्यवस्थापनासाठी भौतिक, रासायनिक, जैविक अशा विविध पद्धतींचा अवलंब करून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीखाली आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे सर्व पातळ्यांवर किडींचे नियंत्रण केले जाते. पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, तसेच फक्त जैविक किंवा रासायनिक अशा एकाच उपाययोजनेचा वापर न करता, बदलते ऋतू, नैसर्गिक व पर्यावरणीय बदल, शेतीचे क्षेत्र यांनुसार जैविक, रासायनिक व भौतिक उपाययोजनांचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
 
 
एकात्मिक कीड नियंत्रणाद्वारे कीड व रोग यांचा प्रादुर्भाव रोखून प्रभावीपणे नायनाट केला जाऊ शकतो. बहुतांश शेतकरी केवळ रासायनिक पद्धतीचा वापर करून कीड नियंत्रणाचे व्यवस्थापन करतात. रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे किडीची प्रतिकारक्षमता वाढते. पर्यायाने कीड नियंत्रणावर अधिक खर्च करावा लागतो. त्याचप्रमाणे फळे व भाजीपाला यामध्ये कीटकनाशकांचे विषारी अवशेष अधिक प्रमाणात आल्याने विविध आजारांचे प्रमाण वाढते.
 
 
म्हणूनच कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करून त्याऐवजी पर्यायी व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. कीड नियंत्रणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हे शक्य होऊ शकते. याच दृष्टिकोनातून पितांबरी अ‍ॅग्रिकेअर डिव्हिजनने भौतिक व जैविक उपाययोजनांसाठी काही उत्पादनांची निर्मिती केली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीतील किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त पितांबरी अ‍ॅग्रिकेअर नीम पावडर. याच्या वापरामुळे कीटक, नेमाटोड तसेच खोडकिडा, हुमणी व जमिनीतील बुरशीमुळे होणार्‍या रोगांपासून पिकांचे संरक्षण होते. तसेच पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
या वर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाला आहे. अतिरिक्तपावसामुळे पिकांवरील किडींचे प्रमाण वाढते. अशा वेळी कीड नियंत्रणासाठी उत्तम पर्याय म्हणजे पितांबरी अ‍ॅग्रिकेअरचे ‘बी. व्ही. एफ. शिल्ड’ हे पर्यावरणपूरक बुरशीनाशक व रोगनाशक. फळे, भाजीपाला यांवरील विविध बुरशीजन्य, जिवाणूजन्य रोग यांच्या नियंत्रणासाठी हे उत्पादन अतिशय फायदेशीर आहे.यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड, नॅनो सिल्व्हर हे घटक असून याच्या वापरामुळे फ्युजेरियम, मर, तेल्या, डाऊनी मिल्ड्यू, भुरी इत्यादी रोगांपासून पिकांचे संरक्षण होते. महत्त्वाचे म्हणजे या रोगनाशकाचा कोणताही अवशेष पिकांमध्ये राहत नाही ज्यामुळे हे उत्पादन आपल्या आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित ठरते. शिवाय हे उत्पादन किफायतशीर आहे.
 
 
बी. व्ही. एफ. शिल्डप्रमाणेच ‘पितांबरी फ्लाय कॅचर’ (फळमाशी नियंत्रणासाठी सापळे) फिमेल आणि मेल फ्रूट फ्लाय ट्रॅप या अभिनव कृषी उत्पादनाचीसुद्धा पितांबरी अ‍ॅग्रिकेअरने निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे यापैकी फीमेल फ्रूट फ्लाय ट्रॅप हे भारतातील पहिले पेटंटेड आविष्कारी उत्पादन आहे.
 
 
pitambari
 
आंबा तसेच वेलवर्गीय भाज्यांवर फळमाशीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असतो. या पिकांवरील फळमाशीच्या नियंत्रणासाठी हजारो रुपये खर्च करूनही त्याचे प्रभावी नियंत्रण होत नाही. पितांबरी फिमेल फ्रूट फ्लाय ट्रॅप हे अद्वितीय अशा कॅरोमोन आणि नॅनो-फ्लो तंत्रज्ञानावर आधारित असून या माध्यमातून मादीफळमाशांना सापळ्यात अडकवून त्यांची संख्या नियंत्रित केली जाते. मादी फळमाशांच्या नियंत्रणामुळे फळमाशीचे जीवनचक्रच पूर्ण होत नाही. परिणामी शेतात फळमाशांची वृद्धी होत नाही व त्यापासून होणारा उपद्रवही कमी होतो. अशा पद्धतीने अतिशय कमी खर्चात प्रभावीपणे फळमाशीचे नियंत्रण होते. फळमाशी नियंत्रणासाठी एका एकरात केवळ दहा सापळे वापरावे. हा एक सापळा 90 ते 120 दिवसांपर्यंत वापरला जाऊ शकतो.
 
 
फिमेल फ्रुट फ्लाय ट्रॅप मादी फळमाशांच्या नियंत्रणासाठी, तर मेल फ्रूट फ्लाय ट्रॅप नर फळमाशांच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो. या दोन्ही ट्रॅप्सचा वापर केल्यास फळमाशीला पूर्णपणे आळा बसू शकतो. प्रभावी ओ-जेल तंत्रज्ञानाने निर्मित हा सापळा असून या माध्यमातून सापळ्यातील मादी फळमाशांच्या नैसर्गिककामगंधाने आकर्षित होऊन, सापळ्याजवळ येणार्‍या नर माशांचा नाश होतो. विशेष म्हणजे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कामगंध सापळ्यांच्या तीनपट अधिक काळ म्हणजेच 80-90 दिवसांपर्यंत हा सापळा प्रभावीपणे कार्य करतो.
 
 
आगामी काळात इतर अनेक प्रभावी कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके व कीडनाशके निर्माण करण्याचाही पितांबरी अ‍ॅग्रिकेअरचा मानस आहे.
 
 
याचबरोबर माकड, रानडुक्कर, हत्ती अशा वन्यप्राण्यांमुळे शेतकर्‍यांना होणारा उपद्रव थांबवण्यासाठी अ‍ॅनिमल रिपेलंटही पितांबरी अ‍ॅग्रिकेअरतर्फे बाजारात आणले जाणार आहे. काही शेतकर्‍यांच्या शेतावर याच्या चाचण्या सुरू असून त्यावरसकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पुढील महिन्यातच हे उत्पादन बाजारात उपलब्ध होणार आहे.
 
 
तेव्हा, आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी प्रत्येक शेतकर्‍याने पितांबरी अ‍ॅग्रिकेअर डिव्हिजनच्या साथीने एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा मार्ग अवलंबणे अत्यंत गरजेचे आहे. पितांबरीची ही सर्व कृषी उत्पादने आपण कृषी सेवा केंद्रातून विकत घेऊ शकता.
 
या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
 
संपर्क साधा
भ्रमणध्वनी - 9820979166, 8779858835.
वेबसाइट - www.pitambari.com

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.