अहिल्याबाई होळकर

विवेक मराठी    30-May-2024   
Total Views |
 
 
 Ahilyabai Holkar
अहिल्याबाईंचा जीवनपट बघता हेच लक्षात येते. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना पतीचे निधन, त्यानंतर समाजरीतीप्रमाणे अथवा तेव्हाच्या संस्कृतीप्रमाणे त्या सती जाणार होत्या, पण तो निर्णय त्या घेऊ शकल्या नाहीत. ज्या सासऱ्यांच्या पाठबळामुळे पुढे आयुष्यक्रमण करणार होत्या त्यांचा मृत्यू, अहिल्याबाईंचा मुलगाही अल्पायुषी ठरला. जावई यशवंतराव फणसे यांचे कॉल-याने तडकाफडकी निधन, तर त्यांच्या निधनानंतर मुलगी सती गेली. नथ्थाबा नावाचा लाडक्या नातवाला क्षयरोगाची बाधा झाली. एकाच वेळी एवढी संकटे आली. नशिबाला दोष देणार तरी कुठवर? अहिल्याबाईंनी आपल्या व्यक्तिगत दु:खाला कधीच आपल्या सामाजिक जीवनावर आरूढ होऊ दिले नाही. आलेली परिस्थिती आपल्या हातात नाही, पण त्या परिस्थितीला उत्तर देणे आपल्या हातात आहे हे त्यांना पक्के माहीत होते. 
खरं तर ‘पुण्यश्लोक’ या शब्दातच त्या व्यक्तीचे वर्णन येते. पाप-पुण्य या संकल्पनांवर आधारित हा शब्द अहिल्याबाईंच्या बाबतीत केवळ तेवढाच अर्थ घेऊन येत नाही, तर जीवनात समाजहिताय जे जे करता येईल ते सगळं अहिल्याबाईंनी आपल्या आयुष्यात सतत केले. असेही म्हणता येईल की, त्या स्वांत सुखाय कधीच जगल्या नाही. त्यांचे जीवन अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्’ असे होते. आज भेटू या भारतमातेच्या वीरांगना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना.
 
31 मे 1725 साली तेजस्वी शलाका अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगर येथील चौंडी गावात शिंदे परिवारात झाला. मल्हारराव होळकर हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती एकदा चौंडी गावातून प्रवास करीत असताना त्यांचे लक्ष एका छोट्या चुणचुणीत पोरीने वेधून घेतले आणि त्यांनी ठरवले, हीच त्यांच्या घरची सून होणार. अहिल्याबाई शिंदे होळकर झाल्या.
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी 

भारतमातेच्या वीरांगना

https://www.vivekprakashan.in/books/bharatmatechyavirangana/ 
 
 
 
प्रत्येक घडलेल्या गोष्टीला तसेच प्रत्येक घडलेल्या गोष्टीसाठी आपण नशिबाला दोष देत असतो. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःखाची परिभाषाच बदलून जावी इतके दुःख सोबती बनून जाते. अहिल्याबाईंचा जीवनपट बघता हेच लक्षात येते. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना पतीचे निधन, त्यानंतर समाजरीतीप्रमाणे अथवा तेव्हाच्या संस्कृतीप्रमाणे त्या सती जाणार होत्या, पण तो निर्णय त्या घेऊ शकल्या नाहीत. ज्या सासऱ्यांच्या पाठबळामुळे पुढे आयुष्यक्रमण करणार होत्या त्यांचा मृत्यू, अहिल्याबाईंचा मुलगाही अल्पायुषी ठरला. जावई यशवंतराव फणसे यांचे कॉल-याने तडकाफडकी निधन, तर त्यांच्या निधनानंतर मुलगी सती गेली. नथ्थाबा नावाचा लाडक्या नातवाला क्षयरोगाची बाधा झाली. एकाच वेळी एवढी संकटे आली. नशिबाला दोष देणार तरी कुठवर? अहिल्याबाईंनी आपल्या व्यक्तिगत दु:खाला कधीच आपल्या सामाजिक जीवनावर आरूढ होऊ दिले नाही. आलेली परिस्थिती आपल्या हातात नाही, पण त्या परिस्थितीला उत्तर देणे आपल्या हातात आहे हे त्यांना पक्के माहीत होते.
 
भारतावर सतत आक्रमण होत राहिले. मोगलांच्या आक्रमणातून भारत जरा सावरत होता तोपर्यंत ब्रिटिशांनी आपले पाय भारतात रोवायला सुरुवात केली. अहिल्याबाईंनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक तीर्थक्षेत्रांत धर्मशाळा बांधल्या, पाणपोई सुरू केल्या. भारताच्या कानाकोप-यातून हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी एका स्त्री राज्यकर्तीने अथक परिश्रम घेतले.
 
 
वयाच्या 70 व्या वर्षी 13 ऑगस्ट 1795 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ‘भारतमातेच्या वीरांगना लेखमाला’ पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या लेखाशिवाय अपूर्ण राहिली असती. आपल्या काळाच्या पुढे विचार करू शकणा-या अहिल्याबाई आपल्या सगळ्यांसाठी सदैव प्रातःस्मरणीय आहेत यात शंकाच नाही.
 
साभार - भारतमातेच्या वीरांगना पुस्तकातून...

सोनाली तेलंग

व्यवसाय - प्रशिक्षक (soft skill trainer) आणि समुपदेशक (counsellor)
गेली २३ वर्षे विविध कंपन्यांमधून कामाचा अनुभव. मानसशास्त्र हा विषय घेऊन नाशिक आकाशवाणीवरून विविध कार्यक्रम प्रस्तुत केले आहेत. कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालन, तसेच संहिता लेखन. मानसशास्त्र, इतिहास, अध्यात्म ह्या विषयांची विशेष आवड.