संघकार्याच्या तळमळीतून एकीकडे शारीरिक व्याधी अंगावर काढणे आणि दुसरीकडे पैशाची सोय करताना मानसिक ताण सहन करणे अशा अवघड काळातील दोन पत्रे...
पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणायचे की, मनुष्याला जीवनात अर्थाचा अभाव तसेच प्रभाव दोन्ही नको. वर्तमान पिढीला डॉ. हेडगेवारांनी संघकार्य करताना अर्थाचा अभाव कसा सोसला असेल याची थोडीबहुत कल्पना पुढील दोन पत्रांतून येऊ शकेल..!