सद्यःस्थितीत प्रति व्यक्ती जमीन धारण क्षमता घटत चालली आहे. म्हणूनच कमी जागेमध्ये अधिक उत्पादन घेणे गरजेचे आहे. सघन आंबा लागवड हा कमी जागेत अधिक उत्पन्न घेण्याचा एक उत्तम पर्याय आहे. महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी आज पितांबरी नर्सरी उत्पादित विविध जातींच्या आंबा कलमांची सघन पद्धतीने लागवड करून खात्रीशीर उत्पन्न घेत आहेत.
महाराष्ट्रातील आंबा समृद्ध, सुगंधी, रसाळ आणि गोड आहे. पूर्णपणे पिकलेल्या, स्वादिष्ट, रसाळ आंब्याचा आस्वाद घेणे किती आनंददायी असते हे आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच त्याला ’फळांचा राजा’ म्हटले जाते; परंतु असा दर्जेदार आंबा खाण्यासाठी किंवा बाजारात उपलब्ध होण्यासाठी त्याची लागवड तितकीच काटेकोर व तंत्रशुद्ध असावी लागते.
महाराष्ट्रातील मुख्यत्वेकरून कोकणातील हवामान हे आंबा लागवडीसाठी अनुकूल आहे. भारतभरात आंब्याच्या 1500 हून अधिक जाती आढळतात. यामध्ये देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, पायरी, रत्ना, सोनपरी, तोतापुरी, दशेरी, बदामी, सिंधू या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते; परंतु सद्यःस्थितीत आंब्याची कमी उत्पादकता आणि फळांची निकृष्ट प्रत यामुळे ’आंबा’ हा फळांचा राजा असूनही त्यापासून ’राजा’सारखे उत्पन्न मिळत नाही. यावर रामबाण उपाय म्हणजे ’सघन पद्धतीने आंबा लागवड’ करणे होय. सघन पद्धतीने आंब्याची लागवड 5 X 5 मी., 5 X 6 मी. किंवा 6X6 मी. अंतराने करण्यात येते, तर 3 X 3 मी. तसेच 1. X 53 मी.वर अतिघन लागवड केली जाते. या पद्धतीचा अवलंब केल्यास एकरी झाडांची संख्या वाढते. तिसर्या वर्षात कलमांची वाढ होऊन मोहोर येण्यास सुरुवात होते.
पितांबरीने रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील तळवडे येथे 3Z3 मी. अंतरावर 1 एकर क्षेत्रामध्ये हापूस व केशर कलमांची सघन पद्धतीने लागवड केली आहे. एका एकरामध्ये 400 कलमे आहेत. ही कलमे पितांबरी नर्सरीमध्ये लावलेल्या जातिवंत मातृवृक्षापासून निर्मित करण्यात आली आहेत. रोपांची लागवड करताना जमीन व्यवस्थित नांगरून 1 मी. X 1 मी. X1 मी. आकाराचे खड्डे करून त्यात 1 किलो पितांबरी गोमय सेंद्रिय खत व प्रति झाड 500 ग्रॅम निम पावडर वापरण्यात आली.
ही लागवड दक्षिण-उत्तर दिशेने केली. यामुळे कलमांना मुबलक सूर्यप्रकाश मिळाला. कलमांना सुरुवातीच्या काळात अन्नद्रव्यांचा मुबलक पुरवठा होणे खूप गरजेचे असते. यामध्ये नत्र, स्फुरद, पालाशची अधिक आवश्यकता असते. म्हणूनच पितांबरीचे सुबहर एपीपी 10:34:00 द्रवरूप खत लागवडीनंतर सात दिवसांनी 4 मिली/1 लि. पाणी प्रति झाड आळवणीद्वारे देण्यात आले. त्यानंतर 15 दिवसांनी प्रति महिना (पुढील 3 महिने) यूएएन 32 एकरी 4 मिली/1 लि. प्रतिझाड पाण्यामध्ये आळवणी केली. गरम हवेपासून आंब्याची बाग व फळांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती सुरू, मोहगनी या उंच वाढणार्या वारा प्रतिबंधक वृक्षांची लागवड केली. ही रोपे पितांबरी नर्सरीतून उपलब्ध झाली.
सघन लागवडीमध्ये कलमांना व्यवस्थित वळण देणे, ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. कलमे दीड ते दोन फुटांची होईपर्यंत एकच खोड ठेवावे. नंतर शेंडा मारला, त्यातून तीन ते चार फांद्या निघाल्या, त्यातून सशक्त अशा तीन फांद्या ठेवल्या. त्यानंतर दोन ते तीन पेर आल्यावर परत शेंडा मारला. अशा प्रकारे कलमांची रचना केल्याने तिसर्या वर्षी मोहोर चांगला मिळतो.
कलमांची फळधारणा सुरू झाल्यानंतरही त्याची नियमित शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करणे गरजेचे आहे. छाटणी झाल्यावर पितांबरी सुबहर यूएएन 32 एकरी दोन लिटर ठिबकद्वारे किंवा 4 मिली/1 लि. प्रति झाड पाण्यामध्ये आळवणी करावी. फळांच्या काढणीपूर्वी एक महिना पितांबरी सुबहर कॅल्शिअम नायट्रेटची 0.5% फवारणी करावी. सुरुवातीची दोन वर्षे बागेमध्ये आंतरपीक घेता येते. सरासरी विचार करता सघन आंबा लागवडीचे सुनियोजित व शास्त्रोक्त व्यवस्थापन केल्यास एकरी 5-6 टनांपर्यंत उत्पादन घेण्याची शाश्वती आहे.
पितांबरी नर्सरीमध्ये हापूस, केशर, सोनपरी, आम्रपाली, दशेरी ही विविध प्रकारची जातिवंत आंबा कलमे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये पितांबरी नर्सरी उत्पादित केशर कलमांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या कलमांना मोठी मागणी असून याची लागवड महाराष्ट्र, गुजरात व गोव्यामध्येही केली जात आहे. विशेष म्हणजे पितांबरी नर्सरीमधून कलमांसोबत कृषितज्ज्ञांकडून लागवडीसंदर्भात सर्व प्रकारचे मार्गदर्शनही दिले जाते. शेतकर्यांना लागवडीसंदर्भात येणार्या तांत्रिक अडचणींचे आवश्यकतेप्रमाणे निराकरणही केले जाते.
आंब्याच्या जातीची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते. सद्यःस्थितीत हापूस आंब्यामध्ये काही दोष निदर्शनास येत असून यामध्ये दरवर्षी फळधारणा न होणे, मादी फळांचे प्रमाण कमी असणे, आंब्यातील साका या मुख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याउलट केशर आंबा अधिक गोड, रसाळ असून दरवर्षी फळधारणा होते म्हणूनच हापूसऐवजी केशर जातीकडे शेतकर्यांचा कल अधिक आहे.
पितांबरी नर्सरीकडून आंब्याची कलमे घेतलेल्या शेतकर्यांमध्ये गुजरात राज्यातील वलसाड येथील शेतकरी राजेश शहा यांनी 5 एकरवर 4 मी. X 4 मी. अंतरावर 1200 केशर कलमांची लागवड केली आहे. यामध्ये Green Dwarf व S1 या बुटक्या जातीच्या नारळाचीही लागवड केली आहे. कलमांसोबतच पितांबरीची खते गोमय, सुबहर, स्ट्रेसील ही उत्पादने वापरली व लागवडीसंदर्भात वेळोवेळी प्रक्षेत्र भेट घेऊन पितांबरी कृषितज्ज्ञांनी मार्गदर्शनही केले. भविष्यात उत्पादित फळांची निर्यात करण्याचा त्यांचा मानस आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील शेतकरी केवल गायकवाड यांनी 6 एकरवर 2 X 3 मी. अतिघन पद्धतीने पितांबरी नर्सरी केशर आंब्याची लागवड केली आहे. सहा एकरवर 2900 कलमे त्यांनी लावली आहेत. अतिघन पद्धतीमुळे लागवड व आंतरमशागत करणे सोपे जात आहे. पाचव्या वर्षी एकरी पाच ते सहा टनांपर्यंत आंबा उत्पादन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच चांदवड येथील रामचंद्र जाधव यांनी पाच एकरवर सघन पद्धतीने 1200 कलमे लावली आहेत. सध्या नाशिक क्षेत्रात केशर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे व त्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने केशर आंबा लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पितांबरी क्षेत्रामध्ये उत्पादित होणार्या आंब्यापासून तसेच काही आंबा उत्पादकांकडून पितांबरी जातिवंत फळे संकलित करत असून यापासून काही नावीन्यपूर्ण उत्पादने बनवत आहे. यामध्ये कैरीचे लोणचे व मुरांबा तसेच आंब्यापासून मँगो रोल व मँगो पावडर अशी विविध उत्पादने ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत.
पितांबरी नर्सरी फ्रँचायसी संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. सघन आंब्यासाठी लागणारी विविध जातींची खात्रीशीर मातृवृक्षापासून निर्मिती केलेली कलमे आपल्या जवळच्या पितांबरी नर्सरी फ्रँचायसीतून किंवा तळवडे येथील पितांबरी नर्सरीत आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. तसेच आपल्यालाही ’पितांबरी नर्सरी फ्रँचायसी’ घ्यायची असेल तर आम्हाला खालील दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क साधा. 9867112414 ....
विशेष सवलतीच्या दरात पितांबरी केशर आंब्याची जातिवंत कलमे उपलब्ध. त्वरा करा!