5 ऑगस्टनंतरच्या पहिल्या पंधरा दिवसांतच दोन हजारांवर हिंस्र धर्मांध हल्ले घडविण्यात आले. महिलांवर अत्याचार, 915 घरांना आगी लावण्यात आल्या आणि हिंदूंच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, असेही एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 64 जिल्ह्यांमध्ये 953 उद्योगांना बेचिराख करण्यात आले. 22 मंदिरे, चर्चेस आणि अहमदियांची प्रार्थनास्थळे यांना उद्ध्वस्त करण्यात आले. हे केवळ पहिल्या पंधरा दिवसांचे वर्णन आहे. जर ही पहिल्या पंधरा दिवसांतल्या घटनांवर आधारित पाहणी आहे, तर गेल्या चार महिन्यांत त्याच्या किती पटींनी हे हल्ले वाढले असतील ते युनूसच जाणोत. हे सर्व कल्पनातीतच दुष्टपणाचे म्हणायला हवे. पूर्व पाकिस्तान असताना तेव्हा म्हणजे 1947 ते 1971 दरम्यान असाच प्रकार घडला होता. जो जो बंगाली तो तो त्यांच्या दृष्टीने देशद्रोही ठरत होता. आता त्रेपन्न वर्षांनंतर बांगलादेश पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल करतो आहे.
पूर्व पाकिस्तान असताना म्हणजे 1947 ते 1971 या कालखंडात पाकिस्तानी सैन्याने मोठा नरसंहार घडवला, तेव्हा त्यांनी हिंदू, मुस्लीम असा भेदभाव केला नाही. जो जो बंगाली तो तो त्यांच्या दृष्टीने देशद्रोही ठरत होता. आता त्रेपन्न वर्षांनंतर बांगलादेश पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल करतो आहे. त्यास अमेरिकेसारख्या देशाची मदत मिळते आहे. तिथे हिंदू, बौद्ध आणि अहमदिया यांच्यावर बांगलादेशाच्या सैन्याकडूनच अत्याचार केले जात आहेत. आता बांगलादेशात नरसंहार हाही पूर्वीच्या पाकिस्तानी वळणाने चालला आहे. बांगलादेशाचे धर्मांध नेते आणि त्यांचा जमात ए इस्लामी हा पक्ष तिथल्या हिंदूंवर वेचून वेचून हल्ले करतो आहे. हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत. पूर्व पाकिस्तानात हिंदूंची संख्या 28 टक्क्यांच्या घरात होती, ती आता आठ टक्क्यांच्या घरात घसरली आहे. बांगलादेशच्या नेत्या शेख हसिना यांना बांगलादेशातल्या हिंस्र तरुणांनी आणि त्यांच्या पाठीशी

असलेल्या बांगलादेशी लष्कराने देश सोडून पळवून लावल्यावर बांगलादेशातली स्थिती अधिकच चिंताजनक बनलेली आहे. त्याविरोधात भारताचे म्हणणे मांडायला आणि त्या देशाचे काळजीवाहू प्रशासकीय सल्लागार मुहम्मद युनूस यांना समज देण्याच्या उद्देशाने ढाका येथे गेलेले भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी भारताच्या भावना स्पष्ट केल्यावर युनूस यांनी आपला उद्धटपणा स्पष्ट करून बांगलादेशाच्या अंतर्गत कारभारात भारताने हस्तक्षेप करता कामा नये, असे त्यांना सांगितल्याचे उघड झाले आहे. बांगलादेशातली ही स्थिती खरोखरच चिंताजनक आहे आणि त्याचा थेट परिणाम भारतावर होत असताना आम्ही डोळे बंद करून बसावे, असे जर बांगलादेशी प्रशासकीय सल्लागारांना वाटत असेल तर ते शक्य नाही, हे त्यांना मिस्त्री यांनी ठणकावून सांगितले आहे. बांगलादेश हा पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्यानंतरची पहिली काही वर्षे सोडली तर तिथल्या प्रसार माध्यमांची दृष्टी तितकीशी साफ राहिलेली नाही. ती अधिकाधिक विकृतीकडून दुष्टपणाकडे झुकते आहे. बंगाली वृत्तपत्रे ‘प्रतिदिन संवाद’, ‘प्रोथोम अलो’, ‘युगांतर’ ही काय किंवा ‘बांगलादेश ऑब्झर्व्हर’, ‘डेली स्टार ढाका पोस्ट’, ‘ढाका ट्रिब्यून’ ही इंग्रजी वृत्तपत्रे काय, त्यांचे सर्व लेखन हे भारतविरोधीच होत आहे. शेख हसिना यांचे पलायन झाल्यावर ही वृत्तपत्रे जास्तच चेकाळलेली आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्रे त्यामानाने टीकेत खूपच सौम्य असल्याचे जाणवते. याचे कारण अर्थातच पाकिस्तानमधल्या राजकीय गदारोळात दडले आहे. शिवाय त्यांना बांगलादेशी हिंसाचारात फार लक्ष घालू नका, असे लष्कराकडून बजावण्यात आले आहे. त्याचे कारणही बांगलादेशात पाकिस्तानकडून होणार्या वाढत्या कारवायांमध्ये दडलेले आहे.
अतिशय धक्कादायक असणार्या त्या गोष्टीला बरोबर 49 वर्षे पूर्ण होत असताना जेमतेम दहा दिवस आधी शेख हसिना यांना बांगलादेशातून जेमतेम काही मिनिटांची मुदत देऊन घालवण्यात आले. 15 ऑगस्ट 1975 च्या पहाटे बांगलादेशात उठाव घडवून बांगलादेशचे पितामह शेख मुजिबूर रहमान यांना आणि त्यांच्या त्या प्रासादात राहणार्या सर्व कुटुंबाला लष्करी रणगाड्यांमधून आलेल्यांनी ठार केले होते आणि आता 5 ऑगस्ट 2024 रोजी शेख हसिना भारतात आश्रयाला आल्या. त्याही गोष्टीला आता चार महिने उलटून गेल्यावर शेख हसिना प्रथमच बांगलादेशमुक्तीच्या स्मृतिदिनानिमित्त बोलल्या. होय, त्याला आता स्मृतिदिनच म्हटले पाहिजे. आपल्याकडे एखाद्याच्या निधनानंतर त्याचा स्मृतिदिन पाळला जात असतो; पण पाकिस्तानपासून मुक्त झालेल्या बांगलादेशचा तो खरे तर स्वातंत्र्य दिन असतानाही त्या बोलल्या आणि त्यांनी मुहम्मद युनूस यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांनी देशात नरसंहार घडवल्याचा आरोपही केला. युनूस हे अमेरिकेचे हस्तक आहेत आणि भारतद्रोही जॉर्ज सोरोसचे ते मित्र आहेत, हे मी याआधीच्या लेखात म्हटलेले होते. मुहम्मद युनूस यांना ग्रामीण बँकेत त्यांनी केलेल्या 20 लाख अमेरिकी डॉलरएवढ्या (25 कोटी 22 लाख टका) रकमेच्या भ्रष्टाचाराबद्दल बांगलादेशी न्यायालयाने दोषी ठरवले, त्याला जेमतेम दोन महिने होतात न होतात तोच त्यांना प्रमुख प्रशासकीय सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. सांगायचा मुद्दा हा की, युनूस यांना बांगलादेशच्या प्रशासनाची कवडीइतकीही जाण नाही, त्यांची प्रशासनावर पकड राहिलेली नाही. उलट त्यांनी तिथल्या हिंदू, बौद्ध, अहमदिया आणि ख्रिश्चन समाजाच्या लोकांच्या हत्या घडवल्या जात असताना त्याकडे डोळेझाक केली. तिथल्या मंदिरांवर जमावाकडून हल्ले होत असताना ते त्यावर चकार शब्दानेही बोलले नाहीत. त्यांनी उरलेला हिंदू समाज तिथून कसा पळ काढील हेच पाहिले. युनूस ही बांगलादेशातली विकृती आहे. विशेष हे की, शेख हसिना यांना बांगलादेशातून पळवून लावल्यावर अवघ्या 24 तासांत हिंदू मंदिरांवर संपूर्ण बांगलादेशात हे हल्ले सुरू झाले. हा काही योगायोग नव्हता, तर ती खोलवरची विषवल्ली आहे. हिंदूंवर झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या चार महिन्यांत ते बांगलादेशातून पळ काढू लागले आहेत आणि हिंदूंना आता केवळ भारताचाच आधार वाटतो आहे. बांगलादेश इस्कॉन मंदिराचे प्रमुख चंदनकुमार धर तथा चिन्मयकुमार दास यांना बांगलादेश पोलिसांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अटक केल्यावर त्यांच्या बाजूने न्यायालयात उभ्या राहिलेल्या मुस्लीम वकिलालाही जमावाने हल्ल्यात ठार केले. आता त्यांचे वकीलपत्र घ्यायलाही कोणी वकील नसल्याने ते तुरुंगातच खितपत पडले आहेत. या संघटित अत्याचारात सहभागी असलेल्या एका विद्यार्थी नेत्याने तर भारतात दोन भारत असून त्यापैकी एक बांगलादेशला पाठिंबा देणारा आहे, तर दुसरा भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे बांगलादेशच्या विरोधात ‘खोटा’ प्रचार करतो आहे, असे सांगितले. मुळातच नरेंद्र मोदी यांनी आजवर बांगलादेशातल्या या हिंस्र प्रकारांबद्दल कमीत कमी भाष्य केलेले आहे. त्यांचा सगळा भर हा प्रत्यक्ष कृतीवर असतो, त्याप्रमाणे त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना सांगून परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना ढाक्याला पाठवून दिले. मिस्त्री यांनी बांगलादेशचे परराष्ट्र सचिव जशिम उद्दिन यांची भेट घेऊन त्यांना योग्य ती समज दिल्यानंतरही बांगलादेशी वृत्तपत्रे भारतविरोधात कुठेही कमी नाहीत.

बांगलादेशातल्या प्रमुख प्रसार माध्यमांनी भारतविरोधी पवित्रा 6 ऑगस्टपासून म्हणजेच पहिल्या दिवसापासूनच घेतला होता आणि भारत हा जणू काही बांगलादेशचा शत्रू आहे, अशाच पद्धतीने त्यांचे वृत्तांकन चालू होते. त्याचाच परिणाम म्हणून बांगलादेशातल्या या नव्या प्रशासकीय राजवटीने भारतविरोधी डावपेच लढवायला प्रारंभ केला. ईशान्य भारतातल्या राज्यांसाठी बँडविड्थ मार्गाचे बांगलादेश हे माध्यमकेंद्र असेल, हे गेली अनेक वर्षे मान्य असताना बांगलादेशने शब्द फिरवून त्यात खोडा घातला आहे. सध्या हा मार्ग चेन्नईतून समुद्रातून जोडला गेला आहे. ईशान्येची राज्ये ही चेन्नईहून त्यामानाने खूपच दूरवर असल्याने बांगलादेशाने हा माध्यममार्ग मान्य केला होता. हा एक भाग झाला. अशा किती तरी गोष्टी आहेत, की ज्या बांगलादेशने दुष्टाव्याने केल्या आहेत. 4 ऑगस्टपर्यंत बांगलादेश हा भारताचा अतिशय जवळचा मित्र होता; पण आता तो नाही. त्या देशाने भारतविरोधी पवित्रा घेतल्यानंतर भारत आता काय करील याची चिंता बांगलादेशातल्या वृत्तपत्रांनी किंवा अन्य माध्यमांनी केलेली नाही. ‘डेली स्टार’ हे एक प्रमुख वृत्तपत्र आहे; पण कोणतीही समंजस भूमिका त्या वृत्तपत्राने घेतल्याचे गेल्या चार महिन्यांत दिसलेले नाही. ‘डेली स्टार’ने तर आपल्या संपादकीयामध्ये भारतविरोधी गरळ ओकणे चालूच ठेवले आहे. शेख हसिना यांच्याविरोधात 36 दिवस विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा परिपाक म्हणजे शेख हसिना यांचे पलायन आहे, असे त्या वृत्तपत्राने म्हटलेले आहे. शेख हसिना यांनी बांगलादेश सोडून भारतात येण्याचा जो निर्णय घेतला तो बंदुकीच्या धाकाने होता आणि तो बांगलादेशच्या लष्कराने दाखवलेला होता, याकडे ‘डेली स्टार’ने सोयीस्कर दुर्लक्ष केले.
असे असले तरी ‘प्रोथम अलो’ या बंगाली वृत्तपत्राने शेख हसिना यांना देश सोडून जायला भाग पाडणार्या कारवायांमागे पाकिस्तानच्या ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) या पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या हस्तक असलेल्या छात्र शिबिराचा प्रमुख हात होता, हे धाडसाने प्रसिद्ध केले आहे. त्यातही पाकिस्तानवादी असलेल्या जमात ए इस्लामीसारख्या संघटना अग्रभागी होत्या, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या सहभागाने बांगलादेशातल्या हिंदूंच्या कत्तली मोठ्या प्रमाणात घडवल्या गेल्याचे त्या वृत्तपत्राने मान्य केले आहे. विशेष हे की, त्या वृत्तपत्राने 5 ऑगस्टनंतरच्या पहिल्या पंधरा दिवसांतच दोन हजारांवर हिंस्र धर्मांध हल्ले घडविण्यात आल्याचे म्हटले. महिलांवर अत्याचार हेही याच काळात केले गेले.
पहिल्या पंधरा दिवसांतच 915 घरांना आगी लावण्यात आल्या आणि हिंदूंच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, असेही त्या वृत्तपत्राने म्हटले आहे. 64 जिल्ह्यांमध्ये 953 उद्योगांना बेचिराख करण्यात आले. 22 मंदिरे, चर्चेस आणि अहमदियांची प्रार्थनास्थळे यांना उद्ध्वस्त करण्यात आले. हे केवळ पहिल्या पंधरा दिवसांचे वर्णन आहे आणि ही पाहणी ‘प्रोथोम ‘अलो’ या वृत्तपत्राच्या 64 जिल्ह्यांतल्या प्रतिनिधींनी पाठवलेल्या बातमीपत्रांवर आधारित आहे, असे त्या वृत्तपत्राने स्पष्ट केले आहे. जर ही पहिल्या पंधरा दिवसांतल्या घटनांवर आधारित पाहणी आहे, तर गेल्या चार महिन्यांत त्याच्या किती पटींनी हे हल्ले वाढले असतील ते युनूसच जाणोत. हे सर्व कल्पनातीतच दुष्टपणाचे म्हणायला हवे. तरीही भारताने त्याबद्दल काहीही बोलता कामा नये, अशी जर मुहम्मद युनूस यांची अपेक्षा असेल, तर ती सर्वस्वी चुकीची आणि गैरलागू आहे. भारत काय करू शकतो हे युनूस यांना कळविण्यात आले असणार आणि कदाचित तेही त्याविषयी ओळखून असतील. कदाचित त्यामुळेही असेल, युनूस यांनी जनतेचे लक्ष या घटनेवरून वळवण्यासाठी शेख हसिना आणि त्यांची बहीण रेहाना यांच्या बँक खात्यांना टाळे ठोकण्याचा आदेश दिला. त्यातून त्यांना शेख हसिना यांनीही भ्रष्टाचार केला, असे दाखवायचे असेल. काहीही असले तरी, बांगलादेशातल्या अल्पसंख्य समाजावर होत असलेले हल्ले जगाच्या नजरेआड होणार नाहीत.