निकालाचे संकेत

विवेक मराठी    20-Jan-2022   
Total Views |
ज्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, तो पक्ष चौथ्या क्रमांकावर राहिला. या निवडणुका महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. निकालानंतर मात्र “आम्ही महाविकास आघाडीचे घटक असून आमचे एकत्रित संख्याबळ मोठे आहे” अशी भूमिका तिन्ही पक्षांचे प्रवक्ते घेताना दिसतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेने नक्की कोणते संकेत दिले आहेत, हे समजून घेतले पाहिजे.

bjp

नुकत्याच महाराष्ट्रात नगरपंचायतींचा आणि दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानंतर महाराष्ट्रात नंबर एकवर कोणता राजकीय पक्ष आहे यावर जोरदार चर्चा चालू आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतही स्थानिक प्रश्न महत्त्वाचे असतात, हे लक्षात घेऊन नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाचे विश्लेषण केले पाहिजे. जाहीर झालेल्या निकालांवरून राज्यात संख्येच्या आधारे भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर ज्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, तो पक्ष चौथ्या क्रमांकावर राहिला. या निवडणुका महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. निकालानंतर मात्र “आम्ही महाविकास आघाडीचे घटक असून आमचे एकत्रित संख्याबळ मोठे आहे” अशी भूमिका तिन्ही पक्षांचे प्रवक्ते घेताना दिसतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेने नक्की कोणते संकेत दिले आहेत, हे समजून घेतले पाहिजे.

महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ अधोरेखित करणार्‍या मंडळींनी एकदा विचार करावा की, आपण एकत्रितपणे नगरपंचायतीच्या निवडणुका लढवल्या असत्या, तर आपली काय अवस्था झाली असती? स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी हवी असते. त्याच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अशा निवडणुकीतून होत असते. अशा वेळी तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली असती, तर किती बंडखोरी झाली असती आणि किती उमेदवार निवडून आले असते? राज्यपातळीवर नेतृत्व करणारे नेते स्थानिक पातळीवर आपापल्या गटांना काबूत ठेवू शकले असते? की परस्पर काटा काढण्याची संधी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले असते? निवडणुकीनंतर आम्ही एकत्र आहोत ही वल्गना स्वत:चे अपयश लपवण्यासाठी केली जात आहे, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. उलट या वल्गनेतून स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार्‍या कार्यकर्त्यांचा व उमेदवारांचा विश्वासघात होतो आहे.

महाराष्ट्रात भाजपा एक क्रमांकावर राहिला. याआधी झालेल्या नगरपंचायत निवडणुकांतही भाजपाच एक क्रमांकावर होता. 2019पासून भाजपा विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. त्याला कारण विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेली अनैसर्गिक आघाडी होय. हीच आघाडी स्थानिक पातळीवर निवडणुकीत उतरली असती, तर वेगळे चित्र दिसले असते, हे भाजपाला मिळालेल्या संख्याबळातून लक्षात येते. या निवडणुका स्थानिक प्रश्न आणि स्थानिक नेतृत्व यांना केंद्र करणार्‍या असल्या, तरीही महाराष्ट्रात राज्य सरकारची निष्क्रियता आणि तीन पक्षांतील हेवेदावे मतदारांना कळत नाहीत, सर्व पातळ्यांवर थांबलेली विकासकामे दिसत नाहीत असे म्हणणे धाडसाचे आहे. मतदारराजा सुज्ञ असतो. तो आपली प्रतिक्रिया मतपेटीतून नोंदवतो. ती या निवडणुकीत नोंदवली गेली. आणि संख्यात्मक बळ पाहता भाजपा एक क्रमांकाचा पक्ष ठरला. निकालानुसार साधारणपणे तीस नगरपंचायतींमध्ये भाजपा सत्ता स्थापन करेल, तर काही ठिकाणी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल. प्रश्न फक्त संख्यात्मक बळाचा किंवा सत्तेचा नाही, तर असे का घडले हे समजून घेण्याचा आहे.

मतदारराजा सुज्ञ असतो. तो आपली प्रतिक्रिया मतपेटीतून नोंदवतो. ती या निवडणुकीत नोंदवली गेली. आणि संख्यात्मक बळ पाहता भाजपा एक क्रमांकाचा पक्ष ठरला. निकालानुसार साधारणपणे तीस नगरपंचायतींमध्ये भाजपा सत्ता स्थापन करेल, तर काही ठिकाणी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल. प्रश्न फक्त संख्यात्मक बळाचा किंवा सत्तेचा नाही, तर असे का घडले हे समजून घेण्याचा आहे.स्थानिक पातळीवर प्रश्न काय असतात? पाणी, स्वच्छता, रस्ते या तीन गोष्टींभोवती नगरपंचायतीचे राजकारण फिरत असते. आणि या तिन्ही गोष्टींचा निपटारा आग्रहाने कोण करत आहे? हे मतदारांना कळते. पाणी, रस्ते आणि स्वच्छता यासाठी विविध योजना सुरू करून केंद्र सरकारने मुबलक निधी दिला आहे. हे करताना केंद्र सरकारने पक्षीय भेदभाव केला नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न अपवादाने प्रचारात आला, हे केंद्र सरकारचे यश आहे. स्वच्छ भारत अभियान, पेयजल अभियान, रस्ते बांधणी यामुळे स्थानिक पातळीवर सर्वसामान्य माणूस आनंदी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे आणि तो मतपेटीतून व्यक्त झाला आहे. स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडवणारे, प्रश्नांची जाण असणारे उमेदवार भाजपाने दिले, हा भाजपाच्या यशाचा एक पैलू आहे. पण भाजपा संख्यात्मकदृष्ट्या पहिल्या क्रमांकावर राहिला, त्याचे हे एकमेव कारण नाही. भाजपा आज जरी विरोधी पक्षात असला, तरी मतदारांना भाजपा हवा आहे. त्यांनी स्थानिक प्रश्न सोडवणारा उमेदवार निवडून देऊन भाजपाला पसंती दिली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मतदारांचा हा संकेत भाजपा नेतृत्वाने समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारची निष्क्रियता आणि भ्रष्टाचार यामुळे ते जनतेच्या मनातून उतरले आहे. आता भाजपाची परीक्षा आहे स्वबळाची, भाजपाच राजपातळीवर सक्षम नेतृत्व देऊ शकतो हे सिद्ध करण्याची.