मालवणी पॅटर्न हे तर हिमनगाचे टोक!

विवेक मराठी    13-Mar-2021
Total Views |

 आज जे मालवणीत घडतेय, जो नवामालवणी पॅटर्ननिर्माण केला जातोय, तो उद्या उर्वरित मुंबईत अथवा राज्यातील इतर ठिकाणीदेखील दिसू शकतो. कारण देशाने हा इतिहास अनुभवलेला आहे. काश्मिरी पंडितांना त्यांच्याच राहत्या घरातून हुसकावून लावल्याचा इतिहास, देश आजही विसरलेला नाही. उत्तर प्रदेशातील कैरानातदेखील हिंदूंना पलायन करावे लागले होते. आसाममधील मंगलदयी जिल्ह्यात बाहेरून आलेल्या बांगला देशींनी उच्छाद मांडला होता, परिणामी तेथील मतदानाचा हिंदू टक्का घसरला लोकसंख्येत बदल घडून आल्याचा प्रकार सर्वश्रुत आहेच! त्यामुळे आपले भविष्य लक्षात घेता, वर्तमानातील अशा घटनांना वाचा फोडणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मुंबईतील मालवणीत राहणार्या हिंदू कुटुंबांवर होणार्या अन्यायाला मुंबई भाजपाध्यक्ष मलबार हिल मतदारसंघातील आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत वाचा फोडली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! ही मालवणीतील परिवर्तनाची नांदी आहे. इथून पुढे, पीडित कुटुंबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई लढावी लागणार आहे आणि त्यासाठी या घटनांकडे उघड्या डोळ्यांनी बघणार्या समाजाची आवश्यकता आहे.

malavani_1  H x 

 भारतात प्रत्येक धर्मीयांना स्वतःच्या धर्माचे प्रामाणिक आचरण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. परंतु त्यामुळे इतरांचा किंवा इतर धर्मीयांचा अनादर करणे असा त्याचा अर्थ होत नाही! तसेच स्वधर्माच्या प्रार्थना करत असताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली गेली पाहिजे. परंतु असे होत नसेल आणि काही ठिकाणी अडेलपणाची भूमिका घेऊन केवळ हिंदू धर्मीय नागरिकांना राहते घर सोडून जाण्यास जबरदस्ती केली जात असेल, तर हे आपल्या समाजासाठी भूषणावह नक्कीच नाही!

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik


 मालाडमधील मालवणी चाळीत एकेकाळी अनुसूचित जाती-जमातीतील परिवारांसह एकूण 100च्या आसपास हिंदू कुटुंबे राहत होती. परंतु या ठिकाणी राहत असलेल्या अल्पसंख्याक कुटुंबाकडून गुंडगिरी, दमदाटी करून या हिंदू कुटुंबांना त्रास होत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या. या त्रासाला कंटाळून काही हिंदू कुटुंबांनी चाळ सोडून जाण्याचा मार्ग निवडला. सध्या या ठिकाणी केवळ 8 ते 9 दलित हिंदू कुटुंबे वास्तव्यास आहेत. परंतु त्यांनाही हुसकावून लावण्याचे प्रयत्न या ठिकाणी चालवले जात आहेत. याबाबत पोलिसांत तक्रारीदेखील करण्यात आल्या, परंतु तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मालवणीतील या कुटुंबांना आधार देण्यासाठी, लोढा यांच्यामार्फत त्यांचा आवाज विधानभवनात पोहोचला.

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik


मालवणीत राहणार्या या हिंदू कुटुंबीयांचा या ठिकाणी विविध पद्धतींनी छळ होत असून रस्ता अडवणे, हिंदू कुटुंबीयांना - विशेषतः महिलांना त्रास देणे, त्यांची छेड काढणे, भोंग्याचा आवाज वाढवणे, धमक्या देणे, परिसरात चालत असलेले अवैध व्यवसाय अशा विविध प्रकारांतून वास्तव्यास असलेले हिंदू नागरिक घर सोडून जावेत याकरिता दबाव टाकला जात आहे. हा नवामालवणी पॅटर्ननिर्माण करून हिंदू समाजाला तेथे लक्ष्य केले जात आहे. याबाबत स्थानिक हिंदू कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनादेखील माहिती दिली, तरीदेखील बदल झालेला नाही. उलटपक्षी त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळे प्रकार होत आहेत की काय? अशी शंका तेथील स्थानिक हिंदूंनी बोलून दाखवली आहे. गुंडगिरी करणार्या इसमास राजकीय वरदहस्त असल्याचेदेखील सांगण्यात आले. यावरून आपल्या लक्षात येते की विषय किती गंभीर आहे! असे असतानादेखील स्थानिक प्रशासन, पोलीस किंवा महापालिका या ठिकाणी कारवाई करण्यात कमी पडते, याची खंत वाटते!



malavani_3  H x

मालवणीतराहणार्
या हिंदू महिलांना तर या समस्यांचा पावलोपावली सामना करावा लागतो. पुरुष मंडळी कामानिमित्त घराबाहेर पडतात, घरात महिलावर्ग दिवसभर असतो, अशा वेळी तेथील असुरक्षिततेच्या वातावरणात महिलांची छेड काढणे, अश्लील भाषेचा वापर अशा अनेक समस्यांचा सामना दररोज करवा लागतो. लहान मुलांनादेखील पोर्नोग्राफीसारख्या भयाण काळोखात ढकलण्याचे काम येथील जिहादी घटकांकडून होत असल्याचे नुकतेच समोर आले, याबद्दल बालहक्क आयोगाने नोटिसदेखील बजावली.


अवैध
मशिदी आणि तेथील भोंगे यांनी तर मालवणीत अक्षरश: उच्छाद मांडला आहे. छेडा कॉम्प्लेक्स ही उच्च मध्यमवर्गीय हिंदूंची वसाहत होती. येथे राहत असलेल्या कुटुंबांना अनेक प्रकारे त्रास देऊन येनकेनप्रकारे तेथून निघून जाण्यास दबाव टाकला जात आहे. काही दिवसांपूर्वीच येथील हिंदू कुटुंबाला 15-20 जण धमकावून गेल्याची घटना घडली होती. असे अनेक प्रकार येथे सुरूच असतात. याच जाचाला कंटाळून छेडा कॉम्प्लेक्समधील हिंदूंनी घर विकून इतर ठिकाणी राहायला सुरुवात केली. येथील मोकळ्या जागेत अवैध मशीद उभारून तेथे अनेक घडामोडी घडत असतात. त्यात मोठ्या संख्येने मुस्लीम गोळा होतात, दिवसांतून 5 वेळा नमाझ पढली जाते, मग इतर वेळी मुस्लीम पद्धतीचे भजन... असे खूप वेळपर्यंत भोंगे सुरूच राहतात.

 

येथे रोहिंग्या आणि बांगला देशी मुस्लिमांना आणून वसवण्याचे प्रकारदेखील चालतात, असे लोढा यांनी विधानसभेत मांडले. या मुस्लिमांना आणून झोपडपट्ट्यांत वसवणे, त्यांना अमली पदार्थांसारख्या अवैध व्यवसायात गुंतवणे असे नानाविध प्रकार येथे घडवून आणले जातात.
 
 

जोपर्यंत मालवणीतील दलित हिंदू कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमचा आवाज थांबणार नाही. आम्ही झुकणार नाही. काश्मिरी हिंदूंना त्यांच्या घरी पुन्हा वसवण्याचे जे काम सुरू आहे, त्याच धर्तीवर मालवणीतील हिंदूंनादेखील आम्ही न्याय देऊ.

- मंगलप्रभात लोढा

भाजपा मुंबई, अध्यक्ष

काही महिन्यांपूर्वीच या परिसरात लावण्यात आलेले राममंदिर निधी समर्पणाचे पोस्टर फाडण्यात आले. हे पोस्टर इतर कोणी नाही, तर खुद्द पोलिसांनी फाडल्याचे लोढा यांनी विधानसभेत म्हटले होते. पोलिसांत दिलेली तक्रार लवकर नोंदवून घेतली जात नाही. काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यात एक हिंदू नागरिक मशिदीतील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पोलिसांना त्यावर कारवाई करण्यास विनंती करत होता, परंतु पोलिसांकडून त्याला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. हा प्रकार एकूणच मुंबई महानगराच्या शांतताप्रिय वातावरणास काळिमा फासणारा आहे. राज्य सरकारने आणि महापालिका प्रशासनाने याची वेळेत दखल घेणे अपेक्षित आहे.

आज मुंबईसारख्या महानगराच्या भर वस्तीत हिंदू कुटुंबीयांवर त्यांचे राहते घर सोडून जाण्यास दबाव टाकला जात असताना, मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष अजान स्पर्धा भरविण्यात व्यग्र आहे. परंतु मालवणीसारख्या प्रकरणांत दोषींना जाब विचारायलासुद्धा कोणी पुढाकार घेत नाही. हा कुठला न्याय आणि ही कुठली नीती राबवली जातेय महाविकास आघाडी सरकारकडून? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.
 

malavani_1  H x 

एकीकडे साधुसंतांची पूजा करणार्या याच महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये साधूंनामॉब लिंचिंगकरून ठार करण्यात आले. माजी नौदल अधिकार्यास मारहाण झाली. एका पत्रकाराच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर वार करताना महाविकास आघाडी सरकारकडून सांविधानिक नियमांची पायमल्ली करण्यात आली. असे केवळ सूडाचे राजकारण करून मीडियात येण्याचे प्रकार करण्यात येत आहेत. परंतु मालवणीत घडत असलेल्या अशा दुर्दैवी घटनांकडे लक्ष देण्यास आघाडी सरकारमधील एखाद्या मंत्र्याला अथवा नेत्याला वेळ नाही. ही मुंबईतील सत्ताधारी पक्षाच्या नाकर्तेपणाची खरी शोकांतिका आहे.

 
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik


मालाड
-मालवणी परिसरात राहणार्या नागरिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार्यांनी हे असले दबावतंत्राचे प्रकार थांबवले पाहिजेत आणि यासाठी पोलीस प्रशासनानेदेखील मध्यस्थी करून या पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला पाहिजे. तसेच जी कुटुंबे जिवाच्या भीतीपोटी आपले राहते घर सोडून इतर ठिकाणी वास्तव्यास गेले आहेत, त्यांना परत आणून या ठिकाणी राहण्यास सांगितले पाहिजे. अन्यथा या ठिकाणी हिंदू समाज अल्पसंख्य होईल (तेथे हिंदू मतदारांची टक्केवारी घसरली आहेच, 2014च्या तुलनेत 2019 विधानसभा निवडणुकीत 15 हजार हिंदू मतदार कमी झाल्याचे लोढा यांनी विधानसभेत नमूद केले आहेच.) आणि हळूहळू अख्ख्या मुंबईत हे लोण पसरेल.

  

आज मुंबई महापालिका क्षेत्रात आणि राज्यातदेखील स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणार्या पक्षाची सत्ता आहे. अशा परिस्थितीत पीडित हिंदू कुटुंबीयांना न्याय मिळत नसेल, तर महाराष्ट्रात त्यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असू शकते? एकीकडे राज्यात आणि विशेषत्वाने मुंबईत बांगला देशी घुसखोरांचे रॅकेट समोर येत आहेत. त्यांच्या बळावर मतदारसंघ वसवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे अशा पद्धतीने स्थानिक हिंदू कुटुंबीयांना त्यांच्या राहत्या घरातून हुसकावून लावण्याचे प्रकार मालवणीत घडताहेत. त्यामुळे याबाबत राज्य शासन किती गंभीर आहे, हे आपल्या लक्षात येते.


malavani_2  H x
मंगलप्रभात
लोढा यांच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ विरोधाला विरोध करण्याचा किंवा विषयाला धार्मिक रंग देऊन मुद्दा उपस्थित करण्याचा विषय नसून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा विषय आहे; कारण काही वर्षांपूर्वी जे जम्मू आणि काश्मीरने अनुभवले, ते आपल्या सामान्य मुंबईकरांना अनुभवावे लागू नये एवढेच आमचे म्हणणे आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार, हे मुंबईकरांना आमचे वचन आहे.

मालवणीतील समस्या ही केवळ मुंबईतील एखाद्या ठिकाणाची समस्या नसून हा एक पॅटर्न आहे, जो अनेक ठिकाणी राबवला जात आहे. लोढा यांनी विधानसभेत हा विषय मांडल्यामुळे त्या विषयाला वाचा फुटली. अशा अनेक मालवणी शोधून त्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून तिची ओळख हळूहळू पुसली जाऊन जिहादी कारवायांचे मोठे केंद्र बनेल, त्याकरिता वेळीच जागे होण्याची आवश्यकता आहे.

(लेखक मालवणीतील परिस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या सत्यशोधन समितीचे संघटक आहेत)