‘नॅचरल शुगर’ शेतकर्‍यांना नफा देणारा कारखाना

विवेक मराठी    01-Oct-2021
Total Views |
सध्या साखर उद्योगाचे सध्याचे चित्र चांगले दिसत असले, तरी सध्याच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमुळे ऊस शेती व साखर उद्योगापुढे असंख्य आव्हाने उभे आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश साखर कारखाने मोडीत निघाले आहेत. केवळ उपपदार्थ निर्मितीमुळे एक यशस्वी कारखाना कसा तग धरून आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांचा रांजणी येथील ‘नॅचरल शुगर’ कारखाना होय. अडचणीच्या काळातही उसाला प्रतिटन सर्वाधिक २७०१ रूपये दर देऊन शेतकर्यांआना मोठा दिलासा दिला आहे.
national sugar factory th

महाराष्ट्र राज्य फार पूर्वीपासूनच उसाचे माहेरघर आहे. ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्यासाठी साखर उद्योगामुळे फार मोठ्या प्रमाणावर मदत झालेली आहे. आज अनुकूल हवामान, पुरेसा पाऊस व उसास मिळालेला समाधानकारक दर यामुळे राज्यात ऊस लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
देशातील साखरेच्या उत्पादनात राज्याचा वाटा जवळपास ४० टक्के इतका आहे. असे असले, तरी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे चित्र समाधानकारक दिसत नाही. नुकतेच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकर्यांाना वेळेवर एफआरपी न देणे, वजन करताना शेतकर्यांेची फसवणूक करणे अशी अनेक कारणे दाखवत राज्यातील तब्बल ४४ साखर कारखान्यांना लाल यादीत टाकले आहे. राज्यातील अनेक बड्या साखर सम्राटांच्या कारखान्यांचा यात समावेश आहे, असो.
जागतिकीकरणामुळे ऊस शेतीपुढे व साखर कारखानदारांपुढे अनेक प्रश्न व समस्या उभ्या राहिल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कोसळले की त्याचा परिणाम म्हणून ऊस उत्पादकांना व ऊस कारखानदारांना फटका बसतो. दुसर्या बाजूने कारखानदारांनी यशस्वी व विकसित साखर कारखाना उभा करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. साखरेबरोबरच उपपदार्थांची निर्मिती करणे गरजेचे आहे. व्यावसायिक वृत्तीचे व्यवस्थापन करून अडचणीच्या काळात साखर कारखाना सक्षमपणे उभा राहू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रांजणी येथील ‘नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड’ हा साखर कारखाना होय.


national sugar factory th

 कृषिरत्न बी.बी.ठोंबरे

कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी येथे ‘नॅचरल शुगर’ साखर उद्योग निर्माण झाला आहे. या कारखान्याने साखर निर्मितीबरोबरच पूरक दूध व्यवसाय व डेअरी, तसेच वीजनिर्मिती, इथेनॉल, पोलाद निर्मिती आणि उपपदार्थांची निर्मिती केली आहे. केवळ उपपदार्थांची निर्मिती न करता उपपदार्थ निर्मितीसाठी आवश्यक असणार्याब तांत्रिक बाबींसह बाजारपेठेत त्याबाबत स्वतःचा ब्रॅंड तयार करून चांगले मार्केटिंग करून कारखान्याची आर्थिक बाजू सक्षम केली आहे. व्यावसायिक वृत्तीचे दर्शन घडवत नॅचरल साखर कारखाना ८.२४ कोटी रुपये नफ्यात असल्याचे दाखवून दिले आहे.
 
 
चेअरमन कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी कारखान्याची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या वेळी नॅचरल शुगरच्या प्रगतीचे व वाटचालीचे असे अनेक दाखले समोर आले आहेत. यंदाच्या गळित हंगामासाठी या साखर कारखान्याने ठिंबक सिंचन लागवड उसास प्रतिटन २७०१ भाव जाहीर केला आहे, तर बिगर ठिंबकवरील उसास २६५१ रुपये प्रतिटन एफआरपीप्रमाणे भाव जाहीर केला आहे. यामुळे हजारो ऊस उत्पादक शेतकर्यांटना योग्य भाव मिळाला. यामुळे उसाखालील क्षेत्रात आणि उत्पादकतेत स्थिरता येण्यास मदत होणार आहे.
 
विशेष म्हणजे साखर दराच्या दुष्टचक्रात सापडलेला साखर उद्योग यशस्वी करून दाखवण्याचे काम नॅचरल शुगरने केले आहे. ऊस गाळपाबरोबरच उपपदार्थ निर्मितीमधून, तसेच वीजनिर्मिती, इथेनॉल व डेअरी प्रकल्पामुळे कारखाना नफ्यात आहे. साखर उद्योग टिकवून ठेवावयाचा असेल, तर साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती करून त्यामधून नफा मिळवावा लागेल, असा कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांचा विचार आहे.
सहकारी संस्थेत सहकारी तत्त्वांचे भान ठेवून स्पर्धा करून यशस्वी व्हावे लागते. उसावर प्रक्रिया करून साखर उत्पादन करणे, त्याच्या विक्रीतून सर्व खर्च भागवून नफा मिळवणे व तो नफा ऊस उत्पादकांना शेतकर्यांिना मिळवून देणे इथपर्यंतचे व्यवस्थापन मोठ्या कौशल्याने करावे लागते. हे कौशल्य ‘नॅचरल शुगर’ने आत्मसात केले आहे.

 
उस्मानाबाद हा तसा दुष्काळी भाग. इथे दर वर्षी दुष्काळ पडतो. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होत जाते. त्यामुळे या भागात साखर उद्योग उभा करणे आणि तो अशा तर्हे.ने यशस्वी करून दाखवणे हे कृषिरत्न बी.बी. ठोंबरेंसारख्या उत्तम प्रशासकासच उत्तम जमू शकले.