शाहीन बाग - एक जिहादी कॉरिडॉर

विवेक मराठी    01-Feb-2020
Total Views |

शाहीन बागसारखे आंदोलन उभे करून चक्का जाम करणे आणि देशभरांतील शहरांतील व्यवहार ठप्प करण्याचा या जिहादी मनोवृत्तीच्या लोकांचा प्लॅन होता/आहे. शाहीन बाग आंदोलन हे एक शांततापूर्ण आंदोलन नसून तो एक जिहादी कॉरिडॉर तयार करण्याचे माध्यम आहे. आता चालू असलेली आंदोलने दिखावा असून खरे तर त्याचा संबंधगझवा--हिंदशी आहे. तो कसा, हे आपण या लेखात पाहू या.


jamiya moment_1 &nbs 

मोदी-2 सरकारने आसाममध्ये एनआरसी लागू करून शोधलेले बांगला देशी घुसखोर, तीन तलाकवर आणलेली कायदेशीर बंदी, 370 हटवणे आणि रामजन्मभूमी हे अतिशय जुने प्रश्न सहा महिन्यांतच सोडवून देशप्रश्न सोडवण्याची आपली जबरदस्त इच्छाशक्ती दाखवून दिली. यामुळेच टुकडे टुकडे गँग आणि त्यांचे मालक, समर्थक यांचे पित्त खवळले. आपण नीट विचार केला, तर हे सगळे जुनाट प्रश्न केवळ आणि केवळ मुसलमान समुदायाशी जोडलेले आहेत असे लक्षात येते. नागरिकत्व कायदा केल्यानंतर आता पुढे एनआरसी, एनपीआर आणि समान नागरी कायदा हे सगळे येणारच, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच जिहादी शक्तींना कळून चुकलेय की जर मोदी-शाह असेच काम करत राहिले, तर आपले गझवा--हिंदचे स्वप्न पूर्ण होणे खूपच दूरची गोष्ट होईल. आतापर्यंतची सर्व मेहनत मातीमोल होईल. सध्या चालू असलेली आंदोलने जरी नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या नावाखाली असली, तरी याचा खरा संबंध गझवा--हिंदशी आहे. ते कसे काय, हे लेखात पुढे उलगडून पाहू या.


गझवा
--हिंद म्हणजे काय?

मुसलमान धर्मात दोन ग्रंथांना जास्त महत्त्व आहे - एक कुराण आणि दुसरा हदीस. हदीसमध्ये जिहाद म्हणजे धर्मयुद्ध असा अर्थ आहे. कुराणमध्ये गझवा--हिंदचा उल्लेख प्रेषित मुहम्मदाचे स्वप्न म्हणून येतो. गझवा--हिंद म्हणजेच सर्व हिंदुस्थान एक दिवस संपूर्ण मुसलमानबहुल करण्याचे स्वप्न. यूट्यूबवर शोधल्यास आपल्याला या संदर्भात माहिती सांगणारे अनेक व्हिडिओ पाहावयास मिळतील. पाकिस्तानची निर्मिती हे गझवा--हिंदसाठी उचललेले एक अतिशय महत्त्वाचे पाऊल होते. त्यानंतर पाकिस्तानातून आतापर्यंत भारतावर जी आक्रमणे (1947मधील काश्मीरवरील हल्ले धरून) झाली, जे दहशतवादी हल्ले झाले, हे सर्व याच्याच प्रयत्नांचा भाग आहेत. खलिस्तान चळवळीला मदत करणे, काश्मिरी पंडितांचे शिरकाण, तालिबान, लष्करे तैय्यबा, हिज्बुल मुजाहिदीन, जमाते इस्लामी, सिमी इत्यादी विविध दहशतवादी संघटनांची निर्मिती हे सगळे गझवा--हिंदचाच भाग आहेत. सिमीवर बंदी आल्यावर या दहशतवादी संघटनेने अनेक रूपे धारण करून आपले देशांतर्गत जाळे एकदम मजबूत करण्यास सुरुवात केली. स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (एसआयओ, 1982), वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया (डब्ल्यूपीआय, 2011), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया केरळ (पीडीपी केरळ, 2009), नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट (एनडीएफ, 1994), पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय, 2006) अशासारख्या संघटनांचे देशभर जाळे पसरवले असले, तरी याची पाळेमुळे केरळमध्ये आहेत.

पीएफआयचे खरे रूप

पीएफआयने विविध क्षेत्रांच्या माध्यमातून गझवा--हिंदला चालना देण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार पीएफआयच्या कार्यकर्त्यांना बाँब बनवण्याचे प्रशिक्षणही दिलेले आहे. पीएफआय अशी संबंधित कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय, 2009) विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांना भडकवण्याचे काम करते. नॅशनल विमेन्स फ्रंट (एनडब्ल्यूएफ, 2009) ही संघटना महिलांमध्ये मुसलमान धर्माचा आणि वेषभूषेचा प्रचार, प्रसार करते. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय, 2009) हा पीएफआयशी संबंधित राजकीय पक्ष या धर्मयुद्धाला राजकीय पाठबळ मिळवून देतो. ऑल इंडिया इमाम काउन्सिल हे धार्मिक लोकांमध्ये, तर इंडिया फ्रॅटर्निटी फोरम हे जगभरातील मुसलमानांना एकत्र करण्यासाठी काम करते. मुस्लीम रिलीफ नेटवर्क, मीडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (जिहादी कंटेंट मटेरिअल तयार करणे), मर्कझुल हिदाया, ग्रीन व्हॅली फाउंडेशन, रिहॅब इंडिया फाउंडेशन यांसारख्या सामाजिक आणि पर्यावरणविषयक काम करण्याचे मुखवटे चढवलेल्या संस्थादेखील पीएफआयशी संबंधित आहेत. दिल्लीमधील शाहीन बाग, जामिया नगर या भागात यांची कार्यालये आहेत. या सर्व संस्थांच्या माध्यमातून पीएफआय मुसलमानेतर धर्मांतील लोकांचे धर्मांतर, लव्ह-जिहाद, विद्यार्थ्यांचे ब्रेन वॉशिंग, महिलांमध्ये मुसलमान धर्माचा प्रसार, शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये मुसलमान धर्माचा प्रचार, सरकारविरोधी धोरणे राबवणे आणि कारवाया करण्यास पाठिंबा देणे अशा प्रकारचे काम पीएफआय करते आहे. यांचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे गझवा--हिंद. यासाठी पीएफआयला अरब राष्ट्रांमधून फंडिंग मिळते.


jamiya moment_1 &nbs 

सध्या चालू असलेली आंदोलने

गेल्या महिन्यातील दुसर्या आठवड्यापासून जसा नागरिकत्व कायदा मंजूर झाला, तसे देशाच्या विविध भागांत आंदोलने होत आहेत हे आपल्याला माहीत आहेच. या आधीच्या लेखांमधून आपण त्यांचे स्वरूपही पाहिले आहे. सुरुवातीच्या काळात आसाम आणि बंगाल अतिशय वाईट पद्धतीने जाळला गेला. नंतर दिल्लीमध्ये जामिया विद्यापीठातील आणि जेएनयूमधील हिंसक आंदोलने, उत्तर प्रदेशात लखनौ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या ठिकाणची हिंसक आंदोलने आणि त्यावर पोलिसांची तसेच प्रशासनाची आक्रमक आणि प्रतिबंधात्मक कारवाईदेखील आपल्याला माहीत आहेच. या आंदोलनांच्या गदारोळात दिल्लीमधील एक आंदोलन सुरुवातीला दुर्लक्षित राहिले की इतर हिंसक आंदोलनांच्या आवाजात मुद्दाम ते दुर्लक्षिले जाईल अशी सोय केलेली होती, याची कल्पना नाही. हे आंदोलन म्हणजे दिल्लीतील 14 डिसेंबर 2019पासून शाहीन बाग परिसरात चालू झालेले आणि आजतागायत अखंडपणे चालू असलेले शाहीन बाग आंदोलन. या आंदोलनाचे वैशिष्ट्य असे की हे आंदोलन वरवर दिसताना हिंसक नसून पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचे आहे. ईडीने केलेल्या चौकशीमध्ये असे लक्षात आले की ही सर्व आंदोलने पीएफआय या संघटनेने जवळजवळ 73 बँक खात्यांचा वापर करून 41.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करून प्रायोजित केलेली आहेत.

शाहीन बाग आंदोलन नक्की काय?

दिल्लीतील शाहीन बाग हा परिसर गाझियाबाद, फरीदाबाद आणि नॉयडा या तीन भागांना दिल्लीशी जोडणारा दक्षिण दिल्लीतील एक कॉरिडॉर आहे. या भागातून रोज हजारो गाड्या ये-जा करतात. याच भागातून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि जामिया हमदर्द या विद्यापीठांत जाता येते. थोडक्यात, हा भाग दिल्लीतील नागरी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे, तसेच हा मुसलमानबहुल भाग आहे. शाहीन बाग परिसरात हळूहळू शांतपणे आंदोलनकर्त्यांना जमवून हा भाग पूर्णपणे बंद केला गेला आहे. या आंदोलन करणार्यांत महिला, वृद्ध आणि बालके यांचा सर्वाधिक उपयोग करून घेतला आहे. हे सगळे इतके नियोजनबद्ध आहे की याचे नियमन करायला स्वयंसेवक ठेवलेले आहेत. दररोज सकाळ-संध्याकाळ इथे आंदोलनकर्त्यांना बिर्याणी खाऊ घातली जातेय. शाहीन बागच्या रस्त्यावर जिथे आंदोलन चालू आहे, तिथे लोक क्रिकेट खेळणे, रस्त्यावर पेंटिंग्ज करणे, गाणी गाणे, कविता वाचणे अशा प्रकारच्या ॅक्टिव्हिटीज करत आहेत. इथल्या आंदोलनातील महिला सकाळी घरातील आवरले की इथे मुलांना घेऊन रस्त्यावर येऊन बसतात आणि रात्रीच घरी जातात. आंदोलनकर्त्यांच्या दिवस आणि रात्रपाळ्या लागलेल्या आहेत. गेले 46 दिवस हे आंदोलन अखंड चालू आहे.

विरोधी आंदोलनातील क्षणचित्रे

यूट्यूबवर शाहीन बाग आंदोलनातील काही व्हिडिओ पाहण्यात आले, त्यात एक गोष्ट लक्षात आली - या सर्व आंदोलनांमध्ये एक गोष्ट सामाईक आहे, ती म्हणजे नागरिकत्व कायद्यासंदर्भात अत्यंत चुकीची माहिती आणि त्यावरून मोदी-शाहांना दिल्या जाणार्या शिव्या. आंदोलनातील कोणत्याही रँडम आंदोलनकर्त्याला सीएएचा विस्तारदेखील नीट सांगता येत नाही. जर कुणी विस्तार सांगितलाच, तर सीएएने देशातील मुसलमानांची नागरिकता काढून घेतली जाणार आहे अशी त्या विषयीची अत्यंत चुकीची माहिती दिली जातेय. काही जणांनी तर सीएए आणि एनआरसी हे दलितविरोधी, आदिवासीविरोधी आणि गे-लेस्बियनविरोधी आहे अशाही अफवा पसरवल्या आहेत. या आंदोलनातील पाच-सहा वर्षांची लहान मुलेदेखील अतिशय असभ्य आणि हिंसक भाषा बोलत आहेत. मोदी-शाहांना जीवे मारण्याची, ठेचून मारण्याची भाषा बोलत आहेत. महिलादेखील अशाच प्रकारची हिंसक भाषा वापरूनजेव्हा आम्ही संख्येने अधिक होऊ, तेव्हा तुम्हा हिंदूंना रस्त्यावर आणून ठेचून ठेचून मारूअशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. लहान मुलांनातुम्ही शाळेत जाता का? कितवीत आहात?” असे प्रश्न विचारल्यावर मुले म्हणतात, “सीएए, एनआरसी लागल्यामुळे शाळेला सध्या सुट्टी आहे.” दिल्लीत तीन महिने रासुका लागलेला असला, तरीही शाहीन बागमध्ये पोलीस जाऊ शकत नाहीयेत इतकी आंदोलनकर्त्यांनी महिला, वृद्ध आणि लहान मुलांची फौज तिथे उभी केलेली आहे. मोदी-शाहांनी आमच्याशी बोलायला इथे यावे अशी मागणी करत आंदोलनकर्ते बाकी कुणाशीही बोलत नाहीयेत, काही विचारले की जन गण मन ओरडण्यास सुरुवात करतात आणि आजूबाजूला गांधी, आंबेडकर इत्यादींच्या प्रतिमा लावून ठेवलेल्या आहेत.

आंदोलनातील विरोधाभास आणि उपस्थित प्रश्न

या आंदोलनातील क्षणचित्रे पाहिल्यावर अनेक परस्परविरोधी बाबी लक्षात येतात आणि काही प्रश्न उपस्थित होतात. आंदोलन जरी उत्स्फूर्त आहे असे दाखवण्याचा प्रयत्न असला, तरी ते अतिशय सुनियोजित आणि वेल मॅनेज्ड आहे. साधारण लाखभर लोक (मुख्यत: निम्न आर्थिक स्तरातील) रोज दिवसभर आंदोलनासाठी येऊन बसतात, तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च कोण देतो? हे इतके आर्ट शोज आणि ध्वनिक्षेपकावरून भाषणे देणे, उन्हापासून बचाव करण्यासाठी मांडव, गर्दीला मॅनेज करण्यासाठी असलेले स्वयंसेवक याचा खर्च कोण देतेय? शाहीन बाग परिसरातील व्यवसाय, दुकाने गेले 46 दिवस बंद आहेत. मग या हातावर पोट असलेल्या लोकांचे आर्थिक नुकसान कोण भरून देतेय? आंबेडकरांच्या फोटोच्या समोर भारतीय राज्यघटनेच्या प्रती हातात घेऊन एकीकडेसंविधान वाचवा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य हवे, आजादी हवीअशा घोषणा दिल्या जात आहेत तर दुसरीकडे गेले 46 दिवस शाहीन बागमधून जाणारा रस्ता बंद करून दिल्लीतील लाखो लोकांना त्रास दिला जातोय, आंदोलनकर्त्यांना प्रश्न विचारणार्या पत्रकारांना मारहाण केली जातेय आणि भारतासारख्या स्वतंत्र देशातील पोलिसांना, नागरिकांना एका विशिष्ट भागात प्रवेश नाकारून गो-बॅकच्या घोषणा दिल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ज्यांना राष्ट्रगीत म्हणणे म्हणजे जबरदस्ती वाटत होती, राष्ट्रगीताला उभे राहणे गरजेचे वाटत नव्हते, असे लोक अचानक हातात तिरंगा घेऊन जोरजोरात ओरडून राष्ट्रगीत म्हणत असल्याचे नाटक करत आहेत.

 

शाहीन बाग आंदोलनाचे तत्त्वज्ञान

शाहीन बाग आंदोलन हे वरवर जरी शांततापूर्ण आंदोलन दिसत असले, तरी त्याचे तत्त्वज्ञान आणि मूळ हेतू फार वेगळे आहेत. शाहीन बाग आंदोलनाला तीस दिवस पूर्ण झाल्यावर प्रसारमाध्यमांचे लक्ष शाहीन बाग आंदोलनाकडे वळवले गेले. तोपर्यंत दिल्लीतील शाहीन बाग भागातून रस्त्याने ये-जा करणार्यांची प्रचंड वाहतूक कोंडी आणि ती टाळण्यासाठी एक तासाचा वळसा घालून लोक जाण्यास सुरुवात झालेली होती. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेणे हादेखील एक उद्देश होता, जो फारसा सफल झाला नाही. त्याच सुमारास शर्जिल इमाम या जेएनयूतील विद्यार्थ्याचे नाव या शाहीन बाग आंदोलनाचा मास्टर माइंड म्हणून समोर आले. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात तो चक्का जाम करून देश वेठीस धरणे असे शाहीन बाग आंदोलनाचे तत्त्वज्ञान सांगत होता. म्हणजेच शाहीन बागसारखे येण्याजाण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या भागात मुसलमान लोक जमा करून रस्ता बंद करून शांततेत आंदोलन करायचे. यामुळे रस्ते बंद होऊन त्याच्या आजूबाजूचे व्यवहार ठप्प होतील आणि भारतातील मुख्य शहरे, भाग वेठीस धरता येतील.

jamiya moment_1 &nbs

शर्जिल इमाम कोण आहे?

शर्जिल इमामचे फेसबुक प्रोफाइल पाहिले, तर हा आयआयटी मुंबईमधून संगणकशास्त्रात पदवी मिळवलेला तरुण आहे. त्यानंतर तिथेच टीचिंग असिस्टंट म्हणूनदेखील त्याने काम केलेले आहे. संगणक अभियंता म्हणूनदेखील काही ठिकाणी काम केलेले आढळते. मग अचानक तो जेएनयूमध्ये पॉलिटिकल सायन्स शिकण्यास सुरुवात करतो. तिथेच दंगे आणि दंगली या विषयावर पीएचडी करतो आणि वायर या वेब पोर्टलसाठी पत्रकार म्हणूनदेखील काम करतोय. यात प्रश्न असा उपस्थित होतो की आयआयटीमध्ये शिकलेला संगणक अभियंता पुढे शिकायचे सोडून जेएनयूमध्ये दंगे आणि दंगली या विषयावर पीएच.डी. का करेल? आणि वायरमध्ये पत्रकारितेचे काम का करेल? तर याचे कारण जिहादी मानसिकता. म्हणजे पीएफआयसारख्या संघटना अशा प्रकारे हुशार विद्यार्थ्यांमधूनही जिहादी बाँब्ज तयार करण्याचे काम करत आहेत. जेएनयूमध्ये अशांना खतपाणी घातले जातेय. आंदोलनाची धग देशभर पसरवण्यासाठी हा माणूस उत्तर प्रदेशातील अलिगढ, प्रयागराज, बंगालमधील असनसोल इत्यादी ठिकाणी फिरून मुसलमान लोकांची डोकी भडकवण्याचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करत होता.. जणू तो चालता-फिरता इंटलेक्च्युअल बाँबच आहे.

काय आहे शर्जिल इमामचे वक्तव्य?

शर्जिल इमाम हे नाव देशभर कुप्रसिद्ध झाले ते त्याच्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील देशद्रोही वक्तव्यामुळे. तिथे व्याख्यान देताना त्याने जोशात येऊन या आंदोलनांमागील आपला मूळ हेतूच सांगितला. तो म्हणाला कीआसाममध्ये मुसलमानांची अवस्था एनआरसीमुळे अतिशय वाईट झालीये. अनेकांना डीटेन्शन कॅम्प्समध्ये राहावं लागतेय (याचा अर्थ ते बांगला देशी घुसखोर आहेत). आसाममधील लोकांचा सीएएला विरोध आहे. आसामला आणि ईशान्य भारताला संपूर्ण भारतापासून तोडण्यास आपण मदत केली पाहिजे. तो कायमचा जरी तोडता आला नाही, तरी कमीत कमी एक महिना तरी आपण ते करू शकतो. कसे? तर सिलिगुडी कॉरिडॉर, जो . बंगाल आणि आसाम यांना जोडणारा जेमतेम 22 कि.मी.चा पट्टा आहे, ज्यालाचिकन नेकअसेही संबोधतात, त्या भागात कित्येक वर्षांपासून बांगला देशी मुसलमानांनी घुसखोरी केलेली आहे. त्यातच आता तिथे रोहिंग्या मुसलमानदेखील येऊन राहिलेत. त्यामुळे चिकन नेक हा मुसलमानबहुल भाग झालेला आहे. कन्हैय्या कुमारसारख्यांनी आंदोलनाची हाक देऊन तिथे मुसलमान लोक शाहीन बागसारखे रस्त्यावर उतरले, तर भारतातील लष्कराची आसाम आणि ईशान्य भारतात जाण्याची कोंडी होईल. लाखो लोकांना हटवण्यासाठी त्यांना किमान एक महिना तरी लागेल. तोपर्यंत आसाममधील सर्व हिंदूंना मारून टाकले जाईल. त्यानंतर आसामला भारतापासून तोडायला वेळ लागणार नाही.” असा देश तोडण्याचा प्लॅनच त्याने उघडपणे बोलून दाखवला.

शाहीन बाग - एक जिहादी कॉरिडॉर

शर्जिलच्या या वक्तव्यामुळे त्यांचे मनसुबे उघड झाले आणि त्याला अटकही केली गेली. पण देशभरात अशा प्रकारे शाहीन बागसारखे मोक्याचे भाग हेरून तिथे सगळीकडे शाहीन बागसारखे आंदोलन उभे करून चक्का जाम करणे आणि देशभरांतील शहरांतील व्यवहार ठप्प करण्याचा या लोकांचा प्लॅन होता/आहे. शाहीन बाग आंदोलन हे एक शांततापूर्ण आंदोलन नसून तो एक जिहादी कॉरिडॉर तयार करण्याचे माध्यम आहे. शाहीन बाग हे फक्त एक टेस्टिंग ग्राउंड आहे. खरा शो तर सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये घडवला जाणार होता/आहे. असा एक शर्जिल इमाम जरी सध्या पोलिसांच्या ताब्यात असला, तरी असे अनेक शर्जिल आपल्या आजूबाजूला फिरत आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. त्यांना वेळीच ओळखावे. काश्मीरमध्येदेखील अशाच प्रकारे बायका-मुलांना आणि वृद्धांना पुढे करून पोलिसांना आणि लष्कराला कारवाई करण्यापासून रोखण्यात येते आणि जनजीवन वेठीस धरले जाते. इस्रायलमध्येदेखील हमास ही दहशतवादी संघटना पॅलिस्टिनी बायका, लहान मुले यांना पुढे करून इस्रायलचे बाँब हल्ले निरागस बायका-मुलांवर होत असून इस्रायल मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे असा कांगावा केला जातो. इथेदेखील शाहीन बागमध्ये पोलीस कारवाई केली, तर बायका-मुलांवर मोदी सरकार अत्याचार करत आहे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे असा कांगावा करण्यास सुरुवात करायची, नाहीतर जनजीवन वेठीस धरून आपल्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत राहायचा. म्हणूनच शाहीन बागलाजिहादी कॉरिडॉरहेच नाव योग्य आहे.