Enter your Email Address to subscribe to our newsletters
@शरदमणी मराठे
‘घरपोच कनेक्ट’ची सेवा सुरू झाली असून महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात पसरलेले चोखंदळ ग्राहक तिचा लाभ घेत आहेत. स्वदेशी उत्पादनांच्या,
छोटे उद्योग, गृहउद्योग यांनी बनवलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तूंना ई-कॉमर्सवर आणण्याच्या ह्या प्रयत्नांना आपला हातभार लागावा, असे महाराष्ट्रातील सर्व चोखंदळ ग्राहकांना आवाहन आहे.
एक इतिहास घडतो आहे.
चला, त्यात सहभागी होऊ या!
पाच वर्षे जुनी गोष्ट असेल. मी माझ्या कामाकरता अमेरिकेतील सॅन-फ्रान्सिस्को शहरात गेलो होतो. आठवड्याभरात काम संपल्यावर वीकेंडला सॅन-फ्रान्सिस्को शहर बघताना एके ठिकाणी ‘फार्मर्स मार्केट’ दिसले. चौकशी केल्यावर कळले की हा दर आठवड्याचा प्रघात आहे. त्या मार्केटमध्ये शहराच्या जवळपासच्या भागातून शेतकर्यांनी पिकवलेला ताजा शेतीमाल तर होताच, तशीच शेतीमालाचा उपयोग करून केलेली अनेक तरर्श्रीश रववशव िीेर्वीलीींसुद्धा होती. उदाहरणार्थ, एका स्टॉलवर कोकोच्या एका बोंडातून मिळालेल्या बियांचा वापर करून तयार केलेली चॉकलेट्स होती. ती ‘सिंगल ओरिजिन चॉकलेट्स’ लोक उत्साहाने घेत होते. आता खरे तर मोठ्या अमेरिकन कंपन्यांची उत्पादने जगभरातल्या बाजारपेठेत पोहोचली आहेत. तरीही शहराच्या परिसरातील शेतकर्यांची गुणवत्तापूर्ण उत्पादने विकत घेणारा चोखंदळ ग्राहक तिथे होताच.
आपल्याकडेही गावोगावी आठवडा बाजार ही कल्पना होतीच. अजूनही काही ठिकाणी असेल. छोट्या उत्पादकांना वितरणासाठी कुठलाही खर्च न करता, पैसे खर्च करून आपल्या उत्पादनाची जाहिरात न करता त्यांचा माल विकला जाण्याची सोय होते. ‘घरपोच कनेक्ट’च्या माध्यमातून एक प्रकारे हा आठवडा बाजारच ‘अॅप’वर आणण्याचे ‘घरपोच कनेक्ट’ने ठरवले. जगात कितीही मोठी कंपनी असो, ती काहीही उत्पादन करो, पण माझ्या परिसरातल्या शेतकर्याने, कारागीराने, छोट्या उद्योजकाने बनवलेले गुणवत्तापूर्ण उत्पादन मला नेहमीच जवळचे वाटणार आणि नेहमीच हवेसे वाटणार. नाहीतरी महात्मा गांधी म्हणायचेच की “आपल्या गरजा आपल्या परिसरातून भागवणे हाच स्वदेशीचा खरा अर्थ आहे.”
कोविड-19च्या साथीमुळे जेव्हा देशभर लॉकडाउन होता, सारे व्यवहार जवळजवळ ठप्प होते, तेव्हा चंद्रशेखर वझे आणि त्यांचे सहकारी ‘घरपोच कनेक्ट’ ह्या कंपनीची आखणी करत होते. त्या कामाच्या प्रत्येक क्षणी एकच गोष्ट मनात होती, ती म्हणजे महाराष्ट्रभर पसरलेला चोखंदळ ग्राहक आणि लहान-लहान जागी उत्तम गुणवत्तेचे पदार्थ बनवणारे छोटे उद्योग ‘घरपोच कनेक्ट’ला कसे स्वीकारतील? गेल्या चार महिन्यांत ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत आहे. सतत अनिश्चिततेचे सावट असलेल्या ह्या काळात लहान-मोठ्या 400+ उत्पादकांनी ‘घरपोच कनेक्ट’शी व्यावसायिक सहकार्य करण्याचे मान्य करणे आणि त्यांची सुमारे 4000+ उत्पादने उपलब्ध करण्याची तयारी दर्शवणे हे ‘घरपोच कनेक्ट’मधल्या सर्वांचाच उत्साह वाढवणारे होते.
‘घरपोच कनेक्ट’मध्ये नोंदलेल्या उत्पादनांपैकी जवळजवळ पन्नास टक्के वा अधिक उत्पादने अशी आहेत, ज्यांची विक्री आजवर एका मर्यादित भौगोलिक क्षेत्रातच होत असते. याचा अर्थ त्यांचे उत्पादन कमी गुणवत्तेचे आहे असा नाही, पण महाराष्ट्रभर वितरणाचे जाळे उभे करण्याची उत्पादकाची शक्ती नाही. अशा सगळ्या उत्पादकांसाठी ‘घरपोच कनेक्ट’ने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाणारी वितरणाची साखळी उभी केली आहे. आज महाराष्ट्राच्या सर्व भागात, सर्व शासकीय जिल्ह्यांत आणि जवळपास सर्वच तालुक्यांत ‘घरपोच कनेक्ट’चे जाळे पसरले आहे.
आपल्याकडे ई-कॉमर्स कंपन्यांची काही कमतरता नाही. इंटरनेटवरून, फोनवरून विविध वस्तू, पदार्थ मागवणे, डिजिटल पद्धतीने त्याचे पेमेंट करणे आणि त्या वस्तू आपल्या घरी डिलिव्हर होणे हा अनुभव आपल्याला नवीन नाही. मग ‘घरपोच कनेक्ट’मध्ये असे काय विशेष आहे? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. तशी ‘घरपोच कनेक्ट’ची अनेक वैशिष्ट्ये आहेत, पण एकच महत्त्वाचे वैशिष्ट्य जर सांगायचे झाले तर ते एकाच शब्दात सांगता येईल - संवादक!
घरपोचच्या ग्राहकांनी जेव्हा घरपोचचे अॅप डाउनलोड केले, तेव्हा ते अॅप सुरू करण्यासाठी ग्राहकाच्या परिसरात राहणारा घरपोचचा प्रतिनिधी अॅक्टिव्हेशन नंबर घेऊन त्यांना भेटला आणि अॅप सुरू झाले. तो स्थानिक प्रतिनिधी म्हणजेच ‘घरपोच कनेक्ट’चा संवादक. प्रत्येक ग्राहकाच्या अॅपमध्ये ग्राहकाच्या परिसरात असणार्या प्रतिनिधीचे - म्हणजेच संवादकाचे नाव आणि फोन नंबर नोंदलेला आहे. ग्राहकाच्या जिल्ह्यामध्ये असे सुमारे 150 ते 175 संवादक आहेत. ते त्यांच्या-त्यांच्या अंदाजे अडीच-तीन हजार घरांच्या वस्तीत ‘घरपोच कनेक्ट’चे प्रतिनिधित्व करतात.
“घरपोच’मुळे पुनर्वसु महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचलं”
व्यवसाय सुरू करणं, ब्रँडच्या भाऊगर्दीत आपल्या ब्रँडचा चिमुकला झेंडा फडकवणं, विशेष पाठबळ नसताना मोठमोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत आपला जीव टिकवून ठेवणं, या सगळ्या बाबी किती अवघड आहेत ते जो हा डाव मांडतो त्यालाच कळतं! चांगलं उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचणं याकरता पुष्कळ मार्ग आहेत, पण ते बहुशः लहान उद्योजकाच्या आवाक्याबाहेरचे आहेत. उत्तम पॅकिंग, क्वालिटी, उपलब्धता, स्पर्धात्मक दर याची सांगड घालतानाच जिथं नाकी नऊ येतात, तिथं पुन्हा जाहिरातीकरता भांडवल उभं करणं शक्यच नसतं. शिवाय पेपरमधल्या वा टीव्हीच्या जाहिराती म्हणजे वाळूत पाणी घातल्यातला प्रकार. घातलेलं लोटाभर पाणी कधीच जिरून जातं नि काही उगवत नाही, ते वेगळंच..
पण आता पुनर्वसुची उत्पादनं महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्यांत उपलब्ध करून देता यावीत, हे स्वप्न ‘घरपोच’ या अभिनव उपक्रमामुळे साध्य झालं आहे .घरपोच हे अॅप लाँच करताना ग्राहकांइतकाच उत्पादकांचाही विचार केला आहे, हे विशेष. कोणतेही जाचक नियम नाहीत, अमुकच मार्जिन दिलं पाहिजे, कमीत कमी इतका माल दिला पाहिजे वगैरे काहीही अटी नाहीत. महत्त्वाचं म्हणजे वेळेत पेमेंट येण्याची खात्री! लघु व सूक्ष्म उद्योगांना मोठा ग्राहकवर्ग मिळणं व ग्राहकांना उत्तम दर्जेदार उत्पादनं घरबसल्या मिळणं हे दोन्ही साध्य करणारी ‘घरपोच’ ही अतिशय अभ्यासपूर्वक व अत्याधुनिक प्रणाली वापरून केलेली मार्केटिंग रचना आहे. अक्षरशः एका पॅकेटचीसुद्धा डिलिव्हरी जेव्हा कुठल्यातरी कोपर्यातल्या ग्राहकाला वेळेत दिली जाते, तेव्हा या अद्भुत रचनेचं फार आश्चर्य व कौतुक वाटतं. एका नगाचीही ऑर्डर राहता कामा नये, हे बंधन मग उत्पादकालाही आपोआप वाटतं! विक्रीसाठी जाणारा संवादक हा घटक किती महत्त्वाचा आहे, ते लक्षात येतं; कारण अनेकदा ग्राहकाने काही शंका विचारली, तर संवादक तत्परतेने फोन करून विचारतो व शंकेचं निरसन करून देतो! विक्रीच्या चार-पाच सायकल्सचा अनुभव अतिशय उत्साहवर्धक आहे. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ यासारख्या ठिकाणांहूनदेखील लोक उत्पादनं मागवत आहेत. खर्या अर्थाने आता आपला ब्रँड महाराष्ट्रभर परिचित होतो आहे, याचं समाधान मोलाचं आहे. ‘घरपोच’ लवकरच ई-बाजारात आपला दमदार ठसा उमटवेल, यात शंका नाही!
-विनीता तेलंग
ग्राहकाने आपली ऑर्डर नोंदवल्यानंतर संवादक काही दिवसांत ती ऑर्डर डिलिव्हर करणार आहे. मिळालेल्या वस्तूंबद्दल ग्राहकाला त्याचे म्हणणे तिथल्या संवादकाला सांगता येईल, मग ती प्रशंसा असो, सूचना असो किंवा तक्रार असो. या पद्धतीचा आणखी एक फायदा असा की अन्य ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे प्रत्येक डिलिव्हरीच्या वेळी कोणी नवाच माणूस आपल्या घरी येतो, असे ‘घरपोच’च्या बाबतीत होणार नाही. सध्याच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘घरपोच कनेक्ट’चे 5 लाख ग्राहक आहेत आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधणार आहेत सुमारे 7500 संवादक. ग्राहकाला त्याची ऑर्डर घरपोच देण्याच्या बरोबरीने नव्याने दाखल झालेल्या विशेष उत्पादनांचे तपशील, ग्राहक सेवेच्या नव्या योजना अशाविषयी हाच संवादक ग्राहकाला वेळोवेळी अधिक माहिती देईल. विविध मसाले, रेडी टू कूक उत्पादने, लोणची-चटण्या-पापडांचे असंख्य प्रकार, विविध पिठे, भाजण्या, फळांचे रस, फळांची सरबते, जॅम-मोरांबे, आरोग्यदायक उत्पादने, आयुर्वेदिक उत्पादने, गृहोपयोगी उत्पादने, गोड पदार्थ, खमंग खाऊचे अगणित प्रकार अशा अक्षरशः हजारो गोष्टी ‘घरपोच कनेक्ट’वर मिळणार आहेत.
येत्या दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान ‘घरपोच कनेक्ट’ची सेवा सुरू झाली असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पसरलेले चोखंदळ ग्राहक त्याचा लाभ घेत आहेत. स्वदेशी उत्पादनांच्या, छोटे उद्योग, गृहउद्योग यांनी बनवलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तूंना ई-कॉमर्सवर आणण्याच्या ह्या प्रयत्नांना आपला हातभार लागावा, असे महाराष्ट्रातील सर्व चोखंदळ ग्राहकांना आवाहन आहे. एक इतिहास घडतो आहे. चला, त्यात सहभागी होऊ या!