माणसाने जमिनीवररेषा ओढायला सुरुवात केली आणिस्थलांतर या शब्दाचा जन्म झाला.नैसर्गिकआपत्ती, वाढती लोकसंख्या, वाढती बेकारी, शहरी भागात असणाऱ्यारोजगाराच्या संधी, उद्योगधंदा, व्यापार, शहरी जीवनाचेआकर्षण अशी अनेककारणे आहेत, ज्यामुळेमाणसे वास्तवाचेठिकाण सोडूनपरगावी, परप्रांती - अगदी परदेशातसुद्धा जाऊ लागली.
स्थलांतर म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात.स्थलांतर म्हणजे आपल्या मातीला, आपल्या परंपरेला दुरावणे .
खूप काही मिळवल्यानंतर लक्षात येते कीआपण बरेच काही गमावले आहे. पण अनेकवेळा जे हरवतेते परत मिळणेही अशक्य होऊनजाते.माणूस चांगल्या आयुष्याच्या शोधातआपले गाव सोडतो खरे, पण जगाच्यापाठीवरकुठेही गेला तरीतो आपले मूळ विसरत नाही.हृदयाचा एक कोपरा त्यालाघट्ट
धरून ठेवतो.
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़ेचमन
तुझपे दिल क़ुरबान
रूढ अर्थाने हे राष्ट्रभक्तिपरगीतनाही. हा आठवणींचा कल्लोळ आहे. आपल्यामातृभूमीला घातलेलीसाद आहे.रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली ‘काबुलीवाला’ ही कहाणी केवळ एकपठाण आणिएक छोटी मुलगी यांच्यात निर्माण झालेल्या मैत्रीचीकहाणी नाही, ही आपल्या मातृभूमीला अंतरलेल्या एक विस्थापिताचीही कथाआहे.
चित्रपटाची सुरुवात होते काबुलमधील दृश्याने.रहमत पठाण (बलराज सहानी) हा विधुरआहे.त्याचा सारा जीव त्याच्या लहानमुलीत गुंतलेला आहे.मुलगीआजारी पडते.तिच्या आजारपणात बराच खर्चझाल्याने कर्जाचा बोजावाढतो. हेकर्ज फेडण्यासाठी पैसेतर कमवायला हवे.यासाठी रहमत पठाणभारतात यायचे
ठरवतो.मुलीला सोडून जाताना जिवावरयेते, पण इलाजनसतो.तिचीआठवणम्हणूनएका कागदावरतिच्या हाताचे ठसे घेऊनतो निघतो.
पठाण म्हणजे राकट, क्रूर माणूस असे समजतात.जनमानसात त्याची प्रतिमा अशीचआहे.रहमत वरूनजरी उग्र वाटला, तरी त्याचे अंतःकरण मात्रकोमल आहे.कोलकातामध्ये जेव्हा त्यालामिनी भेटते, तेव्हा तिच्यात त्याला आपल्यामुलीचे प्रतिबिंब दिसते.त्या निष्पाप, गोड मुलीच्या गप्पांततो रमूनजातो. मिनीचेवडील लेखक.ते आणिमिनीची आई आपापल्या कामात व्यग्र असतात. बोलायला आसुसलेली मिनी आणि काबुलीवाला दोघांची गट्टी जमते.मिनीच्या आईच्यामनात मात्र या पठाणाबद्दल संशय आहे. धर्म, जात, वंश, वर्ण हे माणसांनीच निर्माण केलेलेभेदआपापसातील अविश्वासाला जन्मदेतात.काबुलीवाला मात्र मिनीसोबत लहानाहून लहानहोतो.वयाची बंधने गळूनजातात आणि मैत्रीचे निरागसआणि उत्कट नाते त्यांच्यात निर्माण होते. एकेदिवशी काबुलीवाला येत नाही, म्हणून मिनी त्याच्या शोधात निघते.रस्ताचुकते आणिया महानगरात हरवते.काबुलीवाला तिला शोधतो, पण मुलेचोरणारा असेसमजून इतरमाणसे त्याला चोप देतात.मिनी आजारीपडते आणि रात्रभर जागूनअल्लाची प्रार्थना करणाराकाबुलीवालामिनीबरोबर आपल्याही हृदयात घर करतो. हा आघातजीवघेणाच.एकतर पोटच्या पोरीसारख्या असणाऱ्या मुलीलाआजारीपडलेले पाहून होणारेदुःख आणि इतरांच्या नजरेत स्वतःबद्दल जाणवणाराअविश्वास.या परक्याभूमीत आपले म्हणणारे कुणीही नाही, हे दुःख कितीअसह्य असेल!घरापासून दूर, आपल्या मुलीपासून दूर असलेल्या या पठाणालामातृभूमीची आठवणव्याकूळ करते.
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़ेचमन
तुझपे दिल क़ुरबान
तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरीआबरू
तू ही मेरी जान
या गीतात मातृभूमीप्रती वाटणारा आदर आहे, प्रेम आहेआणि अभिमान आहे. हे गाणे आहे एकापठाणाचे.त्याच्या मातृभूमीसाठी, काबुलसाठी गायलेलेअसूनहीते आपल्या राष्ट्रभक्तिपरगीतात आपण सामील करूनघेतलेले आहे. यावरून या गीतातील भावनाहीदेश, धर्म, संस्कृती, सीमा या सर्वांनाओलांडून गेली आहे, हे लक्षात येते.याचे पूर्ण श्रेयजाते गीतकार प्रेमधवन, संगीतकार सलीलचौधरी आणि गायक मन्नाडे यांना.मुंबईत जिथेअफगाणी लोकांची वस्ती होती, तिथूनच सलीलचौधरी यांना या गीताचे ध्रुवपदमिळाले. या गीतात वापरलेले ‘रबाब’ हे अफगाणी वाद्य या संगीताला आणखीउठाव देते. जन्मभूमीपासून लांब असलेल्या प्रत्येकाची वेदना मन्नाडेंनी आपल्याआवाजातून पोहोचवलेली आहे.
तेरे दामन से जो आए, उन हवाओंको सलाम
चूम लूँ मैं उस ज़ुबाँको, जिसपे आएतेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगीं तेरीशाम
तुझपे दिल क़ुरबान
आपल्या देशातल्या वाऱ्यालाही पारखेझाल्याने उन्मळून आलेले हेशब्द आणिब्रायटनच्या समुद्रावर वीरसावरकरांनी रचलेले काव्य यात कितीसाम्य आहेपाहा!आपल्या खिडकीतून अस्तालाजाणारा सूर्यास्त पाहताना, पठाणाला आपल्यादेशातला सूर्योदय आठवतो, क्षितिजाच्या पटलावररंग उधळणारी सायंकाळ
अस्वस्थ करते, तर आपल्या मातृभूमीच्या आठवणीने गहिवरून आलेलेस्वातंत्र्यवीर म्हणतात,
ती आम्रवृक्षवत्सलता रे
नवकुसुमयुतात्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे
फुलबाग मला हाय पारखा झाला॥
सागरा प्राण तळमळला
काही वर्षांपूर्वी एक महिना परदेशातराहण्याचा योग आला होता. तिथलीस्वच्छता, मोठी घरे, प्रवासाच्या सुविधा, वक्तशीरपणा, सुबत्ता यासगळ्यांनी सुरुवातीला भारावूनगेले होते.मग जसजसेदिवस जाऊ लागले, तसतसेभारतातली गर्दी, लोकांचे एकत्रहसणे, बोलणे अगदीवाद घालणे, रस्त्यावरचेधाबे, गाड्यांचे हॉर्न, फेरीवाल्यांची हाळी यांची आठवणअस्वस्थ करूलागली.तिथली शांतताही नकोशीझाली.
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझपे दिल क़ुरबान
आठवणी येत असतातच आणि जरपरदेशात राहणे ही मजबुरी असेल, तर त्याअतिशयत्रास देतात.इथेतर तो आपल्या कुटुंबीयांपासून लांबआहे.
माँ कादिल बन के कभी, सीने से लगजाता है तू
और कभी नन्हीं सी बेटी, बन केयाद आता है तू..
मिनीमध्ये आपली मुलगी पाहणे हाहीआभासच असतो.अर्थात जेव्हा सत्यकडूअसते, तेव्हा माणूस या आभासाच्या सोबतीनेजगतो. त्याच्यात सुखशोधतो.मिनीचे आजारपण, तिच्यापासून लांब जाणे त्यालाविदारक सत्याची जाणीव करूनदेते.हे सूरत्याच्या एकटेपणाच्या व्यथेला बोलके करतात.व्यावहारिक,
आर्थिक अपयश नशिबी आल्यावर, ज्या मातीत जन्मघेतला त्याच मातीत मिसळणे हीत्याची इच्छा सर्वच निर्वासितांच्या आणिविस्थापितांच्या वेदनेला शब्ददेते.