जामियातील आंदोलन हे जरी विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त असं आंदोलन दाखवलं गेलं असलं, तरी जे दिसतंय तसं नाहीये. यामागे खूप खोलवर अनेक राजकीय शक्ती आणि दहशतवादी शक्ती कार्यरत आहेत, ज्यांचा भाजपा सरकारला विरोध आहे. हा केवळ राजकीय विरोध नसून दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांच्या आडून देशात हिंसक आंदोलनं उभी करणं हे आहे...
भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांत 12 डिसेंबरला नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित झालं आणि 13 डिसेंबरला राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यावर त्याचं कायद्यात रूपांतर झालं. 13 डिसेंबरला शुक्रवारीच जामिया विद्यापीठात हिंसक आंदोलनांना सुरुवात झाली आणि या आंदोलनांवरून देशभरात राजकारणासदेखील सुरुवात झाली. आपण सगळ्यांनीच सोशल मीडियावर 13, 14 आणि 15 डिसेंबरला तीन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत असलेल्या एका मुलीच्या फोटोसंदर्भात पोस्ट्स पाहिल्या. या पोस्ट्स एकच प्रश्न विचारत होत्या - तीन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करताना एकच व्यक्ती? हा योगायोग आहे की प्रसारमाध्यमांनी किंवा आणखी कुणी पेरलेली व्यक्ती? आणि अनेकांच्या मनात संशयाचा किडा वळवळू लागला.
बरखा दत्तने घेतलेली दोन शिरॉइन्सची मुलाखत आणि पर्दाफार्श
बरखा दत्तच्या ट्वीटच्या छायाचित्रात त्या दोन मुलींना तिने ‘शिरॉइन्स’ म्हंटलंय. पण या नाट्यातील खरी हिरो ही एकच मुलगी आहे आणि दुसरी आहे ती विंगेतील आहे. विंगेतील माणूस हा नाटकातील हिरोसाठी छोटे-मोठे धोके पत्करतो. त्यामुळे लोकांना जरी वाटत असलं की आयेशा राणा (बरखाच्या ट्वीटच्या छायाचित्रातील चश्मेवाली मुलगी) ही विंगेतील आहे आणि लदिदा फरझाना ऊर्फ लदिदा शखालून (छायाचित्रातील दुसरी मुलगी) ही खरी हिरो आहे. बरखाच्या ट्वीटवरील छायाचित्रे पाहा. (छायाचित्र-2) आयेशाचा उपयोग फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला होता. पण सगळी चळवळ ही लदिदा फरझाना ऊर्फ लदिदा शखालून हिला मोठं करण्यासाठी होती. बरखानेही मोठ्या हुशारीने ट्वीटमध्ये तिचं नाव पहिलं टाकलं आहे. बरखाने मुद्दाम तिचं नाव टाकताना लदिदा फरझाना असं टाकलेलं आहे. कारण सोशल मीडियात तिच्याबद्धल आपण तिच्या नावावरून काहीही शोधू शकणार नाही. लदिदा शखालून ही मुसलमान धर्माची प्रचारिका आहे. https://www.youtube.com/watch?
लदिदा शखालून नक्की कोण आहे?
सध्या लदिदा जामिया विद्यापीठात अरेबिक भाषा शिकण्याच्या पहिल्या वर्षाला आहे. 2017मध्ये लदिदा मुसलमान महिलांच्या राजकारणाविषयी एका कॉन्फरन्समध्ये बोलली होती. https://www.youtube.com/watch?
अरब स्प्रिंग आंदोलन नक्की काय होतं?
अरब स्प्रिंग आंदोलन हे 2010 ते 2012 दरम्यान उत्तर अफ्रिकेतील अरब राष्ट्रांत तत्कालीन मुसलमान सरकारांविरोधात झालेलं आंदोलन होतं. आपल्याला 2011च्या जानेवारी महिन्यात ट्युनीशियात झालेली राज्यक्रांती आठवत असेल. ही राज्यक्रांती याच आंदोलनाचा एक भाग होती. यात सोशल मीडियाचा खूप महत्त्वाचा वाटा होता. या सगळ्या आंदोलनांमध्ये एक लाखापेक्षा जास्त नागरिक मारले गेले होते. पुढे सीरिया आणि इराक यांच्यामधील गृहयुद्धात याची परिणती झालेली होती. जर अरब स्प्रिंग आंदोलनाशी या आंदोलनाची तुलना करायची, तर तुम्हाला सुदानमधील आंदोलनाचे हे छायाचित्र-3 (ज्यात एक अरब स्त्री कारवर चढून जनतेला प्रस्थापित सरकारविरुद्ध आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे) आणि (बरखाच्या ट्वीटमधील चार छायाचित्रांमधील चौथ्या छायाचित्रा)मध्ये लदिदा तशाच प्रकारे कशावर तरी उभी राहून आंदोलकांना प्रोत्साहित करताना दिसते आहे. जामियाच्या आंदोलनातील लदिदाच्या त्या छायाचित्राच्या छायाचित्रकाराने आणि आउटलुकमधील लेखकाने, या आंदोलनांना अरब स्प्रिंग आंदोलनाचा विचार आणि माहोल आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. केविलवाणा अशासाठी की फक्त छायाचित्रातील पोझ सारखी आहे असं दाखवून समानता दाखवता येत नसते. दुसरं म्हणजे सुदानी स्त्री ही कारच्या टपावर उभी आहे, तर लदीदा ही एका भिंतीवर उभी आहे. हे तपशील का महत्त्वाचे, ते पुढे लक्षात येईलच. बरखाने या दोन मुलींची मुलाखत घेताना “लदिदा कारवर चढली” असा उल्लेख केला, तर लदिदाने तिला दुरुस्त करून “ती कार नव्हती, आम्ही भिंतीवर चढलो होतो” असं सांगितलं. तरी बरखा कारचा मुद्दा सोडायला तयार नव्हती, कारण नक्की काय बोलायचंय, कशाशी तुलना करायची आहे हे आधीच व्यवस्थित स्क्रिप्टेड होतं. त्यामुळे बरखा म्हणते, “हो का? पण तुम्ही अगदी कारवर उभं राहून नारे देत असल्यासारखं दिसत होतं.” म्हणजे लदिदाने स्क्रिप्टमध्ये आयत्या वेळी बदल केला असंच दिसून येतंय. मुलाखतीत स्क्रिप्ट बदलल्यामुळे नक्की कोणाला ओरडा खावा लागणार.... लदिदाला की बरखाला? हे काळच ठरवेल. पण यामुळेच यांचं बिंग फुटलंय.
जामिया आंदोलन स्क्रिप्टेड आंदोलन
हा सगळा योगायोग आहे असा विचार जरी केला, तरी सीएएच्या विरोधासाठीचं आंदोलन हे त्या मुलींचं पहिलं आंदोलन नव्हतं. दोन महिन्यांपूर्वी या मुलींनी जामियाच्याच कुलगुरूंच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं. त्या वेळचीही कथा अशीच होती, फक्त त्या वेळी पोलिसांऐवजी जामियाचे गुंड त्यांना मारत होते. तिने या संदर्भात मीडियाला दिलेलं स्टेटमेंट पुढे दिलेल्या लिंकमध्ये दिसत आहे. https://www.newsclick.in/jamia-students-strike-continues-despite-violence-apology-demanded-administration.) तरीही अनेकांना असं वाटू शकतं की हा सगळा योगायोग आहे. पण बरखाच्या मुलाखतीच्या व्हिडिओत तिसरी व्यक्तीसुद्धा आहे. ही तिसरी व्यक्ती म्हणजे तोच मुलगा, ज्याच्यावर पोलिसांनी तथाकथित लाठीहल्ला केला होता आणि ज्याला या दोघींनी वाचवलं. त्याचं नाव शाहीन अब्दुल्हा. शाहीन अब्दुल्हा हा जामियातील विद्यार्थी नसून मकतूब मीडिया या न्यूज पोर्टलचा वार्ताहर आहे, हे नंतर केलेल्या चौकशीतून बाहेर आलं. शाहीन अब्दुल्हा (सोशल मीडियानुसार जामियाचा विद्यार्थी) पोलिसांना चुकवत, त्यांच्या लाठीहल्ल्यापासून वाचण्यासाठी नेमका त्याच बिल्डिंगमध्ये शिरला, जिथे लदिदा होती. मकतूब मीडिया हे अतिशय टुकार वेब डिझाइन असलेलं न्यूज पोर्टल आहे, जे दिल्लीतून आणि केरळमधून चालवलं जातं. आता हे लक्षात घ्या की योगायोगाने आयेशा राणाचा नवरा अफझल रहमानदेखील मकतूब मीडियासाठी काम करतो. मग इथे प्रश्न उपस्थित होतो की दिल्ली पोलीस जामियाच्या आंदोलनासाठी केरळमधील एका न्यूज वेबसाइटच्या साध्या वार्ताहराचा का पाठलाग करत होते? त्यासाठी दिल्ली पोलिसांनी शाहीनचा पाठलाग करण्याआधी नक्की काय झालं आणि तो नक्की लदिदा व आयेशा होत्या तिथल्याच अरुंद गल्लीत कसा घुसला? ह्याचं व्हिडिओ चित्रीकरण पाहावयास हवं, पण याचा व्हिडिओ कुठेही मिळणार नाही. कारण मुख्य फोकस वेगळाच होता. एका टुकार न्यूज वेब पोर्टलचा पत्रकार दिल्ली पोलिसांना स्वत:चा पाठलाग करण्यास भाग का पाडेल?
पोलिसांना अडकवण्यासाठी आणलेला कांचनमृगच
याचं उत्तर आपल्याला लदिदा-आयेशा शाहीनला दिल्ली पोलिसांच्या लाठीमारापासून वाचवत असल्याच्या व्हिडिओमध्येच मिळतं. या व्हिडिओत एक छायाचित्रकार डीएसएलआर घेऊन छायाचित्र काढत होता. https://www.youtube.com/watch?v=kdGKQZPHPš 2.19 ते 2.21 या विंडोत छायाचित्रकार दिसतोय). हा शाहीन हा मकतूब मीडियाचा जर्नालिस्ट जामियात कॅमेरा घेऊन सीएए विरोधात आंदोलन करायला आला होता? तर नाही. मग पोलीस त्याच्या मागे का लागले? कारण त्याने नक्कीच असं काहीतरी केलं असणार, ज्यामुळे पोलिसांना त्याने उकसवलं आणि स्वत:चा पाठलाग करण्यास भाग पाडलं. शाहीनचं काम हेच होतं की दिल्ली पोलिसांना उकसवून लदिदा आणि आयेशा जिथे होत्या तिथे नेऊन त्या दोघींनी त्याला लाठीमारापासून वाचवण्याची घटना घडवून कॅमेर्यात बंदिस्त करणं. शाहीनला स्क्रिप्टमध्ये नेमकं हेच काम दिलेलं होतं. त्याने ते व्यवस्थित पार पाडलं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की लदिदाला पुढे आणण्यासाठी इतकं सगळं रचलं का गेलं?
संपूर्ण आंदोलन व्यवस्थित स्क्रिप्टेड होतं. कारण लदिदा दिल्लीत नुकतीच आलेली असल्याने तिला फारसा आत्मविश्वास नव्हता. तिला जामियामध्ये मोठं करून तिथल्या तरुणांना स्वत:च्या विचारांकडे वळवण्याचं काम तिला करायचं होतं. त्यासाठी लदिदाला हिरो म्हणून पुढे आणणं अत्यंत गरजेचं होतं. पण बरखा किंवा लदिदा यांपैकी कुणीतरी आयत्या वेळी बदललेल्या स्क्रिप्टमुळे हे सगळं उघड झालं. जे लोक जामिया आंदोलनात सामील होते, त्यांना आपल्या देशात जिहादच करायचा आहे. लदिदा शखालूनचं 11 डिसेंबरचं हे फेसबुक स्टेटस वाचा. (छायाचित्र-4). मग काही जण विचारतील की फक्त लदिदाच का हिरो आहे? आणि आयेशा का नाही? कारण आयेशाचा नवरा हा एक किरकोळ पत्रकार आहे, जो देशविरोधी कारवायांना पाठिंबा देतो. पण लदिदा शखालूनचा नवरा शियास पेरूमथुरा (छायाचित्र-5 मध्ये त्याचं फेसबुक प्रोफाइल पाहा.) हा खूप पॉवरफुल आहे. तो केरळमधील स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (एसआयओ) या संघटनेचा सचिव आहे आणि केरळमधील पीडीपी या राजकीय पक्षाच्या अत्यंत जवळ आहे.
लदिदाचे दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध
एसआयओ नक्की कोणती संघटना आहे? भारत सरकारने सिमी या मुसलमान विद्यार्थी (दहशतवादी) संघटनेवर बंदी घातल्यानंतर एसआयओ ही जमात-ए-इस्लामीची विद्यार्थी संघटना म्हणून अस्तित्वात आली. जेएनयूमधील वादग्रस्त विद्यार्थी उमर खालीदचा बाप एसक्युआर इलियास हा सिमीवर बंदी यायच्या आधी सिमीचा अध्यक्ष होता. सध्या तो वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. लक्षात घ्या की लदिदा आणि आयेशा या दोघीही वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्या आहेत. आत्तापर्यंत आपण पाहिलं की लदिदाला 1. एसआयओ, 2. वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया आणि 3. जमात-ए-इस्लामी या तिन्ही संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. पण याहून सगळ्यात जास्त वादग्रस्त पाठिंबा म्हणजे केरळाच्या पीडीपी पक्षाचा पाठिंबा. लदिदा आणि तिचा नवरा या दोघांचाही अब्दुल नाझेर महादनी या पीडीपी केरळाच्या अध्यक्षाला पाठिंबा आहे.
आता हा महादनी कोण आहे? महादनी हा केरळमधील सध्याचा सगळ्यात पॉवरफुल माणूस आहे. महादनीच्या नावे भारतातील दोन मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा आरोप आहे. दि. 14 फेब्रुवारी 1998ला भाजपाच्या कोयंबतुरच्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीमध्ये पहिला दहशतवादी हल्ला झालेला होता. त्या दहशतवादी हल्ल्यात 59 लोक मृत्युमुखी पडले होते, तर 200 लोक जखमी झालेले होते. लालकृष्ण आडवाणी त्या रॅलीत नेमके वेळेत न पोहोचल्याने थोडक्यात बचावले. तामिळनाडू पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. 15 मार्च 2006 रोजी होळीच्या दिवशी अचनक काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या सरकारने तातडीचं अधिवेशन बोलावलं होतं. विरोधी पक्षात सीपीआयएमच्या नेतृत्वाखालील लेफ्टिस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट होती आणि त्या दिवशी केरळ विधानसभेने एकमताने त्याला मानवतावादी तत्त्वांवर सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि 2007मध्ये सुरुवातीलाच त्याची सुटका झाली. काँग्रेस, सीपीआय आणि एलडीएफ या तिन्ही पक्षांनी एखाद्या हिरोसारखं त्याचं स्वागत केलं. केवळ अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करून आपापली व्होट बँक नक्की करण्यासाठी हे सगळं केलं गेलं.
त्याच्या सुटकेनंतर बरोबर वर्षाने जुलै 2008मध्ये बंगळुरू शहरात 9 सिरिअल बाँबस्फोट करून दुसरा दहशतवादी हल्ला झालेला होता. यातही सिमीचाच हात होता आणि मुख्य म्हणजे महादनी या सगळ्याचा मास्टर माइंड होता. आत्ता सध्या महादनीवर हा बंगळुरूमध्ये यासाठी खटला चालू आहे. सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पूर्वी महादनीला पाठिंबा देत असत. म्हणजे जामियातील हे आंदोलन अनेक राजकीय संघटना आणि दहशतवादी संघटना यांनी एकत्र विणलेलं मोठ्ठं जाळं आहे. इथेच लदिदाचं महत्त्व आयेशापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. म्हणूनच लदिदाला जामियात मोठं करण्यासाठी हा सगळा आंदोलनाचा पूर्वनियोजित पद्धतीने वापर केला गेलेला होता.
निष्कर्ष
जामियातील आंदोलन हे जरी विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त असं आंदोलन दाखवलं गेलं असलं, तरी जे दिसतंय तसं नाहीये. यामागे खूप खोलवर अनेक राजकीय शक्ती आणि दहशतवादी शक्ती कार्यरत आहेत, ज्यांचा भाजपा सरकारला विरोध आहे. हा केवळ राजकीय विरोध नसून दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांच्या आडून देशात हिंसक आंदोलनं उभी करणं आणि नरेंद्र मोदींमुळे देशात सगळे जण किती नाराज आहेत हे प्रोजेक्ट करणं यासाठी चालू असलेला प्रयत्न आहे. नरेंद्र मोदींच्या कामाच्या धडाक्याने काँग्रेसची आणि इतर विरोधी पक्षांची दुकानं बंद झाल्याने यांना कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करायचं आहे, मग त्यासाठी देशाचं भविष्य असलेले विद्यार्थी हाताशी घेऊन, त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून देश पेटवून देण्यासही विरोधकांनी मागेपुढे पाहिलेलं नाही. मला माहितीये की आपल्यातील बहुसंख्य जनता नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देणारी आहे. फक्त आपण मूक राहतो आहोत. त्यामुळे रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलनं करणारे जिंकत आहेत. देशातील जबाबदार नागरिक म्हणून रस्त्यावर उतरून शांतपणे नागरिकत्व सुधारणा कायद्याला आणि नमो सरकारला असलेला आपला पाठिंबा दाखवून द्यावा. असं न करता मूक राहिलं, तर तो एक प्रकारे देशद्रोह्यांना पाठिंबाच ठरेल.