पिनरई विजयन मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत - अर्थात फक्त नऊ महिन्यांच्या कालावधीत बारा संघ स्वयंसेवकांची/भाजपा कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाली आहे. शंभरच्या आसपास संघस्वयंसेवकांना कायमचं अपंगत्व आलंय आणि या नऊ महिन्यांत संघस्वयंसेवकांच्या एकूण पाचशेपेक्षा जास्त घरांवर हल्ले झालेले आहेत...! संघ या हल्ल्यांना तोंड देऊ शकतो का? जास्त स्पष्टपणे मांडायचं तर संघ या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकतो का? याचं सरळ उत्तर आहे, होय. केरळमध्ये संघटित शक्तीच्या रूपात संघाची ताकद जबरदस्त आहे. त्यामुळे संघाने मनात आणलं तर केरळमध्ये माक्र्सवादी कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी होईल, हे निश्चित..!
कांजीकोडे. पलक्कड जिल्ह्यातलं एक लहानसं गाव. केरळच्या पूर्व सीमेवर असणारं. तामिळनाडूला खेटून वसलेलं. मात्र औद्योगिक बाबतीत पुढारलेलं. केरळचे माजी मुख्यमंत्री आणि माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अच्युतानंदन यांचं हे विधानसभा क्षेत्र. पलक्कड या लोकसभा क्षेत्रात असणारं. 1957पासून एकूण 11 वेळा या जागेवर कम्युनिस्ट खासदारांचा कब्जा राहिलेला आहे. त्यातील 1996पासून सतत 6 वेळा माक्र्सवादी पक्षाचाच खासदार निवडून आलेला आहे.
तर अशा या माक्र्सवाद्यांच्या सुरक्षित तटबंदीत - कांजीकोडेमध्ये कन्नन हा संघाचा स्वयंसेवक पंचायत समितीवर भाजपातर्फे निवडून आला. त्याचा भाऊ राधाकृष्णन हा संघाचं काम करणारा हाडाचा स्वयंसेवक. कन्ननची बायको विमला हिला संघाची आणि भाजपाची ओळख झाली ती सासरी आल्यावरच. मग तीदेखील हिरिरीने भाजपाच्या महिला मोर्चाचं काम करू लागली. या दोन भावांचं एकत्र कुटुंब. पूर्णपणे संघसमर्पित. एका लहानशा एकमजली बैठया घरात त्यांचा निवास.
मात्र कन्नन-राधाकृष्णन परिवाराचं संघ-भाजपाविषयी प्रेम आणि त्यांचा वाढता प्रभाव हा माक्र्सवादी गुंडांच्या पचनी पडणं शक्यच नव्हतं. तशातच मागच्या विधानसभा निवडणुकीत फक्त 2500 मतं मिळवणाऱ्या भाजपाने या विधानसभा निवडणुकीत चमत्कार केला. चक्क 46 हजार मतं घेऊन भाजपा दुसऱ्या स्थानावर आला. अच्युतानंदन यांच्या समर्थकांना हे सहन होणं शक्यच नव्हतं. त्यांनी आधी धमक्या दिल्या. पण हे दोघेही भाऊ बधले नाहीत. पक्षाचं काम करतच राहिले.
अशा या स्वाभिमानी, राष्ट्रभक्त परिवाराला अद्दल घडवण्यासाठी माक्र्सवादी गुंडांनी 28 डिसेंबरच्या अगदी पहाटे अडीच वाजता, त्यांच्या घरावर पेट्रोलबाँब फेकला आणि घराचे दरवाजे बाहेरून बंद केले.
त्या भडकलेल्या आगीत हे कुटुंब अक्षरश: होरपळून निघालं. आणि पुढील आठ-दहा दिवसांत हे तिघंही या माक्र्सवादी हिंसेत हुतात्मे झाले...! त्या विमलेचा दोष इतकाच होता की संघसमर्पित, राष्ट्रभक्त कुटुंबात त्या माउलीचा विवाह झाला होता..!
माक्र्सवादींचा वाढता हैदोस
माक्र्सवादी गुंडांची सत्ता केरळमध्ये पुन:स्थापित झाल्यानंतर त्यांनी घातलेल्या हैदोसाचा हा फक्त एक नमुना आहे. कांजीकोडे हल्ल्याची शाई वाळलीही नसेल, त्याआधीच माक्र्सवाद्यांनी या जानेवारीच्या पहिल्या आठवडयातच मल्लपुरम जिल्ह्यात आपल्या कौर्याची आणखी एक झलक दाखवली.
सुरेश हा मल्लपुरम जिल्ह्यातला भाजपचा सक्रिय कार्यकर्ता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या 'मोपल्यांचे बंड' ह्या पुस्तकात वर्णन केलेला मलाबार भाग तो हाच. पूर्णपणे मुस्लीमबहुल. येथील मुस्लीम लीगचे खासदार ई. अहमद यांचा नुकताच मृत्यू झालाय. येथील आमदारही मुस्लीम लीगचाच आहे. या जिल्ह्यात मुस्लीम लीगखालोखाल चलती असते ती माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाची. मात्र 2014च्या लोकसभेत भाजपाने चांगलीच मुसंडी मारली आणि 64 हजार मतं मिळवली. मे, 2016मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांतही भाजपाची कामगिरी फारच छान होती. म्हणजे पुढील निवडणुकीत माक्र्सवादी पक्षाला बाजूला सारून भाजपा हा पक्ष मुस्लीम लीगबरोबर टक्कर देऊ लागेल अशी चिन्ह निर्माण झाली.
झालं... माक्र्सवादी खवळले. त्यांनी संघाला आणि भाजपाला अद्दल घडवण्यासाठी सुरेश या भाजपाच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. सुरेश आपल्या परिवारासोबत कारने जात असताना या माक्र्सवादी गुंडांनी मल्लपुरम जिल्ह्याच्या तिरूरजवळ त्याची कार थांबवली. जबरदस्तीने कारचा दरवाजा उघडला. सुरेशच्या 10 महिन्यांच्या लहान बाळाला पायाला धरून रस्त्यावर फेकून दिलं आणि सर्वांसमोर सुरेशला भोसकलं...!
सुरेशचा गुन्हा काय होता...? तर तो मल्लपुरम जिल्ह्यात प्रामाणिकपणे भाजपाचं काम वाढवण्याचा प्रयत्न करत होता.
अशी अनेक उदाहरणं आहेत. मे 2016मध्ये यूडीएफचं राज्य आल्यावर आणि पिनरई विजयन मुख्यमंत्री झाल्यावर हे माक्र्सवादी गुंड अक्षरश: चेकाळले आहेत.
तथाकथित बुध्दिवंतांची मिठाची गुळणी
पिनरई विजयन मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत - अर्थात फक्त नऊ महिन्यांच्या कालावधीत बारा संघ स्वयंसेवकांची/भाजपा कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाली आहे. शंभरच्या आसपास संघस्वयंसेवकांना कायमचं अपंगत्व आलंय आणि या नऊ महिन्यांत संघस्वयंसेवकांच्या एकूण पाचशेपेक्षा जास्त घरांवर हल्ले झालेले आहेत...!
हे भयानक आहे. फार भयानक आहे. आणि दुर्दैवाने याची दखल ना राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी घेतली, ना प्रादेशिक. 'असहिष्णुते'च्या नावाने गळा काढून देश सोडण्याच्या धमक्या देणारे, ऍवॉर्ड वापस करणारे सारे चिडीचूप बसले आहेत. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, अरुंधती रॉय वगैरे बुध्दिवंतांनी केरळच्या लाल दहशतवादाविरुध्द 'ब्र'देखील उच्चारलेला नाही.
केरळमध्ये कम्युनिस्टांनी संघाच्या स्वयंसेवकांवर आक्रमणं करण्याचा इतिहास तसा जुना आहे. संघाच्या विचारसरणीबद्दल लोकांचं आकर्षण वाढू लागलं आणि कम्युनिस्टांची अस्वस्थताही वाढू लागली. कारण कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते संघाचे चांगले स्वयंसेवक झाले आणि येथूनच संघर्षाला सुरुवात झाली.
जानेवारी 1948मध्ये, संघबंदीपूर्वी काही दिवस, श्रीगुरुजी केरळच्या प्रवासात होते. एर्नाकुलममध्ये स्वयंसेवकांची बैठक घेत असताना त्या बैठकीवर माक्र्सवादी गुंडांनी हल्ला केला. मात्र स्वयंसेवकांनी तो परतवून लावला. पुढे संघबंदी हटल्यानंतर जेव्हा श्रीगुरुजींचा पहिला केरळ प्रवास झाला, तेव्हाही अलपुझ्झामध्ये त्यांच्या कार्यक्रमात हल्ला करण्यात आला. अर्थात स्वयंसेवकांच्या सावधतेने विपरीत काही घडू शकलं नाही.
1967मध्ये जनसंघाच्या झालेल्या कालिकत अधिवेशनानंतर, कम्युनिस्ट अधिकच आक्रमक झाले. 1969मध्ये 'चिन्मय मिशन'चे संस्थापक स्वामी चिन्मयानंद विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यास त्रिशूरच्या केरल वर्मा कॉलेजात आले असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मात्र सुदैवाने परिषद कार्यकर्त्यांनी तोही परतवून लावला.
पिनरई विजयन आणि लाल दहशतवाद
आताचे मुख्यमंत्री पिनरई विजयन हे 1969मध्ये कण्णूरमध्ये एसएफआयचे सचिव होते. अत्यंत आक्रमक आणि क्रूर अशी त्यांची प्रतिमा होती. कण्णूरमध्ये कम्युनिस्टांच्या लाल दहशतवादाला सुरुवात झाली ती प्रामुख्याने याच काळात. कण्णूरमध्ये टेलरिंगचा व्यवसाय करणारे संघस्वयंसेवक वडिक्कल राधाकृष्णन यांची 28 एप्रिल 1969ला निर्घृण हत्या झाली. पोलिसांनी जे आरोपी पकडले, त्यातील दोन प्रमुख नावे होती - पिनरई विजयन आणि कोडियारी बाळकृष्णन. मात्र सहा महिन्यांच्या मामुली कैदेनंतर ते दोघंही पुराव्याअभावी निर्दोष सुटले..! महत्त्वाचं म्हणजे यातील पिनरई विजयन हे सध्या केरळचे मुख्यमंत्री आहेत, तर कोडियारी बाळकृष्णन हे केरळमध्ये अनेक वर्षं मंत्री होते आणि सध्या माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे महामंत्री आहेत..! गेल्या मे महिन्यात, कम्युनिस्ट परत सत्तेवर आल्यावर संघस्वयंसेवकांवरचे हल्ले का वाढले, हे यातून स्पष्ट होतं!!
कण्णूर लोकसभा क्षेत्रातून माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे दोनदा खासदार राहिलेल्या ए.पी. अब्दुल्लाकुट्टी यांचं एक पुस्तक प्रसिध्द आहे - 'निंगलेनेकाँग्रेसअक्की' (अर्थात 'तुम्ही मला काँग्रेसी बनविलं', कारण 2009नंतर हे अब्दुल्लाकुट्टी काँग्रेसमध्ये सामील झाले.) यात अब्दुल्लाकुट्टींनी पिनरई विजयनबरोबर काम करतानाचे अनेक अनुभव दिलेले आहेत. एका ठिकाणी ते लिहितात, 'पिनरई विजयन यांनी पश्चिम बंगालच्या माक्र्सवादी साथीदारांची प्रशंसा करत आम्हाला समजावलं की आपल्या वैचारिक विरोधकांना इतक्या शिताफीने नष्ट केलं पाहिजे की त्यांचा कुठलाही मागमूस उरता कामा नये.' अब्दुल्लाकुट्टी पुढे लिहितात, 'विजयन म्हणत होते की, तुमचा विरोधक तुम्हाला जिवंत मिळाला तर त्याला बांधून पोत्यात घाला. नंतर जमिनीत खोल खड्डा खणून ते पोतं त्यात टाका. वरून भरपूर मीठ घालून तो खड्डा बुजवा. कोणाला काही कळणारही नाही..!'
असा क्रूर काळजाचा माणूस आज केरळचा मुख्यमंत्री आहे! गेल्या साठ-सत्तर वर्षांची कम्युनिस्टांची शैली ही भयानक दहशतवादाची राहिलेली आहे. कम्युनिस्टांना फक्त हत्या करायची नसते, तर अत्यंत क्रूर, पाशवी आणि बीभत्स पध्दतीने करायची असते, ज्याद्वारे लोकांमध्ये एक जबरदस्त दहशत पसरेल. त्यामुळे त्यांनी केलेल्या सर्व हत्या या अशा नृशंस आणि निर्घृण प्रकारातच मोडतात.
साधारण दर पाच वर्षांनंतर केरळात डाव्यांची सत्ता येते. अशी सत्ता आल्यावर त्यांच्या क्रौर्याला उधाण येतं अन् संपूर्ण प्रशासन तंत्र ते या कामासाठी वापरतात. सध्याचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी गृहखातं स्वत:जवळ ठेवलंय ते यासाठीच. या संदर्भातलं एक उदाहरण सांगता येईल -
के.टी. जयकृष्णन हा तरुण भाजयुमोचा प्रदेश उपाध्यक्ष होता, शिवाय शाळेत शिकवणारा लोकप्रिय शिक्षकही. त्याने अनेक तरुणांना भाजयुमोच्या कामात आणलं, ज्यात माक्र्सवादी तरुणही होते. झालं... माक्र्सवादी चवताळले आणि पाच माक्र्सवादी गुंडांनी भरदिवसा शाळेत शिरून, जयकृष्णन शिकवत असताना त्या लहान मुलांसमोरच त्याचा निर्घृण खून केला. भर वर्गात झालेल्या या खुनामुळे केरळ हादरलं. सरकारला काही ऍक्शन घेणं भाग होतं. ते पाच माक्र्सवादी गुंड पकडले गेले. 2003मध्ये जिल्हा न्यायालयाने त्यांना आजन्म कैदेची शिक्षा सुनावली. 2005मध्ये केरळ उच्च न्यायालयानेही हीच शिक्षा कायम ठेवली. अपिलात प्रकरण सर्वोच्च न्यायालायाकडे गेलं. 2006मध्ये न्याय देताना सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांवर भरपूर ताशेरे ओढले. न्यायमूर्तींनी म्हटलं की, 'पोलिसांपेक्षा जास्त हिंमत त्या वर्गातल्या लहानशा विद्यार्थ्यांनी दाखविली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात कुठेही गंभीरतेने काम केल्याचे दिसत नाही.' पाचपैकी चार आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले. दिल्लीत तेव्हा डाव्यांच्या मदतीने चालणारं यूपीए सरकार होतं. त्यात माक्र्सवाद्यांनी चावी फिरवली अन् फक्त सहा महिन्यांत तो पाचवा आरोपीही निर्दोष सुटला.
भर वर्गात जयकृष्णन या शिक्षकाचा निर्घृणपणे खून करणारे पाचही माक्र्सवादी गुंड आज उजळ माथ्याने केरळमध्ये हिंडत आहेत!
माक्र्सवाद्यांची हीच कार्यशैली आहे. शासकीय यंत्रणेचा पुरेपूर वापर करत आपल्या कार्यकर्त्यांना ते अलगद वाचवतात.
हा हिंसाचार बंद करण्यासाठी संघाने माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी बोलणी करण्याचे तीन प्रयत्न केले.
प्रत्यक्ष हल्ल्याशिवाय संघस्वयंसेवकांना त्रास देण्याचं असं कम्युनिस्टांचं विशिष्ट तंत्र आहे. स्वयंसेवकांचं जगणं मुश्कील करणं, हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. स्वयंसेवकांच्या विहिरींमध्ये विष्ठा टाकणं, सलूनमधून गाडया भरभरून उचलून आणलेले केस टाकणं असे प्रकार सररास चालतात.
मात्र या सर्वांना पुरून उरत जेव्हा संघाचा स्वयंसेवक एकेका जिल्ह्यात लाख लाख स्वयंसेवकांची एकत्रीकरणं घडवून आणतो, तेव्हा कम्युनिस्टांना खवळण्यापलीकडे काही करता येत नसतं..!दहशतवादाविरोधात संघाची पावले
मागील सहा दशकांपासून कण्णूर हे दुःखाचे आणि अश्रूंचे माहेरघर झाले आहे. राजकारणातील आंधळया स्पधर्ेची आणि द्वेषाची ती जन्मभूमी आहे. साठ वर्षांच्या या काळातील कम्युनिस्ट क्रौर्यात अनेक संघस्वयंसेवकांचा बळी गेला आहे. आपल्या विचारधारेला अनुसरून जगण्याचे, वागण्याचे आणि काम करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. ताकदीच्या बळावर कम्युनिझम सोडून अन्य विचारसरणींना अनुसरणाऱ्यांना ठार मारण्याचा कर्दनकाळांनी विडा उचलला आहे. अनाथ मुलांच्या, विधवांच्या, अगतिक मातांच्या आणि स्वातंत्र्य दूर सारून घरच्यांना सांभाळणाऱ्या हतबल तरुणांच्या असंख्य कहाण्या या गावात जन्माला आल्या आहेत. कण्णूरमध्ये राहणाऱ्या या माजाने जवर कमावलेले सर्व या काळात गमावताना पाहिले आहे. आबालवृध्द, स्त्रिया आणि दलित यांपैकी कोणीही या कम्युनिस्ट क्रौर्यातून वाचलेले नाहीत. सध्याच्या काळात उर्मट आणि रक्तरंजित अशा सीपीएम सरकारव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचेही अस्तित्व आज कण्णूरमध्ये शिल्लक नाही. पिनरई विजयन यांनी केरळ राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून गेल्या नऊ महिन्यांत येथील नऊ कुटुंबे पोरकी झाली आहेत. पीडितांना न्याय मिळावा यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून व्याख्यानांचे आणि मोर्चाचे आयोजन केले गेले. पण या सगळयानंतरही समाजात भरून राहिलेली भी तीळमात्रही कमी झालेली नाही. वड्डिकल रामकृष्णन यांच्यापासून अंदल्लूर संतोष यांच्यापर्यंत अनेक शूर कार्यकर्त्यांना आपली स्वप्ने पूर्ण होण्यापूर्वीच जीव गमवावा लागला. नोकरी, पन्नासच्या दशकात केरळमध्ये प्रांत प्रचारक असणाऱ्या दत्तोपंत ठेंगडींनी पहिल्यांदा पुढाकार घेतला. माक्र्सवादी म्युनिस्ट पक्षाचे त्या काळचे नेते राममूर्ती यांच्याशी एर्नाकुलम येथे सविस्तर चर्चा झाली. पण नंतरही कम्युनिस्टांचे हल्ले चालूच राहिले. दुसरा प्रयत्न केला तत्कालीन 'भारतीय विचार केंद्राचे' संयोजक असलेल्या पी. परमेश्वरन यांनी. त्यांच्या पुढाकाराने संघाचे दोन वरिष्ठ प्रचारक भास्करराव कळंबी आणि रंगा हरी हे केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री के. नयनार यांना दिल्लीत भेटले. मात्र या बैठकीचाही फार काही लाभ झाला नाही.
तिसरा प्रयत्न केला न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्णाअय्यर यांनी. मात्र या सर्व बैठकींतून हेच निष्पन्न होत होतं की माक्र्सवाद्यांचं 'कॅडर' हे शांतिवार्तेसाठी तयार नाही. मुळात माक्र्सवाद हाच 'संघर्ष' या संकल्पनेवर आधारित असल्यामुळे त्यांना संघर्षाचीच 'ओढ' जास्त होती. एका प्रसंगी तर माक्र्सवादाचे अध्वर्यू म्हणवले जाणारे ई.एम. एस. नंबुदरीपाद म्हणाले, ''We will take up arms against RSS.''
संघ या हल्ल्यांना तोंड देऊ शकतो का? जास्त स्पष्टपणे मांडायचं तर संघ या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकतो का? याचं सरळ उत्तर आहे, होय. केरळमध्ये संघटित शक्तीच्या रूपात संघाची ताकद जबरदस्त आहे. त्यामुळे संघाने मनात आणलं तर केरळमध्ये माक्र्सवादी कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी होईल, हे निश्चित..!
पण मुळात संघाचा तो मार्गच नाही. संघाचा उद्देश स्पष्ट आहे. संघाला साम्यवाद संपवायचा आहे, साम्यवादी नाही! गेल्या चार-पाच वर्षांत संघाजवळ आलेल्या अधिकांश कार्यकर्त्यांमध्ये अधिकतर हे जुने कम्युनिस्ट आहेत. कम्युनिझमच्या विचारधारेला आणि त्यांच्या कार्यशैलीला कंटाळून ते सारे संघस्वयंसेवक झालेले आहेत. त्यामुळे 'प्रत्यक्ष प्रतिकाराचा' मार्ग हा संघाचा मार्ग नाही, हे निश्चित..!
राष्ट्रव्यापी आंदोलनाला सुरुवात
आणि म्हणूनच संघाने केरळच्या या लाल दहशतवादाविरुध्द एक राष्ट्रव्यापी आंदोलन छेडायचं ठरवलं. त्यापूर्वी 24 जानेवारीला दिल्लीत 'केरळ भवन'वर जनाधिकार समितीतर्फे एक धरणं आंदोलन झालं, ज्यात संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे सहभागी झाले. मात्र हे सर्व होऊनही संघस्वयंसेवकांच्या हत्येचं सत्र थांबलं नाही. म्हणून संघाने 1 मार्चला कम्युनिस्टांच्या विरोधात देशव्यापी धरणं आंदोलन करायचा निर्णय घेतला. 'जनाधिकार समिती' आणि तिच्या सहयोगी मंचांद्वारे हे आंदोलन करण्यात आलं. देशाच्या कानाकोपऱ्यात, अक्षरश: प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन झालं. फारच जबरदस्त आणि अभूतपूर्व असं हे आंदोलन होतं. या निमित्ताने केरळचा 'लाल आतंक' लोकांसमोर आला.
पूर्ण देशभरात साधारण एक हजार ठिकाणी झालेल्या विरोधी निदर्शनांमध्ये बारा लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले. नागपूरला संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या नेतृत्वाखाली भव्य 'धिक्कार रॅली' काढण्यात आली. भोपाळला संघाचे सहप्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन झालं. बंगळुरूला क्षेत्रीय संघचालक नागराज आणि भाजपाच्या दिल्ली येथील खासदार मीनाक्षी लेखी यांनी केरळच्या कम्युनिस्टांचं कौर्य लोकांसमोर आणलं. भुवनेश्वर, चेन्नई, कोलकाता, शिमला, इंदूर, जयपूर, गुवाहाटी, जम्मू, अहमदाबाद या सर्व ठिकाणी केरळच्या लाल दहशतवादाला विरोध करण्यासाठी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
सोशल मीडियावरील आंदोलन
सोशल मीडियामध्येही या लाल दहशतवादाविरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं. 1 मार्चला टि्वटरवर #EndViolanceCPM हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता.
संघाच्या या देशव्यापी आंदोलनाने माक्र्सवादी खवळले आहेत. याचा बदला म्हणून गेल्या आठवडयाभरात संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांवरचे हल्ले वाढले आहेत. केंद्र शासनाची आगतिकता अशी की एका विशिष्ट सीमेबाहेर ते राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करू शकत नाहीत. मग त्या वेळेस राज्य सरकारची बरखास्ती हा एकच मार्ग उरतो.
मात्र या सर्व विषम परिस्थितीत एक मात्र निश्चित की केरळचा स्वयंसेवक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ठामपणे उभा आहे. आजूबाजूला मृत्यूचं तांडव सुरू असतानाही अत्यंत समर्पित भावनेने आणि निर्भयपणे काम करणारा केरळचा स्वयंसेवक म्हणजे हिंदुत्वाचं खरंखुरं, चालतंबोलतं प्रतीक आहे. त्यांच्या ह्या विजिगीषू वृत्तीने लवकरच केरळमध्ये कम्युनिस्टांना फार मोठे वैचारिक हादरे बसायला लागणार आहेत, हे स्पष्टपणे दिसतंय..!
9425155551
ttelemat@airtelmail.in
मागील सहा दशकांपासून कण्णूर हे दुःखाचे आणि अश्रूंचे माहेरघर झाले आहे. राजकारणातील आंधळया स्पधर्ेची आणि द्वेषाची ती जन्मभूमी आहे. साठ वर्षांच्या या काळातील कम्युनिस्ट क्रौर्यात अनेक संघस्वयंसेवकांचा बळी गेला आहे. आपल्या विचारधारेला अनुसरून जगण्याचे, वागण्याचे आणि काम करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. ताकदीच्या बळावर कम्युनिझम सोडून अन्य विचारसरणींना अनुसरणाऱ्यांना ठार मारण्याचा कर्दनकाळांनी विडा उचलला आहे. अनाथ मुलांच्या, विधवांच्या, अगतिक मातांच्या आणि स्वातंत्र्य दूर सारून घरच्यांना सांभाळणाऱ्या हतबल तरुणांच्या असंख्य कहाण्या या गावात जन्माला आल्या आहेत. कण्णूरमध्ये राहणाऱ्या या समाजाने आजवर कमावलेले सर्व या काळात गमावताना पाहिले आहे. आबालवृध्द, स्त्रिया आणि दलित यांपैकी कोणीही या कम्युनिस्ट क्रौर्यातून वाचलेले नाहीत. सध्याच्या काळात उर्मट आणि रक्तरंजित अशा सीपीएम सरकारव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचेही अस्तित्व आज कण्णूरमध्ये शिल्लक नाही. पिनरई विजयन यांनी केरळ राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून गेल्या नऊ महिन्यांत येथील नऊ कुटुंबे पोरकी झाली आहेत. पीडितांना न्याय मिळावा यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून व्याख्यानांचे आणि मोर्चाचे आयोजन केले गेले. पण या सगळयानंतरही समाजात भरून राहिलेली भीती तीळमात्रही कमी झालेली नाही. वड्डिकल रामकृष्णन यांच्यापासून अंदल्लूर संतोष यांच्यापर्यंत अनेक शूर कार्यकर्त्यांना आपली स्वप्ने पूर्ण होण्यापूर्वीच जीव गमवावा लागला. नोकरी, चांगले घर, सुरक्षित आयुष्य आणि उद्याचा भविष्य घडवणारी मुले अशी सर्वसामान्यांप्रमाणेच त्यांनीही स्वप्ने पाहिली असतीलच. ही स्वप्ने त्यांनी स्पर्धात्मक राजकारणात वाया घालवण्यासाठी नक्कीच पाहिली नसतील. कम्युनिस्टांनी चालवलेल्या कत्तलीपासून कण्णूरला वाचवणारा आशेचा एक किरण ठरताना यापैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
आपापल्या गावात शांततेने राहण्याचे स्वातंत्र्य मिळावे, म्हणून केरळमधील जनतेने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. कण्णूर येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि तेथील वातावरण सुरळीत करण्यासाठी अनेक योजना व प्रकल्प आखले गेले आहेत. त्यामध्ये सहभागी होणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. सामूहिक प्रकल्पांच्या माध्यमातून कण्णूरमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कण्णूरमधील थकलेल्या जिवांना बळ देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. आम्ही पुढाकार घेऊन पीडितांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या उपक्रमामागील अपरिहार्यता आणि गांभीर्य लक्षात घेऊन आपण यात अवश्य सहभागी व्हावे. हे आवाहन केवळ राजकीय अराजकाच्या निर्मूलनासाठी नसून उद्याच्या समृध्द कण्णूरसाठी आहे.
- पी. गोपालन कुट्टी
प्रांत कार्यवाह, रा.स्व. संघ, केरळ
आपण आर्थिक मदत खालील बँक खात्यामध्ये
थेट जमा करू शकता.
योगक्षेम ट्रस्ट पीडिता साहाय्य निधी
Yogakshema Trust Peeditha Sahaya Nidhi
A/c no. 026800100078532
Dhanalekshmi Bank
IFSC code DLXB 0000268
प्रा. साईबाबाला जन्मठेप
केरळमधील कम्युनिस्टांनी चालवलेल्या हिंसाचाराविरोधात आणि सीपीएम सरकारविरोधात आंदोलने छेडली जात आहेत. याच दरम्यान नक्षलवादाशी संबंधित असल्याच्या आरोपावरून दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. जी.एन. साईबाबा याला गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दिल्ली विद्यापीठातील युवा कार्यकर्त्यांना नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी तयार करणे, त्यांना गडचिरोलीतील जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणे, नक्षल्यांसाठी थिंक टँक म्हणून काम करणे, माओवादी कारवाया करणे असे प्रा. साईबाबावरील आरोप सिध्द झाले. साईबाबासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी व पांडू नरोटे यांना मंगळवार 7 मार्च रोजी जन्मठेप सुनावण्यात आली, तर विजय तिरकी याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या सर्वांच्या साहाय्याने गडचिरोलीत प्रा. साईबाबा याने अनेक हिंसक आणि अतिरेकी कारवाया केल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचे जीव घेऊन नागरी संपत्तीचे नुकसानही केले आहे. सशस्त्र बंडखोरी व हिंसक कारवाया करून लोकशाही उलथून टाकणे असाच साईबाबाच्या कृत्यांमागील उद्देश असल्याचे दिसून आले आहे. अपंग असूनही बुध्दीच्या बळावर त्याने सर्व कारवाया केल्या आहेत. नक्षलवाद हा गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यांना नवीन नाही. माओवादाचा प्रसार आणि लोकशाहीविरोधात केल्या जाणाऱ्या हिंसक कारवाया हा हेतू मनात घेऊन ही कीड पोसली गेली आहे. केरळमधील कम्युनिस्टांनी चालवलेल्या कत्तली असोत वा महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांचा अतिरेक, देशाची प्रगती या सगळयांमुळे खुंटते आहे. अर्थात केरळमधील कम्युनिस्ट हिंसाचाराविरोधात उभे राहिलेले जनआंदोलन आणि साईबाबाला झालेली शिक्षा यांसारख्या घटना या पार्श्वभूमीवर आशादायक चित्र निर्माण करत आहेत.