गेल्या काही वर्षांत केरळमधील तरुण मुस्लीम येमेनमध्ये तसेच श्रीलंकेत गेले आहेत. तेथे येमेनमधील अतिरेक्यांचे अड्डे आहेत. तेथे हे मुस्लीम तरुण पाठविले जातात. इत्तेहिद शुब्बानील मुजाहिद्दीन ही विद्यार्थी संघटना केरळात असून ते स्वत:ला 'इसलाही' म्हणजे सुधारणावादी म्हणतात. त्याचबरोबर तबलिघी जमात, जमात-ए-इस्लामी, इसिस, तालिबान आणि अल कायदा या संघटनादेखील स्वत:ला 'इसलाही' म्हणजे सुधारणावादी - Reformist म्हणवून घेतात.
महाराष्ट्रातील - विशेषत: मराठवाडा व मुंबईजवळील मुस्लीम तरुण इसिस - ISIS या संघटनेशी संबंध ठेवून होते व 4-5 तरुण तेथे जाऊन इसिसतर्फे तेथील लढाईत भाग घेऊन मरण पावले, असे वृत्त आपण गेले कित्येक दिवस वाचत आहोत. हे केवळ महाराष्ट्रापुरते लागू नसून दक्षिणेकडील तामिळनाडू व केरळमध्येही अशा प्रचाराला बळी पडून तेथील मुस्लीम तरुण इसिसच्या प्रचारामुळे प्रेरणा घेऊन येमेनला व श्रीलंकेला जात आहेत. या दोन्ही ठिकाणी इसिसचे अड्डे आहेत. केरळमधील कोव्हिकोड येथील एका मुस्लीम पुढाऱ्याने सांगितले की, तरुण मुस्लीम सीरिया व येमेनमध्ये तेथील युध्दात भाग घेण्यास गेले आहेत. केरळमध्ये इत्तेहिद शुब्बानील मुजाहिद्दीन ही संस्था सध्या कार्यरत आहे. मल्लापुरममध्ये डॉ. जाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची Peace International School कार्यरत असून मुस्लीम तरुणांच्या Brain washingचे काम करीत आहे. अनय जोगळेकर यांचा विवेकच्या अंकात जो लेख आला आहे, त्यात त्यांनी लिहिले आहे की, 'परदेशी देणग्या मिळणाऱ्या संस्थांमधील ख्रिस्ती व इस्लामी धर्मप्रसारक संस्थांचे प्राबल्य चिंतानजक आहे.' यातील अनेक संस्था बेकायदेशीर धर्मपरिवर्तन किंवा आपल्या धर्मीयांमध्ये कट्टरतावादाचा प्रसार करण्यात गुंतल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत केरळमध्ये सुमारे 6000 लोकांनी इस्लामचा स्वीकार केला. या वर्षी मे महिन्यात उत्तर केरळमधून 21 लोक बेपत्ता झाले, ते इसिससोबत लढण्यास गेले असा दाट संशय आहे.
केरळमध्ये जवळजवळ 55 टक्के मुस्लीम व ख्रिस्ती समाज आहे. बाकीचे हिंदू काँग्रेसी व कम्युनिस्ट असून त्यांना हिंदू धर्माशी काही देणेघेणे नसून ते स्वत:ला सेक्युलर समजतात व इतरांना जातीयवादी समजतात. आपल्या पक्षाचे सरकार टिकवण्यासाठी ते I.U.M.L. या केरळमधील जातीय मुस्लीम संघटनेच्या आमदारांबरोबर सहकार्य करून राज्य करीत आहे व काँग्रेस पक्ष मुस्लीम लीग व कम्युनिस्ट यांच्याशी मैत्री करून रा.स्व. संघाविषयी अपप्रचार करतात. प्रसंगी रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाचे व कार्यकर्त्याचे दिवसाउजेडी खून करतात, पण खुनी कधीही पकडले जात नाहीत.
कम्युनिस्टांनादेखील हेच हवे आहे. त्यांना मुस्लीम लीगविषयी भीती असून ते मुस्लीम लीगला कधीही विरोध करीत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे. कम्युनिस्टांनी एखाद्या मुस्लीम कार्यकर्त्याला ठार मारले, तर मुस्लीम त्याचा सूड उगवतील व आपल्या पक्षाच्या चार जणांचे खून पाडतील. त्यापेक्षा त्यांच्याशी सहकार्य करून रा.स्व. संघाचे स्वयंसेवक मृत्युमुखी पडले तर बरेच आहे. काटयाने काटा काढला जातोय. रा.स्व. संघ याबाबत आक्रमक भूमिका घेऊ शकत नाही. तसे केले, तर केरळमधील सर्व पक्ष एक होऊन रा.स्व. संघावर बंदी घालण्याची मागणी करतील व केरळ सरकार रा.स्व. संघावर बंदी आणून संघाचे कार्य खिळखिळे करून टाकतील. गेल्या वीस वर्षांत रा.स्व. संघाचे जवळजवळ 1000 स्वयंसेवक आपले प्राण गमावून बसले आहेत.
याच पार्श्वभूमीवर तुफैल अहमद या मुस्लीम बांधवाने हिंदू व्हॉइस या मासिकात The Islamist radicalisation in Kerala हा लेख लिहिला आहे. त्याचा सारांश -
केरळमधील कम्युनिस्ट पक्ष आपले विळा व हातोडा हे चिन्ह त्याग करून केरळमध्ये इस्लामचा तारा येण्याकरिता तयारी करीत आहे, असा मजकूर 22 सप्टेंबर 2016च्या एका वर्तमानपत्रात छापला आहे.
13 सप्टेंबरला बातमी आली की, रिफालिया व तिचा नवरा इजाझ आणि मुलगा व केरळमधील दोन डझन मुस्लीम तरुण आपल्या घराचा त्याग करून इसिसमध्ये गेले आहेत. तेथे रिफालियाला एक मुलगी झाली, त्याचबरोबर एक बातमी प्रसिध्द झाली की इंग्लंडमधील एक दांपत्य तेथे कार्यरत असून त्यांनी कित्येक मल्याळी मुस्लीम तरुणांना सीरियाला जाण्यास प्रवृत्त केले आहे. 12 सप्टेंबरला इस्माईल कांगरप्पाडी या मौलवीने कोचीमध्ये सांगितले की, इसिस ही संस्था आम्ही मुस्लीम अतिरेकी संघटना मानत नाही. ते नंदनवनाच्या शोधात आहेत. त्याला जिहाद म्हणत नाहीत.
गेल्या काही वर्षांत केरळमधील तरुण मुस्लीम येमेनमध्ये तसेच श्रीलंकेत गेले आहेत. तेथे येमेनमधील अतिरेक्यांचे अड्डे आहेत. तेथे हे मुस्लीम तरुण पाठविले जातात. इत्तेहिद शुब्बानील मुजाहिद्दीन ही विद्यार्थी संघटना केरळात असून ते स्वत:ला 'इसलाही' म्हणजे सुधारणावादी म्हणतात. त्याचबरोबर तबलिघी जमात, जमात-ए-इस्लामी, इसिस, तालिबान आणि अल कायदा या संघटनादेखील स्वत:ला 'इसलाही' म्हणजे सुधारणावादी - Reformist म्हणवून घेतात.
कृष्णेंदू म्हणून मलेशियातील एक रहिवासी रमझानच्या 8व्या दिवशी मल्लापूरममधून प्रवास करीत असता, उन्हाचा त्रास होऊ लागल्याने तिला सोडा-लिंबू पेय हवे होते. आजूबाजूच्या दुकानावर मागणी केली असता तिला सांगण्यात आले की, दुपारच्या वेळेस रमजान असल्यामुळे आम्हाला विक्री करण्यास बंदी आहे. असे का? हे माणुसकीच्या विरुध्द आहे. ''आम्ही जर पदार्थ विकले, तर आमची दुकाने तोडून टाकतील'' हे उत्तर मिळाले. मल्लापुरम हा जिल्हा इंदिराबाईंनी मुस्लीम बहुसंख्य म्हणून बहाल केला व तेथील हिंदू आता अल्पसंख्य व पराधीन आहेत. नझरिया नझिम ही नटी बुरखा वापरत नाही, म्हणून तिला दमदाटी करण्यात आली.
असिफ अली या नटाने 'मक्का ऑफ क्रिकेट' असे लंडनचे क्रिकेटच्या मैदानाचे वर्णन केल्याने त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करण्यात आला. आतापर्यंत रमझानचे इंग्लिश स्पेलिंग Ramazan होते. त्याचे आता अरबीकरण करून Ramadan असे केले गेले.
मल्याळी आखाती देशांकडून केरळमध्ये तेथील दिनार पाठवितात. त्यात मुस्लीम बहुसंख्य आहेत. Popular Front of India ही संस्था तेथील मशिदींचा ताबा घेऊन हिंदू-मुस्लीम तेढ वाढवून आगीत तेल ओतत आहेत.
आपली शक्ती दाखवण्याकरिता एका पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या मशिदीसमोर मुस्लिमांनी गाडया थांबवून रस्ता रोखून धरला, पण पोलीस काही करून शकले नाही. काँग्रेसबरोबर Indian Union of Muslim Leagueने युती करून सरकार चालविले. त्यातील अब्दुल या मंत्र्याने 'गंगा' हे त्याच्या बंगल्याचे नाव 'ग्रेस' असे बदलले!
कोव्हिकोड व मल्लपूरममधील शाळांत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मिळत असे. रमझानच्या काळात दुपारचे जेवण बंद करण्याचा फतवा मौलवींनी काढला व विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणास मुकावे लागले.
मल्लापूरम व उत्तर केरळमधील मॉल्समध्ये मुस्लीम पुरुष व स्त्रियांकरिता खास स्वतंत्र प्रार्थनाकक्ष उभारण्यात आले आहेत. सरकारी कार्यालयात नियमितपणे नमाज पढण्यात येतो. सरकार काही करू शकत नाही.
पतंजलीने एका खेडयात आयुर्वेदिक औषधे दुकानात ठेवली होती, ती तेथील मुस्लिमांनी काढून टाकण्यास सांगितले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे सिमीशी संबंध असून त्यांच्या हालचाली चालूच असतात.
अब्दुल नासर मदानी याने 1998मधील कोईमतूर येथील बाँबस्फोटात व 2008च्या बंगलोर स्फोटात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला शिक्षा झाली. तो परत आला व आता तो मुस्लीम तरुणांकरिता संध्याकाळचे वर्ग चालवितो. अब्दुल नसेरने सांगितले की, तामिळनाडूतील अलउमाह या आतंकवादी संस्थेशी त्याचे संबंध होते.
पी. उन्नीकृष्णन - एकेकाळचे Vigilance Dept. Officer यांनी सांगितले की, अयुब इल्यास या तरुणाला अराजक पसरविण्यासंबंधी अटक केली होती. त्याला कोर्टाने जामिनावर सोडले. तो पाकिस्तानात पळून गेला.
काश्मीरमधील चार आतंकवादी नियंत्रणरेषा ओलांडून आले, ते केरळीय होते. मल्लापूरमध्ये 1990च्या सुमारास या मदानीने तेथील सिनेमागृहांना आगी लावल्या. सरकार स्वस्थ!
मुस्लीम जमातीत तसे मतभेद आहेत. सइद अहमद याने इस्लामसंबंधी बरेच लिखाण केले आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, सुन्नी आणि मुजाहिद हे केरळीय मुस्लीम अहमदीयांना व शियांना मुसलमान मानत नाहीत.
तंजेथू इळुथाचन हे प्रख्यात मल्याळी साहित्यिक. त्यांचे जन्मस्थळ थिरूर येथे त्यांचा पुतळा उभारण्याचे ठरले; पण तेथील नगरपालिकेने तेथील मुस्लीम गटाच्या दबावाखाली तो पुतळा उभारण्यास मनाई केली.
केरळमधील सुप्रसिध्द सिनेनट प्रेम नझीर याने जवळजवळ 700 चित्रपटांत काम केले आहे व त्याचे नाव Guiness Book of World Recordमध्ये आहे. केरळ सरकार त्याचा पुतळा बसविणार होते, पण केरळ मुस्लीम जमाह काउन्सिलच्या दबावाखाली तो बेत रद्द केला. कारण ''आम्ही मूर्तिपूजा मानत नाही.'' केरळशेजारील लक्षद्वीप बेटांवरील बहुसंख्य मुस्लीम नागरिकांच्या दबावामुळे तेथे म. गांधींचा पुतळा उभारता आला नाही. लक्षद्वीप हा भारताचा एक अतूट भाग!
प्रो. टी.जे. जोसेफ यांनी महंमद पैगंबरांचा अपमान केला, म्हणून 2010मध्ये त्यांचा हात छाटून टाकला, पण ही गुंडगिरी तेथील ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट थांबवू शकले नाहीत!
एशियानेट न्यूज T.V. यांच्या म्हणण्याप्रमाणे तेथील चर्च व कम्युनिस्ट यांना भीती वाटली की जोसेफना आपण पाठिंबा दिला, तर ख्रिश्चन व मुस्लीम यांच्यामध्ये तेढ निर्माण होईल.
केरळला दक्षिणेचे काश्मीर - म्हणजे नंदनवन समजले जाते. ते नंदनवन आता काश्मीरप्रमाणेच मुस्लीम राज्य बनवण्याच्या मार्गावर आहे. बिचारे 35 टक्के हिंदू अल्पसंख्य व असंघटित असल्याने व सरकार विरोधाने मुकाटयाने हे सहन करीत आहेत.
022-28728226
( सदर लेख हिंदू व्हाईसच्या नोहेंबरच्या अंकामध्ये तुफेल अहमद यांनी लिहिला आहे.)