हिंदुत्वाचा बुलंद आवाज युगपुरुष अशोकजी सिंघल

विवेक मराठी    23-Nov-2015   
Total Views |


RSS_1  H x W: 0

अशोकजी उच्चशिक्षित होते. ज्या काळात अभियंता बनणे हे तरुणांचे स्वप्न असायचे, त्याच काळात त्यांच्या हातात अभियांत्रिकी विषयाची पदवी होती. मात्र, देशातील सामाजिक अभियांत्रिकीला गती देण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले होते. 1942 साली शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. संघाच्या संस्कारात देशभक्तीचे धडे गिरवताना या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी सर्वस्व समर्पणाची प्रतिज्ञा त्यांनी घेतली होती. त्यामुळे शिक्षण संपल्यानंतर संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करण्याचे ठरवून त्यांनी स्वत: या देशाच्या पुननिर्माणाच्या चळवळीत झोकून दिले.

 

शोकजी सिंघल गेले! हिंदुत्व जागरणाच्या चळवळीतील हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणजे अशोकजी! अनेक आव्हानांना धीरोदात्तपणे तोंड देत हिंदूंच्या मनात विजयी विश्वास निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे अशोकजी! जीवननिष्ठा म्हणून हिंदुत्वाचा विचार स्वीकारून त्यासाठी आपल्या जीवनाचा धगधगता होमकुंड करणारी समिधा म्हणजे अशोकजी! श्रीरामजन्मभूमीला लोकचळवळीचे स्वरूप देणारा आक्रमक नेता म्हणजे अशोकजी! अत्यंत संवेदनशील आंदोलनात सर्वात पुढे राहून, येणारे संकट स्वत:वर झेलणे म्हणजे नेतृत्व करणे, हे दाखवून देणारा नेता म्हणजे अशोकजी! अशोकजी सिंहल यांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतके पैलू या सव्वाशे कोटींच्या देशाने पाहिले आहेत की या अलौकिक नेत्याचे स्मरण या देशवासीयांना सदैव विश्वविजयाची प्रेरणा देत राहील!

गुरुजी गोळवलकर जीवनचरित्र
@रंगा हरी
गोळवलकर कुलवृत्तांतापासून त्यांच्या पूर्णाहुतीपर्यंत विस्तृत माहिती या जीवनचरित्रात वाचायला मिळते.
 अशोकजी उच्चशिक्षित होते. ज्या काळात अभियंता बनणे हे तरुणांचे स्वप्न असायचे, त्याच काळात त्यांच्या हातात अभियांत्रिकी विषयाची पदवी होती. मात्र, देशातील सामाजिक अभियांत्रिकीला गती देण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले होते. 1942 साली शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. संघाच्या संस्कारात देशभक्तीचे धडे गिरवताना या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी सर्वस्व समर्पणाची प्रतिज्ञा त्यांनी घेतली होती. त्यामुळे शिक्षण संपल्यानंतर संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करण्याचे ठरवून त्यांनी स्वत: या देशाच्या पुननिर्माणाच्या चळवळीत झोकून दिले. संघाचा स्वयंसेवक संघाचे काम एक जीवननिष्ठा म्हणून स्वीकारत असतो. वारकरी जसे देहावर तुळशीपत्र ठेवून आपला देह ईश्वरार्पण असल्याच्या भावनेने जीवन जगतो, तसे संघाचा प्रतिज्ञित स्वयंसेवक आपल्या वैयक्तिक इच्छा, महत्त्वाकांक्षा यांना तिलांजली देऊ न राष्ट्रहित सर्वोपरी या भावनेने संपूर्ण समर्पित होऊ न काम करत असतो. अशोकजी सिंहल यांनी उत्तर प्रदेशामध्ये कानपूरसह अनेक ठिकाणी रा.स्व. 


संघाचे काम केले. संघावरील दोन्ही बंदींच्या काळात त्यांनी स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि जनता यांचे मनोधैर्य कायम ठेवून अन्यायी बंदी झुगारून देणारी चळवळ चालविली. संघशाखेतून देशभक्तीची ऊर्जा घेऊन जीवनाच्या सर्व क्षेत्रांत हिंदुत्वाचा ठसा उमटविणारी एक मोठी चळवळ संघाचे स्वयंसेवक चालवत आहेत. त्यामध्ये 1980 सालापासून अशोकजी सिंघल यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी देण्यात आली. विषयाचे आकलन, संघटनात्मक कौशल्य यामुळे अशोकजी चारच वर्षांत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री झाले. नंतर दीर्घकाळ त्यांनी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. देशातील जनतेच्या मनात असलेली भक्ती हीच देशाची खरी शक्ती आहे, हे ओळखून त्यांनी या शक्तीचे जागरण करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाला गती देण्याचे ठरवले. अशोकजी सिंहल यांच्या नेतृत्वगुणांचा परिचय जगाला झाला तो श्रीरामजन्मभूमी आंदोलनातच! श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनाला श्रीरामशिलापूजनाच्या अभिनव उपक्रमाने देशातील गावागावात नेऊन पोहोचविले होते. त्यापाठोपाठ अयोध्येत कारसेवेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभरातून रामभक्तांना कारसेवेसाठी अयोध्येत बोलावले गेले. मात्र उत्तर प्रदेशात तेव्हा समाजवादी पक्षाचे सरकार होते. मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, असा निश्चय करून सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली. उत्तर प्रदेशात अयोध्येकडे जाणारे सर्व रस्ते रोखण्यात आले. 'जय श्रीराम' म्हणणे जणू गुन्हा झाला. रामाचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाला अटक होऊ  लागली. प्रत्येक गावात हजारो कारसेवक बंदिस्त करून ठेवण्यात आले. कारसेवेच्या एक दिवस आधी मुलायमसिंह यादव यांनी टीव्हीवर येऊ न 'अयोध्या में परिंदा भी पर नही मार सकता' अशी दर्पोक्ती केली. मात्र या सर्व चळवळीचे नेतृत्व करणारे अशोकजी सिंघल निश्चल होते. संकल्पावर अढळ होते. अलीकडे सामाजिक आंदोलनात नेते आपल्या कपडयाला धूळही न लागू देता नेतृत्व करत असतात. प्रतीकात्मक आंदोलन करून अटक करवून घेतात. मात्र अशोकजींनी नेतृत्व करणे म्हणजे काय असते ते दाखवून दिले. वेषांतर करून मुलायम सिंह यादव यांच्या पहाऱ्याला चकवा देऊन ते अयोध्येत नियोजित वेळेला पोहोचले. देशभरातून लपत-छपत तेथे आलेल्या कारसेवकांचे मनोधैर्य टिकविले. मार्गदर्शन करून कारसेवेची रचना केली. पोलिसांच्या वेषात अयोध्येत मुलायमसिंह यादव यांनी गुंड ठेवले असताना संघर्षाला न घाबरता अशोकजी कारसेवकांचे नेतृत्व करत थेट सर्वात समोर रस्त्यावर उतरले. कारसेवक आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांनी कारसेवकांवर लाठीहल्ला सुरू केला. अशोकजी न घाबरता अग्रेसरच राहिले. पोलिसांची काठी लागून त्यांच्या डोक्याला जखम झाली. त्यांच्या या सक्रिय आणि धडाडीच्या नेतृत्वामुळे कारसेवकांमध्ये अपूर्व उत्साहाचा संचार झाला. शरदकुमार कोठारी आणि रामकुमार कोठारी हे दोन बंधू पोलिसांचा कडा पहारा तोडून वादग्रस्त ढांच्यावर चढले. भगवा फडकविला आणि कारसेवा झाली! मोहन बने या छायाचित्रकाराने या क्षणाची छायाचित्रे काढली आणि 'एक्स्प्रेस' ग्रूपच्या वर्तमानपत्रात ती देशभर प्रकाशित झाली. ''कारसेवा झालीच नाही'' म्हणणाऱ्या मुलायमसिंह यादव  यांचा अहंकार जमीनदोस्त झाला. श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात या घटनेने एक विजयी स्फुरण निर्माण झाले. देशातील हिंदुत्वजागरणाची चळवळ तेथून जी गतिमान झाली, ती कधी थबकलीच नाही. स्वबळावर बहुमत मिळवून देशाच्या पंतप्रधानपदावर एका हिंदुत्ववादी नेत्याला विराजमान करेपर्यंत ही चळवळ यशस्वी होत गेली आहे. अशोकजी या हिंदुत्वजागरणाच्या चळवळीतील सर्व घटनाक्रमाचे खरे नायक होते. हिंदुत्वजागरणाच्या या चळवळीला वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून बदनाम करण्याचे कितीतरी प्रयत्न हिंदुत्वविरोधकांनी केले. मात्र या चळवळीचा आत्मविश्वास कणभरही कमी होऊ  न देण्याचे कौशल्य अशोकजींच्या नेतृत्वाने दाखवून दिले. लोकजागृती, न्यायालयीन लढा आणि रामजन्मभूमी आंदोलनावर होत असलेली सामाजिक चर्चा या सर्व आघाडयांवर एकाच वेळी विजयी वाटचाल कशी चालत राहील, याची काळजी अशोकजींनी सतत घेतली. यातील एकाही लढयात हिंदुत्वाच्या चळवळीला तसूभरही मागे हटण्याची वेळ येणारच नाही, उलट ती अधिक आत्मविश्वासाने, निग्रहाने पुढे पुढेच जात राहील, अशा प्रकारे अशोकजींनी नेतृत्व केले. धर्माचार्यांची मानसिकता तयार करून त्यांच्या आदेशाने ही चळवळ कशी पुढे जात राहील, याचे नियोजन त्यांनी केले. भारतातील राजकारणात यशस्वी व्हायचे असेल, तर हिंदुत्वाचा आग्रह थोडा पातळ केला, तरच नेतृत्व सर्वमान्य होऊ  शकते, असा भ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न चालले होते. अशा काळात हिंदुत्वाचा आग्रह आणि आत्मविश्वास डळमळीत होणार नाही, याचे यशस्वी डावपेच अशोकजींनी आखले. कृषिप्रधान भारतात गाय हा केंद्रबिंदू आहे असे मानून गो-संगोपन ही एक लोकचळवळ झाली पाहिजे, यासाठी विश्व हिंदू परिषदेने अभियान हाती घेतले. त्याचे नेतृत्व अशोकजींनी केले. गोमय, गोमूत्रापासून औषधे व अनेक उपयुक्त गोष्टी तयार करण्याच्या संशोधनापासून ते नवनिर्वाचित सर्व पक्षांच्या खासदारांना भेटून गो संगोपनाचा कायदा करण्यासाठी त्यांचे मत तयार करण्याची चळवळ गतिमान करण्यापर्यंत अनेक गोष्टी अशोकजींनी आग्रहाने केल्या. नरेंद्र मोदी यांना पूर्ण बहुमत मिळालेले असल्याने अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माणाचा मार्ग बराच प्रशस्त झाला आहे, अशा धारणेने अशोकजींचे काम चालू होते. मात्र वयोमानानुसार वयाच्या 89व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अशोकजींचा ज्यावर दृढ विश्वास होता, त्या हिंदू विचारधारेत शरीराला फारसे महत्त्व नाही. आत्मा अमर आहे असे मानले आहे. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:' असे आत्म्याचे अमरत्व सांगितलेले आहे. आपल्या दृढविश्वासाच्या रूपाने, हिंदुत्वावरील दुर्दम्य निष्ठेच्या रूपाने भारतीय समाजाला येणाऱ्या काळात हिंदुत्वाची विजयपताका विश्वात फडकत ठेवण्याचे काम करण्याची प्रेरणा देत अशोकजींच्या स्मृती अमर राहणार आहेत. आदर्श जीवनमूल्यावर आधारित, वैभवसंपन्न, अजिंक्य असा भारत श्रीरामजन्मभूमीवरील भव्य राम मंदिरासह उभा करणे हीच अशोकरावजींना खरी श्रध्दांजली ठरेल.

9422202024