Enter your Email Address to subscribe to our newsletters
साऱ्या जगाला एक गूढ, कुतूहलजनक वाटत आलेल्या चीनचे अंतरंग कसे आहे, तेथील महानगरे व ग्रामीण भागांची वास्तव स्थिती काय आहे, तेथील समाजमानस कसे आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न सा. विवेकच्या निमेश वहाळकर यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौऱ्यात केला. हे अनुभव व अनेक महत्वपूर्ण निरीक्षणे मांडणाऱ्या या लेखमालिकेतील हा पहिला भाग..
मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे. तरीही बांगलादेशमध्ये अशांतता आणि अस्थिरतेची परिस्थिती आहे. अशा स्थितीत अचानक मुहम्मद युनूस यांचे अमेरिकेला निघून जाणे, हे बांगलादेशबद्दल चिंता वाढवणारे ठरते. कमला हॅरिस यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला अध्यक्षीय निवडणुकीत पराभव पत्करावा लागणे आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विजयी होणे, हे अनेक दृष्टीने ‘गेम चेंजर’ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बांगलादेशात पुन्हा लवकरच निवडणुका होतील का? झाल्यावर शेख हसीनांचे
निजामशाही राजवटीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणावर बंदी होती. एवढेच नव्हे तर देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हौदावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या डॉ. बाबासाहेबांना जातीवाचक शिवीगाळ निजामाच्या मौलवीने केली. हा अपमानाचा कलंक मिटवून टाकण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी याच ठिकाणी संकल्प केला. त्या ठिकाणास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या छत्रपती संभाजीनगरमधील अन्य काही ठिकाणांस केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भेट दिली. या सर्
कॉंग्रेसने सत्तेच्या अखेरच्या दिवशी म्हणजे निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुका जाहीर करण्याच्या दिवशी, मनमोहन सिंह सरकारने वक्फ बोर्डाला अनेक मालमत्ता हस्तांतरित करण्याचे दिलेले पत्र म्हणजे या वक्फच्या राक्षसाला दिलेले वरदानच होय. दिनांक 5 मार्च 2014 रोजी सकाळी मनमोहन सिंह यांच्या सरकारने, एकूण 123 सरकारी मालमत्ता, वक्फ बोर्डाला, दोन अटींच्या अधीन राहून हस्तांतरित करीत असल्याचा शासन निर्णय (जी.आर.) काढला. सदर जी.आर. काय होता?, त्याचे फायदे वक्फ बोर्डाला काय झाले... याबाबत माहिती देणारा लेख..
1 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे, तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्म्सचे भरत शितोळे यांची आहे.
देशहिताचा विचार करणारा पक्षच जनमानसात आपले स्थान टिकवून ठेवणार हे निश्चित. देशभक्तीच्या रंगात सर्व रंग एकजीव होऊन जातात. तोच आपला खरा रंग आहे. राजकारणाला ओंगळवाणा रंग देणार्या रंगांधळ्या पुढार्यांना तो रंग ओळखणे हे शक्य नाही, हेच खरे....
कर्णबधिरांचे पूर्वप्राथमिक शिक्षण व त्यातून ती मुले सर्वसाधारण शाळेत जाण्यासाठी प्रयत्न करणे, हा एक मोठा क्रांतिकारी टप्पा आहे. या दिशेने दिव्यांगांच्या शिक्षणात पुण्यातील रक्षाताई देशपांडे ह्या गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ पायाभूत स्वरूपाचे काम करीत आहेत. अशा स्वरूपाचे पथदर्शी काम उभे करणे आणि विस्तारणे यातील त्यांचे योगदान मोठे आहे.
‘यतो धर्मस्ततो जय:’ ह्या उक्तीप्रमाणे रामायण ही मूर्तिमंत धर्म असलेल्या रामाच्या विजयाची कथा आहे. दरवर्षी रावणदहन समाजाला अधर्म करणार्याला शिक्षा दिली पाहिजे हे शिकवते. अधर्माने वागू नये हेदेखील रावणदहन शिकवते. कोणी अधर्माने वागत असल्यास रामाप्रमाणे अन्यायाच्या विरुद्ध उभे राहण्यास शिकवते. म्हणूनच एक चांगला समाज घडवण्यासाठी रावणदहन करायची प्रथा पूर्वीच्या शहाण्या लोकांनी सुरू केली असावी. घुबडाला जसे सूर्यदर्शन त्रासदायक ठरते, तसे ही प्रथा समाजकंटकांच्या डोळ्यांत खुपत असेल तर त्यात आश्चर्य ते काय!
सोशल मीडिया, त्यावर वारंवार येणारी नोटिफिकेशन्स आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झालेली आहेत. नोटिफिकेशन्सची सुरुवात महत्त्वाच्या माहितीकडे आपले लक्ष वेधून घेण्यासाठीच झालेली आहे; परंतु आपल्यासाठी ‘महत्त्वाचं काय’ हे नक्की कोण ठरवतंय? आपल्या एकाग्रतेवर, कार्यक्षमतेवर, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकणार्या ह्या नोटिफिकेशन्सना चाळणी आणि कात्री लावण्याचं काम आपणच करायला हवं, नाही का?
केवळ रोग, आजार, विकार नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकदेखील आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ वैद्यकीय सेवा न पुरवता सामाजिक प्रश्नांची उकल लक्षात घेऊन श्री गुरुजी रुग्णालयामार्फत सामाजिक कार्य करण्यात येते. एक सुदृढ, निरामय समाज घडावा यासाठी ही चळवळ सुरू आहे. म्हणूनच नाशिक जिल्हा व परिसरात अल्प दरात उत्तम, दर्जेदार आरोग्यसेवा मिळविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्वसामान्य जनतेला आधार व दिलासा देण्याचे काम येथे सातत्याने करण्यात येते.
कमल ग्रुप्सअंतर्गत जनजागृती ‘पे बॅक टू सोसायटी’ या संकल्पनेतून मुलींना आरोग्य आणि मासिक पाळी याविषयी शाळा-शाळांतून मार्गदर्शन करणार्या डॉ. उन्नती शिंदे हिच्या निःस्वार्थी वृत्तीचा आणि समाज निरोगी ठेवण्याच्या कार्याचा घेतलेला आढावा.
डॉ. अजय हौदे हे सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी खेड्यातील अतिशय सामान्य कुटुंबातील होते. अजय यांनी पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. केले. काही रिसर्च प्रकाशने आणि तीन पेटंट्स मिळाल्यावर आज त्यांच्या नावे 68 पेटंट्स आहेत, ज्याचा उपयोग विविध प्रॉडक्ट्स तयार करण्यात केला गेला. आरोग्य क्षेत्रात ही ‘अजय’ यात्रा निरंतर चालू आहे.
नुकताच मी तीनशे तरुण-तरुणींसोबत हिमालयामधील खेड्यांमध्ये सेवाकुंरच्या माध्यमातून एका सेवा प्रकल्पासाठी प्रवास केला त्या वेळी जाणवले की, भारत अजून जागा आहे. आपल्याला ज्या भारतीय मूल्यांचा अभिमान वाटतो, या काळातही टिकून आहेत. विशेष म्हणजे सेवांकुर हा सेवा उपक्रम गेली आठ वर्षे यशस्वीपणे चालू आहे. त्याचे हे अनुभवकथन मांडताना मला विलक्षण संतोष होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा महाराष्ट्र राज्य आर्थिक ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यांच्या माध्यमातून 801 महिलांनी एकत्र येऊन 2018 साली ‘इकोवन सेल्फ रीलायंट वुमेन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी प्रा. लि.’ ची स्थापना केली आहे. या माध्यमातून महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. या महिला शेतमाल व गौण वनउपज खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून विक्रीचे कार्य करत आहेत.
भारतात सुमारे 350, तर महाराष्ट्र राज्यात 47 जनजाती (आदिवासी) बांधवांचे अस्तित्व आहे. हे समाजबांधव मुख्य प्रवाहापासून दूर असले तरी संस्कृती व शेती टिकवून आहेत. डोंगरदर्यांत राहणार्या जनजाती शेतकरी बांधवांच्या (अनुसूचित जमाती) उत्पादनात वाढ व्हावी, जीवनमान उंचवावे यासाठी महाराष्ट्र राज्यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येत आहे.
स्वच्छ दूध उत्पादनामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये दुभत्या जनावरांची योग्य स्वच्छता व आरोग्याची काळजी फार महत्त्वाची आहे. अनेक जनावरांत दगडी, सुप्त अवस्थेतील स्तनदाह, क्षय यामुळे उत्पादित बाधित दूध हे इतर चांगल्या दुधात न मिसळता बाहेर विल्हेवाट लावण्यासोबत नियमित लसीकरण, पशुवैद्यकाकडून तपासणी, आजारी जनावरांची स्वतंत्र व्यवस्था, गोठ्यातील जैव सुरक्षा हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. सोबत गोठ्यातील स्वच्छतादेखील महत्त्वाची आहे.
शेती सुलभ करण्यासाठी नवनवीन पर्याय शेतकरी शोधत आहेत; पण पर्यावरणीय व आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेती पद्धत रूढ करण्याचे प्रयत्न गावगाड्यापासून ते सरकारदरबारी होताना दिसत नाही आणि म्हणून शेतकर्यांनीच यासाठी पुढाकार घ्यायला हवा व आपल्या पंचक्रोशीला साजेसे शाश्वत शेतीचे मॉडेल विकसित करायला हवे. यासाठी स्थानिक परिस्थितीचे म्हणजेच नैसर्गिक घटकांचे भान त्यांना येणे आवश्यक आहे.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. दोन सांघिक आणि चार वैयक्तिक सुवर्णपदकांची कमाई भारताने या स्पर्धेत केली. या लेखात आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल तसेच भारताच्या बुद्धिबळातील यशस्वी वाटचालीबद्दल.
पॅरालिम्पिक स्पर्धांमधील गेल्या चार वर्षांच्या कामगिरीकडे पाहिले तर लक्षात येईल, की भारताच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे. भारताने पॅरिसमध्ये 29 पदके मिळवली. सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि तेरा कांस्यपदकांचा यामध्ये समावेश आहे. स्पर्धेची पात्रता मिळवणार्या खेळाडूंची संख्याही वाढत आहे. पॅरिसमधील भारताचे हे यश या सर्व सकारात्मक बदलांची नांदी ठरेल, हीच अपेक्षा आहे. तसेच पदकांची आकडेवारी पाहता 2028 च्या लॉस एंजिलिस पॅरालिम्पिकमध्ये आपण पदकांच्या अर्धशतकापर्यंत मजल मारली तरीही आश्चर्य वाटणार नाही.
पॅरिसमधील दिव्यांग खेळाडूंसाठी असलेली पॅरालिम्पिक ही स्पर्धा ऑलिम्पिकइतकीच महत्त्वाची मानली जाते. शारीरिक कमतरतांवर मात करून असामान्य कामगिरी करणारे खेळाडू हा प्रेक्षकांसाठी कौतुकाचा आणि औत्सुक्याचा विषय असतो. ह्या स्पर्धेतील प्रत्येक पदकामागे एक प्रेरणादायी कहाणी असते. दिव्यांगत्व कुणी मुद्दाम मागून घेतलेली गोष्ट नाही. अनेक शारीरिक अडचणींवर हे खेळाडू किती धैर्याने मात करतात हे बघून आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळू शकते.
ऑलिम्पिक विजेते काही आकाशातून पडत नाहीत, ते घडवावे लागतात आणि हा मार्ग सोपा नसतो. गेली काही वर्षे ‘खेलो इंडिया’अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन मुलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. ह्या स्पर्धांमधील विजेत्यांना शिष्यवृत्तीही मिळते. हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
समरसतेच्या कामात नुसतं वाहून घेतलं नाही तर समरसता खर्या अर्थाने जगणारे कार्यकर्ते म्हणजे मधुसूदन व्हटकर. भटके-विमुक्त समाजाचे प्रश्न हे सर्वार्थाने वेगळे आणि ती सोडविण्याची कार्यपद्धतीही वेगळी. अशा या भटके-विमुक्तांच्या व्यथा स्वकष्टाने दूर करणार्या मधुकररावांसारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांमुळे ते साध्य झाले.
ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समीक्षक आणि लेखिका नीला वसंत उपाध्ये यांचे सोमवार, दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. नीला उपाध्ये यांचे ‘सा. विवेक’शी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या ‘वसंततिलका’ नावाने ‘विवेक’मध्येही ललित सदर लिहीत असत. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा श्रद्धांजलीपर लेख.
भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव कळंबेळकर यांचे 16 जून 2024 रोजी सकाळी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
संघ संस्काराचे बीज व्रतासारखे जोपासलेले माधव जोशी यांनी आर्थिक कमाईसाठी जी माध्यमे निवडली ती ही राष्ट्रीय वृत्तीच्या जोपासनेला आणि राष्ट्रहिताच्या कार्यविस्ताराला पूरक ठरावी अशी. मुळातच नोकरी करावी ही मानसिकता नसल्यामुळे त्याने ’आपला परममित्र’ नावाचे द्वैमासिक सुरू केले आणि त्यातूनच पुढे ’परममित्र पब्लिकेशन्स’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. परममित्र पब्लिकेशन्सलाही आता 25 वर्षे पूर्ण होत आली आहेत. ’पॉप्युलिस्ट आणि पेइंग’ पुस्तक प्रकाशनाच्या दिशेने न वळण्याचा कटाक्ष माधवने बाळगला. राष्ट्रीय-सामाजिकदृष्ट्या महत
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
आता बास झालं तुझे हे दुबळेपण. तू दुर्गा, काली यांची वारसदार ना? विसरलीस का तुझे तेज, तुझे सत्त्व? आज वेळ आली आहे, स्वत:ची ताकद जोखण्याची, आत्मविश्वास जागवण्याची. हे तरुणी, निश्चय तुलाच करावा लागेल. जोखमीचा विचार तुलाच करावा लागेल. हे करताना मुलांच्या व पुरुषांच्या प्रबोधनाचे कामही आपल्याला हाती घ्यावे लागेल. या नवरात्रीच्या निमित्ताने अष्टभुजांमध्ये युक्त्या-प्रयुक्त्यांची आयुधे घेऊन, मनात आत्मविश्वास जागवून स्व-संरक्षणासाठी सज्ज हो!!
उत्सव मनुष्याच्या मनात नवचैतन्य जागवतात. प्रत्येक उत्सवाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. दैनंदिन रटाळ आणि कंटाळवाण्या जीवनात उत्सव म्हणजे चैत्रपालवी. अमूर्ताला वेगवेगळ्या रूपांत साकार करून त्याचे पूजन करण्यासाठी देवतांची निर्मिती झाली असावी. मनुष्य सकारात्मक प्रवृत्तींना दैवताचे रूप देतो आणि साकार स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो. उत्सवात रांगोळी, वेगवेगळ्या प्रकारची सजावट, मूर्ती घडविणे अशा वेगवेगळ्या कलांमधून मनातले सौंदर्य बाहेर काढले जाते. उत्सव म्हणजे सौंदर्याची पूजा. नवरात्र उत्सव याला अपवाद कसा असेल.
मनुष्यप्राण्यांचे समूहीकरण म्हणजे समाज होय. समाजाची स्वतःची अशी मूल्ये आणि विचार असतात. समाजाच्या या मौलिक गोष्टींचे जर विस्मरण झाले, तर समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः आपलीदेखील अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीला जसे मन असते तसे समाजालादेखील मन असते. त्याला समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. ही सदसद्विवेकबुद्धी समाज जेव्हा हरवून बसतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. ही अवस्था म्हणजे आजचा हरवलेला महाराष्ट्र आहे. आजचा महाराष्ट्र हा वारसा हरवलेला महाराष्ट्र
श्रीराम मंदिराची उभारणी व घटनेतील 370 कलम रद्द करणे अशा एके काळी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी या सरकारने साध्य करून दाखविल्या, जिहादी दहशतवादावर नियंत्रण मिळविले, डाव्या व समाजवादी विचारप्रणालीमुळे दडपल्या गेलेल्या हिंदू इतिहास, परंपरा आणि गौरवस्थाने यांना महत्त्व प्राप्त करून दिले. तसेच गेल्या दहा वर्षांत कोणत्याही अन्य पक्षांनी केली नसतील एवढी विकासकामे या भाजप सरकारच्या काळात झाली. व्यावसायिक सर्वेक्षणापासून बूथ नियोजनापर्यंत सर्वत्र व्यावसायिकता आणली. या सर्व गोष्टी असतानाही व विरोधात पर्याय देण्यासाठी
आजच्या युगात कॉम्प्युटर सिस्टम्सशिवाय उद्योग चालवायची कल्पनाही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांत प्रचंड चर्चेत असलेलं एआय तंत्रज्ञान ही ह्याच बिझनेस सिस्टम्स वापराची पुढची पायरी आहे. दुर्दैवाने सगळ्या चर्चेचा रोख हा आता हे तंत्रज्ञान सगळ्या नोकर्या खाणार आणि प्रलय येणार असाच आहे. आज एआयचा उदोउदो बरोबर औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी ऑटोमेशनने आधीच आणि जास्त जोरात मुसंडी मारली आहे. खरं तर एआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. भीतीपोटी विरोध करण्यात किंवा ‘मला काय त्याच
माणसं निघून जातात आयुष्यातून. त्यांची आत्मचरित्रं अमर होतात. पुनःपुन्हा लोक वाचत राहतात. हरवलेलं शोधतात. कधी सापडतं, कधी नाही. प्रकाशाचे कवडसे दिलासादायक असतात. जिथून गोफ विणायला सुरुवात करतात तिथेच तो सुटावा म्हणून एक गाठ असते. ती सोडवता आली की गुंतागुंत होत नाही. आठवणींचा गोफ नक्षीदार असतो, त्यात रमावं.
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये