( parbhani UBT group & sharad pawar ) परभणी जिल्ह्यातील पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे, पाथरी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण कोल्हे, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बालाजी देसाई यांच्यासह उबाठा आणि शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवार, दि. २ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.
Read More
( UBT group in thane ) शिवसेना उबाठा गटाच्या कळवा येथील शाखाप्रमुख ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली कामगार मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राकेश चौघुले यांनी पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.
बाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी(शरद पवार गट), काँग्रेस या पक्षांना डिवचण्याची संधी सोडलेली नाही. लोकसभा निवडणुकीत मविआने राज्यात ३० जागांवर विजय मिळविला होता. या घवघवीत यशानंतरदेखील सांगलीतील जागेची चर्चा राज्यात पाहायला मिळाली होती.
सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात तणाव सुरू असतानाच, ही जागा सोडण्याच्या मोबदल्यात उबाठा गटाने काँग्रेसकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी शनिवार, दि. ६ एप्रिल रोजी केला. किंबहुना संजय राऊतांचा सांगली दौरा हा त्यासाठाच असल्याचा दावाही त्यांनी केला.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून उबाठा गटाने आपला उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे. उबाठाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन आपल्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. उबाठा ने स्थानिक उमेदवार दिला असला तरी तो भूमीपूत्र नाही. स्थानिक भूमीपुत्राला प्राधान्य देण्यात यावे असे आशयाचे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.
'मोदींनी दहा वर्षांत काय केले? कुठे आहे विकास? महागाईने जनता हैराण आहे. मोदींना भाजपकडून प्रभू श्रीरामाच्या जागी दाखविण्याचा प्रयत्न...’ वगैरे वगैरे बरीच बाष्कळ बडबड उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक टोळक्याने नुकत्याच पार पडलेल्या ठाकरेंच्या कोकण दौर्यादरम्यान केली.
लोकसभेला इंडिया आघाडीतर्फे २३ जागा लढविण्याची वल्गना करणाऱ्या 'उबाठा' गटाकडे २३ माणसे तरी आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. शुक्रवार, दि. २९ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मविआकडून मोर्चेबांधणीस सुरूवात झाली आहे. महायुतीला शह देण्याकरिता मविआ आघाडी उभी राहत असतानाच आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी घटक पक्षालाच घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे स्वतःच्या जीवावर एकही जागा जिंकत नाही त्यांना काँग्रेसला सोबत घ्यावेच लागेल असे विधान संजय निरुपम यांनी केले.
शिल्लकसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची अवस्था म्हणजे कानात बुगडी, गावात फुगडी अशीच! आपल्यापाशी काहीच राजकीय ताकद नसतानाही बेटकुळ्या फुगवत मोठ्या शक्तीचा आव आणण्याची ठाकरेंची जुनीच खोड. आताही राज्याच्या लोकसभा जागावाटपात निम्म्या जागांवर दावा ठोकणार्या ठाकरेंना मात्र काँग्रेसने फटकारत त्यांची राजकीय किंमतच दाखवून दिली आहे.
शीवतीर्थावर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. खोक्याची लंका दहन करणारी धगधगती मशाल माझ्यासोबत आहे, असं ठाकरेंनी म्हटलं आहे. ५७ वर्ष झाले पण आपण आपली परंपरा चालूच ठेवली आहे. काही लोकांनी ही परंपरा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण आपण मोडू दिला नाही. आपला मेळावा झाल्यानंतर इथे आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. असंही ठाकरेंनी भाषणात बोलताना सांगितले.
मुंबईतील राजकीय वादाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या वरळी मतदारसंघात पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावावरून भाजप आणि उबाठा गटात वाद पेटला असून दोन्ही पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे वरळीच्या मैदानात पुन्हा एकदा राजकीय नुराकुस्तीचा डाव रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
रामदेव बाबा यांच्या ‘मोक्ष कसा मिळेल’ या प्रवचनाला विरोधकांनी ‘बाबांचा मोक्ष उद्योग’ असा अग्रलेख सामना वृत्तपत्रात लिहिला होता. सामना वृत्तपत्राचा इतिहास आणि आजची परिस्थिती ही डबघाईला आल्याने बाबारामदेव यांच्याकडून काही आर्थिक लाभ मिळतोय का ? या आशेने त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी सामनात अग्रलेख लिहिण्यात आला आहे,'' असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनलेल्या वरळी मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपने उबाठा गटाला धोबीपछाड दिली आहे. वरळीतील प्रतिष्ठित अशा जांबोरी मैदानावर सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचे यशस्वी आयोजन करून भाजपने सरशी केली आहे.