एक परिचित आवाज, बोलण्याची एक विशिष्ट पद्धत, आवाजात आपलेपणा आणि त्याचवेळी एक नैतिक अधिकार! बिमल यांच्याबाबत माझ्यासारख्या अनेकांना हा अनुभव आला असेल. फोनवरील संभाषणादरम्यान कधीही अधिकारवाणीत ते बोलले नाहीत किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही रागावले नाहीत. प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि व्यक्तिमत्त्व ( Volunteer ) ) घडवण्यात अनेकांचे योगदान असते. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या मदतीला, आपल्याला मार्गदर्शन करायला जी जी व्यक्ती संपर्कात येते, तिचा त्या व्यक्तीच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. उलट अनेक गोष्टी
Read More
संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाप्रमाणेच श्रीगुरूजी रुग्णालयाने आपली स्वतःची सुस्पष्ट अशी मुद्रा आज केवळ नाशिकमध्येच नाही, तर उत्तर महाराष्ट्रात निर्माण केली आहे. हे श्रेय जेवढे रुग्णालय उभे करण्याचा विचार करणार्या डॉक्टरांचे, तेवढेच त्यांच्या या अभिनव प्रयत्नांना साथ देणार्या त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणार्या स्थानिक समितीचे आणि आर्थिक बळ देणार्या दातृत्वाचेसुद्धाही. समाजाचा बदलणारा पोत लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंडेकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्रीगुरूजी रुग्णालयाने एक नवा आयाम उभा केला आह
वैद्यकीय सेवा हे समाज परिवर्तनाचे आणि सामाजिक सेवेचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे रुग्णालये ही केवळ उपचारांपुरती मर्यादित न राहाता सामाजिक सेवेचे केंद्र म्हणून समोर येऊ शकतात. समाजाचीदेखील श्रीगुरूजी रुग्णालयाकडून अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे स्वाभाविकच रुग्णालयाचा विस्तार आणि नवीन सुविधांची सुरुवात काळाची गरज झाली आहे. त्यातूनच रुग्ण सेवा सदन साकारले आहे.