महाड नवेघर येथील २५ एकर जमीनीपैकी ३ गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड समाजाला समाजमंदिर आणि विद्यार्थी वस्तीगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील १५ दिवसात प्रस्ताव देण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
Read More
Artificial Intelligence पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया मुंबई चॅप्टरच्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे औचित्य साधून कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) जबाबदारीने वापर : जनसंपर्काची भूमिका या विषयावर उद्या (दि.२१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह (भा.पो.से.) यांचे मुख्य व्याख्यान होणार आहे.
Mumbai Municipal Corporation ने जैन मंदिर पाडल्याने जैन समाजाने एकत्र येत निदर्शने केली आहेत. मुंबईतील विलेपार्ले विभागत असणार्या ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडण्यात आले. श्री १००८ पाश्वर्थनाथ देरासर, अवैध असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. हे प्रकरण वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले जरी असते तरीही मंदिर समितीच्या बाजूने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.मंदिर पाडण्याची स्थगिती देण्यासाठी भाविकांनी अंतिम क्षणी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु कोणतीही सुनावणी ह
प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावीत याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, ५ एप्रिल रोजी केले.
३० वर्षांहून अधिक काळ सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या अर्थकारणाची काळजी घेत त्यांना सक्षम करण्याचे काम ठाणे येथील जागृती सहकारी पतसंस्था करत आहे. या पतपेढीचे अध्यक्ष गोविंद मोहिते यांची मुलाखत.
राज्यासह आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करणारी अनेक नेतृत्वे स्थानिक पातळीवरही महाराष्ट्रात उभी राहिली. त्यांनी त्या त्या भागाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि आपल्याबरोबर त्या तालुक्यातील सर्वसामान्यांच्याही प्रगतीचा मार्गही सुकर करून दिला. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी ‘संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतसंस्था’ स्थापन केली. आज ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम सालप यांची घेतलेल
मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
‘मातृशक्तीचा जागर आणि कॅन्सरमुक्त राहो प्रत्येक घर’ हे ब्रीदवाक्य घेऊन सेवाकार्य करणार्या नवी मुंबईच्या डॉ. दिपाली बापूराव गोडघाटे यांच्या सम्यक विचारकार्यांचा मागोवा घेणारा हा लेख...
मासेमारीच्या निरनिराळ्या पद्धती आणि मत्स्यसंवर्धन यांचे अतूट नाते आहे. या दोघांमधील सहसंबंध काही वेळा हितवर्धक ठरतात, तर काहीवेळा मत्स्यप्रजातींच्या जीवावर उठतात. ‘निळ्या देवमाशाच्या शोधात’ या लेखमालिकेमधून आपण या सहसंबंधाचा उलगडा करणार आहोत.
मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पोलादपूर येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भाजप विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर भूषविणार आहेत.
आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी व्यापक आणि परिणामकारक धोरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवार, २ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आदिवासी आरोग्य विषयक पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
मुंबई : सहकारी पतसंस्थांच्या कार्यास बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ( Maharashtra State Cooperative Bank ) दि. १ फेब्रुवारी रोजी सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. पुस्तकरुपी दिंडीचे राज्य बँकेत स्वागत केले गेले. यावेळी सहकारी दिंडीतील कार्यकर्त्यांना सहकाराची शपथ दिली गेली. यामध्ये काका कोयटे यांना १० लाखांचा धनादेश देण्यात आला.
आधुनिक भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय असा दिवस म्हणजे पौष. शु. द्वादशी (प्रतिष्ठा द्वादशी) दि. २२ जानेवारी २०२४. हिंदू समाजाची आराध्य देवता याच दिवशी त्यांच्या मंदिरातील गर्भगृहात प्रतिष्ठित झाली, असा ऐतिहासिक आनंदी दिवस. या गर्भगृहात नुकतेच दर्शनासाठी जाता आले, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. खूप महिन्यांची इच्छा पूर्ण झाली आणि गर्भगृहातील बालक रामाचे दर्शन म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण होता. खरे तर गर्भगृहात त्या विग्रहाकडे सतत बघत राहावे, इतकी देखणी आणि नितांत सुंदर श्रीरामललाची मूर्ती आहे. सहा वर्
जगातील सर्व मानव विविधता स्वीकारूनही, परस्परांचा आदर आणि सन्मान करीत गुण्यागोविंदाने राहावेत अशी ज्यांच्या मनात प्रामाणिक इच्छा आहे, त्या सर्वांना दि. ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागोच्या १७ दिवस चाललेल्या जागतिक धर्म परिषदेच्या पहिल्या दिवशी स्वामी विवेकानंदांनी ( Swami Vivekanand ) केलेले पाच मिनिटांचे भाषण व त्यात त्यांनी मांडलेला दृष्टिकोन स्वीकारावाच लागेल असा आहे. ते उत्स्फूर्त भाषण स्वामी विवेकानंदांच्या मुखातून सर्वांनी ऐकले असले, तरी ते ईश्वरानेच त्यांच्या मुखातून केलेले भाष्य आहे ही वास्तविकता समजून घ
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ. व्ही. नारायणन (Dr. V. Narayanan) इस्रोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली आहे. डॉ. व्ही. नारायणन यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. नारायणन यांचे वैशिष्ट्य रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये आहे.
मुंबई : मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या घाटकोपर (पूर्व) येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवार, ९ जानेवारी २०२५ रोजी भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांच्या हस्ते पार पडणार आहे.
आज २०२४ ( Year 2024 ) या वर्षाच्या मैफिलीची भैरवी! सरत्या वर्षातील घडामोडींचे सिंहावलोकन महत्वाचे ठरते. २०२४ या वर्षाने जगासाठी, आपल्या देशासाठी बरेच काही अनुभव दिले. यातील मोजक्या मह्त्वाच्या देश ते राज्य पातळीवरील घटनांचा घेतलेला हा मागोवा...
ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकास तसेच स्वयंपुर्नविकास यासह इतर छोट्या मोठया अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्यासाठी मुंबईत बैठक घेऊ. असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी दिले आहे. सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आयोजित केलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामध्ये शनिवारी (दि.२८ डिसे.) मुख्यमंत्री फडणवीस यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाशी ऑडिओ संवाद साधला. प्रारंभी देशाच
ठाणे : दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि. आणि सहकार विभाग ठाणे जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पहिले महा अधिवेशन पार पडले. या महा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी फोनवरून संवाद साधत ठाण्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी, जे काही निर्णय घेणार आहात त्याची सोडवणूक करण्यासाठी माझ्या दालनात निश्चितपणे बैठक बोलवीण, असे आश्वासन दिले. तर मुंबईत स्वयंपुनर्विकास ज्याप्रमाणे होतो तशा प्रकारची गृहनिर्माण संस्थांची स्व
(Amit Shah) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी नव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांचे उद्घाटन केले.
ठाणे : ठाण्यात प्रथमच होणाऱ्या "गृहनिर्माण संस्थाच्या महाअधिवेशनाला ( Maha Adhiveshan ) २८ डिसें. रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात होत असलेल्या या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस प्रथमच ठाण्यात येत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
परभणी : ( Parbhani ) “सोमानाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे त्याला मारहाण झाली, असे वक्तव्य करणार्या राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करत आहे,” असे ‘जय भीम आर्मी’ने जाहीर केले आहे. ‘जय भीम आर्मी’च्यावतीने सांगण्यात आले आहे की, “देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे राज्य आहे. संविधानाच्या राज्यात जातिभेदाला मुठमाती देण्यासाठी सर्व भारतीय समाज एकत्रितरित्या काम करत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे राजकारण करून परभणी आणि पर्यायाने महाराष्ट्रात जातीय द्वेष प
नाशिक : ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशा घोषणांनी नाशिकचा ( Nashikkar ) आसमंत दणाणून सोडत हिंदू एकवटल्याचे दिसून आले. निमित्त होते बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील अत्याचाराविरुद्ध काढण्यात आलेल्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रा अर्थात मोर्चाचे. मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी सकाळी शहरातील सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि मानवाधिकार आयोगाला आपले कर्तव्य समजावून सांगण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
ठाणे : ( Thane ) हिंदु समाजाचा हा मुक मोर्चा म्हणजे जागृती आणि एक प्रकारे इशारा आहे. असे सूचक वक्तव्य करून आमदार संजय केळकर यांनी बांग्लादेशात हिंदु समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केला. तर,आ. निरंजन डावखरे यांनी देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे आपण एकत्र राहायला हवे.असे आवाहन केले.
आपल्या अतरंगी कोमेंटरीने लोकांची मनं जिंकणारा नवज्योत सिंह सिद्धू आता चांगलच अडचणीत आला आहे. लिंबू पाणी आणि कच्ची हळद यासारख्या आयुर्वेदिक उपचारांनी कॅन्सर बरा होत असल्याचा दावा केल्यानंतर छत्तीसगढ सिव्हील सोसायटीने सिद्धू दामप्तयाला नोटीस पाठवला आहे.
Kumbhmela: आपल्या हिंदू धर्मात कुंभमेळ्याचं विशेष महत्व आहे. गेल्या अनेक शतकांपासून होणारा कुंभमेळा म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा जागरच आहे. कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होतात. पण कोट्यावधी भाविक ज्या वेळी एकत्र येतात त्यावेळी साहजिकच व्यवस्थापनाची आणि परिसराच्या स्वच्छतेची आव्हानं सुद्धा उभी राहतातच. याच आव्हानांवर मात करण्यासाठी Vishal Tibrewala आणि त्यांची My green society ‘एक थैलू एक थाली’ हा प्रकल्प घेऊन सज्ज आहेत. हा प्रकल्प काय आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत
मुंबई : एकीकडे हिंदुंची मंदिरे ते अगदी सरकारी जमिनींवर दावा करून त्या जमिनी लाटणार्या अन्यायकारी ‘वक्फ बोर्डा’बद्दल ( Waqf Board ) हिंदू समाजातून असंतोष व्यक्त होत आहे. दुसरीकडे पुनर्विकासासाठी पाडलेल्या पुण्यातील एका वस्तीच्या जागेवरच ‘वक्फ बोर्डा’ने दावा केल्याने येथील बेघर कुटुंबांनी आता ‘वक्फ बोर्ड हटाव’चा नारा दिला आहे.
परदेशांतील हिंदू समाज आणि मंदिरांवर होणार्या हल्ल्यांवर फक्त भाजपचे नेतेच टीका करताना का दिसतात? देशातील विरोधी पक्षांकडून या हल्ल्यांचा निषेध कधीच का केला जात नाही? टीव्हीवरील चर्चेत हिंदूंची बाजू फक्त भाजपचेच प्रवक्ते का मांडतात? कारण, विरोधी पक्ष हे सत्तेसाठी केवळ मतांचे राजकारण करीत आहेत. सामान्य हिंदूंच्या आस्था आणि समस्यांशी या पक्षांना काही देणे-घेणे नाही. पॅलेस्टाईनमधील मुस्लीम जनतेचा त्यांना कळवळा येतो. पण, आपल्याच देशात आणि परदेशातही हिंदूंवर अत्याचार झाल्यावर ते मूक गिळून गप्प बसतात. हेच ते मुस्
( Art Carnival )"कला आपल्याला एकाच वेळी स्वतःला शोधण्यास आणि विसर्जित करण्यास अनुमती देते." काळात विलीन झालेल्या फ्रान्सच्या सुप्रसिद्ध लेखकाचे वाक्य आज आठवते. कारण ह्याच दुहेरी अनुभवाचा आनंद लुटण्याकरिता १८ ते २४ ऑक्टोबर सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये कलेची आवड असणाऱ्या लोकांची पावले जगभरातून मुंबईच्या वांद्रे रिक्लेमेशनच्या दिशेने वळणार आहेत.
संघ बढता जा रहा हैं - आज संघ केवळ भारतातील कानाकोपऱ्यात नाही तर भारतबाहेरही आहे. संघाच्या प्रेरणेतून तेथील भारतीय वंशाची लोक 'हिंदू स्वयंसेवक संघ', 'सेवा इंटरनॅशनल', 'विश्व हिंदू परिषद' , 'फ्रेंड्स सोसायटी ऑफ इंडिया' , 'बालगोकुलं' अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्या त्या देशातील गरजेनुसार काम करत आहेत. ५० हून अधिक देशांत हे जाळे विणले गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन संघशाखेबरोबरच आपल्या समाजाला पूरक अशा काही क्षेत्रांत भरीव काम चालू आहे. आजच्याच दिवशी दसऱ्याच्या मुहूर्तावर १९२५ साली स्थापन झालेल्
यंदा १५ ऑगस्टचा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष दिन एकत्र आले. यानिमित्ताने पारशी समाजातील स्वातंत्र्यसैनिक असणार्या काही ठळक व्यक्तींचा परिचय करुन देणारा हा लेख...
विशाळगडाच्या पायथ्याशी ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने महाआरती करण्यात आलेली आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणावर जलदगतीने सुनावणी व्हावी, अशी मागणी यावेळी ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने करण्यात आली आहे. “अतिक्रमण हटवा अन्यथा ‘वक्फ’ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू,” असा इशारा ‘सकल हिंदू समाजा’कडून देण्यात आला आहे.
'द नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंडस ऑफ ट्री'च्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे दि. ७ जुलै रोजी 'वनमहोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या वनमहोत्सवात सकाळी १० ते १२ या वेळेत गोकुळ सुषमा, लिंकिंग रोड एक्स्टेंशन, सांताक्रुझ(पश्चिम) येथे रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. तीन वर्षाहून अधिक कालावधीत वाढ झालेली ही रोपे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मोफत वाटप करण्यात येणार आहेत. त्यात विदेशी फळझाडे आणि फुलांच्या रोपांचा समावेश आहे.
ठाण्याच्या हाजुरी भागात जिहादी उन्मादी जिहांदीवर अखेर वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. सकल हिंदु समाजाचे विजय त्रिपाठी आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी हाजुरीत उन्माद माजवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना साकडे घातले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळा पूर्व तयारीच्या कामांमध्ये महानगरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन ठिकठिकाणी छाटणी देखील केली आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, तसेच वाहनेदेखील झाडांखाली उभी करू नयेत, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.
येत्या २० मे रोजी मुंबई आणि ठाणे लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. अधिकाधिक मतदारानी या प्रक्रियेत सहभागी होत मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक अयोग्य प्रयत्नशील आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व संचालकांनी सोसायटीच्या सभासदांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन १००% मतदान करून घेण्यासाठी हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे यंदादेखील दि. २ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीमध्ये श्री बालाजी मंदिर, गंगापूर रोड, नाशिक येथे पुरोहित प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गाबाबत काही...
बारावीत अनुत्तीर्ण होऊनही, नंतर ‘एलएलबी’च्या शेवटच्या वर्षाला प्रथम क्रमांक पटकाविणार्या, वैयक्तिक संघर्षातून सावरून, इतरांच्या न्यायासाठी झटणार्या, अॅड. जयश्री देवेंद्र यादव यांच्याविषयी...
"द.कोरिया आणि आमच्या देशामध्ये ऐतिहासिक-धार्मिक संबंध आहेत. कोरियामध्ये बौद्ध धर्म आमच्या देशातूनच पोहोचला आहे,” असे कोण म्हणाले असेल असे वाटते? तर हे महाशय म्हणजे पाकिस्तानी राजदूत नबील मुनीर. मुनीर यांना असे म्हणायचे आहे की, द. कोरियामध्ये अतिशय भक्कमरित्या अस्तित्वात असलेला, सियोल बौद्ध धर्म (भारतातून चीनमध्ये आणि पुढे कोरियामध्ये गेलेल्या बौद्ध धर्मामध्ये कोरियन लोकांनी कोरियन संस्कृतीनुसार बदल केला. तोच सियोल बौद्ध धर्म) हा मूळचा पाकिस्तानातून आलेला. कोणे एके काळी पाकिस्तान काय नि अफगाणिस्तान काय, तिथे
'यशस्वी एज्युकेशन सोसायटी'च्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे संस्थेच्या चिंचवड येथील प्रांगणात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
"राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न प्राधान्यांने सोडवण्यासाठी शासन दरबारी जरूर प्रयत्न करू. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक दोन महिन्यातून एकदा गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल आणि सहकार भारतीच्या प्रतिनिधींनासुद्धा आमंत्रित करण्यात येईल," असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी केले.
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्व शालेय ,स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ फेब्रुवारी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे महत्व बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १४ फेब्रुवारी रोजी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सहकार क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या 'सहकार भारती'तर्फे मुंबईत 'हाउसिंग सोसायटी राष्ट्रीय महाअधिवेशन' आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ५ या कालावधीत फाईन आर्टस् कल्चरल सोसायटी, चेंबूर येथे एकदिवसीय अधिवेशन होणार आहे. सहकार भारतीने आपल्या भौगोलिक विस्तारासह यावर्षी निरनिराळ्या सेलमध्ये (प्रकोष्ठ) कार्य करण्याची योजना तयार केली आहे. २०२३-२४ या कालावधीत १२ हून अधिक सेलमध्ये राष्ट्रीय स्तरावर सहकारी बँक, क्रेडिट सोसायटी, पॅकस, स्वयंसहाय्यता समुह यांच्याशी निगडित अधिव
इरफान हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, हिंदू समाज इतिहासाच्या नावे चाललेल्या बदमाशीस उधळून टाकण्यास सज्ज झाला आहे!
जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत पोहोचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल. यासाठी जागा निश्चिती करण्यात आली असून १४० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्राप्त झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील एका कुटुंबाला इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली जात आहे. त्याच्या परिसरात बहुतांश मुस्लिम लोक राहतात. त्यामुळे ते या कुटुंबावर जमीन सोडण्याची किंवा इस्लाम स्वीकारण्याची धमकी देत आहेत. याबाबत पीडितेने सहारनपूर पोलिसांना अर्ज दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूरच्या गंगोह पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडकला गावात वाल्मिकी जातीच्या साधुरामच्या कुटुंबाला या धमक्या येत आहेत. अस्लम, नियाज, एजाज, सोनू, आमिर, कामिल, सलीम आणि काला हे साधुरामच्या कुटुंबाला जमीन खाली करण्यासाठी याबाबत
मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने होत असलेल्या चेंबूर येथील न्यू टिळक नगर रिद्धी-सिद्धी को. ऑप.हौसिंग सोसायटीच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ आज भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडला. 'स्वयंपुनर्विकास' हे माझे स्वप्न असून हौसिंग सोसायट्यांनी स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतःच करावा, अशा प्रकारची भुमिका घेऊन हे अभियान मुंबई शहरात सुरू केल्याचे दरेकर यावेळी म्हणाले.
अमेरिकी समाज हा डेमोक्रॅट्स तसेच रिपब्लिकन या दोघांच्यात विभागलेला. या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर मागील दोन्ही निवडणुकींमध्ये मतांची पळवापळवी केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच बाहेरील राष्ट्रे समाजमाध्यमांच्या माध्यमातून तेथील निवडणुकांची प्रचार धोरणे ठरवतात, असे दिसून आले. यंदाही असे प्रकार घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने...
"भय सापळा आणि मोह सापळा यातून व्यक्ती सुटली तरच समाजसेवेत ती नीडरपणे कार्यरत होऊ शकते. सेवेचा विषय हा भावनेशी निगडित असल्याने अंत:प्रेरणेतून समाजकार्य करण्याची इच्छा असणारेच अशा प्रकारची समाजसेवा करू शकतात.", असे मत इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे (छत्रपती संभाजी नगर) वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे यांनी व्यक्त केले.