राम लावण्यपेटीरामदासांनी रामाचे लावण्यसंपन्न रूप पाहिले नव्हते. रामभेटीची ते उत्कट इच्छा प्रगट करतात. त्या भेटीच्या अगोदरच स्वामी रामरूपाला ’लावण्यपेटी’का म्हणाले असावेत, ही शंका प्रथमदर्शनी योग्य वाटली तरी स्वामींनी तपाचरणापूर्वी रामाला पाहिले नव्हते, हे म्हणणे ..
राम कारुण्यसिंधूश्रीरामाच्या भेटीसाठी, भक्तीसाठी कोट्यवधी जन्मांपासून रामभक्त तळमळत आहे. हृदयातील ही आग शांत करण्यासाठी तुझ्या करुणेला महापूर येऊन त्याचा वर्षाव तुला करावा लागेल. असे झाले तरच ही मनातील तळमळ शांत होईल. तू तर ’कारुण्यसिंधू’ म्हणजे करुणेचा महासागर ..
अचल भजनलीलाआता माझे मन फक्त तुझी अविरत भक्ती करू दे, अशी आस माझ्या मनाला लागली आहे. यासाठी मी माझ्या मनावर सक्ती करीत नाही. तुझी भक्ती, तुझे भजन-पूजन सहज लीलेने घडावे, अशी माझ्या मनीची इच्छा आहे. यासाठी समर्थ म्हणताहेत की, ’अचल भजनलीला लागली आस तुझी’. मी तनमनधन ..
‘रघुपति मति माझीआपुलीशी करावी’देहबुद्धीच्या ओढीने जीवाला प्रपंचात अनेक ऐहिक आकर्षणे आपणाकडे खेचत असतात. माणसे मरणाधीन आहेत, पैसा स्थिर राहात नाही, हे तो स्वार्थांध विसरतो. त्यामुळे अंतिमतः स्वार्थमूलक घटनांचे पर्यवसान दुःखात होते याची जीवाला प्रचीती येते. प्रांजळपणा व भक्ती ..
सुटो ब्रीद आम्हांसी सांडूनी जातापरमेश्वर अत्यंत दयाळू असल्याने तो भक्ताचे पूर्वायुष्य पाहात नाही. भक्ताची भक्ती, प्रेम, शरणागत अवस्था पाहून तो भक्तावर कृपा करतो. भेदभाव न करता भगवंत भक्ताला उद्धाराची संधी देत असतो. शरणागत भक्ताचा उद्धार करणे हे परमेश्वराचे ब्रीद असते, तशी त्याची ..
कृपासागरे सर्व चिंता हरावीसंत रामदासांच्या काळात सामाजिक परिस्थिती भयावह होती. तसेच सत्ता परकीयांच्या हातात गेल्याने हिंदू समाजाला न्यायाची अपेक्षा करता येत नव्हती. हिंदू संस्कृती, सभ्यता, नीतिमत्ता टिकते की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अंत:करण भीतीने ..
नभासारिखे रूप या राघवाचे।देवाविषयी करुणा, उत्कटता, तळमळ, अनुताप, वैराग्य इत्यादी आत्मनिष्ठ भावनांच्या आविष्कारामुळे रामदासस्वामींनी लिहिलेल्या ‘करुणाष्टकां’ना भावपूर्ण करुण आत्मशोधक काव्यात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. ‘करुणाष्टकां’ची संख्या पुष्कळ आहे; तथापि त्यातील ..
धांव पंचानना रे!रामभेटीवाचून होणारी व्यथा सहन न होऊन भक्त रामालाच अत्यंत तळमळीने आतुरतेने विनवणी करीत आहे की, रामराया तू आता सिंहाप्रमाणे झेप घेऊन वेगाने धावत ये व मला या वासनांपासून सोडव, नाहीतर या वासना मला तुझ्यापासून दूर नेतील. रामराया धावून येईल यावर भक्ताचा ..
क्षणाक्षणाला निसटून जाणारा निश्चयअनुदिनी अनुतापे या करुणाष्टकातील मागील श्लोक क्रमांक 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे भक्ताच्या मनात अचल भजनभक्तीची आकांक्षा उत्पन्न झाली, पण त्या मार्गातील अडचणी आता समोर येत आहेत. भजनमार्गातील ते अडथळे भक्ताने या श्लोकात मांडले आहेत. ..
रघुनाथाशिवाय सर्व व्यर्थ आहेविषयजनित सुखांच्या मागे धावल्याने कोणीही सुखी होणार नाही. शाश्वत रामाच्या ठिकाणी जो श्रद्धा ठेवून त्याची भक्ती करतो, त्याचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन तो सुखीसमाधानी होतो. याव्यतिरिक्त अशाश्वत गोष्टींच्या मागे धावत राहिल्याने कसलाच लाभ होत नाही, ..
अनुदिनी अनुतापें...समर्थांनी लिहिलेल्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘करुणाष्टकां’चा परिचय आपण या लेखापासून करून घेणार आहोत. त्यावर चर्चा करताना भक्ताच्या अंत:करणातील सच्चेपणा, प्रेमाची आर्तता यांचा प्रत्यय येईल आणि समर्थांच्या प्रभावी वाणींचा अनुभव घेता येईल. ..
समर्थापुढे काय मागो कळेनाप्रभू श्रीराम सर्व सामर्थ्यवान असल्यामुळे त्याला या जगातील अशाश्वत वस्तू मागितल्या तर त्या नाशवंत असल्याने आपले मागणे फुकट जाईल. त्याचप्रमाणे आपली मागायची संधीही त्याद्वारा व्यर्थ गमावली जाईल, या विवेकपूर्ण विचाराने भक्ताचे मन संभ्रमित होते व त्याला ..
देवाच्या सख्यत्वासाठी। सर्व अर्पावें सेवटीं॥‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ हा अतिशय लोकप्रिय श्लोक आहे. देवासाठी भक्त सर्व काही प्राण पणाला लावून देवाची भक्ती करीत असतो. ‘दासबोधा’त समर्थांनी या विचाराचा पाठपुरावा केला आहे. देवाच्या सख्यत्वासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा विचार ‘दासबोधा’त आला आहे. ..