संघाने पंधराव्या वर्षात पदार्पण केले आहे. दक्षिण भारतात संघकार्यासाठी श्री. जनार्दन चिंचाळकर यांना डॉक्टरांनी पाठवले आहे. श्री. बाबूराव मोरे अहिल्यानगर(अहमदनगर)ला कार्यरत आहेत, संघकार्याची जडणघडण करताना पैशाची उणीव, संघविरोधी शक्तींचा सामना आणि साम्यवादी विचारसरणीने प्रभावित होऊन स्वयंप्रेरणेने भारताबाहेर गेलेले वरिष्ठ सहकारी श्री. बाळाजी हुद्दार यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त झालेली डॉ. हेडगेवारांची आत्मीयता - सलगी देणे समजून घेऊ या.