अशा माणसाला बळ देण्याचा वेडेपणा उबाठा गटाने करू नये. विटंबनेला विडंबन समजण्याची घोडचूक आधीच गळती लागलेल्या पक्षाला कायमची मूठमाती देऊ शकते याचे भान ठेवावे.
‘स्टँड अप कॉमेडी’च्या नावाखाली विचारदारिद्य्राचे प्रदर्शन मांडणार्या आणि विडंबनाच्या नावाखाली विटंबनेचा उद्योग आरंभलेल्या कुणाल कामरा याच्या आक्षेपार्ह वर्तनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचे नाव घेऊन निषेध करतो.
या निषेधाला अगदी ताजा संदर्भ आहे तो, ‘हम होंगे कामयाब’ या गीतावर आधारित त्याने केलेल्या विडंबन गीताचा. या गीतातून, हा देश कसा कंगाल होऊ घातलाय, कसे अराजकाचे वातावरण आहे असे बेछूट, बिनबुडाचे आरोप करत त्याने विद्यमान सरकारवर तोंडसुख घेतले आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही आक्षेपार्ह टीका केली आहे. दर्जेदार विडंबनात सारासार विचार व औचित्यविवेक अपेक्षित असतो. इथे तर दर्जाशीच काडीमोड घेतलेला असल्याने अशी अपेक्षा करणेच व्यर्थ. स्वत:ला कॉमेडियन(?) म्हणवून घेणार्या या अत्यंत सुमार दर्जाच्या व्यक्तीकडे एरव्ही दुर्लक्ष केले असते. पण विनोदाच्या नावाखाली काँग्रेेसी गवतासारखी भसाभस वाढणारी ही विकृती आहे हे लक्षात आल्याने त्याची दखल घेणे आणि स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवणे भाग आहे.
We shall overcome हे अमेरिकेतील निग्रोंच्या चळवळीला बळ देणारे गीत, जे निग्रोंचे स्वातंत्र्यगीत म्हणून ओळखले जाते.
हिंंदीतील सुप्रसिद्ध ‘हम होंगे कामयाब’हे गीत त्याचाच भावानुवाद आहे.
We shall overcome, We shall Overcome
We shall overcome someday:
Oh, deep in my heart, I do believe,
We shall overcome someday
त्या गीताच्या पहिल्या चार ओळी जरी वाचल्या तरी ही बाब लक्षात येईल. सुप्रसिद्ध हिंदी कवी-गीतकार, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित गिरिजाकुमार माथूर यांनी We shall overcome या सुप्रसिद्ध इंग्रजी गीताचा तितकाच प्रभावी, राष्ट्रप्रेम जागविणारा प्रेरक भावानुवाद केला. त्यामुळेच राष्ट्र सेवा दलासारख्या सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये, त्यांच्या नित्य एकत्रिकरणामध्ये या गीताचा आवर्जून अंतर्भाव केलेला असे. आकाशवाणीवरून दीर्घकाळ नियमितपणे प्रसारित झालेल्या या गीताविषयी भारतीयांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान आहे.
‘हम होंगे कामयाब’हे गीत विडंबनासाठी निवडून कामराने सर्वसामान्य भारतीयांच्या भावनांचा अवमान केला आहे. या गीतावरून एखाद्याला विडंबन गीत लिहिण्याची प्रेरणा मिळते(की त्यासाठी चिथावणी दिली जाते?) हेच मुळात अतिशय खेदजनक, संतापजनक आहे. असे गीत विडंबनासाठी निवडून कामराने सर्वसामान्य भारतीयांच्या भावनांचा अवमान केला आहे. या गीतावरून एखाद्याला विडंबन गीत लिहिण्याची प्रेरणा मिळते(की त्यासाठी चिथावणी दिली जाते?) हेच मुळात अतिशय खेदजनक, संतापजनक आहे. त्यातच, या तथाकथित कॉमेडियनने अगदी अलीकडेच एका व्हिडीओतून आपला वकूब आणि पातळी दाखवून दिल्याचे उदाहरण ताजे असतानाच ‘हम होंगे कामयाब’चे विडंबन प्रसारित करण्याचा उद्दामपणा केला आहे. याला राजकीय व्यंग म्हणत त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. या माध्यमातून अराजक नरेटिव्ह पसरविण्याचा कामराचा डाव या आधीही दिसून आला आहे. तेव्हा त्याच्या अभिव्यक्तीची पातळी आणखी खालावण्याची वाट न पाहता त्याचा जाहीर निषेध सर्व स्तरांतून व्हायला हवा.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करणार्या समाजमाध्यमांमधील महाभागांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. हे धाडस कामरामध्ये कसे आणि कोणामुळे आले? आदल्या दिवशी त्याने प्रसारित केलेल्या व्हिडिओला डोक्यावर घेणार्यांमुळे ते आले का? राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तीवर प्रच्छन्न टीका करणारा त्याचा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर एकनाथ शिंदेंच्या म्हणजे मूळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. त्यांनी केलेल्या तोडफोडीचे समर्थन आम्ही अजिबात करत नसलो तरी कामराच्या शो साठी जुहूमधील एक हॉटेल उद्धव गटाने आरक्षित केले होते अशी माहिती पुढे येते आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी त्या तोडफोडीनंतर समाजमाध्यमांवरून दिलेली प्रतिक्रियाही आक्षेपार्ह आणि संशयाला बळ देणारी आहे. ‘मी तर व्यक्तीचे नावही घेतले नाही’ असे निर्लज्जपणे म्हणत (आणि समोरच्यांना निर्बुद्ध समजत) कामरा खिजवत राहिला. त्याला दुजोरा देणार्या अनेकांनी, ‘त्याने व्यक्तीचे नावही घेतले नाही मग एवढे लागण्याचे कारण काय?’, असे विचारत सत्ताधार्यांना डिवचण्याची आपली कंड शमवून घेतली. त्याने नाव जर घेतले नाही तर मग तुम्ही त्याला डोक्यावर का म्हणून घेतले आणि नाव घेतलेले नसतानाही त्याच्या समोर बसवण्यात आलेले प्रेक्षक का खदाखदा हसत होते, याचे पटण्याजोगे उत्तर या मंडळींकडे आहे काय?
व्हिडीओ प्रसारित झाल्यावर एकनाथ शिंदेंच्या म्हणजे मूळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. त्यांनी केलेल्या तोडफोडीचे समर्थन आम्ही अजिबात करत नसलो तरी कामराच्या शो साठी जुहूमधील एक हॉटेल उद्धव गटाने आरक्षित केले होते अशी माहिती पुढे येते आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी त्या तोडफोडीनंतर समाजमाध्यमांवरून दिलेली प्रतिक्रियाही आक्षेपार्ह आणि संशयाला बळ देणारी आहे.
त्या व्हिडीओचे समर्थन करणारे उबाठाचे नेते आणि त्यांचे हुजरे नंतरच्या विडंबन गीतालाही टाळ्या पिटणार आहेत का? डोक्यावर घेणार आहेत का? तसे होणार असेल तर हे प्रकरण अजिबातच दुर्लक्षण्याजोगे नाही. सलग तिसर्यांदा सत्तेत असलेले केंद्रातले सरकार आणि राज्यातले सरकारही यांच्यासहित अनेकांच्या डोळ्यात कसे सलते आहे याचे या घटना द्योतक आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या कामराने आजवर अनेकदा समाजमाध्यमातून भाजपा, संघ, केंद्र सरकारवर अतिशय आक्षेपार्ह टीका केलेली आहे. केवळ उपमुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती हे त्याचे लक्ष्य नाही तर या नथीतून त्याचा तीर मुख्यमंत्र्यांवर रोखलेला आहे. आणि हा खेळ कुणाल कामरा ही एकच व्यक्ती खेळत नसून त्याच्यामागे अनेक देशविघातक शक्ती उभ्या आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे. तसे नसते तर त्याने,‘मी हेच गीत एलफिन्स्टन ब्रिजवर उभा राहून गाईन’ असे म्हणण्याची हिंमत केली नसती.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला खणखणीत बहुमत मिळाले आणि 1 डिसेंबरला युतीचे सरकार सत्तेवर आले. उबाठाचा पक्ष आणि थोरल्या पवारांचा राष्ट्रवादी यांना इथल्या मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. निवडणुकीतील ही हार त्यांच्या इतकी जिव्हारी लागली की त्यांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे, कोणालाही बरोबर घेऊन कुरापती काढणे चालूच आहे. या बी ग्रेडी कॉमेडियनच्या वळचणीला जाण्यासाठी त्यांनी मुहूर्त निवडला तो राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आणि दिशा सालियन प्रकरणाने पुन्हा डोके वर काढल्याचा. या सगळ्या घटनांचा परस्परांशी काही संबंधच नाही असे समजणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणे आहे.
अशा माणसाला बळ देण्याचा वेडेपणा उबाठा गटाने करू नये. विटंबनेला विडंबन समजण्याची घोडचूक आधीच गळती लागलेल्या पक्षाला कायमची मूठमाती देऊ शकते याचे भान ठेवावे.