तत्त्वनिष्ठ तत्त्ववादी

विवेक मराठी    22-Mar-2025
Total Views |

rss
ज्येष्ठ संघप्रचारक, विश्व विभाग प्रमुख डॉ. शंकरराव तत्त्ववादी यांचे नुकतेच निधन झाले. अनेक देशातील त्यांच्या कार्यामुळे, आज हिंदू स्वयंसेवक संघ 50हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे. काही कार्यक्रम विश्व विभागासाठी मैलाचे दगड सिद्ध झाले. विश्व विभाग संयोजक सौमित्र, विश्व विभाग सह-संयोजक डॉ. राम वैद्य आणि विश्व विभाग सह-संयोजक अनिल वर्तक यांनी शंकररावजी सोबतच्या आठवणींना उजाळा प्रस्तुत लेखातून दिला आहे.
डॉ. शंकरजी तत्त्ववादी यांचे 13 मार्च 2025 रोजी निधन झाले. हिंदू धर्मासाठी समर्पित अशा त्यांच्या जीवनाची 93 वर्षे पूर्ण होण्याच्या फक्त एक आठवडा आधी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
 
 
20 मार्च 2008 ची सकाळ होती. स्थळ होतं केशव कुंज, झंडेवाला दिल्ली येथील संघ कार्यालय. गुरुवार असल्याने सकाळच्या शाखेत विविध क्षेत्रांचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. शंकररावजी दिल्लीत असल्याने ते ही उपस्थित होते. 20 मार्च हा त्यांचा वाढदिवस आहे हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ’जीवेत् शरदः शतम...’ हा श्लोक जेव्हा कोणीतरी म्हटला, तेव्हा शंकररावांना संकोचल्यासारखे झाले. त्यांचे ते परिचित स्मितहास्य करत ते म्हणाले की, ‘मला 100 वर्षे माहीत नाहीत किंवा मला 100 वर्षे जगण्याची इच्छाही नाही. मी फक्त मंत्राच्या नंतरच्या भागात असलेली प्रार्थना म्हणतो - अदीनशयम शरदः शतम’ म्हणजे कोणावरही अवलंबून न राहता शंभर वर्षे जगण्याची प्रार्थना करतो.....
 
 
गेल्या वर्षापर्यंत त्यांची तब्येत चांगली होती आणि सर्वांना वाटत होते की, ते शंभरावा शरद ऋतू नक्की पाहतील. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. देवाने त्यांना जवळजवळ शेवटच्या दिवसांपर्यंत उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य दिले. म्हणजे देवाने त्यांची प्रार्थना स्वीकार केली होती, असे म्हणायला हरकत नाही.
 
 
1960 पासून ते विश्वविभागाशी संबंधित होते आणि सुमारे 20 वर्षे त्यांनी ‘विश्व विभागा’चे प्रमुख पद भूषविले. ते ‘विश्व विभागा’चे जणू एन्सायक्लोपिडिया होते. त्यांना कार्यक्रम, व्यक्तिमत्त्वे, तारखा यांचे बारीक-सारीक तपशीलही तोंडपाठ होते. त्यांचे तपशीलवार वर्णन करायला त्यांना आवडायचे. त्यांनी वर्षानुवर्षाच्या डायर्‍या काळजीपूर्वक जपून ठेवल्या होत्या. त्या डायर्‍या म्हणजे त्यांच्या प्रवासाचा तसेच एचएसएस आणि इतर उपक्रमांचा खजिना आहे.
 
 
शंकरजी जवळजवळ 18 वर्षे ‘विश्व विभाग संयोजक’ होते. अनेक देशातील त्यांच्या कार्यामुळे, आज हिंदू स्वयंसेवक संघ 50हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे. काही कार्यक्रम विश्व विभागासाठी मैलाचे दगड सिद्ध झाले. विश्व संघ शिबिर आणि विश्व संघ शिक्षा वर्ग त्यापैकीच आहेत. 1995 ते 2010 पर्यंत शंकरजींनी या सर्व कार्यक्रमांचे नेतृत्व केले. आज, जागतिक पातळीवर संघाने मानवतेला धर्माच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी एक भक्कम स्थान प्राप्त केले आहे. जगात धर्म आधारित संस्कृती उभारण्यात शंकरजींचे योगदान म्हणजे आधारस्तंभ आहे.
 
 
जिथे अगदी एकच हिंदू राहत असेल अशा ठिकाणी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा शंकरजींनी प्रयत्न केला. त्यांनी 60हून अधिक देशांमध्ये प्रवास केला आणि सर्व संपर्क कायम ठेवले. त्यांना संपर्क, बैठकांचे इतिवृत्त, टिप्पण्या आणि प्रवास कार्यक्रम एका लहान लाल डायरीत लिहून ठेवण्याची सवय होती. आजही या सर्व नोंदी भविष्यातील संदर्भासाठी व्यवस्थित जतन करून ठेवलेल्या आहेत.
 
 
विविध देशांच्या प्रवासादरम्यान, शंकरजी नेहमीच विविध लोकांना सोबत घेऊन जात असत. कार्यकर्त्यांचे नातेवाईक, त्यांचे माजी विद्यार्थी, विद्यापीठातील प्राध्यापक इत्यादी, कोणीतरी कायम त्यांच्या सोबत असत. ते कायम त्यांच्याशी संपर्क ठेवत असत आणि शक्य असल्यास त्यांना भेटायला जात. त्यांचे माजी विद्यार्थी, जे त्यावेळी आपापल्या क्षेत्रात मोठ्या पदावर गेलेले असत, ते त्यांना भेटण्यासाठी अनेकदा लांब अंतरावरही जात असत.
 
 डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांनी लिहिलेली आणि 1963 मध्ये सुरू झालेली ‘विश्व प्रार्थना’, त्यात काही बदलांची आवश्यकता होती. संघ अधिकार्‍यांनी काही बदल सुचवले. शंकरजी डॉ. वर्णेकर यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांच्याकडून प्रार्थनेत योग्य ते बदल करून घेतले. एक नवीन श्लोक त्यात जोडण्यात आला आणि नवी प्रार्थना 2000 मध्ये सुरू करण्यात आली, जी आजही सुरू आहे.
 
संघ ही एक अद्वितीय संघटना आहे. ध्येय आणि कार्यपद्धतीशी कोणतीही तडजोड न करता नवीन कल्पना, सर्जनशीलता आणि कार्यपद्धतीत आवश्यक बदल करण्यास नेहमीच इथे वाव असतो. डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांनी लिहिलेली आणि 1963 मध्ये सुरू झालेली ‘विश्व प्रार्थना’, त्यात काही बदलांची आवश्यकता होती. संघ अधिकार्‍यांनी काही बदल सुचवले. शंकरजी डॉ. वर्णेकर यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांच्याकडून प्रार्थनेत योग्य ते बदल करून घेतले. एक नवीन श्लोक त्यात जोडण्यात आला आणि नवी प्रार्थना 2000 मध्ये सुरू करण्यात आली, जी आजही सुरू आहे.
 
 
त्याचप्रमाणे, हिंदू धर्माच्या वैश्विक मूल्यांना आणि आपल्या संघटना शास्त्राच्या एकूणच संकल्पनेला व्यक्त करण्यासाठी एखादा स्तोत्र तयार करण्याची आवश्यकता भासू लागली. शंकरजींनी पुन्हा एकदा संघ अधिकार्‍यांकडून सूचना एकत्रित केल्या आणि ’ईश चिंतन’ प्रत्यक्षात आले, जे जगभरातील सर्व शाखा, शिबिर आणि संघ शिक्षा वर्गात म्हटले जाते. शंकरजींनी संरचनेतील बदलासाठी कोणताही संकोच केला नाही, परंतु ते संघाच्या ध्येयावर ठाम होते.
 
 
शंकरजींचे बाह्य रूप कोमल होते. मात्र ते आपल्या नित्य शिस्तीबद्दल अगदी ठाम होते. ते म्हणत असत की, माणसाने इतरांसाठी कोमल आणि स्वतःसाठी कठोर असले पाहिजे. सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा संध्या वंदन करण्याचा त्यांचा नेम होता. संध्या वंदनापूर्वी ते अन्न सेवन करत नसत. एकदा ते संध्याकाळी उशिरापर्यंत प्रवासावर होते आणि रात्रीचे जेवण करू शकले नाही. रात्री 10.30 नंतर जेवणासाठी ते एका कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले. तेथेही त्यांनी रात्रीचे जेवण करण्यापूर्वी संध्या वंदन केले. त्यांच्या प्रदीर्घ प्रवासात ते काही करून संध्या वंदन करण्यासाठी वेळ आणि जागा शोधून घेत. ही कडक शिस्त त्यांनी स्वत:वर लावून घेतली होती. एकदा, एका प्रचारकाने जेव्हा त्यांना संध्या वंदन करावे का असे विचारले तेव्हा शंकरजींनी सांगितले की ते आवश्यक नाही. हा माझा दिनक्रम आहे. आपले संघकार्य म्हणजे ईश्वराची पूजा होय. त्यामुळे त्यांनी आपली दिनचर्या कोणावरही लादली नाही. तशाच प्रकारे शब्दापेक्षा ते त्यांच्या आचरणाने, जीवनात शिस्तबद्ध राहण्याची प्रेरणा देत.
 
कडक शिस्त त्यांनी स्वत:वर लावून घेतली होती. एकदा, एका प्रचारकाने जेव्हा त्यांना संध्या वंदन करावे का असे विचारले तेव्हा शंकरजींनी सांगितले की ते आवश्यक नाही. हा माझा दिनक्रम आहे. आपले संघकार्य म्हणजे ईश्वराची पूजा होय. त्यामुळे त्यांनी आपली दिनचर्या कोणावरही लादली नाही. तशाच प्रकारे शब्दापेक्षा ते त्यांच्या आचरणाने, जीवनात शिस्तबद्ध राहण्याची प्रेरणा देत. 
 
1995 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या विश्व संघ शिबिरादरम्यान एक स्मरणिका प्रकाशित करण्याची योजना होती. ’हिंदू धर्मो विजयताम’ या शिबिराच्या संकल्पनेवर एक चित्र डिझाइन करण्याची जबाबदारी एका कलाकारावर सोपवण्यात आली. भगवान श्रीकृष्ण शंख वाजवत असल्याचे चित्र काढण्याचे ठरविण्यात आले. कलाकाराने एक चित्र तयार केले. संघाच्या निर्णयप्रक्रियेचा भाग असलेल्या शंकरजींनी कलाकाराला श्रीकृष्णाचे संपूर्ण व्यक्तिमत्व कसे साकारायचे ते समजावून सांगितले. त्यानुसार, कलाकाराने एक नवीन चित्र तयार केले. तरी ही शंकरजी पूर्णपणे समाधानी नव्हते. पुरुषार्थी श्रीकृष्णाचे अचूक व्यक्तिमत्व साकार होईपर्यंत त्यांनी कलाकाराचा पाठपुरावा केला. शेवटी शंकरजी चित्रावर खूप समाधानी झाले. ते चित्र नंतर खूप प्रसिद्ध झाले. हे श्रीकृष्णाचे चित्र असलेले अनेक पार्श्वभूमी आणि डिझाइन तयार केल्या जातात. शंकरजी या घटनेचा अनेक वेळा उल्लेख करत. पात्राच्या स्वरूपाची कल्पना करणे, नंतर ते कलाकाराला शब्दशः सांगणे आणि मग ते प्रत्यक्ष चित्राच्या स्वरूपात प्रकट करणे, ही एक कला आहे. शंकरजी या कलेत निष्णात होते.
 
 
शंकरजी हे बीएचयूमध्ये प्राध्यापक आणि फार्मसी विभागाचे प्रमुख होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बीएचयू) संस्थापक मदनमोहनजी मालवीय यांच्याबद्दल त्यांना खूप आदर होता. शंकरजी बीएचयूच्या माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कमध्येही सक्रिय होते. 2011 मध्ये, मालवीयजींची 150 वी जयंती संपूर्ण भारतात साजरी करण्यात आली. शंकरजींना ही जयंती लंडनमध्ये साजरी करण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रतिष्ठित नेहरू सेंटरमध्ये हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. भारताच्या अशा महान सुपुत्राबद्दल शंकरजींच्या मनात कृतज्ञतेची भावना होती.
 
 
शंकरजी हे बीएचयूचे एक लोकप्रिय प्राध्यापक होते आणि विद्यार्थ्यांबद्दलचे त्यांचे प्रेम आणि विद्यार्थ्यांचे त्यांच्यावरील प्रेम अनेक दशकांनंतरही त्यांच्या भेटीतून दिसून येत असे. त्यांना असंख्य विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे बॅचमेट आणि अभ्यासाचे वर्षही आठवत असे. त्यांना केवळ त्यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांचीच नव्हे तर इतर विभागातील विद्यार्थी आणि अर्थातच बीएचयूमधील संघशाखेशी संबंधित विद्यार्थ्यांचीही चांगली आठवण होती. ते जिथे जिथे प्रवास करायचे तिथे विद्यार्थ्यांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा ते नेहमीच प्रयत्न करायचे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, प्रशासकीय आणि सरकारमध्ये वरिष्ठ पदे मिळवली आणि शंकरराव शक्य असेल तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधण्यास चुकत नसत.
 
 
जुलै 2005 मध्ये, त्यांच्या विद्यार्थ्यांनी शंकरजींच्या सन्मानार्थ न्यूयॉर्कमध्ये एका मेळाव्याचे आयोजन केले होते. विश्व विभाग संयोजक सौमित्र गोखले यांना शंकररावांना शिक्षक म्हणून त्यांना मिळत असलेला मान पाहण्याचे भाग्य लाभले. त्या संध्याकाळी अनेक औषध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ त्यांच्या कुटुंबियांसोबत जमले होते. त्यांनी त्यांच्या बीएचयूमधील दिवसांच्या गोड आठवणी सांगितल्या. भेटवस्तू देण्यापूर्वी त्या प्रत्येकाने शंकरजींचे खूप कौतुक केले. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान आणि नम्रता स्पष्ट दिसून येत होती.
 
 
शंकरजींची शिकवण्याची पद्धत खूप छान होती. शंकरजी एखादी संकल्पना समजावून सांगण्याची सोपी पद्धत वापरत असत. मुख्य तत्त्वे लक्षात ठेवण्यासाठी ते अनेकदा आकर्षक वाक्ये वापरत असत. एकदा, कॅरिबियनमधील प्रवासादरम्यान, त्यांना एका अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला भेटायचे होते. त्यांना वाटत होते की ते संघाच्या जवळ येऊ शकतील. त्यांनी त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती मागितली.
 
 
त्याच्यासोबत कोण असावे, त्यांनी कसे कपडे घालावेत, कोणता मजकूर सादर करावा आणि नेमके कधी पोहोचावे याबद्दल ते बारकाईने काळजी घेत असत. गाडीत असताना, त्यांनी संपर्कासाठी मार्गदर्शक तत्त्व असलेले एक वाक्य उच्चारले. लक्षात ठेवा, ते म्हणाले, ‘पहिली छाप पाडण्यासाठी दुसरी संधी तुम्हाला कधीच मिळत नाही.’
 
 
अमेरिकेतील संघ शिक्षा वर्गादरम्यान, अनेक कार्यकर्त्यांनी आचार पद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यांचे म्हणणे होते की एसएसव्हीमध्ये शाखा सुरू करण्याची आणि समाप्त करण्याची आचार पद्धती शिकत असताना, व्यावहारिक अडचणी येतात. जसे की शाखा स्थळावरील जागेची मर्यादा यामुळे सर्व काही अक्षरशः पाळणे कठीण असते. अशा परिस्थितीत आचार पद्धती कशी अनुसरावी असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
 
शंकरजींनी ते तीन सोप्या शब्दांत स्पष्ट केले-मानक, औचित्य आणि पावित्र्य.
 
 
ते म्हणाले, ‘जर परिस्थिती आदर्श असेल, तर कोणत्याही बदलाशिवाय मानकांचे पालन करा. जर काही मर्यादांमुळे बदल आवश्यक असतील, तर काय योग्य आणि स्वीकार्य आहे याचा विचार करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणतेही बदल करताना, भगव्या ध्वजाचे पावित्र्य राखले जाईल याची खात्री करा.’
 
 
त्यांच्या या उत्तराने कार्यकर्त्यांचे समाधान तर झालेच, तसेच त्यांना आचारपद्धती प्रभावीपणे राबविण्यासाठीचे छान सूत्रही मिळाले.
विश्व विभाग सह-संयोजक डॉ. राम वैद्य, यांनी त्यांच्यासोबत 13 वर्षे घालवली. ते एकत्र राहिले, प्रवास केला, गप्पा मारल्या आणि अनेक क्षण एकत्र अनुभवले. जेव्हा रामजी जॉन हायडर यांचे ’ताओ ऑफ लीडरशिप’ नावाचे नेतृत्वावरील पुस्तक वाचत होते, तेव्हा शंकरजी यांनी एका बुद्धिमान नेत्याच्या दोन प्रमुख गुणांचा उल्लेख केला. हुशार नेता गोष्टी घडवून आणण्यासाठी दबाव आणत नाही, तर तो सर्व प्रक्रिया स्वतःहून उलगडू देतो. रामजी पहिल्यांदाच पूर्व आफ्रिकन देशांमध्ये जात असताना चिंताग्रस्त होते. शंकरजीदेखील भारताच्या प्रवासाला निघणार होते. रामजी विमानतळावर शंकरजींना भेटले. आफ्रिकेबद्दल त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी रामजींना खूप कमी वेळ मिळाला. शंकरजींनी थोडक्यात सांगितले,‘तुम्ही जा. तुम्ही अनेक लोकांना भेटा. तुम्हाला समाजाचे काम, आव्हाने आणि गरजा आपोआप समजतील आणि मग तुम्ही काम करू शकाल.’ त्यांनी कार्यकर्त्यांबद्दल, आधी केलेल्या कामाबद्दल किंवा त्यांच्या कल्पनांबद्दल त्यांचे मत अजिबात सांगितले नाही. त्यांच्या उत्तरामुळे रामजींची चिंता कमी झाली आणि ते पूर्व आफ्रिकेतील स्थानिक कार्यकत्यांसोबत काम करण्यात अधिक सर्जनशील झाले.
 
शंकरजी संघ विचारसरणी, शिष्टाचार आणि वैयक्तिक शिस्तीबद्दल कठोर, आणि कधीकधी अतिआग्रही होते. त्यांची अभिव्यक्ती नम्र होती परंतु त्यांच्यात दृढ विश्वास होता. त्या अर्थाने त्यांना ’आधुनिक ऋषी’ म्हणता येईल.’ 
 
विश्व विभाग सह-संयोजक अनिल वर्तक, यांना विश्व विभागात शंकरजींचा भरपूर सहवास लाभला. अनिलजींना नेहमीच त्यांच्या सकारात्मक आणि मानवीय वृत्तीबद्दल आश्चर्य वाटत असे. ते सांगतात, ‘शंकरजी कोणाबद्दलही काही अप्रिय बोलल्याचे मला आठवत नाही, अगदी विनोदानेही नाही. त्याच वेळी शंकरजी संघ विचारसरणी, शिष्टाचार आणि वैयक्तिक शिस्तीबद्दल कठोर, आणि कधीकधी अतिआग्रही होते. त्यांची अभिव्यक्ती नम्र होती परंतु त्यांच्यात दृढ विश्वास होता. त्या अर्थाने त्यांना ’आधुनिक ऋषी’ म्हणता येईल.’
 
 
2011 मध्ये अनिलजी जेव्हा युकेला गेले तेव्हा शंकरराव त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांच्या घरी आणि इतर ठिकाणी गेले. त्यांना युकेमध्ये एचएसएसच्या कामाचा पाया रचणार्‍या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांना भेटायचे होते. वाढत्या वयामुळे आणि जवळ कोणीही नसल्याने, ते वृद्ध जोडपे कठीण परिस्थितीत होते. शंकरराव त्यांच्या परिस्थितीबद्दल काळजीत होते. ते दिवसभर त्याबद्दल बोलत होते. त्यांनी त्यांच्यासोबत आणलेले जेवण त्यांना देऊ केले. त्यांना माहीत होते की, कुटुंबाला ते आवडणार नाही पण त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्यासाठी ते प्रयत्नशील होते.
 
 
पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या अमेरिकेच्या भेटीची आणि त्यांनी ऑस्टिन विद्यापीठात त्यांचे व्याख्यान कसे आयोजित केले आणि दीनदयाळजी यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अमेरिकन प्राध्यापकांना कसे प्रभावित केले याची आठवण ते नेहमी सांगत. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘ऑर्गनायझर विकली’मध्ये याच भेटीचे महत्त्व आणि परिणाम स्पष्टपणे वर्णन करणारा एक लेख लिहिला होता. त्यावेळी, 1960 च्या दशकात जेव्हा भारतीय जनसंघ आणि पंडित दीनदयालजी अमेरिकेसाठी अनोळखी होते.
बीएचयूमधील फार्मसी विभागात प्राध्यापक असल्याने त्यांना विज्ञान भारतीच्या कामाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा ते शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक समुदायाशी सहजपणे जोडले गेले आणि त्यांनी ते कामही विश्व विभागाप्रमाणेच प्रचंड उत्साह, आवड आणि परिश्रमाने केले.
 
 
शंकरजींना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची खूप चांगली जाण होती. ते स्वतः एक उत्तम गायक होते. रात्रीच्या कार्यक्रमात वर्ग/शिबिरांमध्ये, विनंती केल्यावर, शंकरजी मम प्राण सम रमणीय रामा हे गाणे शुद्ध भक्तीने भरलेल्या अतिशय सुमधुर स्वरात म्हणायचे.
 
 
’विश्व मंगल साधना के हम हैं मौन पुजारी’ या गीतातील अभिव्यक्तीचे शंकरजी खरे मूर्त रूप होते.
 
संकलन - संतोष पिल्लई, विश्व विभाग कार्यालय प्रमुख