कुशल संघटक डॉ. हेडगेवारांनी संघस्थापनेनंतर कार्यविस्तार करताना त्यांची तरुणांना जोडण्याची शैली, वर्धा येथील उत्साहवर्धक अनुभव, स्नेहादरयुक्त पत्राचा मायना (त्या काळी वरिष्ठांना ‘राजमान्य राजश्री’ संबोधन वापरले जात असे, तसा उल्लेख रा. आपाजींसाठी केलेला आढळतो.), संघासाठी धनसंग्रह, नागपूरच्या कार्यासंबंधी तळमळ व्यक्त झालेली पत्रे येथे नमूद करीत आहे.