बांगलादेशातील अंतर्गत राजकारणात हिंदूंचाच बळी

09 Dec 2024 14:01:13


Bangladesh violence
 2010 मधील अहवालात कागदपत्रासह नमूद केले आहे की, हिंदू व पारंपरिक अल्पसंख्याकांवरील दडपशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष अवामी लीगमधील सदस्य सहभागी होते.
 
हिंदू हे अवामी लीगचे पाठीराखे मानले जातात. 1 ऑक्टोबर 2001च्या निवडणूक निकालाआधीच हिंदूंविरोधात दंगे उसळले. बांगलादेशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, 25 दिवसांत 266 मारले गेले व 213 महिलांवर बलात्कार केले गेले; पण ’डेली स्टार’मधील वृत्तानुसार दक्षिण भोलामधील एका महिला शिक्षिकेने सांगितले की, अन्नदा प्रसाद गावात 8 ते 70 वयोगटातील शेकडो हिंदू महिलांवर 2 ऑक्टोबर 2001च्या रात्री बलात्कार करण्यात आले. गावातील सर्व घरे पद्धतशीरपणे लुटण्यात आली, हिंदूंना बळजबरीने हुसकावून लावण्यात आले. काहींना ‘संरक्षण पैसे’ भरण्याची सक्ती करण्यात आली. रोझलिन कोस्टानी भोलामध्ये मुलाखत घेतलेल्या 98% हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले होते, त्यामुळे वरील महिलेच्या विधानात कोणतीही अतिशयोक्ती नाही हे सिद्ध होते. कोस्टा यांनी हेही नमूद केले की, स्थानिक पोलिसांनी अल्पसंख्याकांवरील हल्ल्याची चौकशी फ़ारच कमी केली किंवा केलीच नाही. IANS (Indian Abroad News Service) नुसार 2001 मधील निवडणुकांनंतर चार लक्ष अल्पसंख्याकांचा छळ करण्यात आला.
 
1 बहुतांश वेळी अल्पसंख्याकांविषयी सहानुभूती असल्याचा समज असणारे अवामी लीगचे पाठीराखेच अल्पसंख्याकांवरील हल्ल्यात सहभागी असतात. नेदरलँडस्थित अधिकारी गट 'Global Human Rights Defence'ने 2010 मधील अहवालात कागदपत्रासह नमूद केले आहे की, हिंदू व पारंपरिक अल्पसंख्याकांवरील दडपशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष अवामी लीगमधील सदस्य सहभागी होते. 2 शहारियार कबीर2001च्या निवडणुकीनंतर हिंदूंसोबत बौद्ध व ख्रिश्चन ह्या धार्मिक अल्पसंख्याकांवरील छळात वाढ झाली. 2001 ते 2005 मध्ये अल्पसंख्याकांचा झालेला भयानक छळ ह्यावर बांगलादेशी पत्रकार, लेखक, चित्रपट निर्माते व मानवाधिकार कार्यकर्ते शहारियार कबीर ह्यांनी 'An Introduction to the White Paper: 1500 Days of minority persecution in Bangladesh' ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व कार्यकर्त्यांच्या मुलाखती, वर्तमानपत्रातील बातम्या, मानवाधिकार संघटनांचे अहवाल, छायाचित्रे, सर्वेक्षणातील निरीक्षणे इत्यादीची पुराव्यासकट माहिती दिली आहे. हिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर लेख लिहिल्यामुळे व पीडितांच्या मुलाखती घेतल्यामुळे 22 नोव्हेंबर 2005ला शहारियार कबीर ह्यांना अटक करण्यात आली होती.
 
अब्बास ़फैज ह्या Amnesty International च्या बांगलादेशी संशोधकानुसार, बांगलादेशातील हिंदू समुदाय विशेषत: देशातील सध्याच्या तणावपूर्ण काळात अत्यंत धोक्यात राहत आहे. धक्कादायक हे आहे की, त्यांना केवळ त्यांच्या धर्मामुळेच लक्ष्य केले जात आहे. अधिकारी व्यक्तींनी त्यांना आवश्यक असलेली सुरक्षा पुरवली जाईल ह्याची निश्चिती करायला हवी. बांगलादेशातील युद्धगुन्हेगारांच्या ’आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालया’तील खटल्याच्या पार्श्वभूमीवर एका आठवड्यात इस्लामी पक्षांनी 40 पेक्षा जास्त मंदिरे उद्ध्वस्त केली. हिंदूंची घरे, दुकाने जाळून शेकडो लोकांना बेघर करण्यात आले. हल्ल्यातून बचावलेल्या पीडितांनी Amnesty International दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे विरोधी पक्ष जमाते-ए-इस्लामी व त्यांची विद्यार्थी संघटना ’छात्रा शिबिर’ ह्यांच्या मोर्च्यात सहभागी होते; पण जमाते-ए-इस्लामीने हे सर्व आरोप ़फेटाळून लावले आहेत.3
 
संदर्भ
1. Karlekar, Hiranmay. Bangladesh: The Next Afghanistan?, Sage Pub, 2005, Pg 254-255
 
2. Mukherji, Dr. Saradindu. Hindus Betrayed- Religious Cleansing in Bangladesh, India Policy Foundation
Publication, 2013
 
3. Bangladesh: Wave of violent attacks against Hindu Minority, 6 March 2013, Amnesty International
Powered By Sangraha 9.0