राजीव जोशी
9322241313
दोन हजारच्या दशकात मराठी रंगभूमीवर आलेल्या ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या नाटकाने त्यातल्या तिरकस विनोदशैलीने, तरुणाईच्या जोरकस सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले होते. तेव्हापासून परेश मोकाशी हे नाव रसिक प्रेक्षकांच्या मनात रुजले. पुढे परेश मोकाशींनी आपल्या अनवट चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांना वेगळे काही पाहण्याची आवड-सवय लावली. अलीकडे आलेला ‘वाळवी’ सिनेमादेखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाला तेव्हा राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्ट्रिक झाली. आता नवीन काय? अशी उत्सुकता प्रेक्षकांना असताना बातमी आली की, ‘मु. पो. बोंबिलवाडी’वर सिनेमा येतोय, तोही विवेक फिल्म्सतर्फे. कसे असेल एका धम्माल विनोदी नाटकाचे मोठ्या पडद्यावर होणारे माध्यमांतर?
मूळ मराठी नाटकावर बेतलेल्या सिनेमांची परंपरा तशी काही नवीन नाही. अर्थात सर्वच नाटकांचे रूपांतरण होऊन रजतपटावरील कलाकृती घडते असेही नाही; पण काही कालातीत व अनवट धाटणीची नाटके, त्यांचा आशयघन विषय, रंगमंचीय मर्यादेपलीकडे सांगू पाहणारे कथानक यामुळे अगदी मोजकी का होईना अशी नाटके मोठ्या पडद्यावर साकार झालेली आहेत. मग ते ‘नटसम्राट’प्रमाणे अभिजात नाटक असो किंवा ‘पुरुष’सारखे प्रक्षोभक विषयावरील नाटक. ‘कट्यार काळजात घुसली’सारखे संगीतप्रधान नाटक सिनेमा म्हणूनही लोकप्रिय ठरलेे. त्यामानाने ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘नटसम्राट’ ही नाटके सिनेमात रूपांतरित झाली तरीही ‘नाटक’ म्हणूनच अजरामर राहिलेली आहेत. असे असले तरी कलावंत आणि प्रेक्षकांनाही उत्तम नाट्यकृतीचे माध्यमांतर करण्याचा/पाहण्याचा मोह होतोच.
‘मु. पोस्ट...’ही त्याला अपवाद नाही, ज्यामध्ये शाब्दिक विनोद, भाषेची गंमत, तिरकसपणासह ठासून भरलेला उपरोध आणि परेशशैलीचा इरसाल विनोदाचा बार फुल्टू भरलेला आहे, असे नाटक मोठ्या पडद्यावर का येऊ नये? असे वाटत असतानाच नुकतीच एक बातमी आली की, विवेक फिल्म्सतर्फे ‘मु. पो. बोंबिलवाडी’वर सिनेमा येऊ घातलाय. अशा वेळी साहजिकच आपल्याला नाटक आठवते. त्यातली हिटलर-गोबेल्स ही दुक्कल आणि वरवंटे काका आणि काकू अशा व्यक्तिरेखा साकारणारी जितेंद्र जोशी, चिन्मय केळकर, हृषीकेश जोशी, वैभव मांगले, गीतांजली, सचिन देशपांडे, विनोद लव्हेकर, सोनाली विनोद व गणेश मयेकर अशा अनेक उमद्या व एनर्जीयुक्त अभिनेत्यांची फलटण, भेदक शब्दांच्या साहाय्याने फुलवलेला-खुलवलेला बोचरा-खोचक विनोद. मनात येते की, ही चअऊउअझ कॉमेडी रंगमंचाच्या चौकटीबाहेर आली तर काय धुमाकूळ घालेल?
नाटक माध्यमात आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या परेश मोकाशीने आतापर्यंत सिनेमातही आपला ठसा-हुकमत दाखवलेली आहे. असा मुरलेला दिग्दर्शक आपल्याला सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘बोंबिलवाडी’मध्ये नेतोय. ‘वाळवी’चे यश आणि त्यातील ब्लॅक कॉमेडीच्या पाठोपाठ एक उत्तम सटायर पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मराठी रंगभूमीवर ब्लॅक कॉमेडी हा प्रकार अधिक प्रमाणात रुजवला ते विख्यात प्रायोगिक लेखक-दिग्दर्शक सतीश आळेकर यांनी. त्यांच्या तिरकस-उपरोधिक आणि खास पुणेरी विनोदाचा प्रभाव पुढील दशकातील पिढीवर न पडला तरच नवल! त्या काळात म्हणजे 1990च्या दशकापासून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, प्रायोगिक नाटक सर्वत्र ‘आळेकर-धर्ती’ने लिहिणारे काही तरुण एकांकिका लेखक आणि नाटककार निर्माण झाले. पैकी काहींनी आपल्या आशय-विषयांची वेगळी वाट-अनवट लेखनशैली व त्याचबरोबरीने दिग्दर्शन-सादरीकरण शैली व फॉर्म्स रुजवले, फुलवले. त्यामध्ये परेश मोकाशी हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अवघ्या काही एकांकिका करून मोजके प्रायोगिक नाटक करत त्यांनी आपले कौशल्य थेट व्यावसायिक स्तरावर दाखवण्यास सुरुवात केली. त्याआधी 1999च्या पृथ्वी फेस्टिव्हलसाठी त्यांनी ‘संगीत डेबुच्या मुली’ हा एक अनोखा प्रयोग केला होता. त्यानंतर परेशने व्यावसायिकसाठी आणले ते ‘मु. पो. बोंबिलवाडी’. त्यातील विनोदाचा बाज टिपिकल व्यावसायिक नाटके पाहणार्या प्रेक्षकांना बसल्या जागी अचंबित करणारा होता; पण त्यांनी अशी नाटके स्वीकारली. म्हणून तर केवळ स्पर्धा किंवा प्रायोगिक नाटके किंवा एकांकिकातून दिसणारे नवीन फॉर्म-नवा आशय, त्याला अनुरूप मांडणी व एकूणच सादरीकरण अशी नाटके केवळ तिथेच न होता मुख्य प्रवाहात-चौकटीच्या रंगमंचावर होऊ लागली. त्याचे प्रयोग लावण्याचे धाडस करणारे निर्माते पुढे येऊ लागले म्हणून आपली रंगभूमी अधिक समृद्ध व काळाशी-प्रवाहाशी सुसंगत-प्रगत राहिली. म्हणूनच अथर्व थिएटरची तरुण टीम- अभिजित साटम, संतोष काणेकर व राजश्री चव्हाण हेदेखील मोठी जोखीम अंगावर घेण्याबद्दल कौतुकास पात्र, कारण अशी जणढ जऋ इजद पठडीची नाटके आल्याने, येत राहिल्याने मराठी रंगभूमी प्रवाहित राहिली. नवनव्या तरुण रंगकर्मींच्या सहज अभिनयशैलीने, सळसळत्या ऊर्जेने आपल्या भूमिकेला भिडण्याने रंगमंचावर सर्जनशीलतेचा चैतन्यदायी प्रवाह दिसणे हे महत्त्वाचे. आधीच्या पिढीतील आळेकर यांचे ‘दुुसरा सामना’, शफाअत खान यांचे ‘शोभायात्रा’प्रमाणेच पुढच्या काळात डॉ. विवेक बेळे, गिरीश जोशी, डॉ. चंद्रशेखर फणसाळकर, प्राजक्त देशमुख, दत्ता पाटील अशी पिढी नवा आशय मांडत आली आहे.
मु. पो. बोंबिलवाडी
कथानकातच सिनेमाची शक्यता-क्षमता?
मुळात संहितेत खच्चून मसाला भरलेला असल्याने मोठ्या पडद्यावर हे खुलवायला खूपच वाव असणार आहे. परेशच्या मुशीत घडलेली एकेका व्यक्तिरेखेची इब्लिस-इरसाल जडणघडण दिसते.एका प्रसंगातून व स्थळातून दुसर्यात जाण्याचा प्रवास एकाच शब्दात सांगायचा तर हळश्ररीर्ळेीी म्हणता येईल. मुळात नाटकाचे कथानक प्रवाही आहे. त्यातून पुढे काय घडणार याचा अंदाज येत तर नाहीच; पण उत्कंठा-उत्सुकतेचा पट एखाद्या पटकथेसारखा पुढे जातो आणि एका उत्कर्षबिंदूवर थांबतो. मुळात बोंबिलवाडी नामक एक प्रातिनिधिक गाव, स्वातंत्र्यासाठी लढायचे आहे म्हणून बॉम्ब करण्याची ऊर्मी, गावात नाटक करणारी मंडळी, आकस्मिकपणे हिटलरचे विमान बोंबिलवाडीत उतरणे, प्रभात फिल्मचा काळ, असे विभिन्न प्रवाह, वेगवेगळ्या प्रवृत्ती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. हिटलर-गोबेल्स, वैद्यबुवा, कुक-ब्रिटिश प्रतिनिधी अशी ज्ञात असणारी पात्रे दिसतात आणि त्याचबरोबरीने बबन-भैरव, वरवंटे काकू-कुंडलिनी अशा लक्षवेधी व्यक्तिरेखांचा एकत्रित गोंधळ हाच या कथानकाचा यूएसपी म्हणता येईल.