व्हायरस प्रेमाचे चक्रव्यूह

विवेक मराठी    18-Nov-2024
Total Views |
@रिद्धी बांदिवडेकर
 
आपल्या तरुण हिंदू मुलींमध्ये एक विचित्र व्हायरस पसरतोय. या व्हायरसमुळे त्या आपले घर, संस्कार विसरून गायब होतात. नक्की काय होतं त्यांच्यासोबत? त्या कुठे जातात? या व्हायरसचा शिकार त्या कशा होतात आणि नेमका तो व्हायरस आहे तरी काय? या विषयावर अजय जगताप यांनी ‘व्हायरस’सारख्या पुस्तकातून विवेचन मांडले आहे. पुस्तकाचे शीर्षक हे या कथासंग्रहाला साजेसे वाटते, कारण जसा व्हायरस पसरतो तसाच प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीच्या नसानसांत हा व्हायरस पसरतो जो त्यांना कुठल्याही गोष्टी करण्यापासून थांबवत नाही. हा व्हायरस त्यांच्यात इतका भिनतो की, त्याच्यापुढे आपले घर, संस्कार, रूढी, परंपरा या सर्वांचा त्यांना विसर पडतो.
 
vivek 
 
 
’हिंदू मुस्लीम भाई भाई’ हे नारे आपण ऐकत असतो. सर्वधर्मसमभाव, एकता, समानता अशी मूल्ये आपल्यात रुजतात. समाजप्रबोधन म्हणजे हेच असे वाटते; पण व्यवसायानिमित्त सातार्‍यात स्वयंसेवक म्हणून स्थलांतरित झालेला लेखक एका विषयाकडे आकर्षित होतो तो म्हणजे ‘लव्ह जिहाद’. ग्रामीण भागात काम करत असताना हिंदू मुली परागंदा होत आहेत, असे लेखकाला जाणवत होते. हे भीषण वास्तव समाजासमोर आणायला हवे, असे त्याला वाटत होते. मुस्लीम समाजाचे हे षड्यंत्र समोर यावे यासाठी त्यांची मानसिकता, हिंदू मुलींची मानसिकता लेखकाने या कथांमधून मांडली आहे. त्यांनी या पुस्तकातून मुस्लीम समाजाचा द्वेष दर्शवला नाही किंवा प्रेमालासुद्धा विरोध केला नाही; पण प्रेमासारखी निर्मळ भावना दाखवून धर्मांतर कसे केले जाते याकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित केला आहे. या कथेत त्यांनी न केवळ हिंदू समाजजागरण केले आहे, तर ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरलेल्या मुलींना मदत करून आपल्या हिंदू बहिणींचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
•
पुस्तक: व्हायरस
• लेखक : अजय जगताप
• संपादन - जयेश मेस्त्री
• प्रकाशक - साप्ताहिक विवेक
(हिंदुस्थान प्रकाशन संस्था)
• पृष्ठसंख्या - 100 • मूल्य - 150/-
• पुस्तक नोंदणीसाठी - 9594961858

https://www.vivekprakashan.in/books/viruses-book/
 
 
प्रकाशकांनीदेखील समाजहिताची भावना ठेवून ‘व्हायरस’ हे पुस्तक प्रकाशित केले, कारण ‘विवेक प्रकाशन’ नेहमीच समाजप्रबोधन करणार्‍या विषयाला हात घालतो. गेल्या काही वर्षांत हिंदू स्त्रियांचे गायब होणे, मुस्लीम मुलाशी लग्न करणे व अन्याय सहन करणे अशा भीषण समस्या वाढलेल्या आहेत. फसविल्या गेलेल्या सर्व मुली शिकलेल्या असतात; पण तरीही त्या कशा फसवल्या जातात, कोणता व्हायरस त्यांना हा निर्णय घ्यायला लावतो, यामागचे षड्यंत्र समोर यावे, हा प्रकाशकांचा हेतू आहे. आपली संस्कृती, सुरक्षा या सगळ्यांवर विचार करायला लावणार्‍या या कथा प्रकाशकांनी प्रकाशित केल्या. आपल्या समाजात कसे हिंदू संस्कृतीला दुर्बल केले जात आहे, यामागे कोणती मानसिकता असते, गोड बोलून आधी धर्माचा आदर करून, प्रेमात धर्म कुठे येतो असे खोट्या आणाभाका घेऊन कसे मुलींना वश केले जाते, त्यांचे शारीरिक आणि लैंगिक शोषण कसे केले जाते, हे लेखकाने अगदी उत्तम शब्दांत मांडले आहे. तसेच आजच्या पिढीला हे पुस्तक कसे पटेल, ते या पुस्तकाकडे कसे आकर्षित होतील यासाठी प्रयत्न केले आहेत आणि या प्रयत्नात ते बर्‍यापैकी यशस्वीही झाल्याचे म्हणता येईल. म्हणूनच पुस्तक प्रकशित झाल्या झाल्या केवळ पाच दिवसांत त्याच्या 700 प्रती विक्री झाल्या आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहताच आजच्या तरुण पिढीला हे वाचण्याचा मोह होईल, हृदयातून प्रेम समजून जो व्हायरस हिंदू मुलींच्या तनामनात पसरतो आणि मग त्यांना रडण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही, हे या मुखपृष्ठाद्वारे आकर्षकरीत्या मांडले आहे. महाविद्यालयात जाणार्‍या तरुण मुली अनेक स्वप्ने रंगवतात. जिद्दीने, मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष देत असतात. मात्र एक व्हायरस महाविद्यालयात पसरतो आणि त्या फसल्या जातात. प्रेमाचे ढोंग करून हिंदू मुलींचे धर्मांतर, त्यांच्यावर होणारे शारीरिक अत्याचार, त्यांचे अचानक गायब होणे हे ’द केरला स्टोरी’मधून 2023 साली दाखवले. मात्र हे केवळ केरळमध्ये नसून आपल्या महाराष्ट्रातदेखील असेच चित्र आहे, हे लेखकाने या पुस्तकातून आपल्यासमोर मांडले आहे.
 
 
पहिल्या कथेत कृष्णावर लहानपणापासून प्रेम करणारी रेश्मा ताहीरच्या प्रेमात पडते. घरी कळताच तिला समजही दिली जातेे, मात्र कथेचा शेवट अनपेक्षित होतो, त्यामुळे वाचताना धक्का बसतो. लग्न झालेली प्रतीक्षा नवर्‍याला सोडून मुजहीदसोबत पळून जाते आणि तिच्यावर आत्महत्या करायची वेळ येते. अशा कथानकांमुळे मुलींना ताकीद मिळते की, प्रेमाच्या प्रवाहात वाहून जाऊ नका. कधी शिकून डॉक्टर झालेली श्यामली लग्न करून तीन मुलांची अम्मी होते आणि स्वतःचं अस्तित्व विसरते किंवा कधी शिकत असलेली संगीता, प्रेमावर विश्वास ठेवून, आईवडिलांच्या विरोधात जाऊन वेळ पडली तर पळून जाते. प्रेमासाठी लढणार्‍या या तरुणी, यांच्यात व्हायरस आहे हिजाब घालण्याचा, नमाज पढण्याचा. कधी आईवडिलांच्या धाकात, शिस्तीने वाढलेल्या मुली, कधी खूप प्रेमाने वाढलेल्या मुली, विभिन्न वातावरणांतील मुलींना कसे मुसलमान मुले वश करतात, प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, याचे अजय जगताप यांनी साध्या शब्दांत लेखन केले आहे. वाचताना गूढपणे विषय मांडल्यामुळे कथा आकर्षक वाटत आहेत. धर्मांतर, शारीरिक अत्याचार हे नेमक्या शब्दांत मांडल्यामुळे हा कथासंग्रह वाचायला सोपा वाटतो. प्रेमात पडलेल्या तरुण मुलींनो, आपण एका वयात आलो की, घरच्यांची काळजी ही बंधने वाटू लागतात. मात्र ती बंधने नसून आपल्याबद्दलची काळजी आहे, असा हृदयस्पर्शी संदेश लेखकाने दिला आहे.
 
 
या कथासंग्रहाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातील रेखाचित्रे. प्रत्येक कथेच्या आशयानुसार रेखाचित्रांचा समावेश केला आहे. प्रसंगानुसार आजूबाजूचा परिसर, प्रेमात पडलेल्या तरुणाईचे हृदयस्पर्शी मीलन आणि त्यांनी परिधान केलेले वस्त्र या सर्वांची सुंदर मांडणी रेखाचित्रांद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे कथा वाचताना केवळ शब्दांचे भांडार डोळ्यासमोरून जात नाही, तर चित्रांमुळे कथेचा आशय जाणवतो आणि कथा अधिक खुलते.
 
 
मुस्लीम समाज कसा हिंदू मुलींना गोड शब्दांत भुलवतो याचे वर्णन करताना कथेत संवाद साधताना त्यांनी उर्दूमिश्रित हिंदी शब्द वापरले आहेत ज्यामुळे मुस्लीम कुटुंबीय डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे लेखकाच्या दीर्घ अभ्यासाचा परिचय होतो. लेखक स्वयंसेवक असल्याने या विषयाबद्दलची त्यांची कळकळ जाणवते आणि तरुणाई आणि त्यांच्या पालकांसाठी नवा आणि महत्त्वाचा संदेश ते कसा देतात हे नक्कीच इतरांना सांगायला आवडेल.
 
 
या कथांमध्ये महाविद्यालयातील तरुणीचे चित्रण केलेले आहे, त्यामुळे पालकांना ‘लव्ह जिहाद’सारखा विषय कसा हाताळावा हे कळेल. त्यामुळे हा कथासंग्रह तरुण तसेच पालकसुद्धा वाचू शकतात. समाजात जागृती करण्याचे काम या पुस्तकात चित्रपटापेक्षा जास्त आकर्षकरीत्या मांडले आहे. समाजप्रबोधन आणि सामाजिक समस्या लक्षात घेऊन सर्व युवतींनी आणि कुटुंबीयांनी हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे आणि संकटापासून दूर राहिले पाहिजे.