श्रीगणेशाचे नैवेद्य : गाजराच्या आंबटगोडवड्या

15 Sep 2023 12:29:22
श्रीगणेशाचे नैवेद्य
गाजराच्या आंबटगोड
वड्या
 

vivek 
 
साहित्य : केशरी रंगाची 5-6 गाजरे, साखर 2 वाट्या, वेलदोडे 7-8 साल काढून बारीक केलेले, साजूक तूप, दूध, लिंबाचा रस, वड्या थापण्यासाठी ताटली, वड्या कापण्यासाठी सुरी किंवा उलथणे, प्लॅस्टिकची पिशवी.
 
कृती : पातेल्यात थोडे दूध व गाजराचा कीस घालून उकडून घ्यावा. कुकरच्या 2 किंवा 3 शिट्ट्या कराव्यात. कीस गार झाल्यावर वाटीने कीस मोजून घ्यावा. कीस वाटीने जेवढा भरला असेल, त्याच्या पाऊण पट साखर घालावी. ते मिश्रण गॅसवर पातेल्यात घालून शिजण्यास ठेवावे. मिश्रण हलवण्यासाठी डावच घ्यावा, उलथणे घेऊ नये. कीस-साखर मिश्रण पातेल्यातच शिजवावे, कढईत नको. हलवता हलवता मिश्रणाचा गोळा होऊ लागला की त्यात 2-3 चमचे वेलदोडे पूड व लिंबाचा रस घालावा. मिश्रण तयार होत आले की ते सुटू लागते. मग गॅस बंद करावा. ताटलीला साजूक तूप लावावे व त्यावर मिश्रण प्लॅस्टिकच्या पिशवीने थापावे, म्हणजे आपल्या बोटांचे ठसे त्यावर येत नाहीत. मिश्रण फार पातळ थापू नये. गार झाल्यावर वड्या कापाव्यात. आंबट-गोड वड्या छान लागतात. डोळ्यांचे आरोग्य गाजराच्या सेवनाने उत्तम राहते.
प्रमिला बिडकर
Powered By Sangraha 9.0