’द केरला स्टोरी’ न सांगितलेली दुसरी बाजू

10 May 2023 13:06:28
’द केरला स्टोरी’ बघायचा का? मी म्हणेन नक्की बघा, पण बघण्यापूर्वी हा लेख वाचा आणि डोक्यात ठेवा. नुसता अडीच तासांचा चित्रपट बघून काही तुमच्या मनावर खोलवर परिणाम होऊन तुम्हाला उपरती होणार नाहीये, सतत दुसर्‍यांना दोष देत फिरू नका, स्वत: आपापली समाजाप्रती, आपल्या पाल्यांप्रती असलेली जबाबदारी पार पाडा आणि मग वाटल्यास तोंडपाटीलकी करा! कारण समस्या गंभीर आहे. प्रश्न हा आहे एक हिंदू म्हणून तुम्ही ह्या गंभीर समस्यांचा सामना करण्यास किती खंबीर आहात?
 
the kerala story
सैतान, राक्षस, घोस्ट.. जगातल्या कुठल्याही धर्मात, संस्कृतीत, परंपरेत बघा, तुम्हाला वर उल्लेखलेल्या आसुरी प्रवृत्ती दिसतील, कथा-कादंबरीच्या स्वरूपात का होई ना, पण त्यांचे दाखले, उल्लेख दिसतील!! सैतानचा उल्लेख आणि त्याच्या कथा जशा इतर धर्मात असतात, तशाच त्या इस्लाममध्येदेखील आहेत. इस्लाममध्ये तर सैतानाला दगड मारण्याची प्रथा आहे. पण ह्याच धर्मातील सैतान बाहेर दार ठोठावत असेल, तर त्याला दगड मारण्याची त्यांचीच प्रथा गैरमुस्लिमांनी अंगीकारली, तर त्याला हरकत घेता येईल? ’द केरला स्टोरी’च्या निमित्ताने अशाच एका राक्षसी, सैतानी प्रवृत्तीची भीषण ओळख भारतीय समाजासमोर मांडण्यात आलीये. विषय, प्रश्न जुनाच असला तरीही मांडणी वेगळी आहे. अर्थात मांडणी वेगळी आहे म्हटल्यावर लोक ती बघायला गर्दीही करताहेत! त्यात वावगंही नाही म्हणा, ज्वलंत विषय आणि प्रश्न हाताळण्याचा प्रामाणिकपणा असेल तर त्याची कदर व्हायलाच हवी. पण माझा मुद्दाच वेगळा आहे - माझा मुद्दा आहे की ’लव्ह जिहाद’ हा विषय सहज विसरून जाण्यासारखा आहे की त्यावर मंथन करून त्या प्रश्नावर उत्तर शोधण्याची गरज आहे? मुळात हा विषयच समजून घ्यायला तरी आपण सजग, गंभीर आहोत का? एकदा विषय नीट समजून घेऊ या का?
 
 
सामाजिक परिस्थिती
 
 
विषयाची मांडणी करण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. मी स्वत: केरळमध्ये 5 वर्षे राहिलोय, नोकरी आणि संघकार्य हे दोन्ही मी एकत्रितपणे केलंय, त्याचबरोबर मी मध्यपूर्व इस्लामी देशांत 4 वर्षे काढली आहेत, म्हणून मला ह्या प्रश्नाची, विषयाची आणि त्याच्या गांभीर्याची जाण आणि कल्पना दोन्ही आहेत. विषय आपण केरळच्या परिप्रेक्ष्यात बघणार असलो, तरीही हा सामाजिक विषय कधीही कुठल्याही प्रांतात जसाच्या तसा घडू शकतो. त्यामुळे ही उदाहरणे स्थानपरत्वे कदाचित बदलणार नाहीत, पण त्याची दाहकता मात्र कमी-जास्त होऊ शकते!
 
 
the kerala story
 
केरळची डेमोग्राफी बघितली, तर हिंदू तिथे जेमतेम 50%पर्यंत खाली आला आहे आणि मुस्लीम आणि ख्रिश्चन ह्यांची एकत्रित लोकसंख्या हिंदूंच्या एकत्रित लोकसंख्येएवढी झाली आहे. केरळचा विचार केला, तर 1968/69पासून तिथे कम्युनिस्टांचा वावर आहे. हा वावर फक्त राजकीय वावर नाहीये, तर हा वावर सामाजिक वावरसुद्धा आहे. आता सामाजिक वावर म्हणजे काय? तर समाजात राहून वेगवेगळ्या संघटनांच्या स्वरूपात कम्युनिस्टांचे काम गेल्या कित्येक दशकांपासून सुरू आहे. ज्याप्रमाणे संघाच्या विविध संघटना समाजात राहून समाजासाठी वेगवेगळ्या स्तरांवर काम करतात, त्याचप्रमाणे कम्युनिस्टांच्या संघटनासुद्धा विविध स्तरांवर - संघटनात्मक असो किंवा सामाजिक असो, हे कार्य करत असतात. आता कम्युनिस्टांचा मूळ उद्देश किंवा त्यांची मूळ विचारधारा तुम्ही बघितली, तर ती मूळ विचारधारा वर्गकेंद्रित आहे. त्यामुळे धर्म, धर्माच्या परंपरा ह्या सगळ्यांचा कम्युनिस्टांना नेहमीच तिटकारा वाटला आहे. विशेषत: हिंदू संस्कृतीच्या हिंदू परंपरांचा त्यांना जास्त तिटकारा आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दशकांपासून विविध संघटनांच्या स्वरूपात ज्या काही मोठमोठ्या कम्युनिस्ट संघटना केरळमध्ये उभ्या राहिल्यात, त्यातून पद्धतशीरपणे सामाजिक स्तरावरच नव्हे, तर अगदी वैयक्तिक स्तरावरदेखील हिंदू एक धर्म म्हणून, एक परंपरा आणि एक विचारधारा म्हणून मोठ्या प्रमाणात पद्धतशीरपणे क्षीण केली गेली. हळूहळू समाजात, इतकंच कशाला, अगदी घरातसुद्धा गट पडले. हिंदू संस्कृतीचा उदोउदो, पूजा अर्चा हे सगळे विषय मागे पडले. ‘हिंदू हिंदू काय करताय? काय पूजा करायची? बाहेर बघा, किती वर्गविग्रह आहे.. तुम्हाला तुमच्या पुरातन संस्कृतीलाच धरून बसायचं आहे.. माणूस म्हणून कधी जगाल?’ असे टिपिकल प्रश्न नवकम्युनिस्ट युवा वर्गाकडून तत्कालीन ज्येष्ठांवर फेकले गेले. अर्थात आजही जी समस्या आपल्या ज्येष्ठांमध्ये दिसते, त्यानुरूप तत्कालीन ज्येष्ठांनासुद्धा ह्या सो कॉल्ड तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. ज्येष्ठांनी विरोध केला, तात्त्विक वादात ते मागे पडले आणि हळूहळू त्या ज्येष्ठांप्रमाणेच हिंदू संस्कृती, परंपरा मागे पडत गेल्या आणि नवीन निधर्मी कम्युनिस्टांची पिढी मोठी होत गेली. त्यांची पिढी आज नव्वदीत असेल आणि ह्या कम्युनिस्टांनी घडवलेल्या किमान तीन कम्युनिस्ट पिढ्या आज केरळात आहेत.
 

the kerala story 
 
आक्षेप संघ नावाला, पर्यायाने हिंदू ह्या शब्दाला आणि हिंदुत्व ह्या संकल्पनेला होता. काही मोठे उद्योगपती, समाजात मोठे नाव असलेली माणसे वैयक्तिक बोलताना सांगायची, ’‘अरे, संघ करतो ते सेवा प्रकल्प, त्याची कामे खरेच कौतुकास्पद आहे. संघ मायनस सेवा हे बेस्ट आहे, फक्त संघ नको, हिंदुत्ववाद नको!” गेल्या कित्येक पिढ्यांपासून हे स्लो पॉयझन समाजात बिंबवले गेले की धर्माचा उच्चार नको, परंपरा नकोत, वुई आर ह्युमन फर्स्ट! खरी मूळ समस्या आहे की घरातून फक्त धर्मसंस्कारच कमी झाले असे नाही, तर आपण परंपरा, हिंदूंचे क्षात्रतेज, भारताचा जाज्ज्वल्य इतिहास पुढच्या पिढीला सांगितलाच नाही, किंबहुना पुढच्या पिढीच्या लॉजिकल प्रश्नांना लॉजिकली उत्तरे देण्याचा कधी विचारच केला नाही. त्याचा परिपाक म्हणजे पुढची पिढी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दुसर्‍या विचारधारेत शोधायला लागली. केरळच्या बाबतीत साठ/सत्तरच्या दशकांत कम्युनिस्ट चळवळीत शोधायला लागली आणि आजच्या एकविसाव्या शतकात गूगल आणि इतर धर्मांत - ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मात शोधतायत! केरळला संघकार्य काम करताना माझा अनुभव मोठा विचित्र होता. तुम्ही संघस्वयंसेवक म्हणून लोकांसमोर विषय मांडायला लागला की लोक (हिंदूच बरे, इतर धर्मीय तर सोडाच) पाल पडल्यासारखे झटकून टाकायचे. तोच विषय सेवा, यूथ फॉर सेवा, सेवा फॉर नेशन अशा शब्दांच्या आडून संघ हा शब्द येऊ न देता समोर मांडला की त्याला मोठा प्रतिसाद असायचा, अगदी कट्टर कम्युनिस्ट घरात वाढलेल्या तरुणांकडूनसुद्धा! त्यांचा आक्षेप संघ नावाला, पर्यायाने हिंदू ह्या शब्दाला आणि हिंदुत्व ह्या संकल्पनेला होता. काही मोठे उद्योगपती, समाजात मोठे नाव असलेली माणसे वैयक्तिक बोलताना सांगायची, ’‘अरे, संघ करतो ते सेवा प्रकल्प, त्याची कामे खरेच कौतुकास्पद आहे. संघ मायनस सेवा हे बेस्ट आहे, फक्त संघ नको, हिंदुत्ववाद नको!” गेल्या कित्येक पिढ्यांपासून हे स्लो पॉयझन समाजात बिंबवले गेले की धर्माचा उच्चार नको, परंपरा नकोत, वुई आर ह्युमन फर्स्ट! पण ह्या सगळ्यात पिढीदरपिढी जे प्रश्न युवकांना पडतात, त्याची उत्तरे जी खरे म्हणजे आपल्याच धर्मात आहेत, ती दिली गेली नाही, किंवा अनुत्तरित राहिली. त्यामुळे हिंदूंची युवा पिढी त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधायला लागली. जरा विचार करून बघा, ही सामाजिक परिस्थिती कुठेतरी ऐकल्यासारखी वाटतेय? संघस्वयंसेवकांना कदाचित जाणवेल.. होय, 1925पूर्वीची - म्हणजे रा.स्व. संघाच्या स्थापनेपूर्वीची हिंदूंची जी परिस्थिती होती, तशीच काहीशी परिस्थिती नाहीय का?
 
 
 
आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती
 
बहुतांश मुस्लीम समाज धनिक आहे. मध्यपूर्वेतून खोर्‍याने येणारा पैसा, मुस्लीम समाजाची घट्ट सामाजिक वीण, बहुतांश शैक्षणिक आणि आर्थिक संस्थांवर असलेली मुस्लीम, ख्रिस्ती समाजाची पकड, नकळत लादल्या गेलेल्या त्यांच्या चालीरिती (प्रेयर, सणांचे सेलिब्रेशन इत्यादी) ह्यांचे
केरळातील हिंदूंची सामाजिक परिस्थिती आपण बघितली. युवकांच्या प्रश्नांना ’लॉजिकल’ उत्तरे मिळतील अशी परिस्थिती घरी नव्हती/नाही, त्याचबरोबर धर्मसंस्कार मिळणे बंद झालेले, किंबहुना ते बंद झाले, त्यामुळेच युवा पिढी त्यांना पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधायला लागली. गूगल, कॉलेजमधील मित्रमैत्रिणी, त्यांचे ग्रूप असे अड्डे तयार व्हायला लागले आणि मग व्हेस्टेड इंटरेस्टदेखील वाढायला लागला. केरळमधील समाजाचे आर्थिक मॉडेल खूप चमत्कारिक आहे. बहुतांश मुस्लीम समाज धनिक आहे. मध्यपूर्वेतून खोर्‍याने येणारा पैसा, मुस्लीम समाजाची घट्ट सामाजिक वीण, बहुतांश शैक्षणिक आणि आर्थिक संस्थांवर असलेली मुस्लीम, ख्रिस्ती समाजाची पकड, नकळत लादल्या गेलेल्या त्यांच्या चालीरिती (प्रेयर, सणांचे सेलिब्रेशन इत्यादी) ह्यांचे अवडंबर सर्वधर्मसमभावाचा, सेक्युलॅरिझमचा किडा चावलेल्या हिंदू युवकांच्या मनात नकळत भिनत, मग हळूहळू ‘आपल्या पत्नीचा त्याग केलेला व्यक्ती कसा रे तुमचा देव?’ ‘16000 स्त्रियांशी लग्न करणारा कसा रे तुमचा देव?’ इथपासून सुरू झालेला प्रवास ’द केरला स्टोरी’पर्यंत येऊन थांबतो! आपला मित्र, मैत्रीण हे करतेय ना? गंमत म्हणून रोझे ठेवतेय नं? रविवारी चर्चला जातेय नं? काय फरक पडतोय? किती कूल आहे बघा.. आम्ही सर्वधर्मसमभाव पाळतो, आमचा बंड्या/स्वीटी की नै, नेक्स्ट जनरेशनचे बरं का, जसे होळी खेळतात की नै, अगदी तसेच रमदानचे रोजे पाळतात, गुड फ्रायडेचा केक खातात.. हे सांगणार्‍या बंड्या/स्वीटीच्या पालकांना हे कळतच नाही की गंमत म्हणून रोजा पाळता पाळता कधी ते होळी खेळायचेच बंद झाले आणि हळूहळू पाच वेळचे नमाजी, दर रविवारी चर्चमध्ये कन्फेशन बॉक्समध्ये साल्व्हेशनच्या भिका मागायला लागले! बरे, हे इतके सगळे - म्हणजे रोजे ठेवणे, साल्व्हेशन चुकीचे आहे का? मी म्हणेन, नाहीये; पण तेव्हाच, जेव्हा तुमच्या कॉन्सेप्ट्स अतिशय क्लियर आहेत, तुमच्या स्वधर्माच्या, परंपरेच्या, पूजापद्धतीच्या कॉन्सेप्ट्स क्लियर आहेत, कुठलीही आमिषे तुम्हाला त्यातून वाममार्गावर घेऊन जाऊ शकणार नाहीत! लक्षात घ्या, इथे कुठेही टार्गेटेड व्यक्तीवर जबरदस्ती नसते, कुठलेच आमिष नसते, ह्याउपर अगदी सुरुवातीला तर हिंदू धर्म आणि त्यांचा (टार्गेट करणार्‍यांचा) धर्म कसा सारखाच आहे, आमचा (टार्गेट करणार्‍यांचा) धर्म कसा तुमच्या (टार्गेट व्यक्तीच्या) धर्माचा अपडेटेड व्हर्जन आहे, इथपासून सगळे सुरू होते. जोरजबरदस्तीचा मामलाच नसतो मुळी, पद्धतशीर टार्गेटेड इन्सिमिनेशन असते, व्यक्तीच्या नकळत होणारे. टार्गेटेड व्यक्तीच्या पालकांना सोडा, त्याला स्वत:लासुद्धा कळत नाही की कधी तो स्वत: त्याच्या धर्मापासून तुटत गेला! मित्रमैत्रिणी, त्यांचा ग्रूप, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कामाची ठिकाणे, कलीग, वर्क एन्व्हायरमेंट हे सगळे ह्या प्रोसेसमध्ये कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात! व्यवस्थाच एक टार्गेटेड अ‍ॅप्रोच म्हणून काम करते!
 
 
सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, स्तरावर अशा तुटत जाणार्‍या घटकांबद्दल हिंदू समाज काय करतो? त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतो - एकतर निद्रिस्त अवस्थेत दुर्लक्ष करतो, किंवा मग दूषणे देतो. ’लव्ह जिहादचे’ प्रकरण असेल तर ’आजकालच्या मुली बघा काही पडलेली नाहीय, संस्कार नाहीय, पालकांचे लक्ष नाहीय’ असे म्हणत दोषारोप करून मोकळा होतो. खरेच का हो फक्त त्या मुलींची, तिच्या आईवडिलांचीच पूर्ण चूक आहे का? समाजाची काहीही चूक नाही? लव्ह जिहाद प्रकरणाला बळी पडलेल्यांना हा हिंदू समाज वाळीत टाकतो, ही त्यांची चूक नाही? युवा वर्गाने विचारलेल्या शंकांना ’आजकालची बेशिस्त पिढी’ म्हणून लेबले लावत झिडकारणार्‍या समाजाची काहीच चूक नाही? त्यांच्या घरात संस्कार होत नसतील, पण समाज म्हणून तुमच्याच हिंदू धर्मातील युवकांवर संस्कार करण्यात कमी पडलो, ही समाजाची चूक नाही? अरे, साधे अदबीने, गोड प्रेमाने ’फ्लर्टिंगही’ करू न शकणार्‍या हिंदू समाजातील आचरट, गूळपाड्या, हेकट तरुणांना झिडकारून ’क्लासी’ नकाब ओढलेल्या कुणा आसिफ, ओबेद, मुहम्मदच्या जाळ्यात ओढल्या गेल्या, तर त्यात फक्त दोष मुलींनाच का? अरे, शिकवा की तुमच्या मुलांना क्लासी बनणं, शिकवा की प्रेमात पेशन्स ठेवणं, समोरच्या मुलीशी अदबीने वागणं, कुणी अडवलंय! माझ्या ओळखीच्या मुली आहेत, डॉक्टर, इंजीनियर आहेत, लव्ह जिहादला बळी पडलेल्या. सुदैवाने त्यांचा अंत फ्रीजमध्ये झाला नाही किंवा धर्मपरिवर्तन करून चूल फुंकण्यात झाला नाही, थोडे उशिरा का होईना, निपटले प्रकरण. प्रत्येक वेळी तलवारीच्याच भरोशावर धर्मपरिवर्तन करण्याची गरज असते असेच नाही, इतर प्रलोभने, आमिषे दाखवता येतात. तेही जमले नाही, तर कच्चे दुवे हेरून पद्धतशीर ब्रेनवॉश करता येते की!! ’द केरला स्टोरी’ची दुसरी न समजलेली, सांगितलेली बाजू ही आहे! ही द केरला स्टोरी एका दिवसात आकारात येत नाही, हळूहळू येते आणि वेळीच आवर घातला तर आवरतादेखील येते!! एकदा का प्रकरण प्रेमापर्यंत गेले किंवा इतर उदाहरणांत इमोशनल कोशंटपर्यंत गेले तर मात्र तिथून परतीचा मार्ग कठीण होतो.
 
 
 
केरळमधील माझ्या पाच वर्षांच्या वास्तव्यात आणि मध्यपूर्वेतील माझ्या चार वर्षांच्या वास्तव्यात असल्या पद्धतशीर ब्रेनवॉशिंगच्या बर्‍याच कार्यक्रमात जायची संधी मिळाली. इस्लामवरील माझ्या अभ्यासात ह्या कार्यक्रमांमुळे साहित्याची मात्र मोलाची भर पडत गेली. कुराण, हदीस, शरिया ह्याबद्दल ऑथेंटिक पुस्तके मला ह्याच कार्यक्रमातून मिळत गेली, तीही फुकट. माझा इस्लामवरील अभ्यास ह्याच कार्यक्रमातून वाढत गेला. फक्त फरक हा होता की माझे माझ्या धर्माच्या बाबतीतले माझ्या धार्मिक, सामाजिक परंपरांबाबतचे, रुढींबाबतचे कॉन्सेप्ट्स क्लियर होते, आहेत. आजही कुठल्याही मौलानाबरोबर किंवा हाजींबरोबर बसून ’हिजरतचा सफर’, ’शरियत’, ’प्रेषितांच्या आधीचा आणि नंतरचा मध्यपूर्व’ ह्यावर वादविवाद, सखोल चर्चा करू शकतो, कारण मी कुराण, हदीस ह्याचा अभ्यास केला आहे. मला ’मक्का’कालीन आणि ’मदिना’कालीन सुराह ह्यांचा संदर्भ माहितीय. काफिर, जन्नत, जिहाद, जहन्नुम ह्यांच्या इस्लामिक रेफरन्समधील माझ्या कॉन्सेप्ट्स क्लियर आहेत!! मध्यपूर्वेत राहून मी शरियत चार वर्षे रोजच्या जीवनात बघितली आहे, वहाबी परंपरा शिक्षण मी डोळ्यांसमोर शिकवताना बघितले आहे. त्यामुळे मला कधीच मोक्षप्राप्तीसाठी माझा धर्म सोडण्याची गरज वाटली नाही. आज खरी गरज आहे ती आपल्या युवा वर्गाला भगवद्गीतेबरोबर, कुराण आणि हदीस ह्यांची ओळख करून द्यायची! संस्कृतबरोबर अरेबिकची आणि उर्दूची शिकवणी लावून द्यायची! आपल्या पाल्याला पाठवा की जवळच्या संघशाखेत. कबड्डी खेळता खेळता हिंदू परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची तोंडओळख होईल, किमान फालतू प्रश्न पडणार नाहीत. प्रश्नाला प्रश्न म्हणून मान्य केले तरच त्याची उकल होण्याची प्रक्रिया सुरू होते, दुर्लक्ष केलेत तर तोच प्रश्न कधी ना कधी तुमच्यासमोर भस्मासुराच्या रूपात आ वासून उभा राहील, हे नक्की!
Powered By Sangraha 9.0