‘पितांबरी’ कंपनी उत्पादनांच्या माध्यमातून गेली 33 वर्षे ग्राहकांच्या सेवेत आहेच. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकून पितांबरीने 2013 साली रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ साखळोली येथे ‘पितांबरी नर्सरी’ची निर्मिती करून हरित क्रांतीची सुरुवात केली. शेतीतून उत्तम दर्जाचे उत्पन्न मिळावे यासाठी राज्यातल्या प्रत्येक गावात अस्सल जातिवंत रोपे, कलमे उपलब्ध करून देणे, तसेच महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना वर्षभर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध व्हावा, या उद्देशांनी पितांबरीने ‘पितांबरी नर्सरी फ्रँचायसी’ही योजना तयार केली आहे.
पितांबरी नर्सरीमार्फत विविध प्रकारची दुर्मीळ आयुर्वेदिक झाडे, फळझाडे, फूलझाडे, शोभिवंत झाडे, मसाला रोपे, जंगली झाडे, मसाला पिके, विविध प्रकारचे बांबू, भाजीपाला रोपे, विविध वेली आदी दर्जेदार 143 प्रकारची रोपे व कलमे विक्रीकरिता उपलब्ध केली जातात. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्याशी गेली 15 वर्षे पितांबरी संलग्न आहे. त्यांच्यामार्फत शेती विषयातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रमाणित मातृवृक्षांपासून ही सर्व रोपे व कलमे तयार केली जातात.
भाजीपाला रोपनिर्मितीसाठी व चंदन रोपनिर्मितीसाठी ’पॉलीहाउस’ या शेतीतील प्रगत तंत्राचा वापर केला जात आहे. याशिवाय ’बेडवर’ फक्त भाजीपाला रोपांची निर्मिती केली जाते, ज्यामध्ये वांगी, मिरची, टॉमेटो, कलिंगड इ. रोपांची निर्मिती जास्त प्रमाणात होते.
याबरोबरच वनस्पतींच्या व पिकांच्या उत्तम वाढीकरिता, तसेच जमिनीची गुणवत्ता वाढविण्याकरिता देशी गायीच्या शेणापासून तयार केलेले ’गोमय’ हे सेंद्रिय खतदेखील येथे विक्रीकरिता उपलब्ध आहे. गोमय सेंद्रिय खताला महाराष्ट्र राज्याच्या शेती विभागाकडून सेंद्रिय प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. त्याशिवाय बागकामाकरिता विशेषत्वाने विकसित केलेली विविध अवजारेदेखील पितांबरी नर्सरीमध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहेत.
पितांबरी नर्सरीमध्ये कृषी, उद्यान, वनशास्त्र तज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल व अनुभवी कारागीरांद्वारे सर्व रोपांची नियमित जोपासना केली जाते. तसेच आवश्यकतेप्रमाणे रोपांची कलमे व अभिवृद्धी केली जाते.
सुरुवातीला 2 एकर एवढ्या जागेत पितांबरी नर्सरी सुरू करण्यात आली होती. सद्य:स्थितीत दापोली येथे 27 एकर जमिनीवर, तर तळवडे राजापूर येथे 11 एकर जमिनीवर (एकूण 38 एकर जमिनीवर) पितांबरी नर्सरी आहे. याशिवाय 5 एकर जमिनीवर 32 प्रकारच्या बाबूंची लागवड, 10 एकरावर सोनचाफा, 2 एकरावर आंबा, 2 एकरावर काजू इ. मातृवृक्षांचीही लागवड करण्यात आली आहे. अशा प्रकारे पितांबरी नर्सरी फ्रँचायसीअंतर्गत वर्षाला 3 ते 5 लाख झाडांची विक्री होते.
अशी प्रमाणित मातृवृक्षांपासून निर्मित सर्व रोपे, कलमे व सुविधा महाराष्ट्रातील अन्य ठिकाणीही उपलब्ध करून देता याव्यात, याकरिता पितांबरीने एक अभिनव संकल्पना मांडली. पितांबरीची एफएमसीजी क्षेत्रातील अभिनव उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरिता पितांबरीकडे देशातल्या सर्व राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुपरस्टॉकिस्ट, एजंट व दुकानदार अशी विस्तृत आणि सक्षम अशी विक्रीसाखळी तयार आहे. अशाच प्रकारची रचना करून पितांबरी नर्सरीमार्फत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात अस्सल जातिवंत रोपे व कलमे उपलब्ध करून देण्याकरिता ’पितांबरी नर्सरी फ्रँचायसी’ ही योजना तयार करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्टॉकिस्ट व प्रत्येक तालुक्यात एक नर्सरी फ्रँचायसीधारक नियुक्त करण्यात येतो. या सुपरस्टॉकिस्टकडे पितांबरी नर्सरीमार्फत अस्सल जातिवंत रोपे व कलमे पोहोचविली जातात व त्यांच्याकडून फ्रँचायसीधारकांना त्यांच्या मागणीनुसार अस्सल जातिवंत रोपे व कलमे उपलब्ध करून देतात. याद्वारे महाराष्ट्रातील शेतकर्यांना वर्षभर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो. रोपांच्या, कलमांच्या उपलब्धतेबरोबरच नर्सरी चालविण्यासाठी लागणारे अन्य साहित्य - उदा., साइन बोर्ड, स्टेशनरी, बिलिंग सॉफ्टवेअर इ. सामग्रीदेखील पितांबरीकडून पुरविण्यात येते.
शेतकर्यांना उत्कृष्ट, दर्जेदार व खात्रीलायक रोपे वाजवी दरात पुरविणे याबरोबरच पितांबरी नर्सरी फ्रँचायसी हा केवळ खात्रीशीर उत्पन्नाचा व्यवसायच नव्हे, तर वसुंधरा बचाव अभियानाचा एक भागही आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आणि 357 तालुक्यांमध्ये पितांबरी नर्सरीच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत 1 कोटी वृक्षलागवडीचे पितांबरीचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक व प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशा प्रकारे नर्सरी फ्रँचायसीचा विस्तार करणे हे पितांबरी नर्सरी फ्रँचायसीचे मुख्य उद्धिष्ट आहे.
आजपर्यंत महाराष्ट्रात 27हून अधिक फ्रँचायसीधारक झाले असून याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात, तसेच महाराष्ट्राबाहेर गोवा व आंध्र प्रदेश राज्यांतही ग्राहकांचा विस्तार झाला आहे. यामुळे अधिकाधिक संख्येने पितांबरी नर्सरी फ्रँचायसी योजनेत सहभागी व्हा व खात्रीशीर उत्पन्न मिळवा!
पितांबरी नर्सरीच्या आकर्षक संकल्पना
वृक्षलागवड ही केवळ आवड किंवा व्यावसायिक लाभाची बाब न राहता ती पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक मोहीम व्हावी, याकरिता सर्वसाधारण रोपे व कलमे विक्रीबरोबरच पितांबरी नर्सरीमार्फत काही वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनाही राबविल्या जातात.
पंचहरितक्षेत्र - यामध्ये गावातील 1) ग्रामपंचायत क्षेत्र, 2) शाळा, 3) जलाशय (तलाव, नदी इ.), 4) देवालये व 5) घरे या सर्व ठिकाणी वृक्षलागवड केली जाते, जेणेकरून संपूर्ण गाव हिरवेगार होईल.
फूलपुडी - दररोजच्या देवपूजेसाठी लागणार्या फुलांची रोपे - उदा., मोगरा, शेवंती, झेंडू, निशिगंधा, तुळस, दुर्वा.
मियावाकी - 1 गुंठा ते 1 एकर क्षेत्रात अनेक प्रकारच्या वृक्षांची अधिक संख्येत जवळ जवळ लागवड केली जाते.
लाखीबाग - एक एकरात एक लाखाचे हमखास उत्पन्न देणारी लागवड.
नक्षत्र उद्यान - 27 नक्षत्रांना अनुकूल असणारे 27 प्रकारचे वृक्ष.
पंचमहाभूत तत्त्व - पृथ्वी (वड), आग (पिंपळ), पाणी (औदुंबर), आकाश (बेल), हवा (चंदन) या पाच महाभूतांची तत्त्वे असणारे वृक्ष.
पितांबरी नर्सरी फ्रँचायसीकरिता अधिक माहितीकरिता नरेश शिंदे - 9867112714 किंवा 022-6703 5555 या क्रमांकांवर संपर्क साधावा.