एक अनाम, अनिकेत नायक!

24 Nov 2023 15:50:16
 @डॉ. मनमोहन वैद्य
 
vivek  हिंदुत्व विचाराचा एक उत्तुंग वैचारिक योद्धा, हृदयस्पर्शी संवादपटू वक्ता , चौकटीबाहेरील विचारवंत आणि भारत राष्ट्रासाठी समर्पित असलेल्या अशा एका संघऋषीचा जीवनप्रवास थांबला. केरळमधील हिंसक डाव्या विचारसरणीच्या बालेकिल्ल्यात सतत संघर्ष करत असताना, ध्येयसमर्पित, ध्येयासक्त संघयात्रींची शृंखला मालिका निर्माण करणार्‍या या महान व्यक्तीला, ज्येष्ठ मार्गदर्शकाला आदरपूर्वक अभिवादन...
रविवार, 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, माजी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख रंगा हरीजी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि निजधामाकडे प्रस्थान केले. हिंदुत्व विचाराचा एक उत्तुंग वैचारिक योद्धा (ीेुंशीळपस ळपींशश्रश्रशर्लीींरश्र ुरीीळेी), हृदयस्पर्शी संवादपटू वक्ता (र हशरीीुंरीाळपस लेर्पींशीीरींळेपरश्रळीीं), चौकटीबाहेरील विचारवंत (रप र्ेीीं ेष ींहश लेु ींहळपज्ञशी) आणि भारत राष्ट्रासाठी समर्पित असलेल्या अशा एका संघऋषीचा जीवनप्रवास थांबला. मृत्युसमयी ते 93 वर्षांचे होते. रंगा हरीजी वयाच्या 13व्या वर्षी स्वयंसेवक झाले आणि ते तब्बल 80 वर्षे संघकार्यात सतत सक्रिय राहिले. 1983 ते 1993पर्यंत ते केरळचे प्रांत प्रचारक होते. तद्नंतर 1991 ते 2005पर्यंत ते अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. संघाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतरही, रॉबिन शर्मा यांनी लिहिलेल्या अ श्रशरवशी ुहे हरव पे ढळींश्रश या पुस्तकातील वर्णनानुसार, रंगा हरीजी स्वयंसेवक म्हणून अखंड कार्यरत होते.
 
 
कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या केरळमध्ये संघाच्या राष्ट्रीय विचाराचे बीजारोपण आणि सर्वसमावेशक नसलेल्या (एुलर्श्रीीर्ळींळीूं), हिंसक डाव्या विचारसरणीच्या वैचारिक अन् वास्तविक आव्हानांना समर्थपणे उत्तर देऊन केरळमध्ये हिंदुत्वाच्या सर्वसमावेशक आणि राष्ट्रीय विचाराची प्रस्थापना करण्यात ज्ञाननिष्ठ आणि कष्टाळू कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. रंगा हरीजी हे त्यांच्यातील एक महत्त्वाची व्यक्ती होते. हिंसक कम्युनिस्टांशी रक्तरंजित संघर्षात संघाच्या 298 स्वयंसेवकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यापैकी 70% असे होते, जे कम्युनिस्ट विचारधारा सोडून ते संघाचे स्वयंसेवक बनले होते. या सर्व स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे, त्यांचे सांत्वन करणे आणि त्यांना संघाशी जोडून ठेवणे अतिशय कठीण कार्य होते. त्यासाठी लागणारी हृदयाची दृढता कशी मिळवायची? एके दिवशी मी त्यांना याबद्दल विचारले असता ते अचानक रडायला लागले. अशा संघर्षमय जीवनात अनेकदा कठोरपणाने निर्णय घ्यावे लागतात. पण रंगा हरीजींचे हृदय किती संवेदनशील आणि कोमल आहे, हे मला त्या दिवशी प्रत्यक्ष जाणवले.
 
 
गंभीर आणि गूढ विषय विनोदी शैलीत उदाहरणांसह समजावून सांगणे ही त्यांची खासियत होती. त्यांच्याकडे संस्कृत श्लोकांचे आणि सुभाषितांचे विपुल भांडार होते. त्यांच्या वाचनात आलेल्या तसेच त्यांच्या लेखनात आणि उद्बोधनात वापरलेल्या अशा उत्तम शब्दांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे. या संग्रहाचे नावही खूप अर्थपूर्ण आहे - ‘ सुधा वाणी सुधी वाणी’. नवनवीन भाषा शिकण्याचा त्यांचा उत्साह आणि तंत्र अनुपम होते. ते जेव्हा पहिल्यांदा गुजरातमध्ये आले, तेव्हा इतक्या कमी वेळात गुजराती वाचायला आणि बोलायला शिकलेले पाहून मला आश्चर्य वाटले. ते निरंतर वाचन करीत, मूलभूत विचार करीत आणि त्याचा गहन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांची आतापर्यंत विविध विषयांवर लिहिलेली 62 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक श्रीगुरुजी गोळवलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (2005-2006) श्रीगुरुजींनी आपल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ (1940-1973) कार्यकाळात दिलेली असंख्य व्याख्याने आणि बौद्धिके यांचे एकत्रीकरण करून त्याचे सुयोग्य वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘श्रीगुरुजी समग्र’ नावाच्या 12 खंडांच्या प्रकाशनाच्या ह्या भगीरथ कार्यात रंगा हरीजींचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्याचप्रमाणे श्रीगुरुजींच्या कालातीत चिरंतन विचारांचा अमृतकुंभ ‘श्रीगुरुजी - दर्शन और कार्य’ (डहीळ र्र्ॠीीीक्षळ - तळीळेप रपव चळीीळेप) आणि ‘श्रीगुरुजींचे जीवन चरित्र’ हे त्यांचे दोन ग्रंथ जन्मशताब्दीनिमित्ताने केलेल्या वैचारिक साधनेचा मधुर परिपाक आहेत.
 
 
केरळमधील हिंस्र कम्युनिस्ट गुंडांशी लढत देत असतानादेखील कम्युनिस्ट नेत्यांशी संवादाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी रंगा हरीजी यांनी पुढाकार घेतला होता. अशाच एका संवादप्रसंगी थोर विचारवंत दत्तोपंत ठेंगडीजीदेखील उपस्थित होते. ‘संघर्षग्रस्त केरळमध्ये शांतता कशी प्रस्थापित केली जाऊ शकते?’ या विषयावर केसरी या मल्याळम साप्ताहिकाने एक लेखमालिका सुरू केली होती. तेव्हा संपादकांना पत्र लिहून या उपक्रमाबद्दल आभार मानणारे रंगा हरीजी हे पहिले होते.
 
 
स्वत: चौकटीबाहेरचा विचार करणे व आपल्या सहकार्‍यांना चौकटीबाहेरचा विचार करण्यास (ढहळपज्ञ र्ेीीं-ेष-ींहश-लेु) प्रोत्साहित करणे ही त्यांची खासियत होती. नवनवीन कल्पनांना योग्य दिशा देऊन नवनवीन विचार, वाचन करण्यास ते नेहमीच प्रोत्साहन देत असत.
 
 
दीप्ती वर्मा ही एक नवोदित लेखिका आहे, जिने ‘पंचकन्या’ नावाचे खूप चांगले पुस्तक लिहिले आहे. अहल्या, द्रौपदी, कुंती, तारा आणि मंदोदरी या पंचकन्या प्रात:स्मरणीय आहेत, त्यामुळे आजच्या सहस्रकातील (ाळश्रश्रशपपळरामधील) मुलींनी त्यांच्या आयुष्यातून कोणता संदेश घ्यावा, या हेतूने लिहिलेले हे उत्कृष्ट पुस्तक आहे आणि ते आजच्या मुलींमध्ये अतिशय लोकप्रियही आहे. या मालिकेतील अहल्या हा पहिला लेख दीप्तीजींनी रंगा हरीजी यांना त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी पाठवला होता. दीप्ती ही लेखिका रंगा हरीजींच्या नातीच्या वयाची, नातीसारखीच आहे. मात्र नव्या कल्पनेचे, नव्या दृष्टीकोनाचे स्वागत करताना आपल्या पत्राच्या अखेरी तिला आशीर्वाद देण्याऐवजी त्यांनी त्यांच्यासह ‘भक्तवत्सल भगवान आपल्या सर्वांचे कल्याण करो’ असे लिहिले आहे. यात त्यांची नम्रताच दिसून येते. ते मूळ इंग्लिशमधील पत्र पुढीलप्रमाणे आहे -
 
 
विनोद (र्र्हीोीी) हा रंगा हरीजींच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. संघाच्या अखिल भारतीय बैठकांनंतरच्या मोकळ्या वेळात (षीशश ींळाशमध्ये) कुठेही कार्यकर्त्यांचा घोळका दिसला, येणारे-जाणारे कार्यकर्ते त्या घोळक्यात उत्साहाने सामील होताना दिसले आणि त्यातून अचानक हास्याची कारंजी उडत असली, तर त्या घोळक्याच्या मध्यभागी रंगा हरीजी हमखास दिसायचे. तशी त्यांची शारीरिक उंची खूपच कमी (5 फुटांपेक्षा कमी) होती, त्यामुळे अशा घोळक्यात ते बाहेरून दिसत नसत. पण तिथून अचानक उडालेली विनोदाची कारंजी त्यांच्या उपस्थितीचे संकेत देत असत.
 
 
मी कुठेतरी प्रसिद्ध लेखक खलील जिब्रान यांची र्धेीी उहळश्रवीशप ही कविता वाचली होती. अनेकदा मी ती उद्धृतही करीत असे. पण मला माहीत असलेली कविता अपूर्ण आहे हे मला माहीत नव्हते. एकदा एका ठिकाणी मी त्या कवितेचा उल्लेख केला, तेव्हा रंगा हरीजीही तिथे उपस्थित होते. बोलणे संपल्यावर त्यांनी अर्धी कविता बाकी असल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले. ई-मेलचा तो काळ नव्हता. त्या वेळी मुंबई हे रंगा हरीजींचे केंद्र होते. आपला नियोजित प्रवास संपवून ते दोन महिन्यांनी मुंबईला पोहोचले आणि मला खलील जिब्रानची र्धेीी उहळश्रवीशप ही संपूर्ण कविता लिहून पाठवली आणि आपल्या विनोदी शैलीत पत्राच्या शेवटी लिहिले - ऊशरी चरपोहरप, ीशपवळपस ‘र्धेीी उहळश्रवीशप’ ीें ेपश ुहे हरी पेपश लू ेपश ुहे रश्रीे हरी पेपश. - ठ. करीळ. (’संघ’ हा विषय नवीन असलेल्या वाचकांसाठी - रंगा हरीजी संघाचे प्रचारक होते अन् मीही संघप्रचारकच आहे आणि प्रचारक अविवाहित असतात.)
 
 
प्रचारक ’अनिकेत’ असतो, पण त्याचे एक केंद्र असते आणि ते संघटनेच्या आवश्यकतेनुसार संघ निश्चित करतो. रंगा हरीजींचे केंद्र मुंबई हे वरती नमूद केले आहे. त्या वेळी एकदा ते गुजरातमध्ये प्रवासासाठी आले असता एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या घरी आम्ही एकत्र गेलो होतो. सुरुवातीच्या संभाषणात त्या उद्योगपतीने रंगा हरीजींना सहज विचारले, “हरीजी, तुम्ही कधी आलात?” आणि त्यांना हे जाणून घ्यायचे होते की हरीजी गुजरातमध्ये किती दिवस राहणार आहेत, म्हणून त्यांनी सहजच पुढे हेही विचारले की, “तुम्ही कधी परतणार आहात?” हरिजींचे तत्काळ उत्तर होते - “मी तीन दिवसांनी येथून दिल्लीला जात आहे. परतणे इथे नाही. कारण माझे केंद्र मुंबई आहे. मी मुंबईला जातो ते परतणे असते. तसे परतल्यावर तुम्हाला कळवतो.” अनौपचारिक संभाषणातही हरीजींनी प्रकट केलेल्या त्या ’अनिकेत’तेच्या सजग जाणिवेने मी आश्चर्यचकित, प्रभावित झालो होतो.
 
 
रंगा हरीजींनी आपल्या जीवनातून, आचरणातून आणि व्यवहारातून अनेकांना अनेक गोष्टी सहजतेने शिकवल्या आहेत. परंतु मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी मृत्यूची चाहूल लागत असताना त्यांनी त्यांच्या मृत्यूविषयी जे लिहिले होते, तेही प्रेरणादायक आणि मार्गदर्शक असेच आहे. त्यांनी केरळमधील संघाच्या सर्व संबंधित अधिकार्‍यांना लिहिलेली सीलबंद पत्रे केरळच्या प्रांत प्रचारकांकडे ठेवायला दिली होती आणि आपल्या मृत्यूनंतरच ती उघडली जावीत अशी सूचनाही दिली होती. हरिजींच्या निर्वाणानंतर ती उघडली. त्यात रंगा हरीजींनी लिहिले होते की, ‘मनुष्य जिवंत असेपर्यंत आपल्या इच्छेनुसार सर्व काही करू शकतो, परंतु मृत्यूनंतर तो स्वत: काही कृती करू शकत नाही. त्यासाठी त्याला इतरांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून मी प्रार्थना करतो की -
माझ्या मृत्यूनंतर माझ्या पार्थिवावर कोणत्याही विशिष्ट जातीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू नये, तर सर्वसामान्य लोकांच्या स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करावे. मी आयुष्यभर जातिभेदावर विश्वास ठेवला नाही, मृत्यूनंतरही मला तेच करायचे आहे.
’आईवरम मठम’ हे केरळमधील ऐतिहासिक ठिकाण असून ’भारत’ नदीच्या काठावर असलेले आहे. जिथे सर्व पांडवांनी त्यांच्या पूर्वजांचे पिंडदान केले होते, तेथे माझे अंत्यसंस्कार केले जावेत. नंतर माझा अस्थिकलश एखाद्या विशेष व्यक्तीप्रमाणे दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जित करण्याऐवजी जवळच्याच जलाशयात विसर्जित करण्यात यावा.
 
मी ब्रह्मकपाल येथे माझे श्राद्ध आणि पिंडदान केले आहे, त्यामुळे कोणीही माझे पिंडदान किंवा श्राद्ध करण्याची गरज नाही.
माझ्या सर्व प्रकाशित पुस्तकांचे अधिकार मी संघाला देतो आहे.
 
 
केरळमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचे मृतदेह लाल कापडात गुंडाळून जाळण्याची परंपरा आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून संघस्वयंसेवकांचे मृतदेह भगव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून त्यांचे दहन करण्याची अयोग्य परंपरा केरळमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने सुरू झाली. पण हे अयोग्य आहे. भगवा हा आपला गुरू आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी माझा मृतदेह भगव्या कपड्यात गुंडाळू नये.’
 
 
अशा प्रकारे रंगा हरीजींनी आपली शेवटची इच्छा लिहून ठेवली होती. त्यांनी आयुष्यभर आपल्या आचरणातून आपल्याला जगायला शिकवले आणि आपल्या मृत्युसमयीदेखील आपल्याला एक बोध आणि दिशा देऊन त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला.
रंगा हरीजींनी आपल्या आयुष्यातील शेवटची प्रार्थना तीन संस्कृत श्लोकांतून व्यक्त केली आहे -
 
मामिकान्तिम प्रार्थना..
 
करणीयं कृतं सर्वम् तज्जन्म सुकृतं मम
धन्योस्मि कृतकृत्योस्मि गच्छाम्यद्य चिरं गृहम् ॥ 1 ॥
कार्यार्थं पुनरायातुम् तथाप्याशास्ति मे हृदि
मित्रै सह कर्म कुर्वन् स्वान्त: सुखमवाप्नुयाम् ॥ 2 ॥
एषा चेत् प्रार्थना धृष्टा क्षमस्व करुणानिधे
कार्यमिदं तवैवास्ति तावकेच्छा बलीयसी ॥ 3 ॥
 
 
अर्थ - सर्व जीवितकार्य पूर्ण करून मी धन्य, कृतकृत्य झालो म्हणूनच आज मी निजधामाकडे निघालो आहे. मात्र, याच कार्यासाठी मला परत येण्याची इच्छा आहे, माझ्या सहकार्‍यांसोबत हे काम अधिकाधिक केल्यास मला सुख मिळेल. माझ्या या प्रार्थनेतील धृष्टतेसाठी, हे करुणानिधे! मला क्षमा करा. हे कामही तुमचे आहे आणि तुमचीच इच्छा बलवत्तर आहे.
 
 
स्वत:च्या मृत्युसमयीदेखील असे संतुलित, आशावादी विचार आणि संपूर्ण समर्पण पाहून मराठीतील एक श्रेष्ठ कवी बा.भ. बोरकर यांच्या एका कवितेच्या काही ओळी आठवतात -
 
देखणा देहांत तो जो, सागरी सूर्यास्त सा।
अग्निचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा॥
 
 
हिमालयासारख्या उंचीवर पोहोचलेल्या अशा एका व्यक्तीला आपण सर्वांनी प्रत्यक्ष पाहिले, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे सहकारी बनून, सामान्य स्वयंसेवक असूनही आपण त्यांच्या मित्रभावनेने स्नेहसिंचित झालो. हे असे इतके सहज झाले की यावर विश्वास बसत नाही. केरळमधील हिंसक डाव्या विचारसरणीच्या बालेकिल्ल्यात सतत संघर्ष करत असताना, ध्येयसमर्पित, ध्येयासक्त संघयात्रींची शृंखला मालिका निर्माण करणार्‍या या महान व्यक्तीला, ज्येष्ठ मार्गदर्शकाला आदरपूर्वक अभिवादन...
कवी बा.भ. बोरकरांच्या वरील कवितेतील आणखी दोन ओळी स्मरतात -
 
देखणी ती पाउले जी ध्यासपंथे चालती।
 
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्में रेखती॥
 
 
 
लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह आहेत.
Powered By Sangraha 9.0