कृतार्थ जीवन

16 Oct 2023 16:29:25
1977पासून माझा मोहनराव ढवळीकर यांच्याशी संबंध येऊ लागला. ते जरी नवी मुंबईत राहत होते, तरी त्यांच्याकडे चेंबूर भागातील संघकामाची जबाबदारी होती. मुंबईतील पार्ले भाग आणि चेंबूर भाग यांच्यात संघवाढीसाठी निर्मळ स्पर्धा असे. चेंबूर भागात छोटी गावे खूप होती. माहुल, गवाणपाडा, तुर्भे, मंडाला इ. त्यांची नावे होती. तेथे स्थानिक कोळ्यांची वस्ती आहे आणि या प्रत्येक गावात संघकार्य घरोघर पोहोचलेले होते. अनेक कार्यकर्त्यांचे परिश्रम त्यासाठी कारणीभूत होते. मोहन ढवळीकर हे त्यातील एक होते. जन्माला आलेली माणसे आपल्या परीने जीवन जगतच असतात. परंतु जीवनाचे सार्थक केले असे म्हणणारी माणसे विरळ असतात. मोहन ढवळीकर त्यातील एक होते. त्यांच्या स्मृतीस प्रणाम.

vivek

संघसंस्थापक म्हणत असत की ‘संघाचे भूत तुमच्यावर स्वार होऊ द्या.’ हेडगेवार कुळातून संघभूतबाधा झालेले हजारो कार्यकर्ते उभे राहिले. मोहनराव ढवळीकर हे त्यातील एक होते. नवी मुंबईतील वाशी येथे त्यांचे निवासस्थान आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाले. मी त्यांना भेटायला गेलो होतो. पत्नीच्या निधनाचा धक्का त्यांनी सहन केल्याचे जाणवले. परंतु दोन वर्षांनंतर त्यांच्यावरच मृत्युलेख लिहिण्याची पाळी येईल, असे मला वाटले नाही.
 
मी मुंबईतील संघकामातील एक कार्यकर्ता होतो. आणीबाणी उठल्यानंतर 1977पासून माझा मोहनराव ढवळीकर यांच्याशी संबंध येऊ लागला. ते जरी नवी मुंबईत राहत होते, तरी त्यांच्याकडे चेंबूर भागातील संघकामाची जबाबदारी होती. मुंबईतील पार्ले भाग आणि चेंबूर भाग यांच्यात संघवाढीसाठी निर्मळ स्पर्धा असे. चेंबूर भागात छोटी गावे खूप होती. माहुल, गवाणपाडा, तुर्भे, मंडाला इ. त्यांची नावे होती. तेथे स्थानिक कोळ्यांची वस्ती आहे आणि या प्रत्येक गावात संघकार्य घरोघर पोहोचलेले होते. अनेक कार्यकर्त्यांचे परिश्रम त्यासाठी कारणीभूत होते. मोहन ढवळीकर हे त्यातील एक होते.


राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ग्रंथ
संघ ग्रंथ नोंदणीसाठी  https://www.evivek.com/rss-vishesh-granth/

 
 
ते आरसीएफमध्ये नोकरी करत होते. संध्याकाळी सुटल्यानंतर त्यांचा संघप्रवास सुरू होई. तो संपवून मग ते घरी जात. हा त्यांचा प्रवासयज्ञ दोन-अडीच दशके चालू राहिला. अथक परिश्रम, प्रचंड संपर्क, विविध स्तरांतील व्यक्तींना संघकार्याशी जोडणे हे त्यांचे कार्य अफाटच होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रसन्न होते. कितीही ताणतणाव निर्माण झाले, तरी त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य कधीही लोप पावले नाही.

चेंबूर भागात छोटी गावे खूप होती. माहुल, गवाणपाडा, तुर्भे, मंडाला इ. त्यांची नावे होती. तेथे स्थानिक कोळ्यांची वस्ती आहे आणि या प्रत्येक गावात संघकार्य घरोघर पोहोचलेले होते.
 vivek

संघकार्य विविध क्षेत्रांत विस्तारत गेले. या विस्तारित कार्याची जबाबदारी जाणकार आणि परिश्रमी संघकार्यकर्त्याकडे द्यावी लागते. मोहन ढवळीकर यांच्या शिरावर अशा अनेक जबाबदार्‍या आल्या. चेंबूर विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यवाह, विश्व संवाद केंद्र यांचेही कार्यवाह, तरुण भारत संस्था अशा विविध संस्थांची जबाबदारी त्यांच्याकडे येत गेली. त्यातील सर्व विषयांचे ज्ञान त्यांच्याकडे होते, असे नाही. परंतु संघकार्यकर्ता, जी जबाबदारी आली त्यासाठी स्वत:ला लायक करतो, स्वत:चा विकास करून घेतो. मोहनराव ढवळीकर या बाबतीत एक आदर्श स्वयंसेवक होते.
 
सामाजिक समरसता मंचाचे एक काम समरसता साहित्य परिषद या नावाने सुरू झाले. ते जेव्हा सुरू झाले, तेव्हा सर्व विषय नवीन होता. 14वे समरसता साहित्य संमेलन चेंबूर हायस्कूलमध्ये भरविण्याचा निर्णय झाला. साहित्य संमेलनाच्या उभारणीची जबाबदारी मोहन ढवळीकर यांच्यावर सोपविण्यात आली. संघकार्यकर्त्यांना शिबिराची उभारणी कशी करायची याची माहिती असते. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ कसे उभे करायचे, मंडपाची रचना कशी करायची, सजावट कशी करायची असे सर्व विषय संघकार्यकर्त्याला नवीन असतात. 2012चे 14वे समरसता साहित्य संमेलन यशस्वी करण्यात मोहन ढवळीकरांनी खूप परिश्रम घेतले. संमेलन हे खर्चीक काम असते. त्यासाठी लागणारा पुरेसा निधी मोहनरावांनी उभा केला. असे होते मोहनराव.

2012चे 14वे समरसता साहित्य संमेलन यशस्वी करण्यात मोहन ढवळीकरांनी खूप परिश्रम घेतले. संमेलन हे खर्चीक काम असते. त्यासाठी लागणारा पुरेसा निधी मोहनरावांनी उभा केला.
नंतरच्या काळात राजकीय परिवर्तने होत गेली. संघस्वयंसेवक सत्तास्थानी पोहोचले. त्यांच्याविरुद्ध अपप्रचाराची कथानके रचण्यात आली. त्यातील एका कथानकाचा विषय होता की, संघ संविधानविरोधी आहे, संविधान बदलण्याचा संघाचा आणि भाजपाचा छुपा अजेंडा आहे. ‘संविधान बचाव’चे मोर्चे काढण्याची नाटके करण्यात आली. तेव्हा गरज निर्माण अशी झाली की संविधान काय असते हे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याची.
 

vivek 

दोन-तीन वर्षांपूर्वीच समरसता अध्ययन केंद्र सुरू करण्यात आले. त्याचा एक न्यास तयार करण्यात आला. कार्यवाह म्हणून मोहन ढवळीकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. समरसता अध्ययन केंद्रातर्फे 24 आणि 25 मार्च 2018ला संविधान अभ्यासवर्ग घेण्याचे निश्चित करण्यात आले. यशवंत भवनच्या सभागृहात दोन दिवसांचा अभ्यासवर्ग घेण्याचे ठरले. संघाचे अखिल भारतीय अधिकारी मधुभाई कुलकर्णी आणि शामप्रसादजी हेे या वर्गाला उपस्थित होते. संघाच्या वाटचालीत संविधान विषयावरचा हा पहिलाच वर्ग होत होता. त्याची रचना अतिशय काटेकोरपणे करण्यात आली. संविधानाचे दोन दिवसांचे विषय निश्चित करण्यात आले. मोहनराव ढवळीकर अशा सर्व बैठकांना उपस्थित असत. ठरलेल्या वक्त्यांशी संपर्क साधण्याचे कामही त्यांनी केले. योजना केल्याप्रमाणे हा वर्ग यशस्वीरित्या पार पडला.
त्यानंतर महाराष्ट्रात आणि पुढे हळूहळू देशभर संविधान या विषयाची मांडणी होऊ लागली. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस शेकडो ठिकाणी कार्यकर्त्यांनी साजरा केला. समरसता कामातील तो एक आता भाग झालेला आहे.
बाळासाहेब देवरसांच्या शब्दात सांगायचे तर ते देवदुर्लभ कार्यकर्त्यांत मोडणारे होते.
 
समरसता अध्ययन केंद्राचे कार्यवाह म्हणून मोहनराव ढवळीकरांचे हे योगदान ऐतिहासिक ठरले आहे. समरसता अध्ययन केंद्राला कार्यकर्ते जोडून देण्याचे काम त्यांनी केले. जी जबाबदारी आपल्याकडे येईल, तिचे एकनिष्ठेने पालन करणे हा त्यांचा संघस्वभाव होता. बाळासाहेब देवरसांच्या शब्दात सांगायचे तर ते देवदुर्लभ कार्यकर्त्यांत मोडणारे होते.
 
त्यांचे निधन हे तसे आकस्मिक निधन म्हटले पाहिजे, म्हणून ते मनाला चटका लावून गेले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर दिवसभर त्यांची प्रतिमा डोळ्यापुढून हलत नव्हती. अजातशत्रू भास्करराव मुंडले यांच्या आठवणींच्या पुस्तकाचे काम हे त्यांचे अखेरचे संघकार्य होते. भास्कररावांच्या कन्या राधा भिडे यांना त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य केले. भास्कररावांवरील पुस्तक उत्तम होईल याची शेवटच्या क्षणापर्यंत चिंता केली. परंतु विधिलिखित असे विचित्र की पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर त्यांची प्राणज्योत मालवली.

 
जन्माला आलेली माणसे आपल्या परीने जीवन जगतच असतात. परंतु जीवनाचे सार्थक केले असे म्हणणारी माणसे विरळ असतात. मोहन ढवळीकर त्यातील एक होते. त्यांच्या स्मृतीस प्रणाम.
Powered By Sangraha 9.0