भारतीय पुरातत्त्व विभागाने इसवीसन 1915मध्ये संरक्षित जागा म्हणून घोषित केलेले भारतातील सगळ्यात जुने मंदिर!
मूळ मंदिर शिवाचे असले, तरी देवी दुर्गेचा अवतार मानलेली मुंडेश्वरी या मंदिरात आहे. तिने येथे मुंड राक्षसाचा पराभव केला आहे. मंदिर गुप्तकालीन आहे, त्यामुळेच पाटलीपुत्र आणि मगध काळातील नागर शैलीचा प्रभाव आहे. मंदिर अष्टकोनी असून काहींच्या मते त्या काळी चार दरवाजे होते, जे कालौघात नष्ट झाले आहेत आणि आता दोनच दरवाजे उरले आहेत. उरलेल्या देवळात महिरपी, वेलबुट्टी असे कोरीवकाम दिसते. कोणे एके काळी या मंदिरावर शिखर होते, जे कालांतराने पडझड होऊन आता फक्त आडवी शिला छप्पर म्हणून बसवली आहे.
येथील देवीचे डोळे अतिशय तेजस्वी आहेत. या मंदिराला भेट द्यायला जवळपास 11-12 लाख पर्यटक येतात.