इंग्लंड इस्लामी मूलतत्त्ववादाच्या विळख्यात

22 Sep 2022 18:01:50
भारतासह ज्या ज्या देशातून हिंदू इंग्लंडमध्ये राहायला गेले, त्यांना पाकिस्तान व अन्य मुस्लीमबहुल देशातल्या जिहादी मुस्लिमांनी त्रास द्यायला सुरुवात केली. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी घेतलेल्या सौम्य भूमिकेमुळे बर्मिंगहॅमजवळच्या स्मेथविक शहरातील दुर्गादेवी मंदिरावरही हल्ला केला. तिथल्या ओम् लिहिलेल्या भगव्या ध्वजाची नासधूस केली. या सगळ्या घटनांमुळे इंग्लंडमधील हिंदू सुरक्षित नसल्याचा आणि हा देश मूलतत्त्ववाद्यांना पाठीशी घालत असल्याचा संदेश जगभर पोहोचत आहे. 
 
england
 
भारतावर जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती, तेव्हा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीय नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर उभी फूट पाडली. परिणामी, धर्माच्या आधारे फाळणी होऊन भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान नावाचे इस्लामी मूलतत्त्ववादाला खतपाणी घालणारे राष्ट्र निर्माण झाले. या राष्ट्राला सतत पंखाखाली घेण्याचे, त्याच्या कारवायांकडे दुर्लक्ष करण्याचे धूर्त धोरण इंग्लंडसह जगातल्या अनेक राष्ट्रांनी अवलंबले. त्यामुळेच कोणतीही भौतिक प्रगती करू न शकलेल्या या देशातले मूलतत्त्ववादी आपल्या उपद्रवमूल्याच्या भांडवलावर आज जगभर उन्माद करत आहेत. त्यातून इंग्लंडही सुटला नाही, याचे अनेक दाखले गेल्या काही दिवसांत सातत्याने मिळत आहेत. हिंदू-मुस्लीम संघर्ष पेटता ठेवण्यासाठी ज्या सापाला दूध पाजायचे पुण्यकर्म ब्रिटिशांनी केले, तोच साप इंग्लंडमधील शांततापूर्ण समाजजीवनाला चूड लावतो आहे, तेही इंग्लंडमध्ये स्वकर्तृत्वाच्या बळावर स्वत:चे स्थान निर्माण करणार्‍या हिंदूंना लक्ष्य करून.
 
 
लेसेस्टर हा इंग्लंडमधील हिंदूबहुल भाग. हिंदूबहुल असणारे युरोपातील हे दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण. भारताबाहेर सगळ्यात मोठा दीपोत्सव होतो तो या शहरात, अशी या शहराची ख्याती. गेली सात दशके शांततापूर्ण समाजजीवन जगणार्‍या इथल्या हिंदूंना मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी वेठीस धरले. निमित्त झाले नुकत्याच झालेल्या आशिया कपचे. भारताने पाकिस्तानचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली, तेव्हा लिसेस्टर येथील हिंदूंनीही घराबाहेर एकत्र येत हा विजयोत्सव साजरा केला. हातात भारताचा ध्वज घेऊन घोषणा दिल्या, गाणी म्हटली, पण कुठेही इस्लामच्या वा मुस्लिमांच्या विरोधात घोषणा दिल्या नाहीत. तरीही या विजयोत्सवामुळे चवताळलेल्या मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी जमलेल्या हिंदूंना मारहाण केली, त्यात काहींना गंभीर दुखापत झाली. या हिंदू जमावाच्या हातातील भारतीय ध्वजाचा अपमान केला. या हिंदूंनी मुस्लीम/इस्लामविरोधात घोषणा दिल्या असा धादांत खोटा प्रचार समाजमाध्यमांच्या मदतीने करायला सुरुवात केली. या भागातील संसद सदस्य क्लॉडिया वेब, जी भारतद्वेष्टी म्हणून ओळखली जाते, तिने या मूलतत्त्ववाद्यांनी केलेल्या खोट्या प्रचाराचा प्रसार करायला हातभार लावला. ब्रिटिश पोलिसांनी या घडामोडींची सखोल चौकशी करून येेथील हिंदूंकडून असे काही घडले नसल्याचे लेखी निवेदन देत, या निवेदनाचा समाजमाध्यमांमधून प्रसार करायचे आवाहन केले. मात्र बिथरलेल्या मुस्लिमांनी त्याकडे दुर्लक्ष केले. क्लॉडिया वेबनेही ते गांभीर्याने घेतले नाही. परिणामी हा वणवा वेगाने पसरला. भारतासह ज्या ज्या देशातून हिंदू इंग्लंडमध्ये राहायला गेले, त्यांना पाकिस्तान व अन्य मुस्लीमबहुल देशातल्या जिहादी मुस्लिमांनी त्रास द्यायला सुरुवात केली. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी घेतलेल्या सौम्य भूमिकेमुळे बर्मिंगहॅमजवळच्या स्मेथविक शहरातील दुर्गादेवी मंदिरावरही हल्ला केला. तिथल्या ओम् लिहिलेल्या भगव्या ध्वजाची नासधूस केली. या सगळ्या घटनांमुळे इंग्लंडमधील हिंदू सुरक्षित नसल्याचा आणि हा देश मूलतत्त्ववाद्यांना पाठीशी घालत असल्याचा संदेश जगभर पोहोचत आहे.
 
 
 
जे भारतीय हिंदू स्वकर्तृत्वावर या देशात स्थायिक झाले, त्यातल्या बहुतेकांनी स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी आपल्या उद्योग-व्यवसायातून अनेक रोजगार निर्माण केले. बुद्धीच्या आणि कर्तबगारीच्या बळावर शिक्षण आणि आर्थिक सुसंपन्नता यात आघाडीवर असलेला, या देशाच्या आर्थिक संपन्नतेत भर घालणारा हा हिंदू समाज आज इंग्लंडमध्ये असुरक्षित असल्याचे चित्र आहे.
 
 
 
इंग्लंडमधील मुस्लिमांची वाढणारी लोकसंख्या केवळ तेथील हिंदूंसाठी नाही, तर त्या देशासाठी चिंतेचा विषय आहे. 2050पर्यंत येथील ख्रिश्चनांची टक्केवारी 64वरून 45पर्यंत खाली येईल आणि मुस्लिमांची टक्केवारी 5वरून 11 टक्के इतकी होईल, असे शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या आधारावर अंदाज वर्तवले जात आहेत. ही वाढणारी लोकसंख्या म्हणजे वाढणारे मतदार इतका स्वार्थी व संकुचित विचार करून जर या अंदाजात दडलेल्या गर्भित धोक्याकडे इंग्लंडचे राज्यकर्ते कानाडोळा करत राहिले, मूलतत्त्ववाद्यांना असेच पाठीशी घालत राहिले, तर एक दिवस इंग्लंड हे मुस्लीमबहुल राष्ट्र बनेल.
 
 
 
इंग्लंडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यादेखील मुस्लीमधार्जिण्या म्हणून ओळखल्या जातात. आपल्या पूर्वसुरींचाच कित्ता त्या गिरवत आहेत. लोकशाही मूल्यांचा स्वीकार करणारा हा देश. मात्र तेथील राज्यकर्ते जर हिंदू नागरिकांचे धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवत असतील, तर ते लोकशाहीचाही गळा घोटत आहेत. स्वार्थी आणि नेभळट राज्यकर्त्यांनी, पोलिसांनी वार्‍यावर सोडलेले असल्याने आपल्याला या देशात कोणी वाली नाही असे दहशतीची शिकार झालेल्या या हिंदू नागरिकांना वाटू शकते. या घटनांमुळे निर्माण झालेल्या सन्नाट्याला शांतता समजण्याची घोडचूक इंग्लंडच्या राज्यकर्त्यांनी करू नये. तसे झाल्यास, एकेकाळी जगावर राज्य करणारा हा देश मुस्लीम मूलतत्त्ववादाचा गुलाम  होईल.
Powered By Sangraha 9.0