स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आमचे चिंतन

25 Oct 2022 12:58:00
 
 
लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फ्रॅटर्निटी यांचे हे आध्यात्मिक आधार आहेत. पाश्चात्त्य विद्वान भौतिक मर्यादेपर्यंत जातात, त्याच्या पलीकडे ते अजून गेलेले नाहीत. मी दुसर्‍याच्या स्वातंत्र्याचे किंवा समानतेचे हरण का करायचे नाही, याचे सैद्धान्तिक उत्तर त्यांच्याकडे नाही. तुम्ही जर केले तर कायद्याचा बडगा बसेल ही भीती त्यामागे आहे. आपण याच्यापुढे गेलेलो आहोत. तू आणि मी कुणी वेगळे नाहीत, एकाच तत्त्वाची वेगवेगळी रूपे आहोत. तुझी हानी करणे म्हणजे माझी हानी करणे असे आहे. हा एकात्मबोध हा आपल्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. या आधारावर आपण आपल्या राज्यघटनेवर भाष्य केले पाहिजे आणि घटनात्मक निवाडे देताना मिल काय म्हणाला, हॉब्स काय म्हणतो, एडमंड बर्कने काय सांगितले, हे जरूर सांगा; पण आपले शंकराचार्य काय म्हणतात, याज्ञवल्क्य काय म्हणतात, उपनिषदे काय म्हणतात, भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात, याचाही अभ्यास करा. त्यामुळे आपण खर्‍या अर्थाने शंभर टक्के भारतीय बनू.”

vivek
 
विद्यापीठातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि बंधुभगिनी यांना हृदयापासून प्रणाम! मला ‘लिबर्टी, इक्वॉलिटी, फ्रॅटर्निटी आणि स्पिरिट ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिझम’ या विषयावर भाषण करायला सांगितलेले आहे. लिबर्टी, इक्वॉलिटी, फॅ्रटर्निटी या तीन शब्दांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असे तीन देशी शब्द दिले जातात. या तीन इंग्लिश शब्दांचे हे तीन देशी शब्द, मूळ इंग्लिश शब्दांचा अर्थ जसाच्या तसा स्पष्ट करीत नाहीत, हे अभ्यासांती माझ्या लक्षात आले आहे, म्हणून मी भाषणाच्या अर्ध्या भागात इंग्लिश शब्दांचाच वापर करणार आहे आणि उर्वरित अर्ध्या भागात या शब्दांविषयी आपले चिंतन काय आहे, हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
 
 
लिबर्टी, इक्वॉॅलिटी आणि फॅ्रटर्निटी हे प्रजासत्ताक संविधानाचे आणि समाजव्यवस्थेचे तीन आधारस्तंभ आहेत. हे तीन आधारस्तंभ नसतील, तर लोकशाही टिकत नाही. या तीन तत्त्वांचे एकेक तत्त्व म्हणून अस्तित्व आहे की ही तीन तत्त्वे अविभाज्य आहेत, याचा प्रथम विचार करू या. ही तीन तत्त्वे एकाच मूलभूत विचारांची तीन अंगे आहेत, ती अलग करता येत नाहीत. यातील कोणतेही तत्त्व दुसर्‍यापेक्षा लहान किंवा मोठे नाही. या तिघांना एकत्रच राहावे लागते. म्हणून त्यांना तत्त्वांची त्रिमूर्ती म्हणतात.
 
 
या तीन तत्त्वांचा त्रिकोण आहे अशी कल्पना केली, तर त्याच्या पायाशी बंधुतेचे तत्त्व आहे. बंधुतेच्या तत्त्वावर पुढील दोन तत्त्वे अवलंबून आहेत. या तत्त्वांच्या अंमलबजावणीचा युरोपचा अनुभव असा आहे की, अमर्याद लिबर्टी, इक्वॉलिटीचा नाश करते. अमर्याद लिबर्टी याचा अर्थ होतो अमर्याद मालमत्ता धारण करण्याचा अधिकार, अमर्याद सत्तेचा अधिकार, स्वत:चे सुख अमर्यादपणे शोधण्याचा अधिकार इत्यादी. समाजरचनेत सर्वांकडे अमर्याद संपत्ती मिळविण्याची गुणवत्ता आणि क्षमता नसते, ती थोड्या लोकांकडेच असते. व्यापार आणि उद्योगातून अपार धन मिळविले जाते.
 
 
धन ही शक्ती आहे. या शक्तीचा वापर करून दुसर्‍याचे शोषण केले जाते. व्यापार्‍यांमार्गे शोषण होते, उद्योगात काम करणार्‍या श्रमिकांचे शोषण होते, शेतकर्‍यांचे शोषण होते, आणि त्यामुळे आर्थिक क्षमतेचा नाश होतो. म्हणून अमर्याद लिबर्टीवर खूप बंधने घालावी लागतात. या अमर्याद लिबर्टीतून भांडवलशाहीचा जन्म झाला आणि भांडवलशाहीची प्रतिक्रिया म्हणून मार्क्सवादाचा जन्म झाला.
 
 
मार्क्सच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे व्यक्तीला भाकरी, निवारा, शिक्षण याची गरज आहे. त्या बाबतीत समानता असली पाहिजे. जो कष्ट करील त्यालाच खाण्याचा अधिकार आहे. भांडवलदार समाजावरील बांडगुळे आहेत, ती नष्ट केली पाहिजेत. वर्गसंघर्षाला पर्याय नाही. शोषण करणार्‍यांना नाहीसे केले पाहिजे आणि समतेचे राज्य आणले पाहिजे. लेनिनने हा प्रयोग रशियात केला. तेथे कम्युनिस्ट शासन आले. त्यांनी जनतेच्या भाकरीचा, निवार्‍याचा, शिक्षणाचा, आरोग्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. खूपशा प्रमाणात या बाबतीत त्यांनी यश मिळविले, परंतु त्याची अफाट किंमत द्यावी लागली.
 

 
कम्युनिस्टांच्या समतेच्या प्रयोगात लिबर्टीला काही स्थान नव्हते. व्यक्तीचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य सर्व समाप्त झाले. समाजाच्या बुद्धीचे बराकीकरण करण्याचा प्रयत्न झाला. ‘मॅन डझ नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन’ ही उक्ती प्रसिद्ध आहे. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. भाकरी कितीही आवश्यक असली, तरीही भाकरीइतकीच सर्व प्रकारची लिबर्टी त्याला हवी असते. अमर्याद इक्वॉलिटी लिबर्टीला खाऊन टाकते.
 
 
लिबर्टी आणि इक्वॉलिटी सुखकारकरित्या समाजात राहायचे असेल, तर फ्रॅटर्निटीची आवश्यकता आहे. युरोपमध्ये या तीन तत्त्वांच्या विकासाचा क्रम आहे, इतिहास आहे. या तीन शब्दांचा उगम युरोपच्या भूमीत झालेला आहे आणि तिन्ही शब्दांमागे युरोपचा राजकीय, धार्मिक आणि सामाजिक इतिहास आहे, तो समजल्याशिवाय या तीन शब्दांचे युरोपीय अर्थ काय होतात, याचे आकलन होत नाही. ते समजून घेण्यासाठी 1. डीेीूं जष ङळलशीीूं - उहरीश्रशी उेषषळप 2. जप ङळलशीीूं - ग. ड. चळश्रश्र ही दोन पुस्तके वाचली पाहिजेत. पहिले पुस्तक हे लिबर्टी संकल्पनेच्या तीनशे वर्षांच्या प्रवासाविषयीचे आहे. अनेक घटनांनी ते भरलेले आहे आणि दुसरे पुस्तक तत्त्वज्ञानात्मक आहे.

 
युरोपमध्ये लिबर्टीचा अर्थ असा केला गेला -
 
व्यक्तिविकासाच्या आड येणार्‍या राज्यसंस्थेच्या कायद्यातून मुक्तता

व्यक्तिविकासाच्या आड येणार्‍या सामाजिक आणि धार्मिक कायद्यातून मुक्तता
व्यक्ती एक स्वतंत्र मूल्य आहे आणि त्याला त्याचा विकास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. बंधनमुक्ती म्हणजे लिबर्टी, असा लिबर्टीचा अर्थ होतो. त्यासाठी युरोपमध्ये प्रचंड संघर्ष झाले. धार्मिक संघर्ष झाला, मार्टिन ल्यूथर याने पोपविरुद्ध बंड केले आणि प्रोटेस्टंट पंथाची स्थापना केली. फ्रान्समध्ये जनतेने राजेशाही आणि सरदारशाही यांच्याविरुद्ध बंड केले आणि राजकीय स्वातंत्र्य मिळविले. अमेरिकन जनतेनेदेखील ब्रिटनच्या राजा आणि पार्लमेंट यांच्याविरुद्ध बंड केले आणि राजकीय स्वातंत्र्य मिळविले. या तीन घटना लिबर्टीच्या विकासक्रमातील अतिशय महत्त्वाच्या घटना मानल्या जातात.
त्याची उद्घोषणा करणारे दोन जाहीरनामे आहेत. ते अतिशय प्रसिद्ध आहेत. पहिल्या जाहीरनाम्याचे शीर्षक आहे ‘डिक्लरेशन ऑफ इंडिपेन्डस’ व त्याचे लेखक आहेत थॉमस जेफर्सन. दुसर्‍या जाहीरनाम्याचे शीर्षक आहे ‘डिक्लरेशन ऑफ राइट्स ऑफ मॅन अँड सिटिझन’. हे दुसरे डिक्लरेशन फ्रेंच राज्यक्रांतीचे आहे. या दोन्ही जाहीरनाम्यांत दोन वाक्ये अतिशय महत्त्वाची आहेत. ती अशी आहेत - जेफर्सनचा जाहीरनामा म्हणतो, ‘ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल’ आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा जाहीरनामा म्हणतो, ‘ऑल मेन आर बॉर्न इक्वल’.
 

vivek 

लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फ्रॅटर्निटी या संकल्पनांचा युरोपातील उगम आणि विकास यावर भाष्य करणारी पुस्तके

 
vivek
 
दिसायला ही दोन्ही वाक्ये समान वाटतात, पण ती तशी नाहीत. ‘ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल’ याचा अर्थ होतो, निर्मितीने सर्व माणसे समान आहेत. आणि ‘ऑल मेन आर बॉर्न इक्वल’ याचा अर्थ होतो ‘जन्माने सर्व माणसे समान आहेत’. निर्मितीने असो किंवा जन्माने असो, सर्व माणसे समान आहेत, याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला आपला विकास आपल्या पद्धतीने करून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. समाजात विषमता निर्माण करणारे वर्ग अनैसर्गिक आहेत, ते जन्मत: निर्माण होत नाहीत. जन्मत: सर्व माणसे समान असल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्यामध्ये बंधुभावना ही संकल्पना जन्मजातच आहे, असा त्याचा अर्थ होतो.
 
 
अमेरिकेचा जाहीरनामा ‘जन्माने सर्व माणसे समान आहेत’ असे का म्हणत नाही? जेव्हा हा जाहीरनामा 4 जुलै 1776 रोजी जाहीर झाला, तेव्हा अमेरिकेची एकूण लोकसंख्या अडीच कोटी होती आणि त्यातील 20% निग्रो गुलाम होेते. जन्माने सर्व माणसे समान आहेत असे जर म्हटले असते, तर काळे निग्रो गोर्‍या लोकांच्या बरोबरीने आले असते. गोर्‍या लोकांना ते नको होते. म्हणून त्यांनी म्हटले की, निर्मितीने सर्व माणसे समान आहेत, म्हणजे काळे, काळे म्हणून समान आहेत आणि गोरे, गोरे म्हणून समान आहेत.. गोरे आणि काळे समान नाहीत.
 
 
फ्रेंच राज्यक्रांतीची उद्घोषणा जन्माने सर्व माणसे समान आहेत, असे सांगते. कारण फ्रान्समध्ये निग्रो नव्हते आणि आशियातील लोकही नव्हते. त्यांची संख्या जर तेथे अमेरिकेसारखी असती, तर जन्माने सर्व माणसे समान आहेत असे म्हणण्याचे धाडस त्यांनी केले नसते. या दोन्ही उद्घोषणांतून अभिव्यक्त होणारी समानता, लिबर्टी आणि फॅ्रटर्निटी ही जागतिक आहे का? आपल्याकडे अनेक विद्वान सांगतात की, हे दोन्ही जाहीरनामे मानवजातीचे जाहीरनामे आहेत. मानवजातीची तत्त्वे आहेत. खरोखर असे आहे का?
 
 
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रथम आमच्या विद्वानांनी अमेरिकेतील काळ्या लोकांच्या संघर्षाचा इतिहास अभ्यासला पाहिजे. 1787पासून 1964पर्यंत हा लढा चालू होता लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फॅ्रटर्निटी प्राप्त करण्यासाठी. ज्यांना आपल्या देशातच लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फॅ्रटर्निटी आपल्या सर्व लोकांसाठी निर्माण करता आली नाही, ज्या लोकांनी स्थानिक लोकांच्या निर्दय कत्तली केल्या, दोन कोटीहून अधिक मूलनिवासी अमेरिकन ठार मारले, त्यांची तत्त्वे जागतिक कशी? आणि ही उष्टावळ आम्ही कशाला चाटायची? या तत्त्वांचा उगम या दोन क्रांतीतून झाला असे आमच्या मुलांच्या डोक्यात का शिकवायचे? तुम्ही सर्व शिक्षणक्षेत्रातील आहात, याचा तुम्ही सर्वांनी विचार करा.
 

vivek
 
पहिला जाहीरनामा - थॉमस जेफर्सन लिखित डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स
 
 
 
हीच गोष्ट फ्रान्ससंबंधी आहे. युरोपातील जे देश वसाहतवादी झाले, त्यात ब्रिटनपाठोपाठ फ्रान्सचे नाव घ्यावे लागते. अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, आशिया या सर्व खंडांत त्यांनी आपले साम्राज्य पसरविले. ब्रिटनच्या खालोखाल जगातील भूप्रदेश एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात फ्रान्स देशाच्या ताब्यात होता. त्याने क्रांतीची उद्घोषणा करून लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फ्रॅटर्निटी ही तीन तत्त्वे जागतिक असल्याची घोषणा केली. आपण कधीतरी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, फ्रेंच साम्राज्यातील कोणत्या भागात त्यांनी या तत्त्वाची अंमलबजावणी केली? त्याचे उत्तर असे आहे की, एक इंच भूमीवरदेखील नाही. मग ही तत्त्वे जागतिक कशी? ती ऐकायला गोड वाटतात. त्यातील अर्थही खूप चांगला आहे, म्हणून ती जागतिक म्हणायची का? ज्या तत्त्वांचा जागतिक अंमल होऊ शकत नाही, केला जात नाही, ती केवळ शोभेची तत्त्वे असतात. त्याच्या माळा आपल्या गळ्यात घालण्याचे काही कारण नाही.
 
 
 
आता आपण भारतीय चिंतनाकडे वळू या. आपले संविधानदेखील लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फ्रॅटर्निटी या तीन तत्त्वांवर उभे आहे. आपल्या संविधानाच्या उद्देशिकेत हे तीन शब्द आलेले आहेत. त्याचा देशी भाषेत अनुवाद ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ असा केला जातो. लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फॅ्रटर्निटी याच्या आपल्या संकल्पना फार वेगळ्या आहेत. त्यांना केवळ राजकीय अथवा सामाजिक संदर्भ नाहीत. खूप खोलवरचे आध्यात्मिक संदर्भ आहेत. पाश्चात्त्य देशात ही तत्त्वे मांडणारे हॉब्स, लॉक, रूसो, बेन्थॅम, मिल, एडमंड बर्क, थॉमस पेन अशी अनेक विद्वान मंडळी झाली आहेत. यांचा जन्म होण्यापूर्वीच आपल्या देशातील महान तत्त्वज्ञांनी या तीन तत्त्वांचा एकत्रितपणे खूप उंचीचा विचार केलेला आहे. तो आपल्याला माहीत नसतो, शोधण्याचा आपण प्रयत्न करीत नाही आणि टेक्स्टबुकमध्ये जे आहे ते प्रमाण मानतो, ही बौद्धिक गुलामी आहे.
 
 
मी या ठिकाणी फक्त भारतातील काही महान लोकांची वचने उद्धृत करणार आहे. योगी अरविंद या तीन तत्त्वांविषयी काय म्हणतात, ते सर्वप्रथम पाहू या. "It (freedom) is the goal of humanity, and we are yet far off from that goal. But the time has come for an approximation being attempted. And the first necessity is the discipline of brotherhood, the organisation of brotherhood; for without the spirit and habit of fraternity neither liberty nor equality can be maintained for more than a short season. The French were ignorant of this practical principle; they made liberty the basis, brotherhood the superstructure, founding the triangle upon its apex ...... the triangle has to be reversed before it can stand permanently.'
 
 
याचा भावार्थ असा - ‘जर स्वातंत्र्य हे मानवजातीचे लक्ष्य असेल, तर त्या लक्ष्यापासून आपण अजून खूप दूर आहोत. पंरतु त्याच्या जवळ जाण्याची वेळ आता आली आहे. त्याची पहिली पायरी बंधुभावनेची आहे. बंधुभावनेशिवाय लिबर्टी (स्वातंत्र्य) अथवा इक्वॉलिटी (समानता) टिकू शकत नाही. टिकलीच तर अल्पकाळासाठी टिकेल. या व्यवहारिक सिद्धान्ताबाबत फ्रेंच अज्ञानी होते. त्यांनी लिबर्टीला आधार केले. लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फॅ्रटर्निटीच्या त्रिकोणावर शीर्षस्थानी फॅ्रटर्निटीला (बंधुतेला) बसविले. हा त्रिकोण उलटा केला पाहिजे, तरच तो कायमस्वरूपी उभा राहील.’ योगी अरविंद यांना हे सांगायचे आहे की, बंधुभावना तीव्रपणे निर्माण झाल्याशिवाय स्वातंत्र्याची आणि समानतेची हमी देता येत नाही.
 
 
 
स्वामी विवेकानंद यांचे शिकागोतील भाषण हे विश्वबंधुतेवरील सर्वश्रेष्ठ भाषण समजले जाते. जागतिक व्यासपीठावर सर्वप्रथमच त्यांनी ‘माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो’ असे संबोधन केले. पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. स्वामीजींच्या दृष्टीने बंधुभावना हे शब्द नव्हते, तो त्यांच्या जगण्याचा मंत्र होता. ते म्हणतात,""He regarded the right of liberty as the only condition of growth. He said : "To advance towards freedom- physical, mental and spiritual, and help others to do so is the supreme prize of man. Those social rules which stand in the way of the unfoldment of this freedom are injurious.''
 
या दोघांचा भावार्थ असा होतो - माणसाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे दुसर्‍याच्या स्वातंत्र्यासाठी - मग ते शारीरिक असो, मानसिक असो की आध्यात्मिक असो - ‘झटणे’ हा आहे. जे सामाजिक नियम या स्वातंत्र्याच्या आविष्काराच्या आड येत असतील ते हानिकारक समजले पाहिजेत.. तसेच स्वातंत्र्य याचा अर्थ कोणत्याही प्रकारच्या बंधनातून मुक्तता एवढाच नसून त्याचा भावात्मक अर्थ असा होतो की, आम्ही आमचे शरीर, बुद्धिमत्ता आणि संपत्ती याचा विकास दुसर्‍याची हानी न करता करून घेणे होय. याच प्रकारचे सर्व अधिकार दुसर्‍यांनादेखील आहेत, याचे भान राखले पाहिजे.
 
 
 
जेफर्सन असो की अन्य पाश्चात्त्य तत्त्वज्ञ असोत, ते सांगतात की, व्यक्तीला स्वातंत्र्य दिले पाहिजे, ज्यामुळे तो स्वत:चा विकास अमर्याद करून घेऊ शकेल. स्वत:चा विकास करीत असताना त्याने कोणत्या नैतिक नियमांचे पालन केले पाहिजे हे कुणी सांगत नाही. संपत्ती मिळवत असताना तिचे मार्ग कोणते असले पाहिजेत, सर्व संपत्ती निसर्गातून प्राप्त होते. निसर्गाशी आपला व्यवहार कसा असला पाहिजे, सर्व संपत्ती ही ईश्वरनिर्मित असते. उदा., जल, जमीन, जंगल, हवा, हे निसर्गनिर्मित आहेत आणि या चार साधनांतूनच संपत्ती निर्माण होते. तिच्याकडे कसे बघितले पाहिजे? हे कुणी सांगत नाही. फ्रान्सिस बेकन म्हणतो की, ‘ही पृथ्वी आपल्या उपभोगासाठी निर्माण झाली आहे, ती खणून काढा, उपभोगाची साधने प्राप्त करा, सुखाने जगा.’
 
 
 
vivek
 
मानवी स्वातंत्र्याचा - म्हणजे लिबर्टीचा असला अमानवी विचार आपण करीत नाही. लोकमान्य टिळक कर्मयोगाच्या सिद्धान्ताच्या आधारे सांगतात की, आपण अनासक्त असले पाहिजे. लौकिक जीवन जगताना जे जे आवश्यक असेल ते ते केलेच पाहिजे, पण त्यात आसक्ती असता कामा नये. आसक्तीतून लोभ निर्माण होतो, लोभातून क्रोध निर्माण होतो, संमोह निर्माण होतो आणि शेवटी बुद्धिनाश होतो. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्य याचा अर्थ केवळ राजकीय, सामाजिक बंधनातून मुक्तता असा नसून आसक्तीतून मुक्तता असा आपल्या दर्शनकारांनी मांडलेला आहे. "God has declared His will. He has willed that Self can be exalted only through its own efforts, Everything lies in your hands. Karma Yoga does not look upon this world as nothing; it requires only that your motives should be untainted by selfish interest and passion. This is the true view of practical Vedanta the key to which is apt to be lost in sophistry.''
 
 
टिळकांना सांगायचे आहे की, परमेश्वराची इच्छा अशी आहे की, आत्मोन्नती स्वत:च्या प्रयत्नातूनच होईल. सर्व गोष्टी आपल्या हातात आहेत. कर्मयोग या जगाकडे नकारात्मक दृष्टीने पाहत नाही. कर्मयोगाचे एवढेच सांगणे आहे की, तुमचे हेतू शुद्ध असले पाहिजेत, त्यात स्वार्थ नसावा किंवा अभिलाषा नसावी. व्यवहारिक वेदान्ताचा हा विचार आहे.
 
 
महात्मा गांधी यांची लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फ्रॅटर्निटीची विचारसरणी थोडक्यात अशी आहे -
 
 
Gandhi's definition of Swaraj encompasses four dimensions : truth, non-violence, political and economic independence. Swaraj would be incomplete without the realization of each, because each, according to Gandhi, is inextricably linked to the others. His concept of Swaraj incorporates the same distinction between inner and outer forms of Liberty as Vivekananda and Arobindo do.
 
 
महात्मा गांधीजी स्वराज्यावर भाष्य करीत आहेत. स्वराज्य, स्वातंत्र्य, लिबर्टी हे एका अर्थाने समान आशय व्यक्त करणारे शब्द आहेत. या शब्दामागे गांधीजी अध्यात्माची चौकट जोडतात. या चौकटीतील पहिला शब्द आहे सत्य, अहिंसा, राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य, या सर्वांच्या प्राप्तीशिवाय स्वराज्याला काही अर्थ नाही. गांधीजींच्या स्वराज्यात व्यक्तीचे अंतर्गत स्वराज्य आणि व्यक्ती ज्या सामाजिक वातावरणात राहते त्या वातावरणातील स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत.
 
 
 
योगी अरविंद ते महात्मा गांधी लिबर्टी म्हणजे मुक्ततेचा अर्थ केवळ राजकीय, सामाजिक आणि धार्मिक बंधनातून मुक्तता असा करीत नाहीत. त्या तर आवश्यक आहेतच, या गोष्टी ते नाकारतात असेही नाही. राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, उपासनेचे स्वातंत्र्य असल्याशिवाय समाज प्रगती करू शकत नाही. राज्यघटना घटनेच्या कायद्याद्वारे या बंधनातून व्यक्तीला आणि समाजाला मोकळे करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराची कलमे आणि राज्यधोरणाची निदेशक तत्त्वे ही दुसरे-तिसरे काही नसून व्यक्तीला राजकीय, सामाजिक, आर्थिक गुलामीतून मुक्त करण्याची कलमे आहेत.
 
 
 
हा झाला भौतिक आशय. आपले चिंतन केवळ भौतिकतेपुरते मर्यादित नसते. ते भौतिकतेच्या पलीकडे जाऊन व्यक्तीचा आणि समाजाचा विचार करते. आपले दर्शनकार असे कधीच म्हणत नाहीत की, निर्मितीने सर्व माणसे समान आहेत किंवा जन्माने सर्व माणसे समान आहेत. त्यांच्या दृष्टीने ही वाक्ये सामान्य वाक्ये झाली. त्यापलीकडे जाऊन ते सांगतात की, सर्व माणसांमध्ये ईश्वरी अंश आहे. मनुष्य हेच ईश्वराचे लघुरूप आहे, म्हणून नरसेवा नारायणसेवा आहे. आपली सर्व उपनिषदे हीच गोष्ट सांगत असतात.
आदिशंकराचार्य यांचे ‘ब्रह्मज्ञानावलीमाला’ या शीर्षकाचे एक स्तोत्र आहे. या स्तोत्रात शंकाराचार्यांचे वेदान्त दर्शन आलेले आहे. ते सांगतात की, व्यक्ती कोण आहे?
 
 
‘नित्यशुद्ध विमुक्तोऽहं निराकारोऽहमव्यय:
 
भूमानंद स्वरूपोऽहमहमेवाहमव्यय:’
 
मी शाश्वत आहे, मी शुद्ध आहे, मी सदैव मुक्त आहे, मी आकारहीन आहे, मी अनाशवंत आहे, मी निरामय आनंदाचा भाग आहे, मी कधीही नष्ट न होणारा अपरिवर्तनीय अव्यय तत्त्व आहे.
 
या स्तोत्रातील शेवटचे चरण अतिशय उत्कृष्ट आहे, ते असे-
 
‘अन्तर्ज्योति बर्हिर्ज्योति: प्रत्यग्जोति: परात्पर:
 
ज्योतिर्ज्योति: स्वयंज्योतिरात्मज्योति: शिवोऽस्महम्॥’
 
मी कोण आहे? तर विश्वज्योतीचा मी एक अंश ज्योतीरूप आहे. मी शिवस्वरूप आहे, मी याचा अर्थ केवळ मी नसून मी म्हणजे मानव. मग तो काळा असो, गोरा, पिवळा असो, उंच असो, ठेंगणा असो, सुस्वरूप असो, कुरूप असो, हा मानव शिवरूप आहे. हे आपले दर्शन आहे. आम्ही ‘बॉर्न इक्वल’ नसून किंवा ‘क्रिएटेड इक्वल’ नसून स्वरूपताच आम्ही विश्वरूप आहोत. एकही पाश्चात्त्य तत्त्वज्ञ अजूनपर्यंत या उंचीवर गेलेला नाही. तत्त्वज्ञानाच्या शाळेतील ते सर्व विद्यार्थी आहेत. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे.
 
vivek
  भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या तीन शब्दांचा उल्लेख आहे. मात्र त्यांना केवळ राजकीय अथवा सामाजिक संदर्भ नाहीत. खूप खोलवरचे आध्यात्मिक संदर्भ आहेत.
आपल्या संविधानाच्या निर्मितीचे श्रेय पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात येते. आपण सर्व त्यांना संविधानाचे शिल्पकार असे म्हणतो. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ही तीन तत्त्वे मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाहीत, ही तत्त्वे माझे गुरू भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून घेतली आहेत.’ असे ते म्हणत. 1950च्या दशकात आकाशवाणी दिल्लीवरून माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान या विषयावर त्यांचे भाषण झाले, तेव्हा ते म्हणाले की, ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही माझ्या जीवनाची तत्त्वत्रयी आहे. त्यातील बंधुतेला मी सर्वाधिक महत्त्वाचे स्थान देतो. बंधुभाव हीच मानवता आहे आणि मानवता हाच धर्म आहे,’ या वाक्यात त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आहे.
 
 
बाबासाहेब या तत्त्वांचा कसा विचार करीत हे आता आपल्याला बघायचे आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या त्यांच्या पुस्तकावर चर्चा चालू असते. त्यातील ब्रह्म तत्त्वज्ञानावर बाबासाहेबांचे जे भाष्य आहे, त्यावर फार कमी लोक बोलतात.
 
 
Some equate democracy with equality and liberty. Equality and liberty are no doubt the deepest concern of democracy. But the more important question is what sustains equality and liberty? Some would say that it is the law of the state which sustains equality and liberty. This is not a true answer. What sustains equality and liberty is fellow-feeling. What the French revolutionists called fraternity. The word fraternity is not an adequate expression. The proper term is what the Buddha called maitree. Without fraternity, liberty would destroy equality and equality would destroy liberty. If in democracy, liberty does not destroy equality and equality does not destroy liberty, it is because at the basis of both there is fraternity. Fraternity is therefore the root of democracy.
 
The foregoing discussion is merely a preliminary to the main question. That question is — wherein lie the roots of fraternity without which democracy is not possible? Beyond dispute, it has its origin in religion.
 
In examining the possibilities of the origin of democracy or its functioning successfully, one must go to the religion of the people and ask — does it teach fraternity or does it not? If it does, the chances for a democratic government are great. If it does not, the chances are poor. Of course other factors may affect the possibilities. But if fraternity is not there, there is nothing to built democracy on. Why did democracy not grow in India? That is the main question. The answer is quite simple. The Hindu religion does not teach fraternity. Instead it teaches division of society into classes or varnas and the maintenance of separate class consciousness. In such a system where is the room for democracy?
 
The Hindu social system is undemocratic not by accident. It is designed to be undemocratic. Its division of society into varnas and castes, and of castes and outcastes are not theories but are decrees. They are all barricades raised against democracy.
 
From this it would appear that the doctrine of fraternity was unknown to the Hindu religious and philosophic thought. But such a conclusion would not be warranted by the facts of history.
 
 
vivek

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या पुस्तकात ब्रह्म तत्त्वज्ञानावर भाष्य केले आहे.


vivek 
 
 
The Hindu religious and philosophic thought gave rise to an idea which had greater potentialities for producing social democracy than the idea of fraternity. It is the doctrine of Brahmaism.
 
It would not be surprising if someone asked what is this Brahmaism? It is something new even to Hindus. The Hindus are familiar with Vedanta. They are familiar with Brahmanism. But they are certainly not familiar with Brahmaism. Before proceeding further a few words of explanation are necessary.
There are three strands in the philosophic and religious thought of the Hindus. They may be designated as (1) Brahmaism (2) Vedanta and (3) Brahmanism. Although they are correlated they stand for three different and distinct ideologies.
 
The essence of Brahmaism is summed up in a dogma which is stated in three different forms. They are —
 
(i) Sarvam Khalvidam Brahma—All this is Brahma
 
(ii) Aham Brahmasmi— Atmana (Self) is the same as Brahma. Therefore I am Brahma
(iii) Tattvamasi—Atmana (Self) is the same as Brahma. Therefore thou art also Brahma.
They are called Mahavakyas, which means Great Sayings, and they sum up the essence of Brahmaism.
The following are the dogmas which sum up the teachings of Vedanta—
 
Brahma is the only reality
 
The world is maya or unreal
 
Jiva and Brahma are —
 
(i) according to one school identical,
 
(ii) according to another not identical but are elements of him and not separate from him,
 
(iii) according to the third school they are distinct and separate.
 
The creed of Bramhanism may be summed up in the following dogmas —
 
(i) belief in the chaturvarna
 
(ii) sanctity and infallibility of the Vedas
 
(iii) sacrifies to gods the only way to salvation.
 
Most people know the distinction between the Vedanta and Brahmanism and the points of controversy between them. But very few people know the distinction between Brahmanism and Brahmaism. Even Hindus are not aware of the doctrine of Brahmaism and the distinction between it and Vedanta. But the distinction is obvious. While Brahmaism and Vedanta agree that Atman is the same as Brahma, the two differ in that Brahmaism does not treat the world as unreal, while Vedanta does. This is the fundamental difference between the two.
 
The essence of Brahmaism is that the world is real and the reality behind the world is Brahma. Everything therefore is of the essence of Brahma.
 
 
There are two criticisms which have been levelled against Brahmaism. It is said that Brahmaism is a piece of impudence. For a man to say “I am Brahma” is a kind of arrogance. The other criticism levelled against Brahmaism is the inability of man to know Brahma. “I am Brahma” may appear to be impudence. But it can also be an assertion of one’s own worth. In a world where humanity suffers so much from an inferiority complex, such an assertion on the part of man is to be welcomed. Democracy demands that each individual shall have every opportunity for realizing his worth. It also requires that each individual shall know that he is as good as everybody else. Those who sneer at Aham Brahmasmi (I am Brahma) as an impudent utterance forget the other part of the Mahavakya, namely Tattvamasi (thou art also Brahma). If Aham Brahmasmi had stood alone without the conjunct of Tattvamasi it may not have been possible to sneer at it. But with the conjunct of Tattvanmsi the charge of selfish arrogance cannot stand against Brahmaism.
 
 
It may well be that Brahma is unknowable. But all the same this theory of Brahma has certain social implications which have a tremendous value as a foundation for democracy. If all persons are parts of Brahma then all are equal and all must enjoy the same liberty, which is what democracy means. Looked at from this point of view Brahma may be unknowable. But there cannot be the slightest doubt that no doctrine could furnish a stronger foundation for democracy than the doctrine of Brahma.
 
 
To support democracy because we are all children of God is a very weak foundation for democracy to rest on. That is why democracy is so shaky wherever it made to rest on such a foundation. But to recognize and realize that you and I are parts of the same cosmic principle leaves room for no other theory of associated life except democracy. It does not merely preach democracy. It makes democracy an obligation of one and all.
 
 
Western students of democracy have spread the belief that democracy has stemmed either from Christianity or from Plato and that there is no other source of inspiration for democracy. If they had known that India too had developed the doctrine of Brahmaism which furnishes a better foundation for democracy they would not have been so dogmatic. India too must be admitted to have a contribution towards a theoretical foundation for democracy.
The question is what happened to this doctrine of Brahmaism?
 
 
हे इंग्लिश अवतरण अनेक वाचकांना बरेच लांबलचक वाटेल. ज्या वाचकांना इंग्लिश वाचण्याची सवय नाही त्यांना जड जाईल, याची मला कल्पना आहे. (तरीसुद्धा हे पूर्ण दिले आहे, याचे कारण असे की, या अवतरणाची थोरवी सांगण्यास शब्द कमी पडतील, इतके ते मौलिक आहे. हे अवतरण मी माझ्या भाषणात पूर्ण वाचून दाखविले. ऐकणारे प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी असे काही वाचावे आणि समजून घ्यावे, म्हणून ते मी केले.)
 
 
या सर्व अवतरणाचा थोडक्यात गोषवारा बघू. पहिली गोष्ट अशी की, पूज्य डॉ. बाबासाहेब निर्भेळ लोकशाहीवादी आहेत. लोकशाहीत हिंसा बसत नाही, म्हणून ते अहिंसक आहेत. लोकशाहीत कायदेभंग बसत नाही, म्हणून ते संविधाननिष्ठ आहेत. या अवतरणात त्यांनी लिबर्टी आणि इक्वॉलिटी हे लोकशाहीचे मूलभूत आधारस्तंभ आहेत, हे सांगितलेच, पण एक प्रश्न उपस्थित केला की, स्वातंत्र्य आणि समानतेच्या रक्षणाची हमी काय? काही जण त्याचे उत्तर देतात की, राज्यसंस्था त्याच्या रक्षणाची हमी आहे. हे उत्तर बरोबर नाही असे बाबासाहेब सांगतात. समानता आणि स्वातंत्र्य यांचे रक्षण सहयोगी भावनेनेच होऊ शकते. फ्रेंच राज्यक्रांती तिला बंधुभावना असे म्हणते. परंतु बंधुभावना हा शब्द पुरेसा नाही. बुद्धांनी दिलेला मैत्री हा शब्द योग्य मानला पाहिजे. बंधुभावना नसेल तर लिबर्टी इक्वॉलिटीला खाऊन टाकील आणि इक्वॉलिटी लिबर्टीला खाऊन टाकील. म्हणून बंधुभावना हे लोकशाहीचे पायाभूत तत्त्व आहे.
 
 
 
बाबासाहेब आणखी खोलात जाऊन पुढचा प्रश्न करतात, बंधुभावनेची मुळे कुठे आहेत? ज्या बंधुभावनेच्या अभावामुळे प्रजातंत्र शक्य नाही, त्या बंधुभावनेचा उगम कुठे होतो? बाबासाहेब त्याचे उत्तर देतात की, या तत्त्वाचा उगम धर्मात होतो. यानंतर बाबासाहेब हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाकडे येतात. या तत्त्वज्ञानाची ते तीन भागात वर्गवारी करतात. 1. ब्रह्मतत्त्वज्ञान 2. वेदान्त तत्त्वज्ञान 3. ब्राह्मणी तत्त्वज्ञान. या तिन्ही तत्त्वज्ञानातील भेद सामान्य हिंदूच्या लक्षात येत नाही, याबद्दल खंत व्यक्त करतात. ब्राह्मणी तत्त्वज्ञान समाजाची चार वर्णात विभागणी करते, जातीपातीत विभागणी करते आणि विषमता निर्माण करते.
 
 
वेदान्त तत्त्वज्ञान ‘ब्रह्म सत्य असून दृश्य जग हे माया आहे’ असे मानते. ब्रह्मत्त्वज्ञान ब्रह्म सत्य आहे हे मानतेच, परंतु जग माया आहे हे मानीत नाही, तेही सत्य आहे असे मानते. ब्रह्मतत्त्वज्ञानाचे तीन सिद्धान्त आहेत. त्यांना महावाक्य असे म्हणतात. त्यातील पहिले महावाक्य असे आहे, ‘सर्व खल्विदं ब्रह्म’, दुसरे महावाक्य असे आहे ‘तत्त्वमसि’ आणि तिसरे महावाक्य आहे ‘अहं ब्रह्मास्मि’. छांदोग्य उपनिषदात हा सर्व विषय आलेला आहे.
 
 
प्रजासत्ताकाचे आणि संविधानाचे मूलभूत सिद्धान्त म्हणून या ब्रह्मतत्त्वज्ञानावरील बाबासाहेबांचे भाष्य असे आहे - ‘असे असू शकते की ब्रह्म कुणी पाहिलेले नाही. असे असले तरी ब्रह्माचे सामाजिक अर्थ खूप होतात. लोकशाहीचे आधार म्हणून त्यांचे मूल्य अनन्यसाधारण आहे. जर प्रत्येक व्यक्तीत ब्रह्माचा अंश असेल तर ते सर्व समान होतात आणि सर्वांना स्वातंत्र्याचा समान आनंद घेता येतो. लोकशाहीचा हाच अर्थ होतो. या दृष्टीकोनातून ब्रह्म या संकल्पनेकडे बघितले, तर लोकशाहीचा पायाभूत आधार म्हणून ब्रह्मतत्त्वज्ञानाइतका आधार अन्य कोणता असू शकत नाही.
 
 
आम्ही सर्व देवाची लेकरे आहोत, हा लोकशाहीचा आधार होऊ शकत नाही. ज्या ज्या ठिकाणी या सिद्धान्तावर लोकशाही उभी केली त्या त्या ठिकाणी लोकशाहीचा पाया ठिसूळ झालेला आहे. परंतु तू आणि मी एकाच जागतिक तत्त्वाचे अंग आहोत, ही गोष्ट मान्य केल्यानंतर सर्वांच्या सहकार्याच्या लोकशाहीला पर्याय राहत नाही. हे तत्त्वज्ञान लोकशाहीचा उपदेश करीत नसून लोकशाही हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे हे सांगते.’
 
 
पाश्चात्त्य विद्यार्थी सांगतात की, लोकशाहीचा उदय ख्रिश्चन धर्मातून किंवा प्लेटो (ग्रीक तत्त्वज्ञ) यांच्यातून झालेला आहे. लोकशाहीचे दुसरे आधार नाही. जर त्यांना हे माहीत झाले की, भारतानेदेखील ब्रह्मतत्त्वज्ञानाचा विकास केलेला आहे. जे तत्त्वज्ञान लोकशाहीचा भक्कम पाया बनू शकते, तर ते आपला दुराग्रह सोडू शकतील. भारतानेदेखील लोकशाहीची सैद्धान्तिक पार्श्वभूमी केलेली आहे, हे त्यांना मान्य करावे लागेल.
 
 
लिबर्टी, इक्वॉलिटी आणि फ्रॅटर्निटी यांचे हे आध्यात्मिक आधार आहेत. पाश्चात्त्य विद्वान भौतिक मर्यादेपर्यंत जातात, त्याच्या पलीकडे ते अजून गेलेले नाहीत. मी दुसर्‍याच्या स्वातंत्र्याचे किंवा समानतेचे हरण का करायचे नाही, याचे सैद्धान्तिक उत्तर त्यांच्याकडे नाही. तुम्ही जर केले तर कायद्याचा बडगा बसेल ही भीती त्यामागे आहे. आपण याच्यापुढे गेलेलो आहोत. तू आणि मी कुणी वेगळे नाहीत, एकाच तत्त्वाची वेगवेगळी रूपे आहोत. तुझी हानी करणे म्हणजे माझी हानी करणे असे आहे. हा एकात्मबोध हा आपल्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. या आधारावर आपण आपल्या राज्यघटनेवर भाष्य केले पाहिजे आणि घटनात्मक निवाडे देताना मिल काय म्हणाला, हॉब्स काय म्हणतो, एडमंड बर्कने काय सांगितले, हे जरूर सांगा; पण आपले शंकराचार्य काय म्हणतात, याज्ञवल्क्य काय म्हणतात, उपनिषदे काय म्हणतात, भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात, याचाही अभ्यास करा. त्यामुळे आपण खर्‍या अर्थाने शंभर टक्के भारतीय बनू.”
 
Powered By Sangraha 9.0