दहशतवाद आणि धर्म (मजहब)

31 May 2021 12:36:32

कुराणातील आणखी एक तत्त्व म्हणजे काफिरांसह राहायचे नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी इस्लाम बहुसंख्याक होत गेले, त्या ठिकाणी धर्माच्या आधारे एकत्रीकरण वाढले. तसेच इस्लामी फुटीरतावादी सक्रिय झाल्याचे, दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसतेह्या लेखातधर्महा शब्दमजहबम्हणजेचरिलीजनह्या अर्थाने घेण्यात आलेला आहे.


musalim_1  H x

दहशतवाद आणि धर्म ह्यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. ‘धर्मह्या शब्दाचा अर्थ बराच व्यापक आहे. भारतीय परंपरांमध्ये निसर्गाचा नियम म्हणजे धर्म, एखाद्याचे कर्तव्य म्हणजे धर्म - उदा., राजधर्म इत्यादी.. असे अनेक अर्थ आहेत. पण प्रचलित भाषेतधर्महा शब्दमजहबम्हणजेच ज्यालारिलीजनअसे इंग्लिशमध्ये म्हटले जाते. दहशतवादी हल्ले जरी राजकीय कारणांसाठी होत असले, तरी त्यामागची मूळ प्रेरणा धर्मच असल्याचे बहुतांश वेळा दिसून येते. ज्या दहशतवादी संघटना धर्माधिष्ठित आहेत, त्या जास्त जहाल आहेत. तसेच त्या वर्षानुवर्षे आपल्या ध्येयपूर्तीसाठी नवनवे सदस्य जोडतच राहतात. कारण त्यांच्या कृतीचे मूळ हे धार्मिक सर्वंकषवादी सिद्धान्तात आहे. सर्वंकषवाद म्हणजेच व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक घटकावर प्रभाव पाडणारी, तसेच नियंत्रण आणणारी विशिष्ट विचारप्रणाली.

धर्माच्या इतिहासात दहशतवादाचे मूळ

इस्लाम धर्मात म्हटलेले आहे की, ‘हे श्रद्धावंतांनो, यहुदी आणि ख्रिस्ती यांना आपले जिवलग बनवू नका, हे आपापसातच एक दुसर्याचे मित्र आहेत आणि जर तुमच्यापैकी कोणी त्यांना आपला मित्र बनवीत असेल, तर त्याची गणना त्यांच्यातच होईल, नि:संशय अल्लाह अत्याचार्यांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो.’ (संदर्भ - 5.51 सूरह अलमाइदा, पारा - 6, पृष्ठ क्र. -238, दिव्य कुरआन-अटीप मराठी भाषांतर, सय्यद अबुल आला मौदूदी, इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई.)

 

इस्लामच्या मते ज्यू लोक हे शापित असून त्यांना देव कधीही मदत करणार नाही. ज्यू लोकांना कधीही राज्यात वाटा मिळणार नाही. तरीही ज्यूंनी इस्रायल हे राष्ट्र पॅलेस्टाइनमध्ये उभे केले. परिणामी ते नष्ट करण्यासाठी इस्लामी देश सज्ज झाले. प्रेषित मुहंमद पैगंबर हे जेव्हा स्वर्गातरात्रीचा प्रवासह्यासाठी निघाले, तेव्हा ते जेरुसलेम येथे आले. त्या ठिकाणी आताअल अक्साही मशीद उभी आहे. त्यामुळे ज्यू आणि ख्रिश्चन ह्यांच्या जेरुसलेममध्ये इस्लामला हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. शिवाय कुराणने मुहंमदाला शेवटचा प्रेषित मानले आहे. त्याआधीचे सर्व प्रेषित - म्हणजे मोझेस आणि जीझस येशू हे काही अंतिम प्रेषित मानलेले नाहीत. ‘कुराणहा इस्लामचा अंतिम धर्मग्रंथ असून त्याआधीचाबायबलहा त्यांनी रद्दबातल ठरवलेला आहे. कुराणने जीझसला केवळ एकदेवदूतमानलेले आहे. ‘मरियमपुत्र येशू याशिवाय काहीही नाही की तो फक्त एक प्रेषित होता.’ (संदर्भ - 5.75, सूरह अलमाइदा, पारा - 6, पृष्ठ क्र. 244, दिव्य कुरआन-अटीप मराठी भाषांतर, सय्यद अबुल आला मौदूदी, इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई.)

ख्रिश्चन धर्माची सुरुवातच जीझसच्या क्रुसावरच्या मृत्यूपासून होते. कुराणने ॅडमपासून प्रेषित मुहंमदापर्यंत सलगता राखली आहे. मात्र ख्रिश्चनांच्या मते जीझस हाच खरा देव आहे. तो काहीदेवदूतनाही, तर स्वत: देव आहे. इस्लामच्या मते जीझसचे आगमन केवळ मुहंमदाच्या भविष्यातील आगमनाला सूचित करण्यासाठी होते. म्हणजे तो स्वत: देव नाही, तर देवाचा निरोप घेऊन आलेला आहे. यातच इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांच्या संघर्षाची बीजे आहेत. त्याचप्रमाणे दहशतवादी संघटना अल कैदाच्या उगमामध्ये आणि आत्मघातकी दहशतवादामागेसुद्धा इस्लामी धार्मिक घटकांचा प्रभाव आढळतो. ओसामा बिन लादेनवर कुराणचा प्रभाव होताच. ‘खिलाफतम्हणजेच जागतिक मुस्लीम शासनाची निर्मिती करण्यासाठी नेता हाअरबविशेषतःकुरेशम्हणजेच प्रेषिताच्या वंशाचा हवा. मग ओसामा त्याच वंशाचा असल्याने त्याने अल कैदाचे नेतृत्व केले. कुराणमध्ये वर्णिल्याप्रमाणेमजलिस--शूराम्हणजेच काउन्सिलची स्थापना केली. मुहंमदाने ज्याप्रमाणे हिजरत केले, म्हणजे मक्केहून मदिनेला स्थलांतर केले, तसेच 1996मध्ये ओसामा अफगाणिस्तानात आला. त्याआधी तो सुदानमध्ये आणि अरेबियामध्ये सक्रिय होता. प्रेषित मुहंमदाने कुणाही गैरमुस्लिमाला - विशेषतः ज्यू आणि ख्रिश्चनांना अरेबियामध्ये दीर्घकाळ वास्तव्य करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे अमेरिकन सैन्याची सौदी अरेबियातील उपस्थिती थेट धर्माच्या विरोधात आहे, हे ओसामा बिन लादेनला पटलेले होते. ह्यातूनच अल कैदाच्या माध्यमातून अमेरिकेवरचा हल्ला झाला. कुराणातील आणखी एक तत्त्व म्हणजे काफिरांसह राहायचे नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी इस्लाम बहुसंख्याक होत गेले, त्या ठिकाणी धर्माच्या आधारे एकत्रीकरण वाढले. तसेच इस्लामी फुटीरतावादी सक्रिय झाल्याचे, दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसते. विशेषत: चीनच्या झिनजियांग प्रांतातीलउघूरह्या मुस्लिमांवर हा प्रभाव आहे. ह्या नागरिकांची भाषा तुर्किक असली, तरीही त्यांची लिपी पर्शिओ-अरेबिक आहे. त्यामुळे चीनपेक्षाही त्यांची नाळ अरेबियाशी जोडलेली आहे. उघूर लोकांना चीनमधून बाहेर पडून पाकिस्तानप्रमाणे स्वत:चे वेगळे इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी उघूर दहशतवादी हल्ले चीनमध्ये झाले. उदाहरणार्थ - 1992 उरुंमक्वी बाँबिंगपासून 2014च्या कुन्मिंग हल्ल्यापर्यंतचे हल्ले. ह्याचे मूळ कारण धार्मिक आणि राजकीय हेतू साध्य करणे आहे.


musalim_2  H x

चीनमधील उघूर मुस्लीम

रशियातील चेचन्याची तशीच भूमिका आहे. येथे सुन्नी मुस्लीम असून ते चेचन्या प्रांतात बहुसंख्य आहेत. चेचन्याच्याइस्लामिक सेपरॅटिस्ट मूव्हमेंटह्यांनी 23 ऑक्टोबर 2002ला मॉस्को थिएटर ओलीस धरून दहशतवादी हल्ला केला होता. तसेच 1 सप्टेंबर 2004ला बेलसान येथे शाळेला ओलीस धरले होते. ह्यात जरी चेचन्यामधून रशियन सैन्य माघारी जावे हे राजकीय कारण असले, तरीही इस्लामी धार्मिक कारणामुळे चेचन्याची चळवळ उभी राहिल्याचे दिसते. चेचन्याला स्वातंत्र्य केवळ राजकीय आणि ऐतिहासिक कारणासाठी नाही, तर धार्मिक कारणासाठी हवे आहे.

1979-89मध्ये सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तानातील वर्चस्वाच्या विरोधात चेचन्याचा युद्धप्रमुख खत्ताब हा ओसामा बिन लादेनला भेटलेला होता. त्यांनी एकत्रितपणे हा संघर्ष केलेला होता. लादेन हा चेचन्याला मदत करत असल्याचे विधान रशियातील अमेरिकेचे राजदूत अलेक्झांडर वेर्शबोव ह्यानी केले होते. (संदर्भ - चेचेन टेररिझम, रशिया, चेचन्या, सेपरॅटिस्ट, काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स, प्रीती भट्टाचारजी, 8 एप्रिल 2010.) तसेच अल कैदानंतर ह्या संघर्षाचा संबंध थेट इसीसशी जोडला गेला आहे. ओमार अल शिशानी हा जॉर्डीयन चेचन जिहादी होता आणि नंतर तो सीरियामध्ये इसीसचा कमांडर बनला आणि 2016मध्ये मारला गेला. (संदर्भ - म्रोक्यू, बास्सेम, चेचेन इन सीरिया रायझिंग स्टार इन एक्स्ट्रेमिस्ट ग्रूप, असोसिएटेड प्रेस, 2 जुलै 2014.) नुकताच 1 जानेवारी 2021ला एका रशियन पोलिसावर चेचन्या येथे हल्ला केला गेला. विशेष म्हणजे इसीसने त्याची जबाबदारी घेतली आहे. (अल जझीरा, 1 जानेवारी 2021.) इसीसच्या वरच्या रँकवर पोहोचणारे मुख्यत: चेचेन आहेत. (संदर्भ - हेट स्पीच इंटरनॅशनल, दि फ्युचर ऑफ चेचेन्स इन इसीस, ॅना बोरशेव्हसकाया, पृष्ठ क्र. 2.)

 

एकूणच दहशतवादाची मुळे धार्मिक मूलतत्त्ववादाच्या विचारसरणीत आढळून येतात. धर्माबरोबर दहशतवादाचेही जागतिकीकरण झालेले आहे. मात्र आधुनिक काळातही तर्कशुद्ध प्रश्न धर्मग्रंथांना विचारणे निषिद्ध ठरवलेले आहे.

 
musalim_1  H x

भारतावरील दहशतवादी हल्ल्यात छबाड हाउसमधील ज्यूंनाही लक्ष्य करण्यात आले होते

देशापेक्षा इस्लाम धर्माचा प्रभाव

धर्म हा घटक मानवी जीवनावर मोठा प्रभाव पाडतो. आपल्या धर्माचे पालन करणे, तसेच त्याचे रक्षण करणे हे स्वाभाविकपणे सगळ्या धर्मांत आढळते. धर्माच्या मूल्यांचे पालन करताना आपल्या देशाच्या कायद्यांचेही भान ठेवावे लागते. पण इस्लाम धर्म ह्याला अपवाद असल्याचे दिसून येते. जगातील बहुतांश हल्ले हे इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी केल्याचे पुरावे इतिहासात आहेत. इस्लाम धर्मातील व्यक्तींचे संघटन अतिशय प्रभावी असल्याचे दिसून येते. सर्वंकषवाद म्हणजे टोटॅलिटारियन थिअरी ही प्रामुख्याने इस्लाममध्ये ठळकपणे जाणवते. धार्मिक ध्येयपूर्तीसाठी आणि मुख्य म्हणजे राजकीय बदल घडवून आणण्याचे बहुतांश प्रयत्न इस्लामी दहशतवादात झालेले आहेत. धर्मासाठी देशाच्या सीमा ओलांडून म्हणजेच राष्ट्रवादाची भावना दुय्यम ठरवून इस्लामी दहशतवादी सक्रिय झालेले दिसून येतात. अन्य कोणत्याही धर्माच्या बाबतीत असे झालेले दिसून येत नाही. नेपाळ हे हिंदूबहुल राष्ट्र आहे. पण जेव्हा भारतातील अक्षरधाम मंदिरावर 24 सप्टेंबर 2002ला दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा कोणताही नेपाळी हिंदू गट त्या विरोधात उभा राहिला नाही. त्याचप्रमाणे जगातील अन्य देशातून कोणतीही हिंदू व्यक्ती भारतातील मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सज्ज झाली नाही. तसेच जेव्हा अफगाणिस्तानमध्ये बामियान येथील बुद्धाच्या मूर्ती तालिबानने फोडल्या - कारण तालिबानच्या इस्लामी राजवटीत मूर्तिपूजाच काय, मूर्तीचे अस्तित्वही चालत नाही - पण तरीही जगातल्या कोणत्याही बौद्ध व्यक्तीने त्याचा बदला घेण्यासाठी काही केल्याचे इतिहासात आढळत नाही. त्याचप्रमाणे श्रीलंकेत इस्टरच्या रविवारी तीन चर्चमध्ये हल्ला झाला. पण श्रीलंकाच काय, अन्य कोणत्याही देशातील ख्रिश्चन व्यक्तीने श्रीलंकेत जाऊन दहशतवादी हल्ला चढवून सूड घेतलेला नाही. इस्लाम धर्मातच अशी उदाहरणे प्रामुख्याने आढळतात, कारण इस्लामी जनतेमध्ये धार्मिक शिकवणीचा मोठा प्रभाव आणि त्याचा स्वीकार मोठ्या प्रमाणात झालेला आहे.

जगातील मुख्य हल्ले आणि इस्लाम

जगातील मुख्य दहशतवादी हल्ल्यांचा विचार केल्यास धर्माचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

 1. अमेरिकेवरचा हल्ला - 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर अल कैदाच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींमध्ये थेट विमाने धडकवून ह्या हल्ल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले. अमेरिकेचा हल्ला हा कोणत्याही धार्मिक स्थळावर झाला नव्हता. ट्विन टॉवर, जे अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीचे, तसेच पेंटॅगॉन, जे सुरक्षिततेचे प्रतीक होते, ह्यांना लक्ष्य केले गेले. त्यामुळे काही जणांनी ह्या हल्ल्यांना धार्मिक हल्ला मानणे चूक आहे असे विश्लेषण केले होते. पण ओसामा बिन लादेनने 2002मध्ये स्पष्ट केले की अमेरिकेने मुस्लीम राष्ट्रांवर जो ताबा मिळवला आहे, त्याच्या विरोधात हा हल्ला आहे. सौदी अरेबियामधील अमेरिकन सैन्य, सोमालियातील मुस्लिमांवरील हल्ल्यांना पाठिंबा, लेबेनॉनमध्ये मुस्लिमांच्या विरोधात ज्यूंना पाठिंबा आणि काश्मीरमध्ये भारताच्या धोरणाला अमेरिकेचा पाठिंबा ही कारणे ह्या हल्ल्यामागे होती. ही सगळी कारणे धर्माशी थेट जोडलेली आहेत. शिवाय, 9/11चा हल्ला चढवणार्या 19पैकी 15 जण सौदी अरेबियाचे होते. आणखी दोन जण युनायटेड अरब अमिरातचे होते. एक जण झियाद जर्राह लेबेनॉनचा होता, तर ह्या गटाचा प्रमुख मोहम्मद अत्ता हा इजिप्तचा होता. वास्तविक इजिप्त आणि लेबेनॉनवर अमेरिकेने कधीही कब्जा केलेला नव्हता. मग तेथील नागरिक ह्या हल्ल्यात का सहभागी झाले? कारण.. धर्म! देशाच्या सीमांपलीकडे जाऊन आपल्या धर्मासाठी हे सगळे एकत्र आले होते.


2. भारतावरील हल्ला - 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर क्रूरपणे दहशतवादी हल्ला चढवला गेला. ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, सी.एस.टी. आणि छबाड हाउस या ठिकाणांवर हल्ला चढवण्यात आला. हा हल्ला लष्कर--तैबाने चढवला होता. ही इस्लामी दहशतवादी संघटना असून तिला पाकिस्तानचे साहाय्य आहे. दहशतवाद्यांनी सी.एस.टी. हे नेहमीच सामान्य नागरिकांची वर्दळ असणारे ठिकाण निवडले, कारण भारतीयांमध्ये मोठी भीती निर्माण करायची होती. सामान्य नागरिक आपल्या देशात सुरक्षित नाहीत, पाकिस्तानातून येऊन थेट आर्थिक राजधानीला वेठीस धरता येते हे दाखवायचे होते. ज्यूंच्या छबाड हाउसलासुद्धा लक्ष्य केले गेले, कारण भारतातही आता ज्यू नागरिक सुरक्षित राहू शकत नाहीत हे जगाला दाखवून द्यायचे होते. जेरुसलेम ह्या इस्लाम, ख्रिश्चन आणि ज्यू ह्या तिन्ही धर्मांसाठी पवित्र असणार्या भूमीवर इस्रायल आणि पॅलेस्टाइन हे दोघेही हक्क सांगतात. इस्रायलची निर्मिती आणि पॅलेस्टाइनचा सातत्याने चाललेला वाद ह्यातून धार्मिक संघर्ष सदैव पेटता राहिलेला आहे. ज्यू जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरीही यापुढे ते सुरक्षित राहू शकणार नाहीत हा संदेश यातून दहशतवाद्यांनी दिला.

3. श्रीलंकेवरील हल्ला - 21 एप्रिल 2019 ह्या दिवशी श्रीलंकेत तीन चर्चेसवर आणि तीन मोठ्या हॉटेल्समध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ले केले गेले. नॅशनल तौहिथ जमाथ, जामियाथूल मिलाथू इब्राहीम आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेवांत ह्यांनी मिळून हा हल्ला केला होता. श्रीलंकेच्या हल्ल्याचे वैशिष्ट्य असे की हा ईस्टरचा रविवार होता. ईस्टरचा दिवस म्हणजे ज्या दिवशी येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाला असे मानून ख्रिश्चनधर्मीय सण साजरा करतात. त्यामुळे चर्चमध्ये जास्त गर्दी असते. तो दिवस आणि त्यांचे प्रार्थनास्थळच लक्ष्य केल्याने हा उघडपणे धार्मिक हल्ला असल्याचे सिद्ध होते. इसीसने ह्याची जबाबदारी घेतलेली आहे.

 

ह्या तिन्ही हल्ल्यांमध्ये एक महत्त्वाचे साम्य आढळते, ते म्हणजेधर्मह्या घटकाचा प्रभाव. थोडक्यात, प्राचीन काळापासून जे धार्मिक संघर्ष चालत आलेले आहेत, त्यांचा प्रभाव आधुनिक काळातील दहशतवादावर जाणवतो. इस्लाम विरुद्ध हिंदू, इस्लाम विरुद्ध ख्रिश्चन आणि इस्लाम विरुद्ध ज्यू अशी अनेक प्रमेये ह्यात आहेत. जरी दहशतवादाला राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक कारणे असली, तरीही मूळ कारणधर्मआहे, असे दिसून येते.

 


Powered By Sangraha 9.0