विवेकशी असलेला ऋणानुबंध

21 May 2021 11:42:14

 डोंबिवलीतील अनेक महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेत, अनेक संस्था मोठ्या करण्यात त्यांचा सहभाग होता. राजकारणाचे क्षेत्र तर त्यांच्या स्वाभाविक रुचीचे क्षेत्र होते. परंतु विवेकबरोबर जे जेवढा काळ राहिले, तेवढे अन्यत्र राहिले नाहीत. यातूनच विवेकच्या नव्या पिढीचे त्यांचे भावनिक अनुबंध तयार झाले.


dombivali_2  H

विवेकचा संपादक म्हणून मी चाळीस वर्षांपूर्वी विवेकची सूत्रे हाती घेतली त्यानंतर काही काळाने विवेकचे प्रकाशन सात महिने स्थगित करून नव्याने सुरू करावे लागले. त्या वेळी शिवराय तेलंग हे विवेकचे पालक होते. विवेक पुन्हा सुरू होत असताना शिवराय तेलंग यांनी आबासाहेब पटवारींशी माझी ओळख करून दिली. “आजपासून आबासाहेब विवेक सहकार भारती यांचे काम करतीलअसे त्यांनी सांगितले. डोंबिवलीचे प्रत्यक्ष लोकांमधून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष म्हणून ते सर्वपरिचित होते. मी संपादक असलो, तरी वयाने आणि अनुभवाने अगदी नवखा होतो. परंतु आमच्या पहिल्याच भेटीत, त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे आमच्यातील दडपण संपून गेले. त्यानंतर त्यांचा विवेकचा माझा ऋणानुबंध निर्माण झाला तो अखेरपर्यंत टिकला. विवेक पुन्हा सुरू होण्याच्या प्रारंभीच्या काळात अत्यंत अल्पकाळात मोठ्या प्रमाणात वर्गणीदार झाले. तेव्हा संगणकाची व्यवस्था नव्हती. अंक पाठविण्यासाठी वर्गणीदारांचे पत्ते चक्रमुद्रांकित करून घ्यावे लागत. त्यामुळे अंक मिळणे, एका वर्गणीदाराला दोन दोन, तीन अंक जाणे हे सररास घडत होते. आलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेणेही अशक्य होत होते. It was public relations disaster. अशा वेळी आबासाहेबांनी जनसंपर्क प्रमुख म्हणून विवेकची जबाबदारी स्वीकारली. जे जिथे जिथे जात, तिथे एकामागून एक तक्रारी ऐकत राहणे हे काम ते करत राहिले. “डोंबिवलीचे नगराध्यक्ष म्हणून काम करताना आलेला अनुभव कामी आलाअसे ते गमतीने म्हणत. पण एखाद्या कसलेल्या उत्तम कार्यकर्त्याप्रमाणे ते त्यातून नाउमेद झाले नाहीत की त्यांच्या हसतमुखपणावर त्याचा परिणाम झाला नाही. मी त्या वेळी अनुभव, वय आणि सामाजिक प्रतिष्ठा याने लहान असूनही संस्था प्रमुख या नात्याने मी घेतलेले सर्व निर्णय त्यांनी मन:पूर्वक स्वीकारले.

विविध सामाजिक स्तरांतील लोकांशी असलेला प्रचंड जनसंपर्क हे आबासाहेबांचे वैशिष्ट्य. विवेकसाठी महाराष्ट्रभर फिरत असताना विवेकसंबंधी तक्रारी करणार्या अनेकांचा कडवट स्वर असे. त्या वेळी आबासाहेबांच्या डोंबिवलीतील जनसंपर्काची त्यांना कल्पना नसे. पण ते जेव्हा कोणत्याही कारणाने डोंबिवलीत जात, तेव्हा आबासाहेबांचा तिथला संपर्क पाहून आपण ज्या प्रकारे त्यांच्याशी वागलो, त्याबद्दल ते शरमिंदे होत ते आबासाहेबांची माफी मागत. अशी अनेक उदाहरणे माझ्या माहितीत आहेत. घार हिंडते आकाशी, पण तिचे मन जसे घरातील पिल्लाकडे असते, तसे आबासाहेबांचे हृदय मन डोंबिवलीत गुंतलेले असायचे. आबासाहेबांचे कार्यकर्तेपण समाजकेंद्री होते. त्यांचा संपर्क समाजाच्या सर्व क्षेत्रांत असे. कोणत्याही कार्यालयात गेले की शिपायापासून ज्या अधिकार्यांना भेटायचे आहे, तिथपर्यंत सर्वांची दखल घेत आबासाहेब जात. आबासाहेबांच्या या समाजकेंद्री विचारांचा परिणाम विवेकमधल्या त्यांच्या सर्व सहकार्यांवर झाला विवेकची मानसिकताही तशी घडत गेली. विवेक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याकरिता आबासाहेबांनी डोंबिवली विशेषांकाची योजना आखली सर्वार्थाने यशस्वी करून दाखविली. डोंबिवली विशेषांकाचा प्रकाशन कार्यक्रम तर दृष्ट लागेल एवढा देखणा झाला. डोंबिवलीतील सर्वपक्षीय महत्त्वपूर्ण व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सहकार हासुद्धा आबासाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे नागरी सहकारी बँका विवेक यांचे विशेष नाते तयार झाले. ठाण्याचे विवेक व्यासपीठाच्या वतीने झालेलेकोकमहे कोकणी, कन्नड, मराठी त्रैभैषिक संमेलन यशस्वी करण्यात आबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता.

दर वर्षी ठिकठिकाणी गुढीपाडव्याला होणारी नववर्ष यात्रा हे आबासाहेबांचे नेहमीसाठी जिवंत राहणारे स्मारक आहे. त्यांच्या याबाबतच्या विचारप्रक्रियेची मला तपशीलवार माहिती आहे. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. मोरोपंत पिंपळे यांनी महाभारत युद्धाला पाच हजार वर्षे पूर्ण होण्याचे स्मरण म्हणून इसवीसनाप्रमाणे युगाब्द ही संकल्पना जेव्हा रूढ करण्याचे ठरविले, तेव्हा ती परिवारापुरती मर्यादित राहता सामाजिक कशी बनेल याचा त्यांच्या मनात विचार सुरू झाला. ते तेव्हा डोंबिवलीच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी गणेश मंडळ धार्मिक कामापुरते मर्यादित ठेवता ते समाजाभिमुख केले होते. सर्व डोंबिवलीकरांच्या सहभागातून गणेश मंडळाच्या माध्यमातून या नव्या वर्षाचे स्वागत करता येईल, अशी कल्पना त्यांनी मांडली कोणीही केलेल्या अपेक्षेपलीकडे यशस्वी करून दाखविली. यातूनच पुढे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात या यात्रा सुरू झाल्या. त्यांनी यासंबंधी एक परिषदही आयोजित केली होती. त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या कवितांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन घडवून आणले. राम शेवाळकरांसारख्या महाराष्ट्रातील अनेक सांस्कृतिक महनीय व्यक्तींशी त्यांचा केवळ परिचय नव्हे, तर स्नेह होता. त्या सर्वाचा लाभ विवेकला होत असे. त्यातूनच ज्येष्ठपर्व प्रकाशन सुरू झाले.


dombivali_1  H

डोंबिवलीतील अनेक महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेत, अनेक संस्था मोठ्या करण्यात त्यांचा सहभाग होता. राजकारणाचे क्षेत्र तर त्यांच्या स्वाभाविक रुचीचे क्षेत्र होते. परंतु विवेकबरोबर जे जेवढा काळ राहिले, तेवढे अन्यत्र राहिले नाहीत. यातूनच विवेकच्या नव्या पिढीचे त्यांचे भावनिक अनुबंध तयार झाले. डोंबिवलीतील सांस्कृतिक क्षेत्राचे मात्र ते अनभिषिक्त सम्राट होते. डोंबिवलीतील कोणत्याही संस्थेच्या ते पदावर असोत किंवा नसोत, ज्यांना ज्यांना डोंबिवलीत सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल, त्यांच्याकरिता हक्काचा सल्लागार, मदत करणारा सहकारी कार्यक्रमानंतर ज्यांच्याकडे हक्काने जाऊन आपला आनंद व्यक्त करावा किंवा वेदना सांगाव्यात, अशी ते व्यक्ती होते. त्यांच्या अखेरपर्यंत त्यांचे हे स्थान कायमचे होते.

आजच्या विवेकच्या वाटचालीतील आबासाहेबांचा सहभाग हा त्यांनी विवेकच्या नव्या पिढीला दिलेल्या प्रेरणेतून, स्नेहातून वाहणारा जिवंत झरा आहे. आपल्यानंतर असा जिवंत वाहता झरा निर्माण करून जाण्याचे भाग्य फार कमी जणांच्या वाट्याला येते. अशा कार्यकर्त्यांच्या घरची स्थिती मात्र बाहेरच्यांना मिळणारा जीवनदायक सूर्यप्रकाश त्याची धग घरात अशी असते. घरात भेटायला येणारे असंख्य जण, त्यांचे आगतस्वागत, कोणत्याही घरगुती कार्यक्रमातील अनिश्चितता या सर्वातून घरच्या मंडळींना जावे लागते. पण असे निखारे हाती धरणारे निघाल्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते काम करू शकत नाहीत. आबासाहेबांच्या दु:खद निधनामुळे त्यांनाही एक पोकळी जाणवत असणार. त्यांच्या दु:खात मी, माझे कुटुंबीय विवेक समूहाचा परिवार सहभागी आहे.


Powered By Sangraha 9.0