@अमरजा कुलकर्णी
घन कचरा व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्या संधी मिळवायच्या असतील, तर भारताला त्यानुसार तयार झालेल्या तंत्रज्ञानाच्या गरजा व त्यासाठी लागणारी वैज्ञानिक निकषांची जोड, व्यवसायपूरक शिक्षण व तंत्रज्ञान प्रशिक्षण अणि कौशल्यविकास ह्यांचा समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर यांचा ‘वारसा’ हा अहवाल महत्त्वाचा ठरतो.
एखादी समस्या जर आपल्याला खूप वर्षांपासून भेडसावत असेल, त्यासंबंधी अनेक लोकांनी त्यांच्या परीने केलेल्या प्रयत्नांना जर तेवढ्यापुरतेच यश मिळत असेल आणि ती समस्या पुढे जाऊन एखादा गंभीर परिणाम करणार असेल, तर ती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कसा विचार करावा?
घन कचरा ही एक अशीच अनेक वर्षे भेडसावणारी समस्या आहे आणि त्याचा किमान आता तरी आपण वेगळा आणि स्वतंत्र सांगोपांग विचार करण्याची गरज आहे.
रिपोर्ट लिंकर आणि मोर्डर इंटेलिजन्स या संस्थांच्या अहवालामध्ये भारतातील घन कचरा व्यवस्थापनाचे मार्केट 2025पर्यंत 1500 कोटी डॉलर्सचे असणार असल्याचा दावा करून मार्केटच्या वाढीचा वेग (CAGR) 7.14% असेल, असे भाकीत वर्तवले आहे. असे असले, तरी अद्याप हे मार्केट सुप्तावस्थेत आहे. परंतु जर सर्व दृष्टींनी विचार करून घन कचरा व्यवस्थापन मार्केटच्या वाढीस चालना दिली, तर आपल्या बर्याच पर्यावरणविषयक समस्यांना उत्तरे मिळतील. याच दृष्टीकोनातून पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर (PARC) या संस्थेने 25 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाइन माध्यमातून घन कचरा व्यवस्थापन या विषयासंदर्भात ‘ "WARSA (वारसा) - Waste As Resource by Changing Stakeholders' Approach' नावाचा शोधनिबंध प्रकाशित केला.

ह्या अहवालाच्या माध्यमातून घन कचरा व्यवस्थापनाच्या संपूर्ण व्यवस्थेचा विचार केला. या व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेले घटक कोणते, त्यांच्या निर्णयांचा परस्परपूरक किंवा परस्परविरोधी कसा परिणाम होतो, या परिणामांद्वारे व्यवस्था सुधारण्यासाठी किंवा नवीन व्यवस्थेची पायाभरणी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा संपूर्ण ऊहापोह या अहवालात केला आहे. यासह घनकचरा व्यवस्थापनाची काही यशस्वी उदाहरणे व व्यवस्थेच्या सुसूत्रतेमध्ये येणारे महत्त्वाचे 44 अडसरदेखील यात मांडले आहेत.
UNESCAPच्याsimulation tooनुसार आपण जर सद्य:स्थितीत फक्त एक टक्का सुधारणा करू शकलो, तरी आपण घन कचर्यात एरवी टाकून दिल्या जाणार्या उपयोगी संसाधनांपैकी 695 लाख टन संसाधनांची बचत करू शकतो, ज्याची किंमत 582290 लाख डॉलर्स इतकी असेल! याशिवाय फक्त 1% सुधारणा झाली, तरी 106.9 लाख लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. बेरोजगारी या जागतिक समस्येवर या मार्गाने उपाय निघत असल्यामुळेसुद्धा पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटरसाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
घन कचरा व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्या संधी मिळवायच्या असतील, तर भारताला त्यानुसार तयार झालेल्या तंत्रज्ञानाच्या गरजा व त्यासाठी लागणारी वैज्ञानिक निकषांची जोड, व्यवसायपूरक शिक्षण व तंत्रज्ञान प्रशिक्षण अणि कौशल्यविकास ह्यांचा समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर यांचा ‘वारसा’ हा अहवाल महत्त्वाचा ठरतो. असलेल्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाच्या स्वतंत्र व्यावसायिक संस्था, शासकीय, निम-शासकीय संस्था, शिक्षण संस्था, ह्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था आणि सुविधा पुरवणारे उद्योजक यांनी ‘वारसा’ अहवालाचा अभ्यास करायला हवा. या अहवालामुळे घन कचरा व्यवस्थापनाच्या व्यवस्थेतील प्रत्येक घटकाचा सहभाग अधिक क्रियाशील व अधिक सकारात्मक होण्यास मदत होईल.

कोरोना काळानंतर अर्थव्यवस्थेचा डोलारा परत उभा करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राची अशी सुव्यवस्था लावली, तर देश स्तरावर आपल्याला सकारात्मक बदल येत्या काळात पाहायला मिळतील. या संपूर्ण landcapeकडे संधी म्हणून पाहिले, तर येत्या काळात घन कचरा व्यवस्थापनाला व्यावसायिक दर्जा तर मिळेलच, शिवाय सफाई साथीदार आणि इतर कर्मचारी यांना समाजात मानाचे स्थान मिळण्यास मदत होईल. याबाबतची जागरूकता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त संस्था एकत्र येऊन कसे काम करू शकतील, याबद्दलसुद्धा ‘वारसा’मध्ये स्पष्टता आणायचा प्रयत्न केला आहे. येत्या काळात पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटरने घन कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करणार्या सर्वांच्या एकत्रित सहकार्याने सर्व घटकांची परस्परपूरकता व त्यांच्यातील समन्वय वाढवण्याचे काम हाती घेतले आहे.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळे -
1. WARSA - Waste As Resource by changing Stakeholders' Approach (https://www.parcfornation.org//p/reports/)
2. पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटरतर्फे 25.9.2021 रोजी आयोजित प्रकाशन सोहळा https://www.youtube.com/watch?v=UwQduCyvQzI
3. रिपोर्ट लिंकर - https://www.reportlinker.com/p03812869/Waste-Management-Market-in-India.html
4. मोर्डर इंटेलिजन्स - https://www.mordorintelligence.com/industry-reports/india-waste-management-market
5. UNESCAP resource efficiency simulation tool -
https://sdghelpdesk.unescap.org/re/index.html
संशोधक, पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर