पुणे जिल्ह्याचा ‘पुरंदर नॅचरल्स’ ब्रँड

04 Jan 2021 17:46:58

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथीलपुरंदर नॅचरल शेतकरी गटानेअवघ्या तीन वर्षांच्या काळात फळे, कडधान्ये, भाजीपाला, दूध यावर प्रक्रिया उद्योगांचे, कोल्ड स्टोरेज, गो-आधारित प्रक्रिया उद्योगाचे यशस्वी नियोजन करून कृषिक्रांती घडवून तर आणलीच आहे, शिवाय गटाचा सेंद्रिय उत्पादनांचापुरंदर नॅचरल्सहा ब्रँड सर्वदूर पोहोचत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांनी या गटाचा आदर्श घ्यावा असाच आहे.

krushi_2  H x W

सासवड-पुरंदर हा पट्टा तसा दुष्काळी भाग समजला जातो. पण इथल्या माणसांनी कायमच परिस्थितीवर मात करण्याची हिंमत दाखवली आहे. बोपगावची कहाणी अशाच स्वरूपाची आहे. पुण्यापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर बोपगाव (ता. पुरंदर) हे छोटेसे गाव आहे. कानिफनाथांच्या गडामुळे (मंदिर) बोपगावची ओळख सर्वदूर पोहोचली आहे. गावाची सतराशे हेक्टर क्षेत्रावर शेती आहे. गावाच्या उत्तर दिशेला असमाधानकारक पाऊस पडतो, तर दक्षिणेला समाधानकारक पाऊस पडतोे, असे गावाचे पर्जन्यमान आहे. पूर्वी बहुतांश शेतकर्यांचा कल पारंपरिक शेतीकडे असायचा. शेतकर्यांनी शाश्वत शेतीकडे वळावे, यासाठी गावातील तरुण प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर फडतरे यांनी प्रयत्न सुरू केला. फडतरे यांच्या प्रयत्नांना गावातील सुजाण शेतकर्यांनी पाठिंबा दर्शवला आणि यातून 2017 साली पुरंदर नॅचरल शेतकरी गटाची सुरुवात झाली. प्रारंभी 20 शेतकर्यांसह सुरू असलेल्या गटाच्या कामात आज जवळपास 45हून शेतकरी जोडले गेले आहेत. गावातील शेतकरी एकत्रित आल्याने गावाच्या शेतीमध्ये आश्वासक बदल दिसत आहे.

ध्येयवादी स्वयंसेवकांनी बांधला गटाचा सेतू

 खेड्याकडे चलाअसा संदेश देणार्या महात्मा गांधी यांनी स्वयंपूर्ण गावाचे स्वप्न पाहिले होते. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण बनले, तर सशक्त, संपन्न भारताचे स्वप्न होईल हे महात्माजींनी ओळखले होते. ग्रामविकासाचे स्वप्न पाहणार्या अशा विविध महापुरुषांचे विचार कृतीत आणण्यासाठी असंख्य लोक धडपडत आहेत. ज्ञानेश्वर फडतरे हे त्यातीलच एक. ज्ञानेश्वर हे तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले व्यक्तिमत्त्व. जिल्हा सहकार्यवाह यासह संघाच्या विविध आयामांचे दायित्व त्यांनी सांभाळलेे आहे. ज्ञानेश्वरजी एम.टेक. पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 2008 ते2011 काळात मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे पर्यावरण अभियंता म्हणून काम केले. या ठिकाणीही संघाची जबाबदारी सांभाळली. परदेशात गेले, तरी गावाची ओढ मात्र होती. त्यामुळे फडतरे यांना गावासाठी काहीतरी करण्याची आस निर्माण झाली. मलेशियातून परत आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि त्यातून पुढेपुरंदर नॅचरल शेतकरी गटाचीनिर्मिती झाली. गटाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत फडतरे हेच गटाचे अध्यक्ष आहेत.

 
फडतरे सांगतात, “आपला व्यवसाय सांभाळताना, त्यातून मागे वळून पाहताना गावाच्या गावासाठी, शेतीसाठी काहीतरी करावे या हेतूने प्रथम आम्ही दहा-बारा जण एकत्र आलो आणि सेंद्रिय शेती करू लागलो. त्यासाठी आम्ही कृषी विभागाकडून रीतसर प्रशिक्षण घेतले. पुढे शेतकरी गट योजनेचे महत्त्व कळले आणि शेतकरी गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला
 

आत्मा विभागाचे डायरेक्टर, सध्या महाराष्ट्र शासनाचे कृषी गुणवत्ता विभाग प्रमुख सुनील बोरकर यांनी गट शेती योजनेमधील बारकावे आणि योग्य पद्धतीने काम कसे करावे? याविषयी मार्गदर्शन केले.


krushi_3  H x W 

 

सेंद्रिय शेतीला चालना

रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती अधिक शाश्वत आणि कायमस्वरूपी उत्पन्न देणारी पद्धत आहे. सेंद्रिय शेती करता यावी यासाठी आमच्या गटातील दोन शेतकर्यांनी सिक्कीम येथे जाऊन सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले आहे.

आज आमचा गट 45 प्रकारचा विविध सेंद्रिय भाजीपाला पिकवतो आणि त्याची विक्रीही करतोे. त्याचबरोबर कडधान्य डाळी, दूध यासह विविध शेतमाल पिकवतो. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणासाठी पी.जी.एस. इंडिया(Participatory Guarantee System (PGS) for India) प्रणालीवर गटाची नोंदणी करण्यात आली आहेअसे फडतरे यांनी सांगितले.

जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी गटातील शेतीचे माती-पाणी परीक्षण केले जाते, असेही ते म्हणाले.

प्रक्रिया उद्योगाची निर्मिती

शेतकर्यांच्या शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणे आणि या मालाची निर्मिती करणे अशा विविध पातळ्यांवर गटाचे काम सुरू आहे.

या संदर्भात बोलताना फडतरे म्हणाले, “शेतीमध्ये रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी आहेत. या संधी ओळखून आमचा गट शेतीमाल प्रक्रिया उद्योगात उतरला. गटातील सदस्यांनी विविध ठिकाणी जाऊन प्रकल्प उद्योगाला लागणारे प्रशिक्षण घेतले आहे. फळे, कडधान्ये, भाजीपाला, दूध यावरील प्रक्रिया उद्योगांची, कोल्ड स्टोरेज, गो-आधरित प्रक्रिया उद्योगाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. हा उद्योग यशस्वी करण्यासाठी त्यासाठी लागणारे पाणी नियोजन शेती नियोजन केले आहे, यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. आज गटाचे काम पाहून अनेक शेतकरी आमच्याशी जोडले गेले आहेत. गटाने 1500 चौ.फुटाची सामूहिक शेतमाल प्रक्रिया इमारत बांधलेली आहे


krushi_1  H x W 

दुग्धजन्य पदार्थांत पनीर, खवा, पेढे, तूप तर मसाल्यांमध्ये मिरची, धणे, गोडा मसाला, प्रक्रियायुक्त उत्पादनांत जॅम-जेली, आमरस, पल्प आदी पदार्थ, तर गो-आधारित उत्पादनांत गोअर्क, साबण, केसांना लावायचे तेल आदी पदार्थांची निर्मिती केली जाते. गटाकडे डाळ मिळ ऑइल तेल मशीन आहे. पशूंसाठी लागणारा चाराही (मुरघास निर्मिती) आमच्याकडे उपलब्ध आहे. अशी सर्व उत्पादन टिकून राहण्यासाठी शीतगृहाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 1000 लीटर क्षमतेचा दूध प्रकल्प सुरू आहे

 
आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत सुरक्षित, शुद्ध नैसर्गिक पद्धतीने हा प्रक्रिया उद्योग सुरू आहे. त्यामुळे आमचा गट उत्पादनाचा दर्जा नियंत्रित राखण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळेचपुरंदर नॅचरल्सब्रँडची ओळख सर्वदूर पोहोचत आहे. आज गटाचे वार्षिक उत्पन्न 50 लाखाच्यावर गेले आहे. त्यामुळे गटातल्या प्रत्येक शेतकर्याची वाटचाल आर्थिक सक्षमतेकडे सुरू आहे.”

 

विक्रीचे व्यवस्थापन

पिकते तिथे विकत नाहीअसे म्हणतात. ही म्हण आम्ही खोटी ठरवली. त्यासाठी आम्हाला कसलीही जाहिरात करण्याची गरज लागत नाही. ‘कल्पकता आणि गुणवत्ताया दोन गोष्टींमुळे आमच्या मालाला बाजारात मोठी मागणी आहेअसे फडतरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “गटाची स्वतःची दोन अन्य 11 विक्री केंद्रे आहेत. या माध्यमातून दूध, पनीर, पेढे, खवा, तूप, कडधान्ये, डाळी, फळे यांची, गो-आधारित आणि सेंद्रिय उत्पादनांची विक्री होत असते.

लॉकडाउनच्या काळात शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी मिळाली. एप्रिल ते मे महिन्यात गटामार्फत पुण्यातील विविध भागांतील गृहनिर्माण संस्थांमध्ये दररोज 2 ते टन सेंद्रिय भाजीपाल्याचा फळांचा पुरवठा करण्यात आला. यातून 14 ते 15 लाखाची उलाढाल झाली. या काळात आम्हाला तीन ते चार हजार फ्लॅटधारकांपर्यंत पोहोचता आले. आज 20 ते 25 गृहनिर्माण संस्था गटाच्या संपर्कात असून त्यांना नियमित शेतमाल पुरवण्यात येत असतो आणि ग्राहकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद लाभतो आहे.”

गटामार्फत शेतकर्यांना मार्गदर्शन

सेंद्रिय शेती, प्रक्रिया उद्योगाविषयी शेतकर्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गटामार्फत शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाते. उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, यवतमाळ, नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील 50 गावांतील शेतकरी गटांना प्रशिक्षण मार्गदर्शन दिले आहे
कृषी उपायुक्त दिलीप झेंडे, तालुका कृषी अधिकारी बरडे, आत्मा विभागाचे देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी आदींनी अनेक वेळा प्रकल्पास भेट देऊन गटातील शेतकर्यांचा उत्साह वाढवला आहे. गटामार्फत जागतिक दर्जाचे शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभा रहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतअसा मनोदय फडतरे यांनी व्यक्त केला.

 

कृषी सिंचनासाठी प्रयत्न 

गावातील जास्तीत जास्त शेती ओलिताखाली यावी, यासाठी गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गटाचे स्वतःचे 1.5 कोटी लीटरचे सामूहिक शेततळे आहे. याद्वारे शेतीला पाणीपुरवठा होतो. गावातील उत्तरेचा भाग कोरडवाहू आहे. दक्षिण भागात एक मोठा बंधारा आहे. या बंधार्यातील पाणी उत्तरेला नेण्यासाठी योजना तयार केली आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी कृषी उपायुक्त दिलीप झेंडे यांनी भारत फोर्ससह विविध संस्था जोडून दिल्या आहेत. येत्या काही महिन्यांत ही योजना पूर्ण होईल. या योजनेमुळे 400 हेक्टर शेती पाण्याखाली येणार आहेअशी माहिती ज्ञानेश्वर फडतरे यांनी दिली.
\\
कृषी विभागाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात गटाने सहभाग नोंदवला आहे. सेंद्रिय शेतीला उपयोगी ठरतील अशा एक हजाराहून झाडांची लागवड निगा राखण्याची जबाबदारी गटाने घेतली आहे. शासनाकडून स्वयंसेवी संस्थांकडून पुरंदर नॅचरल शेतकरी गटाच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. गटास राज्य शासनाच्या राज्य जिल्हा पातळीवरच्या उत्कृष्ट सेंद्रिय शेती गटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यात विविध ठिकाणी भरणार्या कृषी प्रदर्शनांत गटाने सहभाग नोंदवला आहे.

शेती शाश्वत आणि किफायतशीर होण्यासाठी आता एकट्याने शेती कसणे उपयोगाचे नाही, तर समूहाने करणे गरजेचे आहे, हे पुरंदर नॅचरल शेतकरी गटाने दाखवून दिले आहे. अशी गटशेती करण्यासाठी पुढाकार घेणारे ज्ञानेश्वर फडतरेंसारखे गटशेती प्रवर्तक गावोगावी तयार झाले पाहिजेत, हे मात्र नक्की.

Powered By Sangraha 9.0