नवयुगाचा लोकप्रतिनिधी

25 Jan 2021 15:51:38

मराठवाड्यातील एक उमदा, नवयुगाचा लोकप्रतिनिधी म्हणून . राणा जगजितसिंह पाटील यांची ओळख आहे. ते साधे आमदार असोत वा मंत्री असोत, आपल्या मतदारसंघाशी सतत संपर्कात राहून कार्यरत राहणे हा त्यांचा स्थायिभाव आहे. या त्यांच्या कामाच्या पद्धतीमधूनच त्यांनी आपल्या नेतृत्वाची मुळे खोलवर रुजविली आहेत.


bjp_1  H x W: 0 

मराठवाड्यातील महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला एक जिल्हा म्हणजे उस्मानाबाद. या जिल्ह्याचे राजकीय वैशिष्ट्य असे की येथे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. . राणा जगजितसिंह पाटील हे त्यांचे चिरंजीव. . पाटील यांना आपल्या पित्याकडून (डॉ. पद्मसिंह यांच्याकडून) लहानपणापासूनच समाजकारणाचे, राजकारणाचे बाळकडू मिळाले. राणा जगजितसिंह पाटील सर्वप्रथम 2014मध्ये उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वीही दोन वेळा ते विधान परिषदेवर आमदार राहिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वयाच्या 32व्या वर्षी ते महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात कृषी राज्यमंत्री होते. तरुण मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात येतो.

. राणा जगजितसिंह पाटील यांनी तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. उत्तम संघटनकौशल्य, मनमिळाऊ स्वभाव आणि कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे कार्यकर्ता-जनतेमध्ये त्यांच्याबाबत आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांचे नेतृत्वगुण हेरून त्यांना भाजपात आणले. सध्या . पाटील हे भाजपाकडून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पाटील यांच्या रूपाने तुळजापूर मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुलले आहे. . पाटील यांनी या संधीचे सोने करून दाखविले आहे.

 
bjp_3  H x W: 0

दूरदृष्टी विकासाची

उस्मानाबाद/तुळजापूर मतदारसंघाच्या जडणघडणीसाठी विधायक आणि रचनात्मक दिशा देण्यासाठी . पाटील यांचे बहुविध प्रयत्न सुरू आहेत.

 

उस्मानाबाद शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उजनी धरणातून 118 कि.मी. अंतरावरून पाणी आणले आहे. उजनी धरणातून 16 एम.एल.डी. क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून शहराला शाश्वत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यातील 2 एम.एल.डी. पाणी एम.आय.डी.सी.साठी राखीव ठेवण्यात आले आहे. उस्मानाबाद शहर टँकरमुक्त करण्याचा संकल्प तडीस नेला आहे.

 

जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने उस्मानाबाद शहरालगत कौडगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली आहे. या ठिकाणी 1500 एकर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून 1000 एकरच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये 50 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी . पाटील यांनी घेतलेली मेहनत फळाला येत आहे.

 

तुळजापूर विकास प्राधिकरणासाठी . पाटील यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तुळजाभवानी मंदिर परिसरातील व्यापारी, पुजारी यांच्या अडचणी इतर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाटील स्वतः प्रयत्न करताहेत.

 

संत गोरोबाकाका यांचे जन्मस्थान असलेल्या तेर या गावास ऐतिहासिक धार्मिक महत्त्व आहे. या गावात उत्खननात सापडलेल्या पुराणवस्तू जगासमोर आणण्याची जबाबदारी . पाटील यांनी स्वीकारली आहे. तब्बल 16 कोटी रुपये खर्च करून तेर येथे कै. रामलिंग अप्पा लामतुरे पुराणवस्तुसंग्रहालयाच्या नवीन इमारतीचे काम हाती घेण्यात आले आहे. संबंधित विभागाशी चर्चा करून तेरसाठी एक बृहद आराखडा करण्याचे . पाटील यांचे नियोजन सुरू आहे.


bjp_5  H x W: 0

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला सध्याच्या सरकारने मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेला गतिमानता प्राप्त होणार असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.

 

. पाटील म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, टेक्निकल टेक्स्टाइल पार्क, मराठवाडा वॉटर ग्रिड तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाने चालू करणे, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग हे विषय राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवल्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले नसल्याने रखडले असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयांबाबत महाविकास आघाडी सरकारचे नकारात्मक धोरण आहे.

 

सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी . पाटील यांनी मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन न्याय देण्याची विनंती केली आहे.

 
bjp_1  H x W: 0

कोविड-19 काळामधील सेवा कार्य

समाजाच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून संपूर्ण लॉकडाउनच्या काळात . पाटील यांनी वैद्यकीय आघाडीवरदेखील पुढाकार घेतला होता. कोरोनाबाबत समुपदेशन करणे, मास्क वापरण्यास प्रोत्साहन देणे, सोशल डिस्टन्सिंगबद्दल जनजागृती करणे इत्यादी कामे केली आहेत.

. पाटील यांच्यामार्फत जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना 1 लाख मास्क्सचे 50 हजार सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले होते. गोरगरिबांसाठी कळंब, उस्मानाबाद तुळजापूर येथे अन्नवाटप करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये क्लाउड फिजिशियन सेवा सुरू करून घेण्यात आली होती.

 

तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 200 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट आहे. नळदुर्ग हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने रुग्णांना वेळेत आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी या ठिकाणी रुग्णालय लवकरात लवकर सुरू होण्यासाठी पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.

 
bjp_2  H x W: 0

शेतकर्यांसाठी कटिबद्ध

उस्मानाबाद जिल्हा हा बालाघाट डोंगररागांत वसलेला, पण दुष्काळाच्या छायेत असलेला. त्यामुळेच जिल्ह्याच्या पाचवीला पूजलेल्या दुष्काळाचे संकट शेतकर्यांना नेहमीच त्रासदायक ठरत आलेले आहे. जिल्ह्यातील दुष्काळ हटावा, शेतकर्यांना चांगले दिवस यावेत यासाठी . राणा जगजितसिंह पाटील विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहेत.

 

सन 2020च्या ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी पुरामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांचे अतोनात नुकसान झाले होते. राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून केंद्र राज्य सरकारने काही प्रमाणात मदत केली, परंतु ती अत्यल्प आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्यांना योग्य नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित क्रमप्राप्त असताना दुर्दैवाने अधिकांश शेतकरी या हक्काच्या रकमेपासून वंचित आहेत.

 

. पाटील सांगतात, “प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपनी निवडण्याचे करार करण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहेत. करारामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पीककाढणीपश्चात झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीला बाधित शेतकर्यांनी 72 तासांच्या आत फोटोसह अवगत करण्याबाबतची एक अट आहे.

 
bjp_4  H x W: 0

ऑक्टोबर, 2020मध्ये झालेल्या अभूतपूर्व अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतमालासह शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते बाधित शेतकरी 72 तासांमध्ये विमा कंपनीला माहिती कळवू शकत नव्हते.”

 

. पाटील यांनी ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर ही अट काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. परंतु 24 ऑक्टोबरनंतर आलेले अर्ज गृहीत धरण्याची भूमिका विमा कंपनीने घेतली होती. याबाबत अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर कृषी आयुक्तांच्या सहकार्याने अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकर्याला नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपनीने 11 जानेवारी 2021 रोजी मान्य केले आहे. परंतु बहुतांश शेतकरी अर्जच करू शकले नाहीत. ते नुकसानभरपाईपासून वंचित राहत आहेत.

 

. पाटील पुढे म्हणाले, “जिल्हा महसूल प्रशासनाने केलेल्या प्रक्रियेतून उमरगा, लोहारा, तुळजापूर उस्मानाबाद या चार तालुक्यांची इतर तालुक्यांतील काही गावांची पैसेवारी 50च्या आत आली आहे. पीक विम्याशी संबंधित पीक कापणी प्रयोगातून जिल्ह्यात शेतमालाचे उत्पादन जास्त असल्याने पीक विमा देय नाही, असा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे.

 

परंतु प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या अनेक शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे ते या हक्काच्या नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.”

 

याबाबत राज्य सरकारने पीक विम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी . पाटील यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महत्त्वाकांक्षी मानल्या जाणारी मराठवाडा वॉटर ग्रिड योजना गुंडाळण्याचे काम सध्याचे महाविकास आघाडी सरकार करत आहे.

 

उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्याची समस्या आहे. उन्हाळ्यात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि महिलांच्या आरोग्यावरदेखील होतो. मराठवाडा वॉटर ग्रिड योजना पूर्ववत होण्यासाठी जनआंदोलन सुरू करू असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
 

महिला सबलीकरण

महिलांच्या सक्षमीकरणासाठी . पाटील यांचे एक पाऊल सदैव पुढे आहे. महिला स्वावलंबी स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी केंद्र राज्य शासनाच्या अनेक योजना महिलांपर्यंत पोहोचवत आहेत. आत्मनिर्भर भारत या योजनेतून अधिकाधिक महिला कशा सक्षम होतील यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

 

ग्रामीण भागात कुणावर अन्याय होत असेल, तर न्याय मिळवून देण्यासाठी बचत गटांच्या महिलांनी संघटितरित्या अन्यायाच्या विरोधात उभे राहायला पाहिजे. त्याचबरोबर गावपातळीवर दारूबंदी व्यसनमुक्तीसाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी आमचे सदैव सहकार्य राहीलअसे . पाटील यांनी सांगितले.

केंद्रीय योजना जनतेपर्यंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी अनेक जनहित योजना राबविल्या आहेत. मुद्रा योजना, जन धन योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अशा अनेक योजनांत नवनिर्माणाची आस दिसून येते. या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी . पाटील प्रयत्न करत आहेत. पाटील यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत उस्मानाबाद येथील 100 ते 125 फेरीवाल्यांना अल्प व्याजाने 10,000 रुपये कर्जाचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेमुळे छोट्या उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.

 

माणसाचे कर्तृत्व आणि वागणूक यावर त्याचे मोठेपण अवलंबून असते. उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शेतकर्यांचे, सर्वसामान्य जनतेचे हित जपण्याबरोबरच विकासाची दूरदृष्टी ठेवणारा लोकप्रतिनिधी म्हणून . राणा जगजितसिंह पाटील यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे, हे मात्र नक्की.

Powered By Sangraha 9.0