अंधेरनगरी इम्रान राजा!

15 Jan 2021 15:17:03

गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील राजधानी इस्लामाबादपासून रावळपिंडी, पेशावर, कराची, क्वेट्टा, लाहोर, सक्कर, फैसलाबाद, मुलतान आदी 114 विविध शहरे काळोखात बुडाली होती. पाकिस्तानी शहरांना वीजकपात नवी नाही. पण एकाच वेळी इतक्या लहान-मोठ्या शहरांत एकदम वीज गायब होते असे घडले नव्हते. या घटनेनंतर इम्रान खान पाकिस्तान कधी नव्हे एवढे चेष्टेचे विषय झाले आहेत.

Pakistan_4  H x

संपूर्ण पाकिस्तान एक रात्र अंधारात होता, ही बातमी खरे तर पाकिस्तानची सध्याची अवस्था दाखवायला पुरेशी आहे. कोणत्याही एका वेळेस पाकिस्तानला आठ हजार ते दहा हजार मेगावॅटचा तुटवडा असतो. मग गेल्या आठवड्यात एकदम सगळा पाकिस्तान अंधारात कसा सापडला, हे कोणालाही गूढ वाटत नाही हे विशेष. काय झाले, कसे झाले याविषयी चौकशी व्हायची तेव्हा होईलही, पण याविषयी बोलताना कोणीही इथल्या व्यवस्थेलाच त्याचा दोष देत असतो, हे नक्की. इथली नोकरशाही भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहे आणि तिला अत्यंत वाईट व्यवस्थापनाची जोड मिळाली आहे, म्हणूनच सर्व जगात पाकिस्तानचे कसे हसे झाले, हेच आता जो-तो सांगू लागला आहे. इम्रान खानांनी हा देश चीनला विकला आहे, त्यामुळेही ही अवस्था झाल्याचे निदान आता काढले जात आहे. एक देश आपला विजेचा तुटवडाही भरून काढू शकत नाही आणि त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खाननया पाकिस्ताननिर्माण करायची फसवी आशा सातत्याने दाखवत राहतात. त्यातही पुन्हा पाकिस्तानचीप्रगतीभारताला पाहवत कशी नाही, हेही सांगितले जात असते. मात्र 2013मध्ये याच पाकिस्तानने भारताकडून रोज किमान 500 मेगावॅट विजेची मागणी केली होती. त्या वेळी आपण त्यांना ती देऊही केली होती. आपले ऊर्जा सचिव इस्लामाबादला गेले होते, पण वीजवहन व्यवस्था नीट नसल्याने ती वीज तिथे पोहोचलीच नाही. मात्र तेव्हा याच इम्रान खानांनी तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर टीका केली होती. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील राजधानी इस्लामाबादपासून रावळपिंडी, पेशावर, कराची, क्वेट्टा, लाहोर, सक्कर, फैसलाबाद, मुलतान आदि 114 विविध शहरे काळोखात बुडाली होती. पाकिस्तानी शहरांना वीजकपात नवी नाही. पाकिस्तानमध्ये हे घडत असतेच, पण एकाच वेळी इतक्या लहान-मोठ्या शहरांत एकदम वीज गायब होते असे घडले नव्हते.

 

मी 1996मध्ये कराचीला गेलो असता एका रात्री तिथली वीज अशीच गायब झाली होती. कराची हे शहर मुंबईसारखेच असल्याने कोणत्याही महिन्यात तिथे घामाच्या धाराच लागत असतात. मी होतो तेव्हा तिथे मरणाचा उकाडा होता, म्हणून खिडक्या उघड्या ठेवल्या तर सकाळपर्यंत डासांनी माझ्या शरीराचा खिमा केला. सकाळी सातपर्यंत मी तशाच अवस्थेत राहिलो आणि विमान पकडायला गेलो. त्याची मला या निमित्ताने आठवण झाली. आताच्या खेपेला मध्यरात्रीच्या आधी दहाच मिनिटे ही वीज गायब झाली आणि मग पाकिस्तानमध्ये हलकल्लोळ उडाला. पाकिस्तानच्या वीजनिर्मितीची अवस्था अतिशय वाईट असल्याने अनेक शहरांमध्ये हे असे वीज घालवायचे प्रयोग अधूनमधून होत असतात. पण रात्रीची वीज संपूर्ण देशभर एकाच वेळी गायब झाल्याबद्दलचा संशय अनेकांनी व्यक्त केला, तो घातपाताचाच होता. विशेषत: पाकिस्ताननेच पोसलेल्या तालिबानांनी तो केला असावा, असाही अनेकांचा कयास होता.



Pakistan_2  H x 

वीज गायब होण्याच्या घटनेआधी काही दिवस बलुचिस्तानात अकरा शिया पंथीयांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले होते. अनेकांना वाटले की बलूच बंडखोरांनी त्याचा बदला घेतला असावा. मारले गेलेले सगळे हजारा पंथीय कोळसा खाण कामगार होते. ‘पंतप्रधान इम्रान खान जोपर्यंत या हजारा कुटुंबीयांच्या नातलगांना येऊन भेटत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांचे दफन करणार नाहीअसे या कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले. एखादा संवेदनशील पंतप्रधान असता, तर त्यांनी किमानपक्षी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला असता. पण त्यांनी या मृतांच्या नातलगांना ठणकावले की, मृतदेहांच्या जोरावर मलाब्लॅकमेलकरू नका. याला म्हणतात निर्ढावलेला किंवा निगरगट्ट. त्यानंतर लगेचच त्यांना जेव्हा डिजिटल माध्यमांचे काही प्रतिनिधी भेटले, तेव्हा या बहाद्दरांनी सांगितले की हे हत्याकांड भारताने घडवून आणलेले आहे. पाकिस्तानमध्ये भारताकडून दहशतवाद फैलावला जात आहे, त्याचे उदाहरण म्हणजे अकरा हजारा कामगारांची झालेली हत्या. भारत त्यासाठी आता इस्लामिक स्टेटलाही हाताशी धरतो आहे. इतका बेशरम पंतप्रधान पाकिस्तानात आजवर झाला नाही, असे आता जनताच बोलू लागलेली आहे. बलुचिस्तानात माच भागात हे हत्याकांड घडले. त्याबद्दल बोलताना इम्रान खान यांनी हे ठिकाण इतके अंतर्गत भागात आहे की तिथपर्यंत सरकारी यंत्रणांना पोहोचता येणे अवघड असल्याचे म्हटले. म्हणजे जिथे पाकिस्तानची सरकारी यंत्रणा पोहोचू शकत नाही, तिथेभारताचे दहशतवादीआरामात कसे पोहोचू शकतात ते इम्रान खान यांनाच माहीत.



Pakistan_1  H x 

पाकिस्तान सध्या किती भेदरलेला आहे ते मी याआधी एका लेखात सांगितले होते. भारत कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला करील या भीतीने पाकिस्तानला ग्रासलेले आहे. सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरलेले असताना पाकिस्तानातल्या सर्व विमानतळांनारेड ॅलर्टदेण्यात आला होता. पाकिस्तानी हवाई दलाची विमाने भीतीपोटी सर्वत्र घिरट्या घालू लागली होती. या विमानांमुळे उलट भीतीमध्ये वाढच झाली. त्यामुळेच या काळोख्या पाकिस्तानातभारताने पुन्हा बालाकोट केला काय?’ असा प्रश्न ट्विटरच्या किंवा फेसबुकच्या माध्यमातून केला जात होता. कुणीतरी आकाशात झगमगीत दिवा पुढे सरकताना पाहिला आणि मग या भीतीची अधिक गडद छाया आसमंतात पसरली. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानचे एक संरक्षणविषयक तज्ज्ञ आगा हिलाली यांनीबालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात 300 पाकिस्तानी ठार झाल्याचा सनसनाटी दावा केल्याचे वृत्त पसरले होते. मात्र त्याचा खरेपणा तपासून पाहिला असता ते विधान जाफर हिलाली यांनी केले असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबतही ठाम असे काही सांगता आलेले नाही, ज्यावर एकाही प्रमुख पाकिस्तानी नेत्याने खुलासा केला नाही. तो केला असताच, तर त्याचा पाय आणखी खोलातच गेला असता. तर सांगायचा मुद्दा हा की कराचीच्या आकाशात एका विमानाच्या घिरट्या पाहून पाकिस्तान्यांची पाचावर धारण बसलेली होती. तिथल्या नागरिकांनी पाहिले आणि मग सुरू झाले ट्विटर युद्ध. ‘भारत कोणत्याही क्षणी कराचीवर हल्ला करणारअसे संदेश सगळीकडे प्रसारित होऊ लागले. काही जण म्हणाले की, ‘भारत आता असा हल्ला करणार नाही, पण मग मी कशाला विनाकारण लोकांना जागे करून माझ्या मोबाइलचेचार्जिंगसंपवू. ते संपले आणि वीज आलीच नाहीच, तर मग माझा उद्याचा दिवससुद्धा खराब होईल.’ हे झाले ट्विटरचे. पण मग क्लिपनाही जोर चढला. त्यांनीही आपले हात या हाणामारीत धुऊन घेतले. एका क्लिपमध्ये विमानतळावर असलेले लढाऊ विमान उडू शकत नसल्याने त्याला ढकलून चालू करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे सैनिक करत असल्याचे दाखवण्यात आले. खरे-खोटे त्यांनाच माहीत. त्यातच एकाने लिहिले की, ‘पैसे वाचवण्यासाठीपीएमनासीओएएसने सल्ला दिला असला पाहिजे’. आता इथे पीएम म्हणजे पंतप्रधान इम्रान खान आणि सीओएएस म्हणजे लष्करप्रमुख कंवर जावेद बाज्वा, हे सांगायची आवश्यकता नाही. एकाने लिहिले की, ‘इम्रान खान यांना पाकिस्तानचीफेरस्थापनाकिंवाफेरउभारणी’ (रिबूट) करायची असावी. वीज घालवल्याशिवाय ती करता येणार नाही याबद्दल इम्रान खानांच्या मनात शंका नसावी.’ प्रत्यक्षात काय घडले ते काही ट्वीटमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यात चक्क असे सांगण्यात आले आहे की, नसिराबादजवळ असणार्या पॉवर ग्रिडवर बलोच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात तो ग्रिड उद्ध्वस्त झाला आणि त्याचे फळ संपूर्ण पाकिस्तानला भोगावे लागले.


Pakistan_3  H x 

इम्रान खान यांच्या भंपकपणामुळे पाकिस्तान कधी नव्हे एवढा चेष्टेचा विषय झाला आहे. इम्रान खान यांनी गेल्या काही दिवसांमध्ये वृत्तपत्रांना हे छापू नका, ते छापू नका, विरोधकांच्या पाकिस्तानभर चाललेल्या मेळाव्यांना प्रसिद्धी द्याल तर याद राखा, असा वृत्तपत्रांना दम द्यायला प्रारंभ केल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारा एक लेख माझ्या वाचनात गेल्या वर्षी आला होता. झाहिद हुसेन हे त्या पत्रकाराचे नाव आणि तो डॉनमध्ये प्रसिद्ध झाला होता. हुसेन यांनी प्रारंभीच झिया उल हक यांच्या काळात वृत्तपत्रे आपल्याला छापू नका, असा आदेश असलेल्या बातम्यांच्या जागा कोर्या सोडायचे, असे स्पष्ट करूनच तो काळ परत आला आहे की काय, असा सवाल केला आहे. वृत्तपत्रांची वीज घालवली की ती छापणार तरी काय, असा सवाल त्यांनी केला आहे. मात्र हा लेख त्यांनी आता लिहिलेला नाही. त्यांनी 23 ऑक्टोबर 2019 रोजी लिहिलेला हा लेख आहे. याचाच अर्थ हा की पाकिस्तानात हा प्रयोग काही नवा नाही. ते म्हणतात की, ‘एक वर्तुळ पूर्ण झाले असून ते दिवस परत आले आहेत की काय असे वाटावे अशी अवस्था आहे. काय छापा, काय छापू नका हे सांगितले जातेच आहे, त्यात ही यादी वाढतेच आहे. आता कोर्या जागा नसतात, पण वृत्तपत्रे त्यांच्या मुखानेच फक्त बोलत राहत आहेत. पाकिस्तान सरकारच्यापेम्राया माध्यमांवर नियंत्रण ठेवणार्या यंत्रणेने आधी ठरलेली आसिफ अली झरदारी यांची मुलाखतही दाखवू दिली नाही आणि ती छापायलाही बंदी घातली आहे. त्यांच्यावर न्यायालयात खटला चालू असल्याने त्यांना प्रसिद्धी देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नवाझ शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तान मुस्लीम लीगच्या नेत्या मरियम नवाझ यांच्या पत्रकार परिषदांना प्रसिद्धी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.’ मौलाना फजलूर रहमान हे तर पाकिस्तानी शासकांचे प्रमुख लक्ष्य. त्यांना प्रसिद्धी देऊन पाकिस्तानी माध्यमांनी त्यांच्यावर प्रकाशझोतच टाकला आहे. आता वीज गेली की घालवली हे स्पष्ट होण्याची शक्यता नाही. बलोच बंडखोर सरकारला जो काही इशारा द्यायला हवा होता, तो देऊन ते मोकळे झाले, असाही दावा केला जात आहे. त्यातच इम्रान यांच्या विरोधकांनी इम्रान यांच्याकडे पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तो त्यांनी जर 31 जानेवारीपर्यंत दिला नाही, तर हे सर्व विरोधकचलो इस्लामाबादअशी घोषणा करून इस्लामाबादची कोंडी करतील, अशी सध्या तरी या अंधेरनगरीची अवस्था आहे.


अरविंद व्यं. गोखले

9822553076

Powered By Sangraha 9.0