@अमित पेंढारकर
‘शेअरटेल्स’ : दि. २६ ते २९ मे
निफ्टीच्या DownTrend Channel च्या बाहेर प्राईजने ब्रेक आऊट दिलेला आहे. तसेच प्राईज ही २० आणि ५० दिवसांच्या चलत सरासरीच्या वर बंद झाली आहे. या प्रकारच्या संकेताला तांत्रिक विश्लेषणामध्ये प्राईज क्रॉसओव्हर (Price Crossover) म्हणतात. त्यामुळे निफ्टीमध्ये ८७०० चा स्टॉप लॉस ठेऊन ९८०० आणि १०६०० हे लक्ष्य घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. निफ्टी २०० ते ३०० अंकांनी जर खाली आला तर ती आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असेल..
निफ्टी बँक : १९२९७.२५ (+१२७.४५)
निफ्टी मिडकॅप ५० : ३७१३.५५ (+५०.३५)
निफ्टी स्मॉलकॅप २५० : ३५३८.७५ (+४०.३५)
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे जर निफ्टी ९४०० च्या वर जाऊन बंद झाला तर आपल्याला मार्केटमध्ये तेजी दिसून येईल, असा अंदाज मी वर्तवला होता. त्याप्रमाणे निफ्टीचा शुक्रवार २९/०५/२०२० चा क्लोज हा ९५८०.३० आहे. त्यामुळे आपल्याला पुढील काळात शेअर बाजारात तेजी दिसून येईल, अशीच दाट शक्यता आहे. ही सर्व वाटचाल आपण निफ्टीच्या खालील चार्टवरून समजून घेऊ.
निफ्टीच्या वरील चार्टमध्ये आपल्याला एक छोटा DownTrend Channel दिसून येईल. त्या DownTrend Channel च्या बाहेर Price ने ब्रेक आऊट दिलेला आहे. तसेच Price ही २० आणि ५० दिवसांच्या चलत सरासरीच्या वर बंद झाली आहे. या प्रकारच्या संकेताला तांत्रिक विश्लेषणामध्ये Price Crossover असे म्हणतात. त्यामुळे निफ्टीमध्ये ८७०० चा स्टॉप लॉस ठेऊन ९८०० आणि १०६०० हे लक्ष्य घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. निफ्टी २०० ते ३०० अंकांनी जर खाली आला तर ती आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असेल.
आता आपण बँक निफ्टीच्या चार्टकडे वळू.
आता HDFC Bank या शेअरच्या चार्टकडे वळू, जो खूपच Interesting आहे.
वरील HDFC Bank या शेअरच्या चार्टकडे बघितल्यावर असं दिसून येईल की, शेअरने पूर्णतः Higher Low केलेला आहे आणि तो UpTrend Channel मध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळे Higher Low च्या खाली म्हणजे ८०० रुपयाला स्टॉप लॉस ठेऊन UpTrend Channel च्या वरच्या अडथळ्याला म्हणजेच १०४५ ला आपण लक्ष्य ठेऊ शकतो.
काही Recommendations :
खरेदी करा -
१) HDFC Bank : @ ९५२, लक्ष्य – १०४५, स्टॉप लॉस - ८०० (शेअर ९०० च्या आसपास मिळाला तर Risk to Reward चांगला होईल)
२) HDFC Ltd. : @ १६६०, लक्ष्य – १८६४, स्टॉप लॉस - १५०० (शेअर १६०० च्या आसपास मिळाला तर Risk to Reward चांगला होईल)
३) Glenmark Pharma : ३७० च्या पुढे, लक्ष्य – ४००, स्टॉप लॉस - ३४०
-----
- अमित पेंढारकर
(लेखक गुंतवणूक सल्लागार व शेअर मार्केटचे अभ्यासक आहेत)
संपर्क : ९८१९२३०३१० / finmart99@gmail.com
----------
(वरील सर्व निष्कर्ष, अंदाज व मते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)