निफ्टीची वाटचाल : कभी खुशी, कभी गम?

विवेक मराठी    25-Apr-2020
Total Views |


***‘शेअरटेल्स’ दि. २० एप्रिल ते २४ एप्रिल****

निफ्टीने जी ७५११.१० या नीचांकापासून वाढ नोंदवली त्यामध्ये मोठ्या कंपन्यांनी प्रामुख्याने वाढ नोंदवली. त्यात हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL), ब्रिटानिया, नेस्ले, कोलगेट, टीसीएस, एशियन पेंट्स, पीडीलाईट इंडस्ट्रीज, बर्जर पेंट्स अशा काही कंपन्यांचा समावेश होता. त्यामुळे यापुढे निफ्टी समजा घसरला तर या अशा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्याकडे असायला हवेत. त्यामुळे निफ्टी खाली आल्यास गुंतवणूकदारांनी या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत.


nifty in share market_1&n

निफ्टी ५०
: ९१५४.४० (-११२.३५)

निफ्टी मिडकॅप ५० : ३४७०.३५ (-१२३.६०)

निफ्टी बँक : १९५८६.६५ (-१०९४.८०)

निफ्टी स्मॉलकॅप २५० : ३५२३.५० (८६.१५)

वर दिलेले आकडे ही या निर्देशकांची या आठवड्यातील (दि. २० एप्रिल ते २४ एप्रिल) वाढ आणि घट मागील आठवड्यातील आकड्यांशी तुलना करून देण्या आलेली आहे. आहे. निफ्टीने ७५११.१० हा नीचांक दि. २३ मार्च, २०२० रोजी नोंदवल्यानंतर सुमारे २१% इतकी वाढ नोंदवली आहे. हे असं होणं स्वाभाविक आहे कारण निफ्टी ४०% खाली आल्यानंतर एवढी उसळी अर्थातच घेतली जाणारच आहे. आता प्रश्न असा आहे की, ही उसळी यापुढे टिकेल की निफ्टी पुन्हा खाली जाईल. याचं उत्तर आपण तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोधण्याचा प्रयत्न करू.


nifty in share market_1&n

वरील चार्ट हा निफ्टी ५० चा आहे व तो डेली टाइम फ्रेमचा आहे. या चार्टवर आपल्याला एक Price Pattern दिसतोय. हा एक Bearish Pennant Pattern आहे. जर आपण नीट बघितलं तर Price ची हालचाल ही दोन रेषांच्या मधोमध चालली आहे आणि या दोन रेषांचे वरचे आणि खालचे स्तर काढले तर ते ९५०० आणि ८८०० येतात. जर ९५०० हा स्टार तोडण्यात निफ्टी यशस्वी ठरला तर निफ्टी १०००० पर्यंतचे लक्ष गाठेल पण जर ८८०० हा स्टार निफ्टीने तोडला तर निफ्टी ८००० व ७५११ हा स्तरदेखील काही काळामध्ये दाखवू शकतो. त्यामुळे जर कोणाला अल्पमुदतीसाठी (Short term) व्यवहार करायचे असतील तर स्टॉप-लॉस लावून करा व कमी Quantity मध्ये करा.

या आठवड्यामध्ये फार्मा कंपन्यांमध्ये चांगली वाढ दिसून आली. सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, अजंथा फार्मा, अलेम्बिक फार्मा काही फार्मा कंपन्यांमध्ये चांगली वाढ दिसून आली. तसेच निफ्टीने जी ७५११.१० या नीचांकापासून वाढ नोंदवली त्यामध्ये मोठ्या कंपन्यांनी प्रामुख्याने वाढ नोंदवली. त्यात हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL), ब्रिटानिया, नेस्ले, कोलगेट, टीसीएस, एशियन पेंट्स, पीडीलाईट इंडस्ट्रीज, बर्जर पेंट्स अशा काही कंपन्यांचा समावेश होता. त्यामुळे यापुढे निफ्टी समजा घसरला तर या अशा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्याकडे असायला हवेत. त्यामुळे निफ्टी खाली आल्यास गुंतवणूकदारांनी या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत.



nifty in share market_1&n

आपल्यापैकी कुणाला जर पुढील दोन वर्षासाठी शे घ्यायचा झाल्यास Allembic Pharma (Price: 760) हा शेर आपल्या भागभांडारात ठेवा. हा एक Techno Funda Call आहे. त्याचा चार्ट हा खाली दिला आहे. ५ वर्षाचे Consolidation हे खूप चांगल्या Volume ने वरील बाजूस तोडले आहे, सध्याचा भाव हा ७६० असा असून खरेदी करताना ५०० रुपये हा स्टॉप लॉस ठेवून १२०० हे लक्ष ठेवावे.

- अमित पेंढारकर

(शेअर मार्केट अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

संपर्क : ९८१९२३०३१० / finmart99@gmail.com

----------

(वरील सर्व निष्कर्ष, अंदाजमते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)