***धनश्री साने*** ![]() श्रीरामकथेचा आणि रामभक्तीचा मूळ स्रोत वाल्मिकी रामायण आहे. राम, सीता, दशरथ, रामाचे पूर्वज यांचे उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेद, तैतरीय ब्राह्मणे यात आला आहे. देशी-विदेशी अनेक भाषांत वाल्मिकी रामायणाचे भाषांतर झाले आहे. महाभारताच्या नारायणी उपाख्यानात रामाचे नाव आले आहे. भास या नाटककाराने रामकथेवर ‘प्रतिमा’ नाटक लिहिले, तर भवभूतीने ‘महावीरचरित्र’ व ‘उत्तररामचरित्र’ ही नाटके लिहिली. कालिदासाने ‘रघुवंश’ महाकाव्य लिहून रामाचा गौरव गायला आहे. बहुतेक सर्व देशी भाषांमध्ये रामकथेचे एखादे तरी नाटक आढळतेच. भारतीय संतपरंपरेतील अनेक संतांनी आपल्या उपास्य दैवताच्या बरोबरीने श्रीराममाहात्म्य वर्णिले आहे. तुलसीदास, समर्थ रामदास या संतांचे तर श्रीराम हेच उपास्य दैवत. संत सूरदासांनी ‘सूर रामायणा’मध्ये रामभक्तीच्या अनंत लीला गायल्या आहेत. ‘रामचरितमानस’ या ग्रंथाचा कर्ता, महाकवी, श्रेष्ठ रामभक्त तुलसीदासजी यांनी वाल्मिकी रामायणावर आधारित श्रीरामचंद्रांचा गौरव गाणारी अलौकिक कथा अवधी भाषेतील महाकाव्यात शब्दबद्ध केली. या ‘रामचरितमानसा’चे स्थान विश्ववाङमयात अजोड आहे. सर्व प्रकारच्या भवदु:खांवर एकमेव रामबाण औषध म्हणजे रामनामच होय, असे सांगून या महाकाव्यात श्रीराम आरती, श्रीराम नामवंदना, श्रीरामस्तुती, श्रीरामवंदना या पदांमधून रामनामाची महती सांगितली आहे. श्रीरामचंद्र कृपालू भजुमन हरण भवभय दारुणं। नवकंज-लोचन, कंंज-मुुख कर-कंज, पद कंजारूणं ।।१।। |