आयुर्विमा महामंडळाच्या लोकप्रिय विमा योजना - 2

02 Mar 2020 14:16:07

एकेकाळी अत्यंत लोकप्रिय असलेल्या जीवन छाया, जीवन सुरभी, जीवन सुरक्षा, बीमा गोल्ड अशा अनेक विमा योजना एलआयसीने बंद केल्या, तर जीवन आनंद, जीवन लाभ, जीवन उमंग अशा वैशिष्ट्यपूर्ण योजना ग्राहकांसाठी खुल्या केल्या. त्यांपैकी जीवन आनंद आणि जीवन उमंग या योजनांविषयी.

LIC_1  H x W: 0  

दर वर्षी एलआयसी काही नवीन विमा योजना जाहीर करते, तर काही जुन्या विमा योजना बंद करते. कोणत्या प्रकारच्या नवीन विमा योजना आणायच्या आणि कोणत्या जुन्या योजना बंद करायच्या, हे एलआयसीच्या विपणन (मार्केटिंग) विभागाअंतर्गत असलेलासंशोधन आणि विकास कक्षठरवतो. ते ठरवताना ग्राहकांच्या सूचना, एजंटांचा फीडबॅक, इतर विमा कंपन्यांची अधिक विक्री होत असलेली प्रॉडक्ट्स या सर्व बाबींचा अभ्यास करून हा कक्ष बीमांकन (ॅक्चुअरिअल) विभागाकडे त्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेेच्या प्रारूपावरून नवी विमा योजना बेतण्यासाठी वर्ग करतो. हा विभाग मृत्युदर, व्याजदर, महागाईचा दर, विक्रीच्या खर्चाचे अंदाज करूनना नफा ना तोटाया तत्त्वावर भिन्न वयोगटानुसार विमा हप्ता किती असेल याचे गणित मांडते ते अंतर्गत चर्चेनंतर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे आयआरडीए (इर्डाकडे) प्रस्तुत केले जाते. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि स्वीकृतीनुसार ती विमा योजना आयआरडीएच्या संमतीनंतर योग्य वेळी ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाते. काही योजना सीमित कालावधीसाठी खुल्या असतात, तर काही योजना बंद कधी करायच्या ते एलआयसी ठरवते त्यानुसार घोषित तारखेनंतर ती योजना नवीन ग्राहकांना घेता येत नाही. एकेकाळी अत्यंत लोकप्रिय असलेल्या जीवन छाया, जीवन सुरभी, जीवन सुरक्षा, बीमा गोल्ड अशा अनेक विमा योजना एलआयसीने बंद केल्या, तर जीवन आनंद, जीवन लाभ, जीवन उमंग अशा वैशिष्ट्यपूर्ण योजना ग्राहकांसाठी खुल्या केल्या.


जुन्या योजना बंद करणे हा बरेचदा मार्केटिंग स्ट्रॅटेजीचाही (विपणनशास्त्रातील रणनीतीचाही) भाग असतो बरं! विमा प्रतिनिधी त्या निमित्ताने आपल्या ग्राहकांकडे जाऊन त्यांना विमा घ्यायला उद्युक्त करतात मानवी मानसशास्त्राप्रमाणे, बंद होऊ घातलेल्या विमा योजनांची धूमधडाक्यात विक्री होते.

एलआयसीच्या काही लोकप्रिय विमा योजनांची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या.

न्यू जीवन आनंद - एलआयसीचे घोषवाक्यजिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भीखर्या अर्थाने सिद्ध करणारी विमा योजना म्हणजे न्यू जीवन आनंद. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे मुदतीशेवटी विमेदाराला मूळ विम्याची रक्कम ही बोनस अतिरिक्त अंतिम बोनससकट तर प्राप्त होतेच आणि शिवाय तत्पश्चात कुठलाही विमा हप्ता भरता जेव्हा केव्हा विमेदाराचा मृत्यू होईल, तेव्हा पुन्हा नामित व्यक्तीला किंवा वारसदाराला बेसिक सम ॅश्युअर्ड (मूळ विमा रक्कम) दिली जाते. मुदत संपण्यापूर्वी जर विमेदाराचा मृत्यू झाला, तर वारसदारास विम्याची रक्कम बोनससहित देय होते. मुदत संपण्यापूर्वी काही रकमेची गरज भासल्यास या विमा पॉलिसीवर कर्जही उपलब्ध होते. या विम्याला जोडून थोडे प्रीमियम भरून ॅक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी बेनिफिट रायडरही घेता येतो. ही विमा योजना एन्डोमेंट प्रकारात मोडत असली, तरी विमा मुदत संपल्यानंतर तिचे रूपांतर होल लाइफ इन्शुरन्स प्लॅनमध्ये होत असल्याने विमा मुदतीनंतर जेव्हा विमेदाराचा मृत्यू होईल, तेव्हा वारसांना विमा रक्कम प्राप्त होण्याची सोय या खास विमा योजनेत आहे.

इतर कुठल्या विमा कंपनीने ग्रहकांना अशा प्रकारची विमा योजना उपलब्ध करून दिल्याचे ऐकिवात नाही. त्या दृष्टीनेही न्यू जीवन आनंद पॉलिसी एक अद्वितीय विमा पॉलिसी म्हणता येईल. या विमा पॉलिसीत विमेदारास संरक्षण तर प्राप्त होतेच, त्याचबरोबर बचतही होते.

साधारणपणे 30 वर्षे वयाच्या व्यक्तीची 10 लाखाच्या विम्याची न्यू जीवन आनंदची 25 वर्षे मुदतीची पॉलिसी घेतल्यास वार्षिक हप्ता 45,000 रुपये असतो. 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तींना ही पॉलिसी मिळू शकते.

 

जीवन उमंग - होल लाइफ प्रकारातील एक अत्यंत लोकप्रिय विमा योजना म्हणजेजीवन उमंग’. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे विम्याची मुदत संपल्यानंतर तहहयात - म्हणजे विमेदाराच्या मृत्यूपर्यंत सातत्याने मिळत राहणारी पेन्शनसदृश रक्कम.

90 दिवस पूर्ण झालेल्या बालकापासून 55 वर्षे वयाच्या व्यक्तीपर्यंत कुणासही ही योजना घेता येते. प्रीमियम भरत राहण्याचा कालावधी 15, 20, 25 किंवा 30 वर्षे निवडता येतो. मुदत संपतेवेळी विमेदाराचे वय किमान 30 आणि कमाल 70 वर्षे वय असायला हवे. अर्थातच 90 दिवसांच्या बालकाचा विमा घ्यायचा असेल तर तो 30 वर्षे मुदतीचाच घेता येईल, तसेच 55 वर्षे वयाच्या व्यक्तीस जास्तीत जास्त 15 वर्षे मुदतीचाजीवन उमंगप्लॅन घेता येईल.

 

मुदत पूर्ण होण्यापूर्वी जर विमेदाराचा मृत्यू झाला, तर बोनससहित विमा रक्कम वारसदारास मिळते. मात्र मुदत संपेपर्यंत विमेदार जीवित असल्यास त्याला मुदतीनंतर दर वर्षी विमा रकमेच्या 8% रक्कम तो वयाची शंभरी गाठेपर्यंत वा त्याचा मृत्यू होईपर्यंत दिली जाईल. विमेदाराच्या मृत्यूनंतर संपूर्ण विमा रक्कम बोनससहित वारसदारांना मिळेल. विशेष म्हणजे तत्पूर्वी विमेदारास 8% वार्षिक मिळालेली रक्कम मृत्युदाव्यातून वजा होत नाही. एका उदाहरणाने हे स्पष्ट होईल.

 

30 वर्षे वयाच्या व्यक्तीने 15 वर्षे मुदतीचा 10 लाख विमारकमेचा जीवन उमंग प्लॅन घेतल्यास वार्षिक हप्ता जवळपास 80,000 रुपये येतो.

 

वयाच्या 45पूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसदारास 10 लाख रुपये + बोनस + अतिरिक्त बोनस दिला जाईल.

ती व्यक्ती विम्याची मुदत संपल्यावरही जिवंत असल्यास वयाच्या 46पासून मरेपर्यंत त्याला 80,000 रुपये दर वर्षी दिले जातील. शिवाय त्याच्या मृत्युपश्चात वा वयाच्या शंभराव्या वर्षी 10 लाख रुपये + बोनस + अतिरिक्त बोनस एवढी रक्कम दिली जाईल.

आयकर कायद्यातील कलम 10 (10डी)नुसार 80,000 रुपये वार्षिक मिळणारी रक्कम, तसेच मृत्यूनंतर मिळणारी 10 लाखाची बोनससहितची रक्कम करमुक्त आहे. विमा घेण्यापूर्वी या सर्व बाबींची खातरजमा करून घ्यावी.

 

(लेखक इर्डाचे (IRDAचे) माजी सदस्य आहेत.)

Powered By Sangraha 9.0