रुग्णसेवेचा आधारवडस्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णसेवा मंडळ

03 Feb 2020 12:39:07

भरत चेरेकर यांनी  रुग्णसेवा देण्याचे काम सुरू केले. हे काम करताना किमान पेट्रोल खर्च निघावा आणि नोकरीत जेवढे पैसे मिळत होते तेवढे महिन्याला मिळाले तरी खूप झाले, असा विचार केला. त्यानंतर त्यांनी सोबत काम करणाऱ्यांना घेऊन कामाचा व्याप वाढवला. त्यानंतर अनेकांना या समाजोपयोगी कामात येण्याची विनंती केली. काही लोक तयार झाले. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक विनोद कुचेरिया, संवेदनशील डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले. रुग्णसेवेला एक संघटित स्वरूप देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्ण सेवा मंडळ स्थापन केले. आज मंडळाकडे 25 महिला आणि 12 पुरुष आणि ऑॅन कॉल चार डॉक्टर, 2 फिजिओथेरपिस्ट्स अशी टीम आहे.

 
seva_1  H x W:
 

लातूर जिल्हा हा शिक्षणाने राज्य समृध्द करणारा जिल्हा आहे, तसाच उत्तम आरोग्यसेवा देऊन राज्याला सुदृढ करण्यासाठी जिवापाड मेहनत करणारा जिल्हा आहे. लातूर जिल्ह्याचे नाव जसे शिक्षणामुळे देशभर झाले आहे, तसेच लातूर जिल्ह्यातील आरोग्यसेवाही राज्यासह आंध्र, तेलंगण, आणि कर्नाटक या शेजारच्या राज्यांतील नागरिकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. जिल्ह्यातील लातूर आणि उदगीर या दोन ठिकाणी स्वंयसेवी संस्थाच्या माध्यमातून जी आरोग्यसेवा केंद्रे उभी आहेत, त्याचा लाभ तिन्ही राज्यांतील लोकांना होत आहे. काही आजार कायमस्वरूपी किंवा अनेक दिवस इतरांकडून सेवा करून घेणारे असतात. त्यासाठी सेवा देणारे प्रशिक्षित असले की रुग्ण लवकरात लवकर बरा होतो किंवा त्यांचे जगणे तरी सुसह्य होते.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

अर्धांगवायू, उतारवयात बाथरूममध्ये पडून पायाचे, हाताचे, कंबरेचे फ्रॅक्चर होणे, स्मृतिभ्रंशामुळे त्रस्त झालेले रुग्ण आणि त्यांची सेवा करीत करीत अस्वस्थ होणारे त्यांचे नातेवाईक आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. एखाद्या घरात नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असले आणि त्यांच्या आईवडिलांना दीर्घकालीन आजारपण आले, तर त्या घरावर आर्थिक आणि सेवा कशी करावी, कोणी करावी याचे एक संकट येत असते. अशा संकटाला सामोरे जाण्यासाठी मराठवाडयात पहिल्यांदा सेवाभावी वृत्तीने नवे आव्हान समजून नोकरी सोडून काम करणारे तरुण कार्यकर्ते भरत चेरेकर.

भरत चेरेकर पूर्वी विवेकानंद रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात साहाय्यक म्हणून काम करीत होते. त्यांच्या वडिलांना कॅन्सरचा त्रास सुरू झाला. त्यांची सेवा करण्यासाठी भरत यांनी दोन महिने सुट्टी काढून त्यांची सेवा केली. त्याच काळात त्यांच्या मनात विचार सुरू झाला की, रुग्णसेवा देण्याचे सामाजिक काम सुरू केले पाहिजे. त्यानंतर काही दिवस नोकरी आणि गरजू रुग्णाला अशी सेवा देण्याचा प्रयोग सुरू केला. त्यानंतर लक्षात आले की हे पूर्णवेळ आणि एखादी टीम तयार करून करण्याचे काम आहे, म्हणून त्यांनी 15 ऑॅगस्ट 2008 रोजी नोकरी सोडून दिली आणि घरोघरी जाऊन रुग्णसेवा देण्याचे काम सुरू केले. हे काम करताना किमान पेट्रोल खर्च निघावा आणि नोकरीत जेवढे पैसे मिळत होते तेवढे महिन्याला मिळाले तरी खूप झाले, असा विचार केला. त्यानंतर त्यांनी सोबत काम करणाऱ्यांना घेऊन कामाचा व्याप वाढवला. त्यानंतर अनेकांना या समाजोपयोगी कामात येण्याची विनंती केली. काही लोक तयार झाले. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक विनोद कुचेरिया, संवेदनशील डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिल आणि वेदनारहित रुग्णसेवा (पेनलेस सर्व्हिस) कशी देता येईल, याचे प्रशिक्षण दिले.

रुग्णसेवेला एक संघटित स्वरूप देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्ण सेवा मंडळ स्थापन केले. आज मंडळाकडे 25 महिला आणि 12 पुरुष आणि ऑॅन कॉल चार डॉक्टर, 2 फिजिओथेरपिस्ट्स अशी टीम आहे. या सगळयांना डॉ. राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब आणि डॉ. माया आणि मधुकरराव कुलकर्णी यांच्या ममता हॉस्पिटलमध्ये नियमितपणे प्रशिक्षणाच्या कार्यशाळा घेतल्या जातात. डॉ. बाजीराव जाधव हे थिअरीचे प्रशिक्षण करून घेत आहेत.


आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

या मंडळाच्या सेवेकऱ्यांनी राज्यात आणि राज्याबाहेरही गरजेप्रमाणे सेवा दिली आहे. लोणावळा, पुणे, औरंगाबाद, बेंगळुरू आदी ठिकाणी एक ते तीन महिन्यांपर्यंत रुग्णांची सेवा केली आहे.

seva_1  H x W:

रुग्णांना लागणारे साहित्य अत्यंत खर्चीक असते आणि गरज संपल्यानंतर त्याचे काय करावे असा प्रश्न निर्माण होतो. रुग्णासाठी फॉवलर बेड, व्हीलचेअर, एअरबेड, नेब्युलायझर, बायपॅप मशीन, कमोड चेअर, रूम वॉर्मर, इलेक्ट्रिकल पोर्टेबल सक्शन मशीन, मसल स्टिमुलेटर आदी अनेक साहित्य अत्यल्प दरात उपलब्ध झाले आहे. गेल्या 17 वर्षांत 2,700 परिवारांनी या मंडळाच्या सेवेकऱ्यांच्या सेवेचा लाभ घेतला आहे.

ज्यांनी ज्यांनी या सेवेकऱ्यांकडून सेवा करून घेतली, ते व त्यांचे नातेवाईक मंडळाविषयी अत्यंत कृतज्ञतापूर्वक, डोळयात पाणी आणून आपल्या भावना व्यक्त करतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

''या मंडळाची रुग्णसेवा अनुभवल्यानंतर मला महात्मा गांधीच्या आणि बाबा आमटेंच्या रुग्णसेवेच्या कार्याची आठवण येते'' असे रा.ग. महाले यांनी म्हटले आहे.

छाया अजय गजबहार या महिनेने व्यक्त केलेली प्रतिक्रिया तर खूपच बोलकी आहे - ''या मंडळातर्फे जी सेवा पुरवली जाते, ती काळाची अत्यंत गरज आहे. कारण गरीब लोकांना जास्त पैसे देऊन नव्या वस्तू खरेदी करता येत नाहीत. कमी दरात ही सेवा मिळते. त्यामुळे गरिबांना, गरजू व्यक्तींना ते देवाचे वरदान म्हणावे लागेल. माझे पती दोन महिने पलंगावर पडून होते. कुबडया घेतल्यानंतर आमच्या घरातील कर्ता पुरुष चालू लागला, तेव्हा आमच्या घरच्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरला, तो मी शब्दात सांगू शकत नाही.''

पर्यावरणतज्ज्ञ पत्रकार अतुल देऊळगावकर म्हणाले, ''सावरकर रुग्ण सेवा मंडळाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना मंडळ कर्मचारी म्हणेल, परंतु ते रुग्णाची सेवा अगदी घरच्या माणसासारखी करतात. पेशंट हा शब्द पेशन्सशी संबंधितच आहे. अत्यंत संयमाने, प्रेमाने ते जे सेवा करतात, ती खूपच कौतुकास्पद आणि सध्याच्या जगातील महत्त्वाची सेवा आहे. माझ्या वडिलांसाठी आणि आता आईच्या सेवेसाठी माझ्या घरी मी अनुभव घेतला आहे. या मंडळीमुळे, त्यांच्या सेवेमुळे मी निर्धास्तपणे प्रवास करू शकलो, लेखन करू शकलो आहे, हे मी आवर्जून सांगेन. सगळयात महत्त्वाचे म्हणजे, या कर्मचाऱ्यांना आजाराविषयीची जाण चांगली आहे. रुग्णाच्या वर्तनात होणारा बदल त्यांना खूप चांगला कळतो. आम्ही डॉक्टरांना त्याची माहिती दिल्यानंतर त्यंानी औषधेसुध्दा बदलून दिली आहेत.''

 

विमा एजंट म्हणून काम करणारे राजेंद्र शेटे म्हणाले, ''चेरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे माझ्या वडिलांना आजारपणातही पुन्हा जीवन जगणे शक्य झाले आहे.''

रुग्णाविषयी या सेवेकऱ्यांना कसे ममत्व निर्माण होते, याचा दाखला देताना गिरीश चंद्रशेखर प्रयाग म्हणाले, ''माझ्या आईची सेवा करणारी व्यक्ती माझ्या कुटुंबीयांपैकीच एक आहे अशा भावनेमुळे मी मानसिकरीत्या स्थिर राहू शकलो. जेव्हा आईचा अंतिम क्षण होता, त्या वेळी मला अश्रू आवरणे भाग होते. परंतु सावरकर मंडळाच्या रुग्णसेविका सुनीता माने ह्या स्वत: बोलू शकल्या नाहीत, कारण अश्रूंनी डोळे भरलेले होते आणि कंठ दाटून आला होता.''

या सेवेची गरज ओळखून, आता समाजही मोठया मनाने या सेवेला सहकार्य करू लागला असल्याची माहिती देताना रमेश चेरेकर म्हणाले, ''रुग्ण सेवाचा विस्तार, विकास करण्यासाठी पैशाची, वस्तूंची आवश्यकता आहे. ज्यांनी या रुग्णसेवेला लाभ घेतला आहे, ते लोक आता मदत करीत आहेत. ज्येष्ठ वकील संजय पांडे यांनी पन्नास हजार रुपये किमतीच्या तीन गाद्या मंडळाला दिल्या आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष मन्मथअप्पा लोखंडे यांनी त्यांच्या पत्नीच्या वर्षश्राध्दाला कमोड असलेली व्हीलचेअर दिली आहे. आम्हाला असे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा आहे.''

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
Powered By Sangraha 9.0