दिल्ली दंगे गृहयुद्धाची नांदी ?

29 Feb 2020 16:26:55

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियोजित भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून दिल्लीत उसळलेल्या दंगलींमुळे येथील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली. या हिंसक घडामोडींचे निरीक्षण केले तर लक्षात येते की हे केवळ नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधासाठी नसून हिंसा करून लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी आहे.


What is the truth _1 

नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत पास झाला आणि देशातील काही ठिकाणी हिंसक आंदोलने चालू केली गेली. पोलिसांनी नंतर व्यवस्थित कारवाई करून ही हिंसक आंदोलने आटोक्यातदेखील आणली. पण नागरिकता संशोधन कायद्याविरोधात हिंसक आंदोलने करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान का? विशेषत: जेव्हा असे केले, तेव्हा नुकसान करणार्या लोकांकडून उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे भरपाई वसूल करण्यास सुरुवात केली, त्याने या आंदोलनांमधील हिंसा बंद होऊन शाहीन बाग आंदोलनासारखे वर वर दिसायला शांततापूर्ण आंदोलन असले, तरी स्थानिक नागरिकांना एक प्रकारचे टॉर्चर आणि शासनाला ब्लॅकमेल करणे असेच होते. यातच दिल्ली निवडणूक पार पडून तिथे पुन्हा केजरीवाल सरकार आले. सरकारने शपथ घेतली, तर शाहीन बाग प्रकरण न्यायालयात आणि न्यायालयाने शाहीन बाग आंदोलकांशी बोलायला तीन प्रतिनिधींची नियुक्ती केली. बोलणी चालू करूनही तीन दिवसात फरक पडला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नियोजित भारतभेट 25 फेब्रुवारीपासून होती. असे वाटत होते की आता शाहीन बागचा तमाशा संपेल आणि सगळे सुरळीत होईल. पण आपल्याकडे एक समस्या आहे की आपण एकतर इतिहास (भूतकाळ) चटकन विसरतो आणि त्यातून काही शिकतही नाही. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर (पूर्वतयारी करून) ही हिंसक आंदोलने पुन्हा घडवून आणली गेली.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

तीन दिवस दिल्लीतील नऊ भागांतील तांडव

रविवार 24 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये जाफराबाद मेट्रो स्टेशनच्या तिथे शाहीन बागसारख्याच मुसलमान महिला मुलांसह रस्त्यावर येऊन रस्ता अडवून बसल्या. आता शाहीन बागवरून धडा घेऊन पोलिसांनी तिथे अश्रुधुराच्या नळकांड्या सोडून रस्ता मोकळा केला. त्याच ठिकाणी बाहेर भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी पोलीस निरीक्षकांसमोरतीन दिवसांत शाहीन बाग रिकामी करा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेलअसे वक्तव्य केले. दिल्लीत नऊ ठिकाणी (करावल नगर, यमुना विहार, भजनपुरा, चांदबाग, गोकुलपुरी, कर्दमपुरी, मौजपूर आणि बाबरपुरा) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हिंसक निदर्शने चालू केली गेली. पाहता पाहता या हिंसेने भयावह स्वरूप धारण केले. गोकुलपुरी परिसरात दंगेखोरांना शांत करण्यास गेलेल्या कॉन्स्टेबल रतनलाल यांना जमावाने भोसकून मारले. त्यांच्या शवविच्छेदनामध्ये त्यांच्या शरीरातून बंदुकीची गोळीदेखील निघाली, याचाच अर्थ जमावातील कुणीतरी त्यांना पिस्तुलातून गोळीदेखील मारली. खजुरी खास भागात राहणार्या आय.बी.च्या एका कर्मचार्यासकट चार जणांना जमावाने ओढून आपचे स्थानिक नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या इमारतीत नेऊन मारले आणि दुसर्या दिवशी तीन जणांचे मृतदेह जवळच असलेल्या चांदबागमधील अतिशय घाणीने भरलेल्या नाल्यातून मिळाले. लोकांचे म्हणणे आहे की त्या नाल्यात अजूनही मृतदेह सापडतील, कारण दंगे झाले त्या दिवसांपासून बरेच जण नाहीसे झालेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ताहिर हुसैन यांच्या इमारतीच्या गच्चीवरून आजूबाजूच्या परिसरातील घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पेट्रोल बाँब, दगड-विटा टाकण्यात आल्या. दिल्लीतील हे भाग तीन दिवस जळत होते. अनेकांची घरे, दुकाने जाळली. अनेकांना जमावाने घरातून किंवा घराबाहेरून किंवा दुकानातून ओढून नेऊन मारून टाकले. या सगळ्याचे व्हिडिओज यूट्यूबवर पाहावयास मिळतील. हे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधासाठी नसून फक्त हिंसा करून लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी आहे, हे स्पष्ट आहे.


 What is the truth of the 

काही महत्त्वाची निरीक्षणे

1) ज्या भागांमध्ये हे सगळे घडविले गेले, ते सर्व भाग देशाच्या संसद भवन परिसरापासून फक्त 40-50 मिनिटांच्या अंतरावर होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येण्याआधी एक दिवस दंगे चालू झाले आणि ते परतल्यावर हे दंगे आटोक्यात आले. आपल्याकडे याआधी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी भेटी दिल्या, त्या वेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करून आपले अस्तित्व दाखवून दिलेले होते. ह्या वेळी फरक असा होता की 370 कलम रद्द केल्याने आणि काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये ठेवल्यामुळे तिथे काही झाले नाही. पण दिल्लीमध्ये नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधाच्या नावाने पाकिस्तानधार्जिण्या लोकांनी दंग्यांमार्फत आणि जाळपोळ करून देशाच्या राजधानीत, संसद भवनापासून काही किलोमीटर परिसरात काश्मिरातील परिस्थिती निर्माण केली आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवायांची परंपरा राखली.

2) पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश मुहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळावर भारतीय हवाई दलाने जे हवाई हल्ले केले, त्याला 26 फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. दिल्लीत अशा प्रकारे भयानक दंगल घडवून अंतर्गत दहशतवादाच्या माध्यमातून त्याचा बदला घेणे असाही असू शकतो.

3) नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात लोकांना भडकविण्यासाठी पाकिस्तानी आय.एस.आय.ने फेसबुक-ट्विटरवर खोटी खाती उघडून त्याविरुद्ध अपप्रचार चालू केलेला असल्याचा अहवाल गुप्तहेर खात्याकडून मिळालेला आहे. बीबीसी, अल जझीरा, वायर यांसारख्या माध्यमांतून ताबडतोबपंतप्रधान अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतात मग्न आणि दिल्ली जळतेयअशा आशयाच्या शीर्षकओळी टाकून ताबडतोब देशाला बदनाम केले गेलेय.

4) पोलिसांनी सी.सी.टी.व्ही. चित्रीकरणावरून ज्या दंगेखोरांना ओळखले आहे, त्यानुसार ईशान्य दिल्लीत सक्रिय असलेल्या दोन टोळ्यांमधील लोक या आंदोलकांमध्ये सामील झालेले होते. या टोळ्यांनी पिस्तुलांचा आणि पेट्रोल बाँब्जचा, तसेच ॅसिडचा मुक्तहस्ते वापर केला. अशा प्रकारे दंगे करणे हे तर या टोळ्यांचे काम आहेच, पण यांना नक्की कोणी आणले, हे शोधण्याचे काम दिल्ली पोलीस करत आहेत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

5) या दंग्यांमध्ये दिल्लीत राहणार्या भारतीय नागरिकांचे अतोनात नुकसान झालेय. अनेकांचे रोजगार गेलेत, अनेकांची दुकाने जळली आहेत, अनेकांची घरे जळली आहेत, होत्याचे नव्हते झालेय. आत्तापर्यंत 40च्यावर लोकांचे मृतदेह मिळाले आहेत आणि हा आकडा वाढण्याचीच शक्यता आहे. म्हणजेच अनेक संसार उघड्यावर आलेत आणि कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. 300पेक्षा जास्त जखमी झालेत. हा आकडा आणखी वाढतच आहे. यातील किती हिंदू किती मुसलमान यापेक्षा हे सगळे भारतीय नागरीक आहेत हे महत्त्वाचे असले, तरीही हिंदुबहुल भागांमधील लोक बेपत्ता आहेत, हे सत्य नाकारू शकत नाही.

6) शाहीन बाग काय किंवा हे तीन दिवसातील दंगे काय, यातून भारतीय अर्थव्यवस्थेलादेखील धक्का बसलेला आहेच. कारण अशा प्रकारे दंग्यांमुळे शहर जळत असेल, आंदोलनांमुळे महिनोन्महिने रस्ते अडवले जात असतील, तर लोक कामावर पोहोचणार कसे? यामुळेच परदेशी गुंतवणूकदार नव्याने गुंतवणूक करणे सोडाच, तर केलेली गुंतवणूक काढून घेण्याचीच शक्यता जास्त. म्हणजे देशाचे आर्थिक नुकसान झालेले आहे.

7) हे सगळे दंगे, जाळपोळ पूर्वनियोजित होते. सोशल मीडियात स्थानिक लोकांनी टाकलेल्या व्हिडिओजमधून तर ते स्पष्टच होतेय आणि पोलिसांच्या चौकशीतून हे बाहेर येईलच.

8) भाजपाच्या कपिल मिश्रांच्या वक्तव्यामुळे या दंग्यांचे खापर त्यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न चालू आहे. पण ही एक दिशाभूल आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात चुकीची माहिती आणि अफवा काँग्रेस, आप आणि इतर विरोधी नेत्यांनी लोकांमध्ये पसरविली आहे आणि आता लोकांची माथी भडकावून, राष्ट्रद्रोही शक्तींना सक्रिय होण्यास प्लॅटफॉर्म तयार करून देऊन हे लोक नामानिराळे राहिले आहेत. सोनिया गांधींचे व्यासपीठावरून जनतेला उद्देशून केलेले भाषण ऐका - “या कायद्याविरोधात लोकांनी पेटून रस्त्यावर उतरले पाहिजे.” वारिस पठाणांचे व्यासपीठावरून केलेले वक्तव्य - “हम 15 करोड आप 100 करोडोंपर भारी पडेंगे”... यापेक्षा कपिल मिश्रांचे वक्तव्य खूपच मवाळ आहे.

9) जे लोक नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत आणि प्रश्न विचारत आहेत की याची इतक्या तातडीने काय गरज होती? देशात बेरोजगारी किती आहे, अर्थव्यवस्था किती ढासळलीये? या मुद्द्यांवर मोदी सरकारला शिव्या घालत आहेत, ते या दंगेखोरांना, शाहीन बागी दहशतवाद्यांना पाठिंबाच देत आहेत. मग यामुळे जो बेरोजगार निर्माण केला गेला आहे, त्याचे काय? यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले गेले आहे, त्याचे काय? म्हणजेच या लोकांचा दुटप्पीपणा आणि मोदी सरकारला अकारण विरोध करण्याची प्रवृत्तीच दिसून येते आहे.

 

10) नुसती राजकीय लोकांची वक्तव्ये लक्षात घेतली, तर त्यांनी घडविलेला परिणाम लक्षात येईल. आता दंग्यांनंतर यांची वक्तव्ये पाहा. लगेच गृहमंत्री आणि पंतप्रधान यांचा राजीनामा मागून मोकळे. त्यामुळे स्वत: भानगडी करायच्या आणि बिले दुसर्याच्या नावावर फाडायची प्रवृत्ती दिसून येतेय. लोकशाही मार्गाने बहुमताने सत्तेत आलेले सरकार असांविधानिक मार्गाने खाली खेचण्याचा डाव रचला गेलाय.

यातून घेण्यासारखे धडे

1) सर्वच भारतीयांनी यातून धडे घेणे गरजेचे आहे. आपण जेव्हा राजकीय नेत्यांच्या खोट्या अपप्रचाराला बळी पडतो, त्या वेळी आपलेच अतोनात नुकसान होते. आपली घरे, दुकाने जेव्हा जळत असतात, आपली मुले जेव्हा मारली जात असतात, तेव्हा राजकीय नेते मंडळी स्वत:च्या घरात बसून किंवा कोणत्या तरी चॅनलवर येऊन लांबून एकमेकांवर दोषारोप करण्यात मग्न असतात. त्यांना आपल्या आयुष्यात काय घडतेय याचे सोयरसुतक नसते. दिल्लीतील तसेच इतर दंगलग्रस्त भागातील लोकांनी हे अनुभवले असणारच.

 

2) सोशल मीडियावर किंवा कुठेही लिहिताना, बोलताना, मजकूर शेअर करताना आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची तर काळजी घ्यायचीच, पण समजा कोणी आपल्या भावना दुखावत असेल, तर लगेच सायबर पोलिसांत तक्रार दाखल करा, प्रत्युत्तर म्हणून आपण तेच करू नका.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

2) हेच लोक महाविद्यालयात जाणार्या आपल्याच मुलांना स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी चुकीची माहिती देऊन, भुलवून त्यांचा वापर करून घेतात. त्यामुळे अखंड सावध राहणे गरजेचे.

3) अशा प्रकारे हिंसक आंदोलने/दंगे, तसेच शाहीन बागसदृश आंदोलने होतात, तेव्हा त्यात टोळीवाले, लुटारू, दरोडेखोर, पैसे घेऊन दंगे पसरवणारे, दहशतवादी हे लोक घुसण्याचीच शक्यता अधिक असल्याने या अशा गोष्टींमध्ये आपण सामील होणे हेच इष्ट आहे.


 What is the truth of the 

4) हिंदूंनी (सर्वच - म्हणजे अतिसेक्युलर, पुरोगामी, लिबरल यांनीदेखील) एक गोष्ट लक्षात ठेवा की दिल्लीतील या नऊ भागांत राहणार्या कुटुंबांनी (हिंदू-मुसलमान दोन्ही) स्पष्ट सांगितले की आम्हाला काश्मीरमधील परिस्थिती अनुभवण्यास मिळाली, आम्ही घाबरलेलो होतो... आम्ही फक्त आमचा जीव आणि आमच्या बायका-मुलींचा जीव अब्रू कशी वाचेल याचाच विचार करत होतो. काहींना तर 1947मधील फाळणीच्या वेळची दृश्ये, परिस्थिती आठवली, काहींना बंगालमधील दंगलींची आठवण झाली. या सगळ्यात साम्य काय आहे, तर मुसलमान - मग तो तुमचा कितीही चांगला शेजारी असला, तरी जेव्हा धर्मबांधवांची हाक येते, तेव्हा तो तुमचा शेजारी राहत नाही की माणूस राहत नाही. तो फक्त मुसलमान होतो आणि त्याला जे काही करायचे आहे ते करतो. मग ते तुमची घरे लुटारूंना दाखविणे असेल, तुमच्या घरातील मुलांना ओढून नेऊन मारून टाकणे असेल किंवा तुमची घरे जाळणे असेल किंवा तुमच्या घरातील आया-बहिणींची अब्रू लुटणे असेल... हे सगळे कधी होते? जेव्हा ते संख्येने अधिक होतात. प्रत्यक्षात दंगे करणारे, जाळपोळ करणारे बाहेरचेही असू शकतात. पण मग ते ओळखून त्यांना बाहेर काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

5) यासाठीच एन.आर.सी., एन.पी.आर. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे या लोकांना नियंत्रणात ठेवता येईल. आत्ता फक्त 14% आहेत तर इतके करताहेत, संख्या आणखी वाढली तर सगळ्यांना धर्मांतर करावयास लावतील. म्हणूनच हे सर्व कायदे 100% काय, 200% अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा त्यांचे हात बळकट करून आणि स्वत:ला, स्वत:च्या पुढच्या पिढ्यांना वाचविणे गरजेचे आहे, नाहीतर ही गृहयुद्धाची नांदी ठरेल.


Powered By Sangraha 9.0