शिवाजी महाराजांचे व्यापारी कर्तृत्व आणि परकीय

23 Dec 2020 18:04:13

महाराजांच्या इंग्रजांबाबतच्या नीतीचे विश्लेषण करताना त्यातील धोरण इंग्रजांविरुद्ध जमिनीवर सर्वत्र प्रभुत्व, सागरावर कुरबुरी आणि व्यापारात सलोखा असे तिहेरी आहे. जमिनीवर कोकणामध्ये महाराज त्यांच्या सर्वच शत्रूंच्या वरचढ होते. अगदी सुरुवातीपासून त्यांनी कोकणावरच लक्ष केंद्रित केले होते.


shivaji maharaj_1 &n

मुंबईच्या व राजापूरच्या इंग्रजांचा पत्रव्यवहार आपण मागील लेखात पाहिला. व्यापारातील अनिश्चितता आणि अण्णाजी पंतांनी वस्तुरूपाने इंग्रजांच्या मालाची अदा केलेली किंमत हे विषय त्यात होते. वस्तुविनिमयाबाबत मुंबईच्या इंग्रजांचे मत खालील पत्रात बघू. हे पत्र १२ मे १६७५ चे आहे.

अशा महाग दराने नारळ सुपारी देण्याने अण्णाजी अन्याय करत आहे हे खरे आहे. परंतु आपल्या सर्वच सावकारांना हाच माल अशाच दराने देण्याचा त्याचा प्रघात असला तर आपल्याला तक्रारीला फारशी जागा राहत नाहीअण्णाजी हा तिकडील व्हाइसरॅायच्या अधिकारावर अंमलदार असल्यामुळे चतुर असल्यामुळे आपल्या दर्जाप्रमाणे आपला मान ठेवला जावा असे त्याला वाटणे साहजिक आहे, तरी त्याचा योग्य मान ठेवा. आपल्या दर्जाला शोभेल असेच तुम्ही वागा, परंतु उद्दामपणा कृतघ्नपणा करू नका. ज्यांच्याशी तुम्हाला वागायचे आहे, ते मराठे चतुरस्र चौकस बुद्धीचे आहेत. त्यांच्याशी वागताना मर्यादेने आणि मित्रत्वाने वागावे. भावनाप्रधान किंवा फाजिल घमेंडखोर लोकांची केवळ कुचेष्टा करूनच थांबता ते त्यांच्यापासून स्वतःचा शक्य तितका फायदा करून घेतातशिवाजीचा सेनापती कारवारला आला, तेव्हा तुम्ही त्याला भेटायला गेला नाहीत हे बरे केले नाही. त्याच्या सर्व प्रधानांना सेनापतींना चांगल्या रितीने वागवले पाहिजे.’

त्यानंतर जुलै १६७५ ची मुंबईकरांची नोंद अशी -

अनेक गोष्टींची आग्रहाची मागणी करणारे पत्र घेऊन शिवाजीचा वकील रेसिडेंटकडे आला. परंतु शिवाजीला आधीच विकलेल्या मालाबद्दल त्याच्याकडे बरेच येणे आहे. तो रोकड देता माल, नारळ किंवा सुपारी मोबदल्यात देतो. त्यामुळे कंपनीचा काहीच फायदा होत नाही. त्याबरोबरच शिवाजी आता प्रबळ झाला असून कंपनीचा पुष्कळ व्यापार त्याच्याच प्रदेशातून चालतो आणि त्याच्या सगळ्या मागण्या झिडकारल्यास कंपनीच नुकसान होईल, ह्याही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.’

महाराज कंपनी ह्यांच्यातील संबंध अनेकपेडी होते. इंग्रज हे समुद्रावर व्यापारात महाराजांपेक्षा खूप अनुभवी प्रभावी होते. पण महाराज हळूहळू त्यांना कुठे ना कुठे जड जाऊ लागले होते. सुरुवातीच्या काळात महाराज त्यांना केवळ एक बंडखोर भूमिया किंवा जहागीरदार वाटत. मुघल बादशहा आणि आदिलशाह हेच त्यांना दख्खनमध्ये दखलपात्र वाटत. महाराजांना इतर मराठ्यांना ते फारसे विचारात घेत नसत. राजकीय लष्करीदृष्ट्या ते चुकीचेही नव्हते. पण अफझलखानाच्या मोहिमेनंतर त्यांना आपले मत बदलत न्यावे लागले. मामुली बंडखोर ते नवीन शक्तिशाली सत्ता असे महाराजांचे स्थान बदलले, उंचावले. पण महाराजांनी उभारलेले नौदल, कोकणातील आक्रमक हालचाली, व्यापारी उद्योग यामुळे इंग्रज काहीसे जास्त सावध होऊ लागले होते. इतर भारतीय राजांपेक्षा हे पाणी वेगळेच आहे आणि आपल्या महत्त्वाकाक्षांना अडथळे आणणारे आहे, ह्याची जाणीवही त्यांना होऊ लागली होती. खरे तर तुझे-माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेनाअशीच दोघांची अवस्था झालेली होती. त्यामुळे डाव-प्रतिडाव, शह-प्रतिशह असे बुद्धिबळ रंगायला लागले होते. एखादा कुशल बुद्धिबळपटू जसा एकाच वेळी अनेक स्पर्धकांबरोबर लढत असतो, तसे महाराज कोकणात पोर्तुगीज, डच, सिद्दी, फ्रेंच ब्रिटिश या पाश्चात्त्यांशी लढत होते, तर देशावर आदिलशहा आणि मुघल यांच्याशी!

पोर्तुगीज हे समुद्रावर प्रभावी आणि जमिनीवर चिवट असे असले, तरी जगात सर्वत्र त्यांचा व्यापार प्रभाव ओसरत चालला होता. त्याचबरोबर धार्मिक बाबतीत ते अत्यंत कट्टर, कडवे आणि जुलमी होते. तीच बाब सिद्दीची. या दोघांनाही महाराज कट्टर शत्रूच मानत आणि त्यांना जमिनीवर शक्य तितके रट्टे मारत समुद्रावर मात्र तगडे आरमार, लांब पल्ल्यांच्या तोफा दारूगोळा यांच्याअभावी फार मोठ्या लढाया टाळत. छोट्या छोट्या चकमकी दबावाचे राजकारण सतत चालू ठेवत. फ्रेंच डच हे पश्चिम किनाऱ्यावर फार प्रभावी नव्हतेच. पण व्यापारासाठी महाराज त्यांना फारसे दुखावत नसत. इंग्रज हे सर्वांचे समान शत्रू होते, हासुद्धा एक मुद्दा होताच. महाराज फ्रेंच डच या दोघांकडून काही जरुरीच्या वस्तू (शस्त्रे, दारूगोळा .) विशेषतः फ्रेंचांकडून जरूर घेत, पण इंग्रजांशी या दोघांचे जे वैर होते, त्यात त्यांच्या बाजूने कधी उभे राहत नसत. कारण इंग्रजांची शस्त्रे, नौदल व्यापार या दोघांपेक्षा अधिक बळकट होती. अर्थात इंग्रज आणि हे सर्व परकीय आपले शत्रूच असल्यामुळे त्यांना या देशातून हाकलणेच आवश्यक आहे, हे महाराज ओळखून होते. पण त्यासाठी आपल्या एकट्याचे बळ आणि अवधान पुरेसे नाही, हेही ते समजून होते. त्यामुळे शक्तीचा आणि बुद्धीचा गरजेप्रमाणे वापर करून ते सतत लढतच होते. एकाच माणसाने इतक्या गोष्टी निर्धारपूर्वक आणि एवढ्या चिकाटीने कराव्यात, हे खरोखर चमत्कार म्हणावे तसेच आहे.

महाराजांचे पोर्तुगीजांशी कसे संबंध होते, ते आपण ह्यापूर्वीच्या लेखांमध्ये बघितले. त्यातून लष्करी कारवाईबरोबरच आर्थिक बाबतीतही महाराज शत्रूची कशी कोंडी करत, ते दिसते. इंग्रजांच्या बाबतीत लष्करी संघर्ष कमी तर व्यापारी बुद्धिबळ जास्त, असे महाराजांचे धोरण होते. त्या वेळच्या परिस्थितीला साजेसे असेच हे धोरण होते. महाराजांच्या व्यापारी धोरणातले प्रमुख मुद्दे त्यांचे व्यापारी कौशल्य निर्विवादपणे दाखवतात.

महाराज वस्तुविनिमयावर जास्त भर देत होते. तो स्वराज्यासाठी फायदेशीर आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी तोट्याचा होता. पण धूर्तपणे महाराज तोच पुढे रेटत होते

महाराजांनी आपल्या ताकदीचा वचक योग्यरित्या बसवला होता.

महाराजांची माणसे हुशार आणि चौकस आहेत हे इंग्रजांसारख्या मोठे जग पाहिलेल्या लोकांनाही मान्य करावे लागत होते.

वस्तुविनिमयात किंवा विक्रीत महाराज / अण्णाजी दत्तोंसारखी त्यांची माणसे खूप चढ्या भावाने विक्री करू शकत होते.

इंग्रजांना ते वखारीची जागा मोफत लवकर बांधून देत होते. त्यामुळे व्यापारी अनुसंधान वाढत होते.

इंग्रज काही बाबतीत नाराज असले, तरी महाराजांच्या व्यापारी कौशल्याबाबत खूप आशावादी होते.

भू-राजनैतिक वर्चस्वाचा फायदा महाराज योग्य रितीने उठवू शकत होते.

महाराजांचा / प्रतिनिधींचा व्यापाऱ्यांशी सर्व संबंधित लोकांशी उत्तम नियमित संपर्क होता. दळणवळण त्यांच्या नियंत्रणात होते.

महाराज मोठ्या मुदतीचे क्रेडिट सहज घेऊ शकत होते.

महाराजांनी त्यांच्या दुय्यम मंडळींनीही व्यापाराची तत्त्वे पद्धती चांगल्या आत्मसात केल्या होत्या.

वरील सर्व लक्षणे उत्तम व्यापाऱ्याचीच आहेत.

महाराजांच्या इंग्रजांबाबतच्या नीतीचे विश्लेषण करताना त्यातील धोरण इंग्रजांविरुद्ध जमिनीवर सर्वत्र प्रभुत्व, सागरावर कुरबुरी आणि व्यापारात सलोखा असे तिहेरी आहे. जमिनीवर कोकणामध्ये महाराज त्यांच्या सर्वच शत्रूंच्या वरचढ होते. अगदी सुरुवातीपासून त्यांनी कोकणावरच लक्ष केंद्रित केले होते. कोकण आणि त्यालगतचे सह्याद्रीच्या विविध शिखरांवरील किल्ले हेच त्यांचे बलस्थान होते. आदिलशहा आणि मुघल ह्यांचे निजामशाहीच्या पाडावानंतर (शहाजी वजीर असताना) जरी निजामशाही कोकणाचे वाटप आदिलशाही आणि मुघल ह्यांच्यात झाले असले, तरी कोकणचा मुलूख दुर्गम गैरसोयीचा (ह्या दोन्ही शाह्यांसाठी) असल्याने त्यांनी तिथे भक्कम आणि प्रभावी असे नियंत्रण ठेवलेलेच नव्हते. समुद्र, आरमार याबाबत या दोन्ही शाह्या जवळजवळ निष्क्रियच होत्या. सिद्दीला अधूनमधून आपल्या पंखाखाली घेण्याव्यतिरिक्त त्यांचे प्रत्यक्ष कार्य, सामर्थ्य फारसे नव्हतेच. महाराजांनी सुरुवातीपासून त्याचाच फायदा उठवला. जावळी काबीज केल्यानंतर व्यापार, जकात, व्यापारी आणि लढाऊ नौदल, सागरी किल्ले यात महाराज खूप सक्रिय झाले. त्यानंतर आरमारी ताकद वाढवत नेणे हे सतत चालू राहिले. यामध्ये इंग्रजांशी आपोआप संघर्ष निर्माण झाला. जमिनीवर महाराज पहिल्यापासूनच वरचढ होते. त्यामुळे इंग्रजांच्या एकूण कपटनीतीला त्यांनी राजापूर, हुबळी आणि धरणगाव येथील इंग्रज वखारी लुटून जोरदार प्रत्युतर दिले. आधी मराठी आरमार बाल्यावस्थेत असताना महाराजांनी इंग्रजांशी कुठेच समुद्री / नाविक लढाई केली नाही, पण सुमारे २२ वर्षांत त्यांनी आपली आरमारी ताकद इतकी वाढवली की खांदेरी किल्ल्याच्या बांधकामप्रसंगी त्यांनी इंग्रजांशी यशस्वी नाविक लढाई करून त्यांना माघार घ्यायला लावली. हे यश पाहता महाराजांना आणखी १० वर्षे आयुष्य लाभले असते, तर पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी मराठ्यांचेच वर्चस्व निर्माण केले असते. अर्थात इतिहासातजर-तरला काही स्थान नसते, त्यामुळे पुढच्या अनेक अनिष्ट गोष्टी टळल्या नाहीत. असो. बाकी पुढील लेखात.

Powered By Sangraha 9.0